Anghai Fort | सह्याद्रीतील अपरिचित किल्ल्याचा थरारक अनुभव | अनघाई किल्ला | संपूर्ण माहिती |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 чер 2023
  • रायगड जिल्ह्यात जांभूळपाड्या जवळ मृगगड आणि अणघई हे दोन किल्ले आहेत. या भागातून सव आणि निसणी या दोन घाटवाटा जातात. या घाटवाटांवर आणि अंबा नदीच्या खोर्‍यावर लक्ष ठेवण्यासाठी मृगगड आणि अणघई या दोन किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती. हे टेहळणीचे किल्ले असल्याने त्यावर फ़ारसे अवशेष नाहीत.
    अणघई किल्ल्याचे पायथ्याचे गाव कळंब हे रायगड जिल्ह्यात येत असले तरी अणघई किल्ला आणि डोंगररांग मात्र पुणे जिल्ह्यात येत. कळंब व आजूबाजूच्या गावातले काही माणसे ही डोंगरांग ओलांडून लोणावळा भागात नोकरीसाठी जातात.
    अणघईचा किल्ला हा अल्पपरिचित आहे. या किल्ल्यावर चढून जाण्यासाठी ४ कातळटप्पे चढून जावे लागतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने सोबत गिर्यारोहणाचे साहित्य, रोप इत्यादी असणे आवश्यक आहे.
    कळंब गावाच्या मागे असलेल्या डोंगररांगेत ३ शिखरे दिसतात. त्यापैकी डाव्या बाजूचे बाहेर आलेले शिखर म्हणजे अणघई किल्ला. या किल्ल्यावर जाण्यासाठी गावातून बाहेर पडल्यावर पायवाटेने शेतातून, बांधावरुन चालत १५ मिनिटात आपण अंबा नदीवरील पूला पर्यंत पोहोचतो. या पुलाच्या डाव्या बाजूला एक डोह आहे त्याला बुरुना डोह या नावाने गावकरी ओळखतात. पूल पार केल्यावर समोर एक झाडीने भरलेला डोंगर लागतो. त्या डोंगरावर ५ मिनिटे चढून गेल्यावर एक आमराई आणि त्यामध्ये बांधलेले घर दिसते. या घरा समोरुन जाणारी पायवाट अनघईचे शिखर व त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या डोंगराचे शिखर याच्या मधील घळीतून वर जाते. आमराईच्या पुढे सागाचे दाट जंगल आहे. ते १५ मिनिटे चढून पार केल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. येथून पठार पार केल्यावर वाट परत दाट जंगलात शिरते. येथे काही ठिकाणी दगडांवर , झाडांवर दिशादर्शक बाण काढलेले आहेत. त्या बाणांच्या सहाय्याने आपण अनघई किल्ल्याच्या घळीच्या पायथ्याशी पोहोचतो. या ठिकाणी साधारणपणे १५ फ़ूट उंच कातळ भिंत आहे. भिंतीवर चढण्यासाठी होल्ड आहेत. त्याच्या आधारे भिंत चढून जाता येते. दुसरा पर्याय म्हणजे भिंत संपेपर्यंत उजव्या बाजूला जावे. या ठिकाणी चढाई करण्यासाठी होल्ड आहेत आणि बाजूच्या झाडांचा आधारही घेता येतो. हा कातळटप्पा चढून गेल्यावर डाव्या बाजूला एक नैसर्गिक गुहा आहे. ही गुहा पाहून पुन्हा आपण गुहेच्या उजव्या बाजूला आल्यावर कातळात कोरलेल्या पायर्‍या आहेत. या पायर्‍या चढून गेल्यावर आपण अनघईवर जाणार्‍या नळीच्या खालच्या तोंडापाशी येतो.
    नळीत अनेक लहान मोठे खडक पडलेले आहेत. हा नळीतला ७०-८० अंशातला चढ चढून आपण नळीच्या अर्ध्या वाटेपर्यंत पोहोचतो. पुढे वाट बंद झालेली असल्याने उजव्या बाजूच्या कातळावर जावे लागते. या कातळाला तीव्र उतार आहे त्यामुळे हा १० फ़ूटी कातळ जपून चढून जावा लागतो. कातळाच्या शेवटच्या टप्प्यात डाव्या बाजूला कातळात कोरलेल्या ६ सुबक पायर्‍या दिसतात. ( याठिकाणी अजूनही पायर्‍या आहेत पण त्या माती खाली बुजलेल्या आहेत.) या पायर्‍या चढून गेल्यावर आपण कातळ टप्प्याच्या वरच्या भागात पोहोचतो. (पहिल्या कातळ टप्प्या पासून नळीचा दुसरा टप्पा आणि पुढे तिसरा कातळ टप्पा पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो.) पुढे घळीतून चढत १५ मिनिटात अणघईचा डोंगर आणि उजव्या बाजूचा डोंगर यामधल्या खिंडीत पोहोचतो. शेवट़च्या टप्प्यात दाट झाडी आहे. खिंडीत आल्यावर अणघईवर जाणार्‍या कातळात खोदलेल्या खोबण्या दिसतात. या खोबण्यातील अंतर जास्त असल्याने पूर्ण हाताचा भार देऊन शरीर वर ओढून घ्यावे लागते. पुढे कातळात खोदलेल्या पायर्‍यांनी वर चढून गेल्यावर पुन्हा एक कातळटप्पा पार करावा लागतो. हा टप्पा पार केल्यावर आपला गड माथ्यावर प्रवेश होतो. गडमाथा आटोपशीर आहे. माथ्यावर अणघई देवीचे मंदिर आणि ३ पाण्याची टाकी आहेत. गडमाथ्यावरून तैलबैला, सुधागड दिसतात.

