कलिंगड लागवड संपूर्ण माहिती | kharbuja lagwad mahiti marathi |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • ▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
    👉लिंक - krushidukan.bh...
    ====================================================================
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.
    आजचा विषय - 🌱कलिंगड लागवड संपूर्ण माहिती | kharbuja lagwad mahiti marathi | #watermelon #kalingad #bharatagri👍
    👉हंगाम - खरीप, रब्बी ,उन्हाळी . तीनही हंगामात लागवड करता येत असली तरी उन्हाळी हंगामात म्हणजेच डिसेंबर जानेवारी मध्ये या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते.
    👉मशागत - आडवी उभी खोल नांगरट करून घ्यावी .त्यात शेणखत टाकावे (कमीत कमी ३ टन /एकरी , शेणखत कुजलेले नसेल तर त्या मध्ये कंपोस्टिंग बॅक्टेरीया मिसळावा (२ लिटर / एकरी ) पुढे रोटाव्हेटरच्या मदतीने ढेकळे फोडून माती बारीक करून घ्यावी .
    👉जाती -
    1. आइस बॉक्स सेगमेंट - शुगर क्वीन , सागर किंग, मैक्स , बाहुबली, मेलडी
    2. शुगरबेबी सेगमेंट -अगस्टा , शुगर पैक, आयशा
    3. जुबलीओवल सेगमेंट - नामधारी NS 295 , मधुबाला
    4. एक एकर कलिंगड लागवडीसाठी 250 ते 500 ग्रॅम संकरित बियाणे वापरावे.
    👉लागवड पद्धत - टोकण पद्धतीने बी लागवड किंवा पुनर्लागवड करता येते. टोकण पद्धतीमध्ये उगवणक्षमता कमी राहते. न उगवलेल्या ठिकाणी पुन्हा बी टोकावे लागते. पर्यायाने खर्चात वाढ होते. शक्यतो रोपे कोकोपीट ट्रेमध्ये तयार करून लागवड करावी. रोपे तयार होण्यासाठी 20-25 दिवसांचा कालावधी लागतो. लागवडीपूर्वी बेड पूर्ण ओले करावेत. गादीवाफ्यात वापसा स्थिती आल्यावर रोपांची लागवड सकाळी किंवा संध्याकाळी करावी.
    👉लागवड करताना काय काळजी घ्यावी -
    1. रोपाचे वय - २० ते २५ दिवस
    2. लागवड अंतर - ६*१.५ ते २ फूट
    3. रोप प्रक्रिया - इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल - १ मिली + कार्बेन्डाझिम - २ ग्रॅम/ १ लिटर पाणी .
    👉मल्चिंग पेपरचा वापर - गादीवाफ्यावर ठिबक अंथरल्यावर कलिंगड लागवडीपूर्वी 1.25 मीटर रुंद आणि 400 मीटर लांब प्रति रोल सिल्वर मल्चिंग पेपर (30 मायक्रॉन जाडीचा) अंथरावा. यामुळे जमिनीचे तापमान, आर्द्रता, अनुकूल राहून पांढऱ्या मुळ्यांची वाढ उत्तम होते. पाण्याची बचत, तणनियंत्रण, खताची बचत तसेच काहीशा प्रमाणात रसशोषक किडींचे नियंत्रणही होते. एकरी पेपरचे 4-5 रोल लागतात. रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी ठिबक सिंचन लॅटरल आणि मल्चिंग पेपर अंथरल्यानंतर कलिंगड लागवडीसाठी वाफ्याच्या मध्यभागी 2 फूट अंतरावर 10 सें.मी. व्यासाची छिद्रे तयार करावीत. दोन्ही बाजूने लागवड पद्धतीमध्ये मल्चिंग पेपर अंथरल्यानंतर 2 इंची पाईपच्या तुकड्याच्या सहाय्याने ड्रीपरच्या दोन्ही बाजूला 10 सें.मी. अंतरावर छिद्रे पाडावीत. एकाच बाजूच्या दोन छिद्रामधील अंतर 2 फुट ठेवावे. पुनर्लागवड केलेली रोपे प्लास्टिक पेपरला चिकटणार नाहीत याची काळजी घ्यावी.
    👉ठिबक सिंचन - ठिबक सिंचनासाठी 30 से.मी. अंतरावर इमीटर असेल्या इनलाईन लॅटरल (2 लिटर/ तास क्षमतेच्या) गादीवाफ्यावर मधोमध टाकाव्यात. दोन लॅटरलमधील अंतर 6 फुट ठेवावे. फळधारणा व फळवाढीच्या अवस्थेत एकसारख्या प्रमाणात पाणी द्यावे. फळे पक्वतेवेळी पाण्याचे प्रमाण कमी करावे, जेणेकरून फळामधील शर्करा व गराचे प्रमाण उत्तम राहील.
    👉बेसल डोस -
    - १८:४६:०० - ५० किलो
    - पोटॅश - ५० किलो
    - मिक्रोनिट्रिएंट्स - ५ किलो
    - मॅग्नेशिअम सल्फेट- ५ किलो
    - नीम पेंड - २०० किलो
    - फोरेट - ५ किलो
    ( महत्वाची सूचना - आपल्या जमीन च्या माती परीक्षण नुसार आपण डोस घेऊ शकता . )
    👉विद्राव्य खते कशी सोडावी -
    शाखीय वाढ - १९:१९:१९: आणि १२:६१:००
    फुल आणि फुटवा -१२:६१:०० आणि १३:४०:१३
    फळ सेटिंग - १२:६१:०० आणि १३:००:४५
    फळ फुगवण - ००:५२:३४ आणि १३:००:४५
    फळ परिपक्वता - ००:००:५०
    👉फवारणी मधून अन्नद्रव्य व्यवस्थापन -
    1. पीक 15 दिवसाचे झाले असता 19:19:19 - 3 ग्रॅम + IFC स्कुबा (सीवीड अर्क) 1.5 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.
    2. पीक फुलोरा आणि फळ धारणा अवस्थेत असताना 00:52:34 - 5 ग्रॅम + IFC मायक्रोनुट्रीएंट 1 ग्राम प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. फुलोरा अवस्थेत 00:52:34 सोबत सूक्ष्मअन्नद्रव्यांची फवारणी केल्यास बोरॉनची उपलब्धता होऊ शकते.
    3. बोरॉनच्या कमतरतेमुळे फळांचे तडकण्याचे प्रमाण वाढते.
    4. फळ पोसत असताना 13:00:45 या विद्राव्य खताची 5 ग्रॅम प्रति लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
    अशा पद्धतीने नियोजन केल्यास नक्कीच एकरी ३० ते ३५ टॅन उत्पादन काढू शकतो.
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम मराठी - bit.ly/3B9Ny8G
    👉इंस्टाग्राम हिन्दी - bit.ly/45XAj88
    👉वेबसाइट - krushidukan.bh...
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

