धैंचा..खताचे झाड...ऊस खोडवा पिकात फक्त ७००रुपयात .. खत,अच्छादन...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • शेतकरी मित्रांनो या भागात आपण हिरवळीच्या खताविषयी म्हणजे धैंच्या या पिकाविषयी माहिती पाहणार आहोत.... एकरी बियाणे :- धैंच्या या पिकाचे ज्यावेळी आपण हिरवळीचे खत म्हणून घेणार असतो त्यावेळी एकरी २१ ते २५ किलो बियाणे वापरले पाहिजेत. पाणी :- या पिकासाठी फक्त तीन पाणी देणे आवश्यक आहे. जास्त पाण्याची गरज नाही. खत व्यवस्थापन:- या पिकासाठी खत देण्याची गरज नाही परंतु चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी एकरी २० किलो १०:२६:० वापरल्यास फायदेशीर ठरते. काढणी:- या पिकाचे ४५ ते ५० दिवस म्हणजे शेंग कोवळी असताना नांगराच्या मदतीने मातीआड करावा. एकरी उत्पादन:- धैंच्या या हिरवळीच्या पिकातुन आपणास एकरी ८ ते ९ टन खत तयार होते. हिरवळीचे खते माहिती असावी हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती ,झाडांचा पाला किंवा पानांसह कोवळ्या फांद्या बाहेरुन आणून अथवा मुद्दाम जमिनीमध्ये पेरुन वाढलेली पिके फुलो-यावर आली म्हणजे शेतात नांगरून ती गाडून एकजीव करणे या वनस्पतींच्या हिरव्या व कोवळ्या अवशेषांपासून तयार झालेल्या खतास "हिरवळीचे खत "असे म्हणतात. हिरवळीच्या खताचे फायदे :- •ही जवळजवळ प्रति हेक्टरी ५० १७५ किलो नत्राचे योगदान करते . •फार मोठ्या प्रमाणात जमिनीत कर्बाचे प्रमाण वाढवते . •मातीची पाणी व अन्नद्रव्ये धरून ठेवणयाची क्षमता वाढवते . •मातीत फायदेशीर सुक्ष्म जीवाणूंच्या निर्मितीचे प्रमाण वाढवते •मातीच्या भौतिक रासायनिक व जैविक पोतावर किंवा वातावरणात कुठल्याही प्रकारचे प्रदुषण होत नाही. •सर्वसाधारपणे शेंगवर्गीय पिकांपासून बनलेले १ टन हिरवळीचे खत २.८ ते ३ .० टन शेणखताच्या बरोबर असते. या खतांच्या आच्छादनाने जमिनीची धुप होत नाही . हिरवळीच्या खतांचे प्रकार - हिरवळीच्या खतांचे दोन प्रकार आहेत . १) शेतात लगवड करून घेण्यात येणारी हिरवळीची खते : जेव्हा हिरवळीच्या खतांचे पीक शेतात सलग ,मिश्न किंवा एखाद्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून पेरतात व त्याच शेतात ते पीक फुलो-यावर येण्यापूर्वी शेतात नागंरून मिसळतात ,तेव्हा त्याला शेतातच घेण्यात येणारे हिरवळीचे खत असे म्हणतात .या प्रकारच्या हिरवळीच्या खतामध्ये ताग, गवार ,चवळी ,धैचा ,मूग ,मटकी ,मेथी ,लाख ,मसूर ,वाटाणा ,उडीद ,कुळीथ,सेंजी,शेवरी ,लसुरघास ,बरसीम या पिकांचा समावेश असतो. २) हिरव्या कोवळ्या पानांचे हिरवळीचे खत :- पडीक जमिनीवर अथवा जंगलात वाढणा-या वनस्पतीची कोवळी हिरवी पाने आणि फांद्या गोळा करून शेतात गाडणे अथवा पडीक जमिनीवर किंवा शेताच्या बांधावर हिरवळीच्या झाडांची लगवड करून त्याचा पाला आणि कोवळ्या फांद्या शेतात पसरवून नांगरणीच्या अथवा चिखलणीच्या वेळी मातीत मिसळणे होय .हिरवळीच्या खतासाठी गिरिपुष्प , शेवरी ,करंज ,सुबाभुळ ,टाकळा,कर्णिया,ऎन ,किंजळ यांची झाडे व झुडपे पडीक जमिनीत वाढ्वून त्यांच्या हिरव्या पानाण्चा व कोवळ्या फांद्याचा हिरवळीच्या खतासाठी वापर करतात . हिरवळीचे खत तयार करण्याच्या पध्दती - १) निरनिराळ्या हंगामातील पिकांचे हिरवळीचे खत करण्याच्या वेळी हिरवळीचे पीक फुलो-यावर आलेले असावे .ही पिके ६ ते ८ आठवड्यात फुलो-यावर येतात .ही पिके ज्या शेतात घेतली असतील त्याचे खत तयार करावे .या हिरवळीच्या पिकांची पाने बाहेरून आणतात ती जमिनीवर पसरवून नांगरामागे टाकून गाडावीत .ट्रायकोडरमा चा उपयोग केल्यास ह्या खताची प्रत वाढविता येईल . २) नुकत्याच फूलो-यात आलेले हिरवळीच्या पिकांची जमिनीलगत कापणी करावी . कापलेले हिरवळीचे पीक शेतात लोखंडी नागंराने तास घेउन नागंराच्या प्रत्येक सरीमध्ये उपलब्ध प्रमाणात टाकावे .नंतर नागंराच्या दुस-या तासाच्या वेळी अन्यथा धानाच्या चिखलणीच्या वेळी संपूर्ण गाडले जाईल याची काळजी घ्यावी .हिरवळीचे पीक जमिनीत गाडून झाल्यावर वरुन फळी किंवा मैद फिरवावा .त्यामुळे जमिनीत गाडलेले सेंद्रिय पदार्थ पूर्णपणॆ झाकले अथवा दाबले जाऊन ते कुजण्याची क्रिया वेगाने सुरु हाते. ३) हिरवळीचे पीक कुजण्यास जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा लागतो म्हणून सर्वसाधारणपणे हिरवळीच्या पिकांची पेरणी जून अथवा पावसाच्या सुरवातीस करुन आँगस्टमध्ये गाडणी करावी . हिरवळीचे पीक गाडण्याच्या वेळी जर पाऊस पडला नाही किंवा जमिनीलगत ओलावा कमी असेल तर पाणी द्यावे .त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया जलद होईल . ४) शेतात उपलब्ध काडी कचरा व गवत ह्यांचे ढिग शेतात जागोजागी करुन कुजण्यास ठेवावे व योग्यवेळी जमिनीत गाडावे कुजण्याची प्रक्रिया लवकर होण्यास ३ .५ फुट x ३.५ फुट खड्डयात गवत व काडी कचरा कुजवता येईल . हिरवळीच्या खतांची पिके :- धैचा - तागापेक्षा काटक असे हिरवळीचे हे पीक असून कमी ,पर्जन्यमान ,पाणथळ िकाण ,क्षारमय अथवा आम्लधर्मीय जमिनीत सुध्द हे पिक तग धरु शकते .या वनस्पतीच्या मुळांवर तसेच खोडावरही गाठी दिसून येतात या गाठीमध्ये रायझोबियम जीवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात . या पिकांच्या लगवडीसाठी हेक्टरी २५ ते ४० किलो बियोणे पावसाळ्याच्या सुरूवातीस शेतात पेरावे . बियाण्याची उगवण लवकर होण्यासाठी त्यास गंधकाची प्रक्रिय करून परत थंड पाण्याने धुवावे आणि त्यानंतर रायझॊबियम जीवाणू संवर्धनाची प्रक्रिय बियाण्यास करावी .पिकाच्या वाढीसाठी आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करून पीक ६ ते ७ आठवड्यात ९० ते १०० से .मी .उंचीपर्यत वाढले असता जमिनीत नांगराने गाडून टाकावे .या काळात धैच्यापासून १० ते २० टनापर्यत हिरव्या सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते .या वनस्पतीत नत्राचे शेकडा प्रमाण ०.४६ ट्क्के इतके आहे .भाताची लावणी करण्यापूर्वी आठ दिवस पीक जमिनीत गाडल्यास हेक्टरी ८० किलो नत्राची उपलब्धता होऊ शकते . अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चायनल नक्की सबस्क्राइब करा. Tag,dhaynchya,ताग,धैंच्या,हिरवळ,खत,नांगरट,पाडवा,योग्य वेळ,एकरी,बियाणे,hektri, Marathi, #धैंचा #ताग #आधुनिकशेतीचागोडवा #हिरवळीचेखत

