Tatiche abhang 12 | संत मुक्ताबाईचे अभंग | विवेचन | ब्रम्हचैतन्य वाणी | ताटी उघडा ज्ञानेश्वरा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • Tatiche Abhang 12
    amzn.to/2QpFJFm
    संत मुक्ताबाईचे अभंग १२
    अवघी साधन हातवटी । मोलें मिळत नाही हाटीं ॥
    शुद्ध ज्याचा भाव झाला । दुरी नाही देव त्याला ॥
    कोणी कोणास शिकवावें । सार साधुनिया घ्यावें ॥
    लडिवाळ मुक्ताबाई । जीव मुदल ठायीचे ठायीं ॥
    तुम्ही तरुनी विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
    अर्थविवरण :- आईसाहेब
    म्हणतात की,प्रत्येक साधन
    तुमच्या जवळ आहे,त्याचा
    कसा व योग्य उपयोग करायचाय तुम्ही ठरवायचे आहे,कारण तुम्हाला बुद्धी ही दिली आहे,तीचा मनुष्याने उपयोग करुण घ्यावा,
    ते फुकट मिळतय हे खुळ प्रथम तुमच्या डोक्यातुन काढुन टाका,त्यासाठी चांगल्या गुरुचेच मार्गदर्शन
    लागते,व प्रयत्नाची पराकाष्ठा
    लागते,व त्यासाठी निष्ठावंत भाव किंवा शुध्द भावाची जोड लागते,या शिवाय दुसरे
    काहीच लागत नाही,
    मग तुम्हाला पंढरपूर ला जाण्याची गरज नाही, तुम्ही जिथं आहात तिथंच पंढरपूर निर्माण होतो, तुम्ही जे कर्म करता तीच भगवंताची भक्ती होतो,त्याला दुसरी भक्ती करण्याची गरज नाही, म्हणुन तुमचा शुद्ध एक भाव करा,देव तर तुमच्या जवळच आहे,
    इंथ कुणी कुणाला काय शिकवावे,खर काय व खोटे
    काय आहे,ते समजून घ्यावे,
    आईसाहेब म्हणतात की,ज्ञान
    दादा मी आज्ञानी आहे,मला
    काहीच कळत नाही,मी जीव
    आहे,का ब्रम्ह आहे,हेच काहीच कळत नाही,या जगातील लोकाणाही काही
    कळत नाही,
    म्हणुन ज्ञानदादा तुम्ही ताटी
    मधुन बाहेर या,तुम्ही ही या
    जन्म मरण या भवसागरातुन
    तरुण जा,व या विश्वा मधील
    सार्या लोकाणा तरुण जाण्याचा मार्ग दाखवा,

КОМЕНТАРІ • 9