कविता : तेच ते ... तेच ते | विंदा करंदीकर | Spruha Joshi | Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2024
  • For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: Teamspruhajoshi@gmail.com
    तेच ते .. तेच ते - विंदा करंदीकर
    सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !!
    माकडछाप दंतमंजन,
    तोच चहा तेच रंजन
    तीच गाणी तेच तराणे,
    तेच मूर्ख तेच शहाणे
    सकाळपासुन रात्रीपर्यंत
    तेच ते तेच ते
    खानावळीही बदलून पाहिल्या
    कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं.
    काकू पासून ताजमहाल,
    सगळीकडे सारखेच हाल
    नरम मसाला, गरम मसाला,
    तोच तो भाजीपाला
    तीच ती खवट चटणी,
    तेच ते आंबट सार
    सुख थोडे दु:ख फार
    संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे
    त्या स्वप्नाचे शिल्पकार,
    कवि थोडे कवडे फार
    पडद्यावरच्या भूतचेष्टा;
    शिळा शोक, बुळा बोध
    नऊ धगे एक रंग,
    व्यभिचाराचे सारे ढंग
    पुन्हा पुन्हा तेच भोग
    आसक्तीचा तोच रोग
    तेच ' मंदिर ' तीच ' मूर्ती '
    तीच ' फुले ' तीच ' स्फुर्ती '
    तेच ओठ तेच डोळे
    तेच मुरके तेच चाळे
    तोच पलंग तीच नारी
    सतार नव्हे एकतारी
    करीन म्हटले आत्महत्त्या
    रोमिओची आत्महत्त्या
    दधीचिची आत्महत्त्या
    आत्महत्त्याही तीच ती
    आत्मा ही तोच तो
    हत्त्याही तीच ती
    कारण जीवनही तेच ते
    आणि मरणही तेच ते
    तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
    __________________________________
    Travel Vlog Playlist: • Travel Vlog
    खादाडी Playlist: • Khadadi Series
    गंमत गाणी Playlist: • गंमत गाणी
    #SpruhaJoshi #Poems #Marathi #kavita #nakoghabru
    ________________________________
    Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
    Instagram: / spruhavarad
    Facebook: / spruhavarad
    Twitter: / spruhavarad
    ____________________________
    DISCLAIMER: This is the official UA-cam channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
    __________________________________
  • Розваги

КОМЕНТАРІ • 226

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 23 дні тому +1

    तेच ते तेच कविता छान सादर केलीस परंतु तुझ्या सादरीकरणामधये तेच ते तेच ते असं नसतं तुझी कविता रोज सादर करण्याची लकब मात्र नवीन च असते.
    खुप छान कविता

  • @ashakulkarni6679
    @ashakulkarni6679 4 місяці тому +22

    लतानो सांगू का तुम्हाला उद्या श्रीराम येणार , वनाला सर्वया आता खरा इनंद होणार ! ही कविता मला चौथीच्या वर्गात होती , माझंवय आता पासष्ट आहे😊

  • @ravikantdani3267
    @ravikantdani3267 3 місяці тому +2

    विंदाची तेच तेच ही कविता आणि स्पुहा जोशींचे सादरीकरणही आवडलं ❤

  • @anagharanade3014
    @anagharanade3014 3 місяці тому +1

    मस्त g. तुझ्या tondun अजून ch कविता जिवंत होते.

  • @teardrop9562
    @teardrop9562 Місяць тому +2

    आठवते का तुला ती पहिली भेट...
    सुरवात मीच केली बोलायची
    पण शब्द मात्र रुसले होते
    प्रेमाने भिजलेल्या वाटेवर
    पाहुनी तुझ्या वेधक डोळ्यांना
    ओठ माझे अलगद हसले होते
    तुझ हसणं नि तुझ रुसण
    हे माझं असच तुझ्यात फसणं
    आठवते का तुला ती पहिली भेट...
    तुझ्या गोष्टी नि त्या गोष्टीतील तू
    नेहमी साद घालत राहते भोवती जणू
    मी झाड चंदनाचे नि तू वेल प्रीतीचा...

