लोकसभाअध्यक्षपदी पुन्हा Om Birla, भाजपचे ३ मास्टरस्ट्रोक ! | Rahul Gandhi | PM Modi | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • लोकसभाअध्यक्षपदी पुन्हा Om Birla, भाजपचे ३ मास्टरस्ट्रोक ! | Rahul Gandhi | PM Modi | Vishaych Bhari
    १८ व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी लागले. देशात सलग तिसऱ्यांदा भाजप प्रणित एनडीए सरकार सत्तेत आलेलं असून देशभरातील सर्व संसद सदस्यांचा शपथविधी आता पार पडला आहे. मागील १२ तासांमध्ये संसदेच्या लोकसभेतील सभागृहात विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रेसच्या राहुल गांधी यांची तर लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे. काहीशा नाट्यमय घडामोडीनंतर ओम बिर्ला हे सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. लोकसभा उपाध्यक्षपदासाठी भाजपने विरोधकांना विश्वासात न घेतल्याने विरोधकांनी काँग्रेसच्या ८ वेळा खासदार राहिलेल्या के सुरेश यांचा नामांकन अर्ज दाखल केला. लोकसभेच्या इतिहासात केवळ चौथ्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक लागली. जवळपास ५० वर्षानंतर होत असलेल्या या अध्यक्षपद निवडणूकीसाठी विरोधकांनी मतदानाची केलेली मागणी मात्र प्रोटेम स्पीकर भर्तृहरी महताब यांनी फेटाळली. संसदेत अपेक्षित बहुमत असल्याने आवाजी मतदानानेच ओम बिर्ला यांचं अध्यक्षपदाच्या नावासाठी शिक्कामोर्तब झालं. बलराम जाखड यांच्यानंतर ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष बनणारे ओम बिर्ला हे दुसरेच व्यक्ती ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू या तिघांनी मिळून ओम बिर्ला यांचे आभार व्यक्त केले आणि त्यांना त्यांच्या आसनापर्यंत नेऊन सोडलं. यावेळी राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांनी हस्तांदोलन केल्याचं चित्रही देशवासियांना पहायला मिळालं. दरम्यान बिर्ला यांच्या निवडीने भाजपने तीन मास्टरस्ट्रोक खेळल्याच्या चर्चां माध्यमविश्वात रंगताना दिसतायत. त्याचाच थोडक्यात आढावा आपण या व्हिडीओतून घेऊयात,
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #ombirla
    #rahulgandhi
    #ombirlalive
    om birla,om birla vs k suresh,om birla lok sabha speaker,om birla win lok sabha speaker,lok sabha speaker om birla,om birla speaker,om birla speaker of lok sabha,om birla new speaker,om birla elected lok sabha speaker,om birla news,om birla and k suresh file nomination,om birla and k suresh,om birla win lok sabha speaker election,om birla live,new lok sabha speaker om birla,pm modi om birla,om birla elected new lok sabha speaker
    #विषयचभारी

КОМЕНТАРІ • 4