Tolak ' Award wining short film by navnath dhame .

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • Writer &Director
    Navnath Mohan Dhame
    Mob - 9545158943
    Dop &editor - Santosham
    Song - Santosh Narayankar
    Music - Nilesh Dhage
    Singer - premnath kotwal
    Costume - Kambale mama
    makeup - Thatte kaKa
    Production - Babalu Attar
    Loketion - A/P - Wangadari,
    Tel- Shrigonda,Dist Agamadnagar
    CAST
    Anil Nagarkar, Ramchandr Dhumal, Megha Pawar, Rupesh Paratwagh,Sandip Sasane,navnath Dhame
    आपला भारत देश स्वतंत्र होऊन 70 वर्षे उलटून गेली पण आजही आपल्याच काही समाजात तोलक सारख्या मन हेलावून टाकणाऱ्या अनिष्ट प्रथा अस्तीवात आहेत .तेंव्हा प्रश्न पडतो खरच आपण स्वतंत्र झालोय का ?
    जातपंचायती चे भयानक वास्तव म्हणजे तोलक .....

КОМЕНТАРІ • 508

  • @bhivaharale4639
    @bhivaharale4639 3 роки тому +21

    खरच डाॅ, बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते आणि त्यांनी संविधान लिहीलं नसत तर आज अशी प्रथा कायम चालु राहिली असती
    त्यामुळे ज्या मनुवाद्यांना संविधान मान्य नाही त्यांनी विचार करावा

  • @स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे

    खरंच व्हिडिओ बघताना माझ्या डोळ्यातून पाणी आलं आणि अशा प्रथा समाजामध्ये खरंच घडत असतील तर हे थांबणार तरी कधी अशी वेळ कधीच कोणावर येऊ नये अशा प्रथा बंद झाल्याच पाहिजे जय शिवराय जय शंभु राजे

  • @Khumkar
    @Khumkar 5 років тому +7

    जात पंचायत पूर्णपणे उलथून टाकली पाहिजे या पुरोगामी महाराष्ट्रातून. ..
    मानवी जीवनाला काळिमा आहे अशा घटना. .
    सुंदर Shortfilm..👍👍👌

  • @nileshnanaware2682
    @nileshnanaware2682 5 років тому +2

    नवनाथ ढमे सर खूपच हृदयस्पर्शी मन सुन्न करणारी निशब्द भयाण वास्तव शॉर्ट फिल्म आहे ही, कोणत्या समाजात आहे ही असली अघोरी मानव जातीला काळीमा फासणारी प्रथा. ही प्रथा कायमची बंद झाली पाहिजे..

    • @MalranProduction
      @MalranProduction  5 років тому

      पारधी समाजात आजही अशा जातपंचायती लपून छापून सुरु आहेत .कारण कायद्याने यावर बंदी आहे .

    • @mahadeonagane782
      @mahadeonagane782 5 років тому +1

      @@MalranProduction एवढं वास्तव पुढं आणलंय तर ही कुप्रथा बंद पाडण्यासाठी एक पाऊल टाका सर.तुमच्या कलाकृतीचा तो फार मोठा सन्मान असेल.

  • @sachinkharate3254
    @sachinkharate3254 4 роки тому +4

    एखाद्या खूप मोठ्या चित्रपटाला ही लाजवेल आणि या समाजाला ही लाजवेल अशी ही कहाणी आहे , खरचं तुमचे मनापासून आभार ....

  • @kisanbhalerav6992
    @kisanbhalerav6992 5 років тому +46

    अशी स्टोरी पहिल्यांदाच बघितली ,,,,सगळ्या कलाकारांचे व निर्माताचे अभिनंदन ,आपल्या शार्ट फ़िल्म ला अवार्ड मिळाल्याबदल.thanks

  • @riteshshimpi9736
    @riteshshimpi9736 3 роки тому +2

    एक नंबर कथा आहे. काळीज जलाळ. दिग्दर्शक ने खूप सुंदर प्रमाणे मांडणी केली आहे.

  • @tejumaind8433
    @tejumaind8433 Рік тому +2

    माझी पहिली movie खर तर ह्या movie मुळे मी आज अभिनय करायला शिकले 😊 अगदी छोटी च क्लिप आहे पण नवनाथ sirani मला लहानपणी नवरात्री च्या कार्यक्रम मधे dance करताना पाहून select केले होते 😅 एकदम छोटीशी भूमिका त्यांनी मला ह्या movie मध्ये दिली अगदी छोटा श्या क्लिप मधे असलेला माझा dance पण बोलतात ना कुठेतरी सुरुवात झाली तरच माणूस शिकत तसच काही माझ्या आयुष्यात झालं आणि ह्या movie मुळे मी अभिनय करायला शिकले 😌🥰 Thanku So Much Navnath Sir 🙏🏻☺️

    • @MalranProduction
      @MalranProduction  Рік тому +1

      २०१५ ला शूट झाले तोलक चे त्यावेळी खुप छोटी होतीस तु तरी छान डान्स केलाय.पुढील प्रोजेक्ट ला नक्की तुला अभिनयासाठी संधी देऊ....

    • @tejumaind8433
      @tejumaind8433 Рік тому

      @@MalranProduction nakkich sir mla khup Anand hoil☺️🙏🏻

  • @maulijadhav7575
    @maulijadhav7575 4 роки тому +2

    मी एवढच सांगतो, की ज्या समाजात हि प्रथा चालू आहे त्यातील हुशार मुलानी हि प्रथा बद करावी, आणि जो कोणी एकत नाही त्यांना गोळ्या घालाव्या

    • @MalranProduction
      @MalranProduction  4 роки тому

      महाराष्ट्र शासनाने जातपंचायत प्रतिबंध कायदा करून या प्रथा बंद केल्या आहेत .तरी देखील चोरून लपून काही ठिकाणी या प्रथा सुरु आहेत .

  • @sachinzaware5337
    @sachinzaware5337 11 місяців тому +2

    अतिशय वास्तववादी सत्य परिस्थिती मार्मिक भाष्य करणारी फिल्म...
    आणि तितकंच जिवंत सादरीकरण..
    ग्रेट वर्क.. नवनाथ ढमे
    पाटील...संदीप जी ससाणे.

  • @abhishekkharat3068
    @abhishekkharat3068 5 років тому +10

    सर्व प्रथम अभरी आहे संपूर्ण फिल्माच्या टीमचा अत्यंत विदारक सत्य मांडल्या बद्दल खर तर अश्या अनिष्ट प्रथा आज ही महाराष्ट्रात सुरू आहे यावर विश्वास बसत नाही अशा जातपंचायती प्रथा रोखण्यासाठी आजपर्यंतच्या सरकारनी काहीच प्रयत्न केलेले दिसात नाही हे सम्म्पूर्णा पणे felyuar आहे सरकारचे आणि प्रशासनाचे

  • @YogeshManikraoChikatgaokar
    @YogeshManikraoChikatgaokar 3 роки тому +2

    दिग्दर्शन,अभिनय,छायाचित्रण,गीत,संगीत,लोकेशन्स सर्व काही अप्रतिम जुळून आलय अगदी सांगायचच झाल तर चित्रपट बघण्याचा अनुभव येतो.
    नवनाथराव ढमे हार्दीक हार्दीक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी लक्ष लक्ष शिवमय शुभेच्छा.

  • @Vinodbabar-sl7rm
    @Vinodbabar-sl7rm 4 роки тому +2

    आई शप्पत छत्रपती शाहु फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात आजुनहि अशा प्रता आहेत हे खरच मन हेलावुन टाकणारी व काळजाला भीडणारी कथा आहे तसेच ह्रदय हेलावुन टाकणारी शाॅर्ट फिल्म पाहुन डोळ्यात पाणि आले

  • @S.N.INGOLE
    @S.N.INGOLE 5 років тому +52

    बर झाल डाॅ.बाबासाहेब अंबेडकरानी घटना लिहली,
    नाहीतर आजही अशा घटना घडत होत्या

  • @shankarmohite5167
    @shankarmohite5167 4 роки тому +3

    या फिल्म मुळे समाजाला चांगले वळण लागेल.मी धनयवाद सांगतो..या फिल्म च्या सर्व कलाकार आणि टीम ला.

    • @MalranProduction
      @MalranProduction  4 роки тому

      धन्यवाद मोहिते साहेब

  • @rohitshinde0805
    @rohitshinde0805 Рік тому +2

    आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही ..
    कायद्याची गरज का होती!

    • @MalranProduction
      @MalranProduction  Рік тому +1

      खरं आहे ...डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशात जन्माला आले हे आपले भाग्य आहे

  • @dhanrajpandhare9676
    @dhanrajpandhare9676 4 роки тому +3

    आता पर्यंत पाहील्याल्या फिल्म पेक्ष्या खूप वेगळी फिल्म आहे.. सर्व कलाकारांचे मनापुसून अभिनंदन...

  • @shekharohol
    @shekharohol 5 років тому +2

    सभ्य आणि सुसंस्कृत समाज आपण म्हणतो पण तो फक्त नावालाच. इथ धर्म आणि त्याचे ठेकेदार आपली दुकानदारी मांडून बसलाय प्रथा आणि परंपरेनुसार नावाखाली बळी घ्यायला. समाजातील वास्तव मांडणारी एक उत्कृष्ठ कलाकृती 'तोलक'. संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन.

  • @tusharpawar6798
    @tusharpawar6798 4 роки тому +5

    तात्या तुमची चांडाळ चौकडी पाहून खूप हसतो
    पण आज मात्र अंगावर काटा आला...
    खूप छान विषय मांडला👌🙏🙏

  • @gsmdik6201
    @gsmdik6201 5 років тому +57

    Life मधे first time अशी short film पाहिली.
    आणि छत्रपतींच्या महाराष्ट्रात असे घाणेरडे प्रकार घडतात..निषेध

  • @ShivmudraAcademy
    @ShivmudraAcademy 2 роки тому +8

    अप्रतिम कलाकृती...... डोळे भरून आल्याशिवाय राहत नाही....

  • @chetanchauhan4676
    @chetanchauhan4676 5 років тому +9

    विशिष्ठ जात पंचायती च्या या घाणेरड्या प्रथेला भावस्पर्शी
    मांडले आहे. अश्या प्रथा अजुन हि चालत आहे.यावर कायद्याने बंदी हवी .
    नवनाथ ढमे ..well done मित्रा ..👌🙏

  • @annasahebgaikwad7961
    @annasahebgaikwad7961 5 років тому +62

    मला हा चित्रपट पाहूनच खूप दु:ख वाटले डोळे भरून आले अशी वेळ कोणाचाही आयुष्यात कधी येउ नये

  • @gokulsurase3333
    @gokulsurase3333 4 роки тому +2

    खरंच डोळ्यात पाणी येणारे लघुपट पंचावर घाला गोंधळ

  • @santoshabakakade
    @santoshabakakade 6 днів тому

    विषय जितका सुंदर तितकाच या कथेतीलपात्रांनी केलेला अभिनय सुद्धाउत्कृष्ट !! खुपच छान ! एक नंबर !!!

  • @sandipchorghe8310
    @sandipchorghe8310 5 років тому +14

    हि पंचायत कायद्याच उलगंन करणारी आहे आणि ही प्रथा आता अस्तित्वात नाही आहे अशी घटना कुठं निदर्शनास आल्यास लगेच पोलीस कारवाई करा.

  • @ushasharma1973
    @ushasharma1973 5 років тому +6

    खुप चागला संदेश दिलाय तु मेघा टु गुड यार...👍

  • @kshatriyakulavatans108
    @kshatriyakulavatans108 4 місяці тому +1

    अशी प्रथा सध्यातरी महाराष्ट्रात नाही. आमच्या तरी पाहण्यात नाही. आम्ही खेड्यातच राहतो पण अशी प्रथा आमच्या ऐकण्यातही नाही . ही फक्त या लोकांची कल्पना आहे . आपल्या देशातील लोक एवढे नालायक नाहीत . जर माझ्या गावात एखाद्यावर अशी वेळ आली तर १०० जण त्याला मदत करायला पुढे येतील .