  • @suhasinipatwardhan1835
    @suhasinipatwardhan1835 5 місяців тому +4

    विंदांची पूर्वी वाचलेली, ऐकलेली कविता ; पण आज तुझ्याकडून ऐकतांना परत ताजी आणि गोड वाटली 😊
    धन्यवाद !!!

  • @user-of2og8hm4k
    @user-of2og8hm4k 4 місяці тому +2

    काही गोष्टी तुमच्या सारख्या कलाकारांमुळे जिवंत आहेत.....❤

  • @aparnakapade7758
    @aparnakapade7758 4 місяці тому +2

    खरचं खूप छान कविता ...तेच ते... संसारचक्र...कोणाचीही यातून सुटका नाही...कविता नकारात्मक वाटत असली तरी खुप मोठा सकारात्मक विचार सांगून जाते..👌👌👌

  • @bhaskarbhandari7832
    @bhaskarbhandari7832 4 місяці тому +3

    खूप छान कविता ऐकायला मिळाली.तेच ते तेच ते.धन्यवाद.

  • @geetagovilkar4877
    @geetagovilkar4877 5 місяців тому +9

    अश्याच आणखीन कविता ऐकायला नक्कीच आवडतील...thanks spruha..

  • @satishargade7836
    @satishargade7836 4 місяці тому +3

    कविता आणि सादरीकरण केवळ अप्रतिम ! अशाच नवनवीन काव्य सादरीकरणाची प्रतिक्षा आहे ! 🎉

  • @nandkishordeshmukh1258
    @nandkishordeshmukh1258 4 місяці тому +1

    खुप छान ...
    हि कवीता काहितरी सांगुन जाते.

  • @ShreyaPatil1008..
    @ShreyaPatil1008.. 4 місяці тому +1

    Thank you so much for such a beautiful experience ❤

  • @jagrutipatil9007
    @jagrutipatil9007 Місяць тому +1

    Khupch sunder sadrikaran

  • @rasikmitra4582
    @rasikmitra4582 4 місяці тому +1

    अप्रतिम,,मॅम,,तेच ते,,, जरी असलं तरी ते मांडताना तुम्ही खूप छान भावनिक झालात,, शब्दात तुमच्या भावना समोर येत होत्या,आरोह अवरोह नुसार खूप छान सादरीकरण,,तुमच शब्दफेक,सादरीकरनाच ऊत्तम कौशल्य, मोहक भावनुरूप आवाज मुळे कविता तेच ते जरी असली तरी एकावशी वाटली ,,👌👌🌹

  • @pallavisahane9599
    @pallavisahane9599 4 місяці тому +2

    अतिशय उत्कृष्ट सादरीकरण ❤🦋🌿

  • @user-hd3mn5ut9h
    @user-hd3mn5ut9h 4 місяці тому +1

    कवितेचा आशय छान आहे

  • @pandurangkadam2740
    @pandurangkadam2740 3 місяці тому +1

    छान....तेच ते....तेच ते....

  • @ajit_salunke
    @ajit_salunke 4 місяці тому +1

    खूप सुंदर सादरीकरण ❤

  • @ekulkarni6
    @ekulkarni6 4 місяці тому +1

    पृथ्वीचे प्रेमगीत ही कविता एकदा ऐकवा
    डॉ.एकनाथ कुलकर्णी

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 5 місяців тому +1

    किती सुंदर
    काय वाचन
    स्पृहा
    खबरदार टाच मारुन जाल
    पुढे
    अग शौर्य रसातील ही कवीता तुझ्या कडुन ऐकणे🎉❤