КОМЕНТАРІ • 21

  • @ratanbhakare9801
    @ratanbhakare9801 Місяць тому

    ❤❤❤

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Місяць тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!

  • @dokedragonfarmbhutwad9207
    @dokedragonfarmbhutwad9207 3 місяці тому +1

    Sir 25 मे la कलिगड lawata येईल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  3 місяці тому +1

      सर आपण लागवड करू शकता , धन्यवाद सर !

    • @dokedragonfarmbhutwad9207
      @dokedragonfarmbhutwad9207 3 місяці тому

      @@bharatagrimarathi सर आपले मार्गदर्शन होईल का

  • @appukoli6201
    @appukoli6201 8 місяців тому +3

    10जानेवारी पर्यंत कलिगड लागवड केल तर चालेल का

  • @bharatpawar619
    @bharatpawar619 19 днів тому

    नोव्हेंबर महिन्यात कलिंगड लागवड केला चालेल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  14 днів тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @user-rd7ts3ch3q
    @user-rd7ts3ch3q 12 днів тому

    कलिंगड लागवडी नंतर किड व रोग याच्या संबधी माहीती मिळावी.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  11 днів тому

      आपण पुढील लिंक वर क्लिक करून कलिंगड किड व रोग याच्या संबधी माहीती पाहू शकता! ua-cam.com/video/rNhWgNdtRUc/v-deo.html

  • @suniladhenike5973
    @suniladhenike5973 8 місяців тому

    Sir calcium naitret ani boron che dose sangitale nahi

  • @dineshgadhe900
    @dineshgadhe900 7 місяців тому

    Sir बियाणे चे टोक kshe पाहिजे o Kali ka var

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 місяців тому

      आपण बियाणे कसे लावलं तरी चालते पण शक्यतो बियाणांचे टोक वरती असावे .

  • @nikhilkukade6735
    @nikhilkukade6735 7 місяців тому +1

    रोप कुठं मिळतील

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 місяців тому

      आपण विचारल्या प्रमाणे जवळच्या नर्सरी मध्ये विचारलं तर मिळेल किंवा दुकानातून बी घेऊन जरी दिल तरी रोपे तयार करून देतील नर्सरी मध्ये .

  • @amit1168
    @amit1168 6 місяців тому

    प्रत्येक खत किती किलो प्रती एकरी वापरावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 місяців тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @luckywaghmode3867
    @luckywaghmode3867 6 місяців тому

    Sir कलिंगड लागवड कधी करावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  6 місяців тому

      ua-cam.com/video/V-mPo5G5vNA/v-deo.html या लिंक मध्ये आपण कलिंगड लागवड माहिती पाहू शकता ,धन्यवाद सर !

  • @user-mv1rw3mu9h
    @user-mv1rw3mu9h 8 місяців тому

    खोडवा उसात लागण केली तर चालते काय