डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'ग्लोबल अपील'... सांगताहेत डॉ. आलोक जत्राटकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तीमत्त्व बहुआयामी स्वरुपाचे होते. अनेकविध पैलूंनी त्यांचे जीवनकार्य सजलेले आहे. त्यांना केवळ दलितांचे, अस्पृश्यांचे नेते अथवा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार अशा मोजक्या विशेषणांच्या चौकटींमध्ये बंदिस्त करणे गैर आहे. त्यापलिकडे त्यांचे एक प्रखर राष्ट्रप्रेमी म्हणून व्यक्तित्व स्तिमित करणारे आहे. ज्ञानाच्या क्षेत्रातले ते एक जागतिक दर्जाचे मान्यताप्राप्त अधिकारी पुरूष होते. जगाने 'सिम्बॉल ऑफ नॉलेज' म्हणून त्यांचा गौरव केला. केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर जागतिक पटलावर बाबासाहेबांचा वावर हा अत्यंत आत्मविश्वासपूर्ण होता. बाबासाहेब एखाद्या प्रश्नाविषयी काय सांगताहेत, याविषयी ऐकण्यास जगातील भलेभले नेते आतुर असत. अगदी इंग्लंडच्या बादशहाच्या कानी सुद्धा त्यांनी भारतीय अस्पृश्यांची कैफियत घालायला कमी केले नाही किंवा भारतीयांच्या राजकीय हक्कांच्या बाबतीत तडजोड करणे, गैरलागू आहे, असे ब्रिटीशांना गोलमेज परिषदेत ठणकावून सांगायलाही कमी केले नाही. बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्त्वामधील या 'ग्लोबल अपील'चा सदर विशेष व्याख्यानामध्ये डॉ. आलोक जत्राटकर यांनी वेध घेतलेला आहे. बाबासाहेबांचा वेगळा पैलू जाणून घेण्यासाठी आवर्जून ऐकावे, असे हे एक व्याख्यान...

КОМЕНТАРІ • 6