  • @user-uz7pv7wq3b
    @user-uz7pv7wq3b 3 місяці тому +1

    अप्रतिम

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 5 місяців тому +2

    स्पृहा…खरय तेच ते तेच ते…नवीन वर्षाच्या शुभेच्छा मात्र नवीन..नवीन…💐💐💐💐

  • @nileemakamat6140
    @nileemakamat6140 5 місяців тому +3

    स्पृहा तुझ्यामुळे , लईतल्या वाचनामुळे कवितेला एक वेगळाच साज चढतो आणि आम्हाला धुंदी.धन्यवाद स्पृहा

  • @pardipcheddu2443
    @pardipcheddu2443 5 місяців тому +1

    तुमच्या कवितेतून मन अगदी हलक झाल्यासारखं होत

  • @prabhakartilekar7937
    @prabhakartilekar7937 4 місяці тому +1

    खूपच छान ❤

  • @awadheshshembekar9524
    @awadheshshembekar9524 3 місяці тому +1

    Wah...khup chan

  • @poonambhagwat6765
    @poonambhagwat6765 4 місяці тому +1

    Khup chan

  • @shrirampophali
    @shrirampophali 5 місяців тому +5

    ही विंदांची सुंदर कविता ऐकविल्याबद्दल खूप खूप आभार! 💐

  • @rohinigokhale2099
    @rohinigokhale2099 5 місяців тому +2

    खूप आवडली कविता.. विंदां चा कवितेतला विचार फार छान मांडलास , स्पृहा.

  • @pratibhakulkarni9503
    @pratibhakulkarni9503 3 місяці тому +1

    Khup chan ❤

  • @user-io9nq2ku3p
    @user-io9nq2ku3p 5 місяців тому +1

    तेच ते , हे रोजच्या जिवनात असलेला एक छान शब्द आहे त्याचा आर्थ आज स्पृहा ताई कडून ऐकले खूप सुंदर वाटले, तुला लाखो शुभेच्छा.
    तुला वाचनास आवडणारे पुस्तके मला पन वाचायची आहेत त्यांची नाव समजली तरि खूप छान होईल.

  • @yoginijoshi9964
    @yoginijoshi9964 5 місяців тому +1

    स्पृहा ताई.. येवढे द्य्यावे कविता ऐकायला खुप आवडेल.
    आजची कविता सुद्धा खुप सुरेख!
    तुमच्यामुळे बर्याच जुन्या मराठी अप्रतिम कविता ऐकायला मिळाल्या.
    आमच्या सारख्या आजकालच्या मुलांना मराठीच्या वैभवाची खरी ओळख पटली.

  • @rudhirakarekar2309
    @rudhirakarekar2309 5 місяців тому +1

    खूप सुंदर.....कविता ज्या लईमधे वाचता ना त्यामूळे कविता अजुन सुंदर होते....धन्यवाद

  • @medhamanerikar4781
    @medhamanerikar4781 4 місяці тому +1

    छान कवितेचे छान सादरीकरण. कविता ऐकताना तोचतोचपणा नाही जाणवला .

  • @suneetakale1489
    @suneetakale1489 5 місяців тому +1

    तुझे कवितेवर किती प्रेम आहे ते दिसते .आम्हालाही आनंद घेता येतो .

  • @suvidyapanchpor6507
    @suvidyapanchpor6507 5 місяців тому +1

    खूप छान कविता वाचली स्पृहा तुझ्या कविता वाचनाने समाधान वाटते 👌🏻 धन्यवाद स्पृहा🎉🎉

  • @ashasawant948
    @ashasawant948 5 місяців тому +2

    ताजेपणा राखून असलेली सुंदर कविता.सादरीकरण सुंदर खूप प्रेम ❤

  • @suhrudjoshi7143
    @suhrudjoshi7143 3 місяці тому +1

    ह्या कवितेपेक्षा आपण कोणतीही सकारात्मक कविता सादर करा, मला ते आवडेल🙏

  • @tpmwithudk5914
    @tpmwithudk5914 2 місяці тому +1

    Beautiful voice

  • @veerendradhanal7351
    @veerendradhanal7351 4 місяці тому +1

    कवितेचा खुपच छान आशय, सादरीकरण अप्रतिम 😘🌹

  • @anjalikamat6225
    @anjalikamat6225 4 місяці тому

    स्पृहा खरचं खूप सुंदर सादरीकरण करतेस तू. मला एका जुन्या कवितेची फर्मआईश करायची आहे. अर्धवट माहिती आहे व कोणाची तेही माहित नाही पण तुला माहित असेल तर नक्की ऐकायला आवडेल.धन्यवाद.