  • @sagarsathe9361
    @sagarsathe9361 4 роки тому +3

    छ. शिवाजी महाराज, फुले, शाहू, डॉ. आंबेडकर यांच्या महाराष्ट्रा मध्ये असे प्रकार खूप लाज वाटण्या जोगे आहेत या अशा जातपंचायती घेणाऱ्या लोकांचं चौरंगा केला पाहिजे

  • @jagadishwagh848
    @jagadishwagh848 3 роки тому +2

    मला तर अजून वाटत नाही की आपला भारत देश स्वतंत्र झाला आहे असं खूप वाईट प्रथा आहे

  • @user-atul_gaikwad
    @user-atul_gaikwad 3 роки тому +2

    विसावल्या स्वप्नाचा हा पाऊस थांबेना
    दमछाक आसवांना ऊसास सुटेना
    खेळ हा चार घडीचा दार ऊघडेना
    इवल्याशा स्वप्नांचा खेळ हा संपेना
    दिवसामागून दिस जाती जात तिच थांबेना
    कोसळलेल्या वाटेला दुष्काळ पडेना
    अप्रतिम विषय, कास्टिंग, व अभिनय
    अनिल दादांचा अभिनय खुप आवडला सर्व टिमचे मनापासून हार्दिक स्वागत --++ तुमचा मित्र अतुल गायकवाड

  • @abasahebmarwadkar7354
    @abasahebmarwadkar7354 5 років тому +6

    अत्यंत वाईट वाटते की अशा प्रथा अजून आपल्या देशात आहेत,
    अशा प्रथा पाळणार्या सर्वांना शिक्षा झाली पहिजे

  • @sagarartmanmad7190
    @sagarartmanmad7190 3 роки тому +3

    बेस्ट स्टोरी सर.... सर्व टिमचे अभिनंदन

  • @rajendrapathare1341
    @rajendrapathare1341 4 роки тому +3

    नवनाथ खुप मस्त मुव्ही आहे

  • @Sushilkanasepatil
    @Sushilkanasepatil 4 роки тому +4

    आजून अशा अनेक प्रथा आहेत
    आपण शोध घेऊन नायनाट केला पाहिजे
    निर्माण करत्यास कोटी कोटी वंदन....

  • @vishnumatte4482
    @vishnumatte4482 3 роки тому +2

    खूप चांगलं चित्रपट लेखक कलाकार जबरदस्त काम केले

  • @sagarmandavkar6610
    @sagarmandavkar6610 5 років тому +3

    का खरंच अशी प्रथा महाराष्ट्रात जिवंत आहे..... आणि जर का असेल तर नष्ट व्हावी

  • @somnathshendge4151
    @somnathshendge4151 4 роки тому +3

    खरंच अंगावर काटा आणणारे सत्य
    पाहून डोळयांत पाणी आले 👌👌👌👌

  • @user-atul_gaikwad
    @user-atul_gaikwad 3 роки тому +3

    व माझे वडील प्रमाणे होते धुमाळ काका मिस यु

  • @ranojientertainmaint8899
    @ranojientertainmaint8899 4 роки тому +2

    लायनऱ्या आणि अवल्या खतरनाक अभिनय
    अनिल दादा नेहमीच ग्रेट

  • @aniljanakara2704
    @aniljanakara2704 3 роки тому +4

    छान लय भारी

  • @santoshbandal6776
    @santoshbandal6776 5 років тому +9

    विदारक सत्य... समाजातील युवा बदलू शकतात पण काही लोक त्यांना तिढ्यात पकडतात, सरकार हे सर्व प्रकार थांबवू शकते पण...

  • @श्रीमंतयोगी-छ1च

    बाबासाहेबांचे उपकार या जन्मात तरी फिटु शकत नाही ..!
    आमच्या बहुजन समाजाला अजुन पुरती जाग आली नाही याचीच खंत वाटते ...!
    जय भीम जय शिवराय ....!

