रंगपंढरी Face-to-Face: Girish Joshi - Part 1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 чер 2021
  • "भूमिका साकार करताना नटांना एखादी गॊष्ट जमत नसेल तर त्यामागचं मूळ कारण ७०% वेळा वरवर वाटत असलेलं नसतं. प्रत्येक अडचण नटांच्या skillset शी निगडित असेलच असंही नाही. प्रत्येक नटाची मानसिकता समजून घेऊन समस्येचं मूळ कारण दिग्दर्शकाला नेमकेपणाने शोधावं लागतं."
    - गिरीश जोशी
    'अबोली', 'प्रथम पुरुषी', 'फायनल ड्राफ्ट', 'लव्हबर्ड्स', 'पटकथा', 'माकडाच्या हाती शॅम्पेन', 'काटकोन त्रिकोण' अशी अनेक प्रयोगशील आणि गाजलेली नाटकं दिग्दर्शित करणारे गिरीश सर हे गेली तीस वर्षं रंगभूमीवर कार्यरत आहेत. 'रुद्रम', 'काकस्पर्श', 'रानभूल' आणि 'कदाचित' अशा अनेक मालिका आणि चित्रपटांचे लेखक/पटकथालेखक म्हणूनही ते ख्यातनाम आहेत.
    इंडो-जर्मन थिएट्रिकल कोलॅबोरेशन प्रकल्पाअंतर्गत निवड झाल्यावर जर्मनी मध्ये जाऊन नाटकांचा अभ्यास आणि जर्मन भाषेतून रूपांतरित केलेल्या 'खिडक्या' ह्या अतिशय वेगळ्या नाटकाचं भारतात केलेलं सादरीकरण हासुद्धा गिरीश सरांच्या कारकिर्दीतला एक उल्लेखनीय टप्पा.
    नाटक बसवताना मूळ संहिता, त्यातल्या व्यक्तिरेखा, नट मंडळी , संवाद ह्या सगळ्यांत भावनिकपणे अडकून न पडता नाटकाकडे 'अपेक्षित परिणाम साधायचे क्राफ्ट' अशा तटस्थ दृष्टिकोनातून गिरीश सर पाहतात. वरवर कोरडेपणाची वाटली तरी दिग्दर्शनाची ही वस्तुनिष्ठ पद्धत अनेक धाडसी, परस्पर-विरोधी, नवे प्रयोग करत राहण्यासाठी आणि नाटकाची अंतिम परिणामकारकता वाढवण्यासाठी कशी अनुकूल ठरते हे आजच्या भागात जाणून घेता येईल.
    संहितेतले टर्निंग पॉईंट्स म्हणजे काय, नव्या नटांची निवड करताना ऑडिशनशिवाय काय मार्ग आहेत, परदेशी नाटकात हल्ली कमीत कमी संगीत का वापरतात अशा दिग्दर्शनातील अनेक बारकाव्यांविषयी विस्तृतपणे बोलताहेत गिरीश सर.
  • Розваги

КОМЕНТАРІ • 28

  • @kaustubhjoshi1875
    @kaustubhjoshi1875 3 роки тому +7

    Ek number... आम्ही अक्षरशः एपिसोड आला की खाऊन टाकतो.
    संगीत क्षेत्राविषयी पण अशीच एक series करावी ही विनंती

  • @swaradaranade8713
    @swaradaranade8713 3 роки тому +1

    वा मस्त च! वाट बघत होते ! त्यांची बहुतेक नाटके मी बघीतली आहेत,! भारी व्यक्तीमत्व! ❤❤Thanks Rangpandhari !

  • @arunajadeja9324
    @arunajadeja9324 3 роки тому

    वाह, बर्याच दिवसानी रंग पंढरीची बहार! मस्त, मज्जा! 👍
    रंग पंढरी ! आम्ही सर्व तुमचे अत्यंत आभारी आहोत ! 🙏🙏🙏

  • @rohantare2301
    @rohantare2301 3 роки тому +1

    नाटकातील craft किती सोपं करुन सांगितलं, brillent Girish Joshi

  • @rohantare2301
    @rohantare2301 3 роки тому +12

    क्या बात! वीकएंड ची मस्त सोय केलीत. धन्यवाद रंगपंढरी टीम. कोविड काळात पण अविरत काम करताय! विजया बाईंची मुलाखत येणार आहे का?

    • @aditioak2683
      @aditioak2683 3 роки тому

      विजयाबाईंची आतुरतेने वाट पाहतोय.. 🙏

    • @meetapurohit979
      @meetapurohit979 3 роки тому

      विजयाबाईंना ऐकायचेच आहे.....कृपया त्यांना निमन्त्रित करावे , ही विनंती....🙏🙏

  • @pranjalpatil8195
    @pranjalpatil8195 3 роки тому +1

    Madhurani mam aamha la tum chi purna acting che journey ekkay che aahe, Please ranga pandhari varte tumchi journey sanga na. We are so exited to listen your all over journey Love you so much 😘😍😍❤️❤️❤️❤️

  • @atulsathe3579
    @atulsathe3579 3 роки тому +1

    Best interview till date..liked it very much. Interview format change is also good. Keep it up, bring more of such interviews

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 3 роки тому

    Finally..khup vaat baghayla lagli.

  • @moonwalk3rr
    @moonwalk3rr 3 роки тому

    Finally! ❤️

  • @priyankapatil4413
    @priyankapatil4413 3 роки тому

    Finally,,🎉

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 3 роки тому +1

    Khooooop vaat baghayala lavalit

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 3 роки тому +1

    खूप वाट बघत असते या एपिसोडची..मस्तच

  • @cadiwan
    @cadiwan 3 роки тому +1

    कमाल काम करतीये तुमची टीम !!

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 роки тому

      चारुदत्त जी! 🙏

  • @sk.p2588
    @sk.p2588 3 роки тому

    Aata konate project ahet

  • @pradnyeshkanade303
    @pradnyeshkanade303 3 роки тому

    टीम रंगपंढरी खूपच वाट पहायला लावता राव तुम्ही

  • @atulsathe3579
    @atulsathe3579 3 роки тому

    Vivek Bele, Prashant Damle, Jitendra Joshi hyanche pan interviews ghya please

  • @Jordan_negatiive
    @Jordan_negatiive 3 роки тому +1

    Kishor Kadam (Saumitra) hyannchi mulakhat ghya...
    Complex Ani depression var kashi maat karavi he tyanchyakdun aaj chya Tarun mula-mulinna kalana phar mahatwach watat..

  • @omalane3826
    @omalane3826 3 роки тому +1

    हाय हाय

  • @priyankssawant9576
    @priyankssawant9576 2 роки тому

    Elaborate!

  • @nileshnimhan2265
    @nileshnimhan2265 3 роки тому

    बेसिकली खुपच जड जड झालय.

  • @aartishinde637
    @aartishinde637 3 роки тому +1

    Atul Kulkarni sir natrang fame yanahi aikayla avdel

  • @TheRucha28
    @TheRucha28 3 роки тому

    Ma’am clisht ani boring part one

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 роки тому

      ऋचा जी, तुमच्या प्रामाणिक प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
      योगेश तडवळकर.
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी