Tatiche abhang 11 | संत मुक्ताबाईचे अभंग | विवेचन | ब्रम्हचैतन्य वाणी | ताटी उघडा ज्ञानेश्वरा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • Tatiche Abhang 11
    amzn.to/2QpFJFm
    संत मुक्ताबाईचे अभंग ११
    अहो क्रोधे यावें कोठें । अवघे आपण निघोटे ॥
    ऐसें कळलें उत्तम । जन तेची जनार्दन ॥
    ब्रीद बांधिलें चरणीं । नये दावितां करणीं ॥
    वेळे क्रोधाचा उगवला । अवघा योग फोल झाला ॥
    ऐशी थोर दृष्टी धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
    अर्थविवरण :- मनुष्याचा क्रोध हा त्याच्या आधिन आसला पाहिजे,जर कोणी
    आपणाला विनाकारण त्रास देत आसेल तर, त्याला तीन वेळ समजावून सांगा.गुन्हा नसतानाही त्याची माफी मागा,तरी तो तुम्हाला त्रासच
    देत आसेल तर,तुम्ही ही तुमचा क्रोध त्या वेळी त्याचा
    उपयोग करा,त्यावेळी मात्र तुम्ही गप्प बसु नका,
    प्रथम आपल्याला चांगले काय व वाईट काय याचे ज्ञान
    झाले पाहिजे,हे सारे जनच त्या ईश्वराणे निर्माण केलेले आहे,जो तो आपल्या कर्मा
    नुसार फळ भोगित आसतो,
    त्यामुळे त्याला शिक्षा त्याचे
    कर्मच त्याला देते,त्याला आपण शिक्षा देतो हे म्हणनेच
    चूकिचे आहे,
    आपण मात्र त्या भगवंताचे ब्रिद बाधावे,व त्याच्याच चरणावर आपला
    विश्वास ठेवावा, जे जे होते ती
    सारी त्या ईश्वराचीच करणी
    आहे,हाच आपला ठाम विश्वास आसावा,
    आपण आपल्या जिवणात
    विनाकारण क्रोध आणुनये,
    कितीही कठीण प्रसंग आला तरी,त्याचा उदय आपल्या
    जिवणात होवू देवू नये,नाही
    तर आपल्या जिवणाची सारी
    साधना व्यर्थ जाईल,हे मात्र
    लक्षात ठेवावे,

КОМЕНТАРІ •