  • @pradipmisal3826
    @pradipmisal3826 4 роки тому +14

    मनाला भेगा पाडणारी कहाणी😣

  • @uttamgondhali.7754
    @uttamgondhali.7754 5 років тому +13

    जय शिवराय! जय जिजाऊ.
    हे सगळे अज्ञानामुळे घडते. बहुतेक समाजामध्ये अशा जातपंचायती होत्या, आणि अजूनही काही ठिकाणी आहेत.
    सर्वात आधी ह्या जात पंचायती बंद झाल्या पाहिजेत. काही ठिकाणी सरकारने हस्तक्षेप केलाय सुद्धा.

  • @bhaveshshimpi4400
    @bhaveshshimpi4400 5 років тому +1

    कलंक /कातड / या पेक्षा ही खूपच रूदयाला भिडणारी कहाणी आहे. आणि यात सर्व टीम ने इतकं जिव ओतून काम केल आहे की वाटतं नाही ही शूटिंग आहे की वास्तव्य. आणि खरंच डोळे पांजरणारी ही कहाणी आहे.

  • @rahulwagh4014
    @rahulwagh4014 5 років тому +2

    खरच विश्वास बसत नाही 😢😢
    असा प्रसंग कुणावर येऊ नये

  • @sanjaydpaul
    @sanjaydpaul 5 років тому +3

    अतिशय विदारक वास्तव...!!!
    लाज वाटते अश्या समाजात राहण्याची..!!

  • @gautamhiwale4635
    @gautamhiwale4635 5 років тому +2

    या समाजाने जुन्या रुढी परंपरांचा त्याग केला तरच हे कुठे तरी थांबणार आहे.. मी तर म्हणतो की या समाज्याच्या महिलांनी जागृत व्हायला हवे.. आणि अशा विकृतीचा विरोध करायला हवा.. तरच त्यांची प्रगती शक्य आहे..

  • @vaijayantirathod6907
    @vaijayantirathod6907 4 роки тому +1

    Heart touching... आता तरी स्त्रियांनी खंबीर पणे अश्या परिस्थिती ला मात देण्याची हिम्मत करावी.. कारण त्यांच्या सोबतीला आज कायदा आहे संघटना आहेय आणि तुमच्या सारखे सामाजिक विषयाला उभारणारे कार्य करते आहेत.... खूप छान सादरीकरण. 👍

  • @amoljagtap4714
    @amoljagtap4714 5 років тому +2

    खरच जात पंचायत अजुनही चालू आहे

  • @anikettupe1988
    @anikettupe1988 4 роки тому +1

    महाराष्ट शासनाला नम् विनंती आहे असल्या जात पंचायती कायमच्या बंद करन टाका

  • @anandchavan9660
    @anandchavan9660 3 роки тому +2

    लेखन ,दिग्दर्शन आणि पात्रांची भूमिका खूप चांगली

  • @nitashaproduction
    @nitashaproduction 5 років тому +3

    Lay bhari story sir

  • @sharadthatkar1049
    @sharadthatkar1049 5 років тому +6

    अश्या प्रथा ठेसून काढलेल्या पाहिजेत.

  • @navnathwashivle2224
    @navnathwashivle2224 5 років тому +10

    अजून अस काय आहे असल तर वाईट आहे

  • @LokshaktiTV1
    @LokshaktiTV1 2 роки тому +4

    सुपर तोलक....

  • @adventurousmk
    @adventurousmk 3 роки тому +3

    खूपच छान

  • @shankarmane3381
    @shankarmane3381 4 роки тому +8

    अशी वेळ कधी कुणावर पन येऊ नाही देवा

    • @MalranProduction
      @MalranProduction  4 роки тому

      महाराष्ट्र शासनाने जातपंचायत प्रतिबंध कायदा करून या प्रथा बंद केल्या आहेत .तरी देखील चोरून लपून काही ठिकाणी या प्रथा सुरु आहेत .