КОМЕНТАРІ • 154

  • @sportstourerpratz8148
    @sportstourerpratz8148 Рік тому +17

    तुम्हा लोकांमुळे मावळा अजून जिवंत आहे भावांनो नाहीतर आजकाल महाराष्ट्र सध्या गौतमी पाटीलला बघण्यात व्यस्त आहे 🚩

  • @sagarsalunkhe5578
    @sagarsalunkhe5578 Рік тому +20

    खुप दिवसांनीं असा धरारक Adventure पहायला मिळाला ...
    अशक्य सुंदर सह्याद्री....!

  • @kunallagad5213
    @kunallagad5213 Рік тому +19

    जय शिवराय 🔥

  • @pradipvaghmare2600
    @pradipvaghmare2600 Рік тому +4

    दर्शन दादा बिगर रोप च वर चढतो...दर्शन दादा च्या बहादुरी ला सलाम...🙏🙏

  • @Krushna_YT_01
    @Krushna_YT_01 Рік тому +7

    भावा तुचे व्हिडिओ पाहून ते किल्ले आम्हाला माहित नाही ते तुझे व्हिडिओ बघून माहिती मिळते भावा _जय शिवराय 🙏🔱😍

  • @deepakranshevre8506
    @deepakranshevre8506 Рік тому +2

    लहान भवाला जे शिक्षण किव्वा धडा आणि भविष्याचा रस्ता/परिवाराची कलजी घेने काय अस्ते हे दाखवलाच तो आजकाल कोणीच करत नाही.
    ह्य़ाची वरती जे तू गडाची वर्णन आणि जागतिक संदेश देतोय ते अति उत्तम.
    मला त्या आई बापला धन्यवाद करायचा आहे ज्ञानी तुला इतक मनाने मोथा बनवल.
    motivational video everytime every episode you make bro

  • @mohdhusseinkhan6266
    @mohdhusseinkhan6266 Рік тому +4

    वाह क्या बात है। मजा आगया, लोग तो U tube पर मशहूर होने के लिए बेशर्मी की हदें पार कर देते हैं, अपने जमीर को मार देते हैं, ऐसे लोगों के लिए आपका कारनामा लाजवाब है, एक सबक है। लाजवाब प्रस्तुति आप की।आप लोगों को दिल से सलाम। 🌷🌷🌷🌷🌷

  • @ganeshmhatre9311
    @ganeshmhatre9311 Рік тому +4

    😍😍😍👌🏻👌🏻 एक नंबर भावानो जय भवानी जय शिवाजी

  • @shitaldoke6825
    @shitaldoke6825 Рік тому +1

    भगवा t-shert वाला किती fast मदत करत चडत होता. भारी एक मावळा सारखा 🙏जय शिवराय🚩🚩🚩🚩

  • @parthmali_07
    @parthmali_07 Рік тому +14

    भावा रत्नागिरी गुहागर मध्ये अंजनवेल गाव मध्ये असलेला गोपाळगड किल्ल्यास नक्की भेट दे
    जय शिवराय 🚩
    भावा 😊

  • @bajiraowaghmore4887
    @bajiraowaghmore4887 Рік тому +3

    भावा तुझे विडिओ एक नंबर आसतात. माहिती पण एक नंबर
    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @akshayjadhav6837
    @akshayjadhav6837 Рік тому +2

    मी instagram वर दादा तुला सांगितल होत की किल्ले अनघाई वर तू एक व्हिडिओ बनाव ... तू प्रत्यक्ष जाऊन व्हिडिओ बनवून तुझा अनुभव सांगितला त्या बद्दल धन्यवाद 🙏
    खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे ...
    किल्यावर जाताना कोणतेही ट्रेकर्स चुकू नये या साठी आम्ही फलक लावले आहेत..