КОМЕНТАРІ • 44

  • @vilassonavane9191
    @vilassonavane9191 Рік тому +1

    माहिती खूप छान सांगितली आहे.

  • @jayantwaghulade5867
    @jayantwaghulade5867 Рік тому +1

    खुप चांगली माहिती

  • @prashantzanpure8075
    @prashantzanpure8075 Рік тому +1

    Very nice

  • @vijaykaikade8411
    @vijaykaikade8411 Рік тому +1

    Hirvadichya khatala gavar chalte ka

  • @kashinathchormale4713
    @kashinathchormale4713 Рік тому +1

    Dhainchya ch lagwad aani Kapanicha kharch kiti ahe acre la

  • @mithunrathod6703
    @mithunrathod6703 Рік тому +3

    बियाना आहे का

  • @dinkarpatil3590
    @dinkarpatil3590 Рік тому +1

    ऊस लागवड व धैचा पेरणी व ऊस बांधणी केव्हा करावी

  • @roshan-yognamaskar
    @roshan-yognamaskar 10 місяців тому

    याची कटाई कशी केली मग दादा? काय पद्धत आहे त्याची?

  • @sudamghadage951
    @sudamghadage951 2 роки тому +1

    ऊस तोडणी नंतर किती दिवसांनी बी टाकावे?

  • @vineetsumo27
    @vineetsumo27 2 роки тому

    खूप छान

  • @mahamarathiofficial3642
    @mahamarathiofficial3642 2 роки тому +1

    👌🏻👌🏻खूप छान

  • @SiddikshekhSiddikshekh
    @SiddikshekhSiddikshekh Рік тому +1

    Bij kah milta

  • @navnathzate1183
    @navnathzate1183 Рік тому +1

    सर कापूस मार्च मध्ये काढतो आम्ही मार्च मध्ये ताग+धैच्या घेतला तर चालेल का म्हणजे खरीप हंगाम पर्यंत ताग+धैच्या निघून जाईल सर या वर्षी शीतीची लेवलींग मार्च मध्ये करणार आहे शेतीची लेवलींग केल्यानंतर घ्यायला चालल का व त्यानंतर खरीप हंगाम मध्ये त्यावर स्वयाबीन पीक घेतल तर चालेल का नक्की Reply द्या सर🙏

  • @dhanrekhagoatfarm154
    @dhanrekhagoatfarm154 Рік тому +1

    Sheli palan madhe chara mhanun upyog hoil ka

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Рік тому +1

      होय नक्कीच होतो...धन्यवाद...

  • @marotiwadikar7224
    @marotiwadikar7224 Рік тому +1

    हरभरा च्या मुळीमुळे खत तयार होयो काय

  • @high-techpro6886
    @high-techpro6886 7 місяців тому

    खत कोणते द्यावे

  • @devashishjadhao8975
    @devashishjadhao8975 2 роки тому +1

    भाऊ मी नितीन जाधव
    गाव दापुरा
    तालुका तेल्हारा
    जिल्हा अकोला
    खार पानं पट्टा असलेल्या आमच्या जमिनीसाठी हिरवळीचे खत म्हणून धेंचा
    योग्य राहील की ताग

  • @OmkarKulavmode-ow6wo
    @OmkarKulavmode-ow6wo 9 місяців тому

    धैंचा ला आणखी दुसरी नावे आहेत का

  • @bharatsalgare701
    @bharatsalgare701 2 роки тому +2

    धेंच्या खत 45 दिवसात कापलं तर चालत का?

  • @vilassonavane9191
    @vilassonavane9191 Рік тому +1

    265 हा ऊस जानेवारीअखेरपर्यंत जात आहे तरी तिसऱ्या पिकासाठी निडवा हा ऊस ठेवावा की नाही हे माहिती सांगणे.

    • @mayur_1218
      @mayur_1218 2 місяці тому

      Tudva nasel tar problem nahi

  • @parasramdeshatwad1181
    @parasramdeshatwad1181 2 роки тому +1

    Halad pikasathi tag kiva dhaincha kasa waprava

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 роки тому

      हळद पिक लागवड करण्याच्या आगोदर बेवड करावा लागेल सर...

  • @panduranggangane9134
    @panduranggangane9134 2 роки тому +1

    खोडवा पिकामध्ये पाचट ठेवावी का ढेचा किंवा ताग टाकावा

  • @dattatraykanase3204
    @dattatraykanase3204 2 роки тому +1

    धैचाचे बीयिने कोठे मिळेल.

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 роки тому +1

      अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद...

  • @dev99212
    @dev99212 2 роки тому +1

    हलद मध्य हान प्रयोग करता येईल ना…

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 роки тому +1

      हळद पिकांमध्ये हा प्रयोग नाही करता येणार.

    • @dev99212
      @dev99212 2 роки тому +1

      @@adhuniksheticagodva दोन बेड चाय मध्य टाकाले तर टन पन होकर नहीं आनी नाइट्रोजन पन भेटेल…

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 роки тому +1

      हो सर बरोबर आहे.

  • @vivek_kshirsagar5991
    @vivek_kshirsagar5991 2 роки тому

    Apllya,samja,,mokalya,vavarat,dhiechya,lagavad,karun,jaminicha,pot,sudharacha,ahe,tar,kadhi,Ani,Kashi, lagavad,karavi,mahiti,deny,sathi,1seperate,video, upload,karava,hi,req,

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 роки тому

      होय सर आम्ही नक्कीच संपूर्ण माहितीसह नविन व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहोत...धन्यवाद...

  • @mahaeshbaber8118
    @mahaeshbaber8118 4 дні тому

    मी महेंद्र बाबर नंबर सांगा तुमचा

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 2 роки тому +2

    हे बी कुठे मीळेल तुमचा मो.न.द्या

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  2 роки тому +1

      अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद...