|| वैभवशाली महिला भजन मंडळ || कोण चालता हो ! आता माझे संगाती ?गावोगावी करण्यासी जन - जागृती !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • वैभाशाली महिला भजन मंडळ
    कोण चालता हो ! आता माझे संगाती ?
    गावोगावी करण्यासी जन - जागृती ! ।।
    सेवा करण्याची कोणा लाभली मती ।
    आशापाश सोडोनिया निघा पुढती ।।धृ0।।
    आता, देशापुढे हेची वाढवूया प्रेम ।
    शेती आणि माति यांच्या उन्नतीचे काम !
    सहकारी तत्त्व सांगू, करू प्रगती ।
    गावोगावी करण्यासी जन-जागृती ! ।।१।।
    भ्रष्टाचार गुंडगिरी बहूत वाढली ।
    फुटाफूट आपसात गावेहि नासली ।।
    कोणिना कुणाचे मानी, भ्रष्टली मती ।
    गावोगावी करण्यासी जन जागृती ।।२।।
    हरीनाम संकीर्तन चालेना कोठे ।
    जिकडे-तिकडे तमाशांचे प्रस्थ हे मोठे ।।
    सट्टेबाजी -चोरीजारी, वाढली अती ।
    गावोगावी करण्यासी जन-जागृती ! ।।३।।
    व्यसनाधीन लोक बहूसंख्य वाढले ।
    तरुणांचे स्वास्थ्य सारे लयाला गेले ।।
    तुकड्यादास म्हणे अंत पहावा किती ।
    गावोगावी करण्यासी जन-जागृती ! ।।४

КОМЕНТАРІ •