राजे यशवंतराव होळकर महामेष योजना 2024 संपूर्ण माहिती| नवीन योजना|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • राजे यशवंतराव होळकर महामेष योजना संपूर्ण माहिती| नवीन योजना| #शासन_निर्णय #योजना
    राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेमुळे धनगर व तत्सम जमातीला फायदा होत आहे. या अनुदान योजनेतून मेंढ्यासाठी चराई अनुदान, मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान तसेच कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान दिले जाणार आहे. यासाठी 12 ते 26 सप्टेंबर पर्यंत या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
    राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेमध्ये स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सोई-सुविधेसह 20 मेंढया आणि 1 मेंढानर अशा मेंढी गटाचे 75 टक्के अनुदानावर वाटप, सुधारित प्रजातींच्या नर मेंढ्यांचे 75 टक्के अनुदानावर वाटप,
    मेंढी-पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 75 टक्के अनुदान दिले जाईल, मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी 75 टक्के अनुदान, हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान तसेच पशुस्वाद्य कारखाने उभारण्यासाठी 50 टक्के अनुदान इ. घटकांचा समावेश केला आहे.
    मेंढ्यासाठी चराई अनुदान या योजनेमध्ये ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान 20 मेंढ्या व 1 मेंढानर एवढे पशुधन आहे, अशा कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमाह रु. 6 हजार असे एकूण 24 हजार चराई अनुदान वाटप केले जाईल.
    मेंढी-शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान या योजनेमध्ये भुमिहीन मेंढपाळ कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास अर्ध बंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरिता जागा खरेदी करण्यासाठी जागेच्या किंमतीच्या 75 टक्के अथवा किमान 30 वर्षासाठी भाडेकरारावर जागा घेण्यासाठी भाड्यापोटी द्यावयाच्या रक्कमेच्या 75 टक्के रक्कम एकवेळेचे एकरकमी अर्थसहाय्य म्हणून कमाल रु. 50 हजार एवढे अनुदान दिले जाईल.
    कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान या योजनेमध्ये चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या 100 टक्के कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी कमाल रु. 9 हजार मयदित 75 टक्के अनुदान याबाबींचा समावेश आहे. सदर योजनेचे अर्ज जास्तीत जास्त पशुपालकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, यांनी केलेले आहे.
    यासाठी 12 ते 26 सप्टेंबर 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
    👉🏻आवश्यक कागदपत्रे
    आधार कार्ड
    बॅक पासबुक
    मोबाईल फोन otp साठि
    पासपोर्ट फोटो
    कास्ट प्रमानपञ/ निर्गम
    Your Queries:
    Maharashtra government
    Maharashtra government new schemes
    महाराष्ट्र शासनाच्या नवीन योजना
    मुख्मंत्री नवीन योजना
    शेळी, मेंढी पालन अनुदान
    शेळी, मेंढी पालन योजना
    शेळी, मेंढी, कुक्कुट पालन अनुदान
    पुण्यश्लोक अहिल्यादेवी योजना
    शेतकऱ्यांसाठी नवीन योजना
    मागासवर्गीय योजना
    Sheli mendhi palan anudan
    अहिल्यादेवी होळकर योजना
    Disclaimer:
    This video for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
    THANK YOU

КОМЕНТАРІ •