  • @diptidongare3718
    @diptidongare3718 Рік тому +2

    जय शिवराय🚩 ❤🙏

  • @jyotimandhare7452
    @jyotimandhare7452 Рік тому +1

    खुप छान Treak hota nice Vlog All The Best 🚩🚩 Jay Shivaji Jay Bhavani 🚩🚩

  • @sunildeokule2595
    @sunildeokule2595 Рік тому +4

    दर्शन सारख्या अनुभवी ट्रेकर ची सोबत असेल तर तुझे ट्रेक्स अजून रोमांचक व सुरक्षित होतील.
    खूप छान! मस्तच!

    • @darshandeshmukh7818
      @darshandeshmukh7818 Рік тому

      Thank you so much for your love and support ❤❤❤❤.
      असंच support नेहमी असू द्या त्यातून आम्हाला नवनवीन places explore करायसाठी ऊर्जा मिळते 🥰🥰

  • @skboss_1418
    @skboss_1418 Рік тому +1

    जय शिवराय

  • @bhimraopatil2761
    @bhimraopatil2761 Рік тому +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @1crazyboy421
    @1crazyboy421 11 місяців тому

    बोहत जास्त कड़क 👌

  • @akshaysakunde8920
    @akshaysakunde8920 Рік тому +3

    एक नंबर प्रशिल तुझे विडिओ असेच ,adventure असत, ट्रेक मधली माहिती देण्याची कला भारीय,आणि हाच गड करून तुम्ही परत येत असताना आपली खोपोली येथे भेट झाली होती, ⚡️✌️🚩

  • @chetanakeche8644
    @chetanakeche8644 11 місяців тому +1

    Khuppp bari dada....🚩🚩🚩🚩

  • @vaibhavzoje2002
    @vaibhavzoje2002 Рік тому +4

    200k coming soon 🎉congrats in advance 🎉🎉❤

  • @vaibhavdombale6831
    @vaibhavdombale6831 Рік тому +5

    Awesome video 💯❤😘😍 Most Thrilling Experience 💯👍👍 Sooo Proud 💯🙌🙌 Very Nice Information 💯👌👌 Take Care 👍👍 Enjoy And Be Safe 👍👍🙏🙏 Thank you 🙏🙏 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @1kadventur
    @1kadventur Рік тому +2

    मस्त मजा आली दादा ❤❤❤❤

  • @aayushiraut1296
    @aayushiraut1296 Рік тому +1

    Yek nabar vidio hita bhava je kille tumhi dakhvtat aahe te aamhala mahit hi nahi pan tuzya mule aamhala bghayla miltat aahe tya sathi tr tx aaj lahan bhau aala mhnun khup bhari vattl

  • @TV-gh8mb
    @TV-gh8mb Рік тому +3

    भावा जय शिव राय 🚩🚩🚩 असेच माहित देत राहा.. आणि जरा जीवाला घाबर 🤭 असच करत राहा 🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय

  • @amrutapawar1666
    @amrutapawar1666 11 місяців тому

    जयगड किल्ला आणि समृद्ध छान आहे

  • @rajtiwari1721
    @rajtiwari1721 Рік тому +2

    Real hero ho aap log. Full support hai aap ko.

  • @chetanakeche8644
    @chetanakeche8644 11 місяців тому +1

    Jay shambhuraje🚩🚩

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 Рік тому +2

    जय शिवराय जय शंभूराजे ❤

  • @chetanakeche8644
    @chetanakeche8644 11 місяців тому +1

    Jay shivray 🚩🚩🚩

  • @nitinvhate02
    @nitinvhate02 Рік тому +3

    😍🔥❤️ जय शिवराय भाऊ 🚩🙏

  • @charudattkoli8282
    @charudattkoli8282 Рік тому +1

    एक नंबर प्रशिल दादा ❤🚩

  • @hemantpatekar3866
    @hemantpatekar3866 Рік тому +1

    जय शिवराय,जय शंभूराजे🙏🚩🙏

  • @shubhangisawant5480
    @shubhangisawant5480 Рік тому

    Waw...............................💕💕💕💕💕💕amazing

  • @sanishsedmake5881
    @sanishsedmake5881 Рік тому +1

    Jay shivray jay bhim jay ho prashil bhau

  • @nileshmore9923
    @nileshmore9923 Рік тому

    एक नंबर भाऊ जय शिवराय

  • @Sandy.
    @Sandy. Рік тому +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @nileshmore9923
    @nileshmore9923 Рік тому

    भाऊ मंञ लय भारी आहे

  • @mohinikarde3317
    @mohinikarde3317 Рік тому +3

    Drone shots are amazing well done 👏 fun 🤩
    Always be safe God blessed you

  • @ninadkhater444
    @ninadkhater444 Рік тому +3

    u never disappoint us with ur content

  • @bhushannagre5115
    @bhushannagre5115 Рік тому +1

    खूप छान माहिती देतो दादा पण ठिकाणच्या आसपास असलेल्या आणखीन काही किल्ल्यांची माहिती दिली तर आवडेल

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 Рік тому

    Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
    Mitra khupach thararak aani mahitipurna vlog zala aani tuzya bhau khup divsani bhetla treck kartana. Baghun aanand zala ashish eki tumha doghit raho hich prabhu charani prarthna.

  • @Jaypatil0822
    @Jaypatil0822 Рік тому +1

    Dada mast video zala❤😊
    Jay shivay 🚩🙏🌍

  • @user-xl5ib8sy4w
    @user-xl5ib8sy4w Рік тому

    Ekadam super Bhau

  • @dnyneshvarmadke8767
    @dnyneshvarmadke8767 Рік тому

    जय शिवराय दादा

  • @ekvirasamayara2777
    @ekvirasamayara2777 Рік тому

    मस्त खूप छान

  • @sahebraoturatikar5555
    @sahebraoturatikar5555 Рік тому +1

    भाऊ आपला पहिला कमेंट फ्रॉम नांदेड साहेबराव

  • @sandeepjadhav4590
    @sandeepjadhav4590 Рік тому

    खूप छान भाई

  • @deepakupale799
    @deepakupale799 11 місяців тому

    खुपच छान होता व्हिडीओ पण बघत असताना अंगावर काटा येत होता

  • @orangecity242
    @orangecity242 10 місяців тому

    W mil gya...fun fact ...but ..salute to brother....keep tracking...❤ Keep making us smiling 😍

  • @anilkasar946
    @anilkasar946 Рік тому

    खूप सुंदर, अप्रतिम 🧗👍✌️🙏🚩

  • @vijaydabaka7721
    @vijaydabaka7721 Рік тому +1

    जय शिवराय दादा 🔥

  • @amrutapawar1666
    @amrutapawar1666 11 місяців тому

    आमच्या कडे पन या रत्नागिरी जयगड छान बघायला आहे गणपती पूले जय विनायक मंदीर अजून भरपूर काय बघायला 🌷

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi Рік тому

  • @sonalipawar8015
    @sonalipawar8015 Рік тому

    Khup chan

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 Рік тому

    Jabardast dada.mantracha changalch upyog jhla😂😂😂

  • @psychosb879
    @psychosb879 Рік тому

    Dada nit jat ja
    Jay shivray 🚩

  • @sandeepgovind3141
    @sandeepgovind3141 Рік тому

    लै भन्नाट रे मित्रांनो 👌👍👍👍

  • @ankitavishe4631
    @ankitavishe4631 Рік тому

    Khup Chan ani thararak asa video hota 🥰💜

  • @sarveshadavde2908
    @sarveshadavde2908 Рік тому +1

    Khup Chan ahe video dada thartharat anubhav 🚩 love from khopoli

  • @Mhatresaniya1
    @Mhatresaniya1 Рік тому

    खतरनाक भावा जबरदस्त 👌👌

  • @kirangotamare4006
    @kirangotamare4006 Рік тому

    Jay shivray 🙏

  • @user-is5st5xd3j
    @user-is5st5xd3j Рік тому

    w पाहून धमाल हिंदी मूवी ची आठवण झाली

  • @saurabhff2175
    @saurabhff2175 Рік тому +1

    त्री चुन त्री

  • @sameersuware8559
    @sameersuware8559 Рік тому

    मजा आली खूप दिवसानी असा एडवेंचर बघायला अशेच गड़ किल्ले एक्सप्लोर कर खुप बरे वाटते बाघायला

  • @atishchatte5434
    @atishchatte5434 11 місяців тому

    Bhau chandrapurcha hoy kaga tu... Bhay mast bolte tu. Changle 📸 video ahe

  • @mahendrabhande775
    @mahendrabhande775 11 місяців тому

    mast bhava 👌🏻

  • @pandurangshimpi8716
    @pandurangshimpi8716 Рік тому

    Shivaji ke jay

  • @akashPhaltanlover45
    @akashPhaltanlover45 Рік тому

    Ek no.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому

    Awesome..

  • @user-mn7pi8nq6h
    @user-mn7pi8nq6h Рік тому

    जय शिवराय❤

  • @JivitaTalkies
    @JivitaTalkies Рік тому

    Kadak bhava ek number ❤

  • @roshanramane5551
    @roshanramane5551 Рік тому

    जय शिवराय🚩

  • @sonyaaranha7968
    @sonyaaranha7968 Рік тому

    Kadak bhavano❤

  • @azollafarmingindia3637
    @azollafarmingindia3637 Рік тому

    Best traker ever 👍

  • @p_presenting9285
    @p_presenting9285 Рік тому

    🔥🔥🔥 नेहमी प्रमाणे

  • @himanshupatil6130
    @himanshupatil6130 Рік тому

    Jay shivray mitra

  • @mandarambokarvlogs
    @mandarambokarvlogs Рік тому

    Ekdam thararak

  • @SAHIL-et5hw
    @SAHIL-et5hw Рік тому

    Jai shivray bhau

  • @RAJPUTBABU-
    @RAJPUTBABU- Рік тому

    Wow sir

  • @viewpoint-es4iq
    @viewpoint-es4iq Рік тому

    🙏🙏🚩wow...

  • @user-sn3yu8tf9n
    @user-sn3yu8tf9n 3 місяці тому

    Thanks

  • @uddhavpawar9838
    @uddhavpawar9838 Рік тому

    🎉 Great 👍👍

  • @its_shivam_edit_
    @its_shivam_edit_ Рік тому

    जय शिवराय प्रशिल दादा

  • @JKCRIMINALGAMING
    @JKCRIMINALGAMING Рік тому

    Jay Shivray ❤

  • @ajaygurav4359
    @ajaygurav4359 11 місяців тому

    वीर मावळा

  • @Poonamgaykar7333
    @Poonamgaykar7333 Рік тому

    Mast bhau❤

  • @bhagvangaming7758
    @bhagvangaming7758 Рік тому

    Jay shivray❤

  • @swapnilchavan.254
    @swapnilchavan.254 Рік тому

    मुळातच कळंब गावातुन या किल्ल्याच्या पायथ्याखाली जाणारी वाट शोधन कठिन त्यातुन ती घळ वर चढुन जाणे अतिकठीण तर वरच्या खिंडीतुन किल्ल्याचा माथा गाठणे महाकठीण काम आहे आम्ही कोणत्याही मदतीशिवाय हा किल्ला चढुन गेलो होतो आपला थरारक विडिओ पाहुन त्या आठवणी जाग्या झाल्या best luck for next videos keep going 👍👍

  • @diptidongare3718
    @diptidongare3718 Рік тому +1

    Take care da.. ❤😘

  • @hem764
    @hem764 Рік тому

    1no

  • @bhagvangaming7758
    @bhagvangaming7758 Рік тому

    Nice video ❤😊

  • @govindsjadhav
    @govindsjadhav Рік тому

    Great dear ❤

  • @Sandy.
    @Sandy. Рік тому

    Im big fan
    ❤❤❤❤😊😊😊

  • @sushamamahashabde9784
    @sushamamahashabde9784 Рік тому

    Best

  • @AjayKakde-cr6hx
    @AjayKakde-cr6hx Рік тому

    Nice prashil dada😅✊️

  • @mandarjoshi5164
    @mandarjoshi5164 Рік тому

    🎉

  • @akashbandurkar2122
    @akashbandurkar2122 Рік тому

    ❤❤❤

  • @vilasdevtule2150
    @vilasdevtule2150 Рік тому

    Nice bro kharch bhu tuzaymule aamla ghari basun ha chitthararak pahayla milato

  • @akshaydevre3570
    @akshaydevre3570 Рік тому +2

    भावा नाशिक जिल्हा येवला तालुक्यातील आनकाई किल्ला आहे तिथे पण नक्की भेट दे 😊