  • @maheboobshaikh8700
    @maheboobshaikh8700 5 років тому +1

    Khub chhan acting hiro & vilan good

  • @shukleshwarrahinj6773
    @shukleshwarrahinj6773 5 років тому +2

    खरच खुप वाइट वाटते महाराष्ट्रातील या असल्या प्रकारच्या रूढ़ी परंपरा बघून

    • @MalranProduction
      @MalranProduction  4 роки тому

      महाराष्ट्र शासनाने जातपंचायत प्रतिबंध कायदा करून या प्रथा बंद केल्या आहेत .तरी देखील चोरून लपून काही ठिकाणी या प्रथा सुरु आहेत .

  • @mahadevmule303
    @mahadevmule303 5 років тому +4

    खूपच वाईट वाटलं

  • @dnyaneshwarpavar4046
    @dnyaneshwarpavar4046 5 років тому +17

    विश्वास बसत नाही हे सगळं छञपतींनी उभा केलेल्या स्वराज्यात घडतय, ज्या छञपतींनी आया बहिणींची अब्रु वाचवण्यासाठी स्वराज्य निर्माण केले त्या स्वराज्यात अस काही घडत असेल याचा विचारही कधी केला नव्हता 😢😢😢😢

    • @sameershivalkar4622
      @sameershivalkar4622 5 років тому

      K bolava tech kallat nahi Ashi prratha ghaanerdi.lajjaa spad.nkoch to vivaah...

  • @nshelar99
    @nshelar99 4 роки тому +3

    जबरदस्त

  • @nitinpansare990
    @nitinpansare990 5 років тому +3

    स्क्रीफ्ट छान , म्युझिक छान , कॅमेरा अँगल मस्त , म्हातारा अभिनय 👌👌

  • @Arjunhaeale5707
    @Arjunhaeale5707 5 років тому +4

    समाजातील अनिष्ट रूढी आणि जातपंचायती चे वास्तव जनतेच्या डोळ्यात अंजन घालनारे वास्तव समोर आनले (director) धन्यवाद

  • @shankarpawar1555
    @shankarpawar1555 2 роки тому +3

    Congratulations 👏 🎊 💐 🥳

  • @eknathkhandekar925
    @eknathkhandekar925 5 років тому +5

    कोनाच्याही भरवशावर बसु नका.......
    कोन सरकार आणी काय.....
    प्रत्येक ठिकाणी सरकार पोहोचणार नाही......
    अश्या प्रथा कुठे असतील तर थोडसं धाडस करा.....
    काहीही होणार नाही........
    स्वतः धाडस करा.....
    समोरच्याची पळता भुई थोडी होईल.....
    जो घाबरला तो संपला.......
    छान व्हिडिओ बनवला आहे......
    समाज हुशार झाला पाहिजे

  • @umajiborhade1117
    @umajiborhade1117 3 роки тому +1

    अजुनही काही ठिकाणी असे प्रसंग घडतात निशब्द

  • @nitingore2637
    @nitingore2637 5 років тому +8

    काय चाललय माझ्या उद्या महासत्ता होणाऱ्या या देशात.! टाहो...फुटणारी ही विदारक स्थिती.!

  • @nikhilgawade5864
    @nikhilgawade5864 5 років тому +3

    खरचं रडलो राव 😭😭😭अशी वेळ कुणावरच येऊ नये

  • @vikassahane7889
    @vikassahane7889 5 років тому +6

    विदारक वास्तव ....
    पण कंमेंट करणारेही शेवटी आई आणि बहिणीच्याच शिव्या देत आहेत . शेवटी गरज आपला स्त्री कडे बघण्याचा दृष्टीकोण बदलावा हीच आहे .

  • @syblslaw6511
    @syblslaw6511 4 роки тому +1

    Sarkar bagnya peksh apn sarvani lksh dil tr br hoil

  • @kiransonawane1874
    @kiransonawane1874 3 роки тому +1

    Anil Nagarkar is the best

  • @vikaskharatbacheri
    @vikaskharatbacheri Рік тому +2

    हे तुमच बरोबर आहे पन आता कापुन टाकतेल असेल यांचा माज ऊतरायला वे
    ल नाही लागनार आता

  • @travelvlog9503
    @travelvlog9503 5 років тому +1

    खुपच वाईट hertouching😥😥😥😥

  • @pradeepsolankepatil6670
    @pradeepsolankepatil6670 5 років тому +3

    माझ्या महाराजांच्या राज्यात हे असेही घडत असेल यावर विश्वास बसत नाही...😢

  • @Janardhan-palve
    @Janardhan-palve 5 років тому +2

    खरंच काळीज हेलावणारी कथा आहे
    .

  • @laxman15
    @laxman15 5 років тому +2

    खूपच वाईट अवस्था आहे , देखील जात पंचायत घेऊन बसलेत

  • @rustumsawale8032
    @rustumsawale8032 3 роки тому +2

    मन सुन्न करणारी कहाणी

  • @giridharingole3468
    @giridharingole3468 5 років тому +4

    खरच हे थांबणार कधी

  • @dhanrajwagh8529
    @dhanrajwagh8529 5 років тому +3

    Salam Saheb tumhala .best ...movie tumhala tar ..oskar midayala pahije....namskar

  • @satishghule7791
    @satishghule7791 4 роки тому +2

    Very heart touching short film...

  • @prasadjadhav3190
    @prasadjadhav3190 5 років тому +4

    सरकार ने ह्या समाजाच्या कडे लक्ष दिले पाहिजे

  • @vickyhawle3707
    @vickyhawle3707 4 роки тому +1

    Atishay marmik vishay. Mnala bhidnara.. Man sunn zaal..Agdi yogya vishay mandlay. Actor mhanun mlahi yamdhe kaam krayla khup avdl ast. Good luck all of you.. 😊😊🙏🙏👍👍

  • @dilipshinde6189
    @dilipshinde6189 5 років тому +8

    सलाम त्या डारेक्टरला......

  • @abhijeetjagtap9667
    @abhijeetjagtap9667 4 роки тому +3

    हृदय हेलावून टाकणारी कथा !!

  • @satishkumarhawaldar7843
    @satishkumarhawaldar7843 5 років тому +3

    हे खरं आहे सर्व...काही जमाती मधे आजपण हा प्रकार चालतो..तिथे जात पंचाईत म्हत्वाची मानली जाते...कडु आहे पण सत्य आहे..

  • @anilkumawat6409
    @anilkumawat6409 4 роки тому +1

    Acting sarvanchi khupp bhari ahe....n he sarv lokch thambu shktat...

  • @liladharshinde1607
    @liladharshinde1607 3 роки тому +2

    Nice film...

  • @RajshekharNagnathofficialMusic
    @RajshekharNagnathofficialMusic 5 років тому +1

    Miss you मेघा दिदि

  • @tejasmkhedekar
    @tejasmkhedekar 5 років тому +2

    अप्रतिम ...सत्य वास्तव मांडलं आहे ...
    असे विषय समाजापुढे या माध्यमातून यायला हवेत.

  • @kamble_vinod6744
    @kamble_vinod6744 3 роки тому +1

    निशब्द

  • @dasharadnaik5203
    @dasharadnaik5203 5 років тому +2

    मला हे पाहुन खुप दुख झान डोळ्यात पाणी या सारखा हा चित्रपट

  • @vishnukholase6835
    @vishnukholase6835 2 роки тому +3

    Heart touching

  • @nirmalshahaji8451
    @nirmalshahaji8451 5 років тому +5

    आगदी ह्रदय हेलावून टाकणारी आशी छोटी फिल्म आपण कशी बनवता. पूर्वी समाजात आशी प्रथा होती का.

  • @balnathnamdas5931
    @balnathnamdas5931 4 роки тому +1

    लय वाईट आहे राव

  • @sandipbhingardive1713
    @sandipbhingardive1713 5 років тому +1

    khup chan mala khup avadli dolyatun pani ala rudhyala sparsh karnari hoti sort film

  • @shekharawasare5462
    @shekharawasare5462 5 років тому +3

    Kadak acting naad khula

  • @sbhosale4471
    @sbhosale4471 2 роки тому +3

    निःशब्द 🙏