    • @anjalikamat6225
      @anjalikamat6225 4 місяці тому

      कविता आहे
      रोज रोज तेच ते रोज रोज तेच
      डाव इतका सोपा नको हवा थोडा पेच.

  • @vijaymuley5433
    @vijaymuley5433 4 місяці тому

    या सर्व तेच ते तेच ते मध्ये आमची स्पृहा मात्र प्रत्येक वेळी. नव नवीशी वाटते हवी हवीशी वाटते कविते इतकचं उत्कृष्ट सादरीकरण ❤😊

  • @Smita_433
    @Smita_433 5 місяців тому +1

    Khup Sundar ani khupch relatable emotions 😊

  • @MihawkDracule5
    @MihawkDracule5 4 місяці тому

    SPRUHA.....SO HAPPY TO SEE YOU. तुझा आवाजात कविता ऐकायची मजाच वेगळी

  • @nitinnimkar1654
    @nitinnimkar1654 4 місяці тому

    ही कविता मी विं दा चा कार्यक्रम चिपळूणला केला असता त्यांच्याच तोंडून ऐकली होती. पुढे मी जेंव्हा मुंबईला पेईंग गेस्ट म्हणून रहात असे तेंव्हा त्यातली ती ओळ "काकू मावश्यां पासून ताजमहाल" याचा अनुभव मी साक्षात घेतलेला असल्याने ती ओळ माझ्या मनात पक्की रुतून बसली होती. मी ती ओळ अनेकांना सांगितली होती आणि आजही सांगतो. परत त्या कवितेची आठवण जागवल्या बद्दल धन्यवाद !!

  • @marathi640
    @marathi640 4 місяці тому

    भारतमाते पुत्र शहाणे अमित तुला लाभले तुझ्या कुशीला परी जन्मली काही वेडी मुले
    ही कविता ऐकवली तर खूप आनंद होईल

  • @sam53202
    @sam53202 4 місяці тому

    Khup Mast ...Thank you, Ma'am.

  • @vijayphadtare3493
    @vijayphadtare3493 4 місяці тому

    ही कविता पूर्वीही वाचली आणि ऐकली होती, परत तुझ्या आवाजात ऐकून छान वाटले, अप्रतिम सादरीकरण 👌👍

  • @user-lc4tk7ru6c
    @user-lc4tk7ru6c 5 місяців тому

    Chhan kavita. Ati sundar rachna.

  • @vivekvatve
    @vivekvatve 4 місяці тому +1

    nAMASKAR!

  • @suwarnananoti7542
    @suwarnananoti7542 5 місяців тому

    फार छान ! कविता आणि वाचन दोन्ही !

  • @vidyashelar416
    @vidyashelar416 4 місяці тому

    Agdi kharay Spruha ...ayushyat pratekacha toch to ratalvana divas rojcha yet ahe kahi vegla asa nasta ani kharach tyacha khup kantala yeto ....khup sunder varnan kelay tyacha ...kavita khup sunder ani tee tu khup sunder pafdhatine mandlis amcha samor ...❤❤❤

  • @shree5718
    @shree5718 4 місяці тому

    स्पृहा ताई आता तेच तेच नको
    आता नवीन नवीन नवीन नवीन नवीन शब्द पाहिजे
    मजा आली कविता छान छान मस्त मस्त
    Best luck best luck
    ❤🎉 🙏👏👌😃😀

  • @sharadahire95
    @sharadahire95 5 місяців тому +1

    अप्रतिम! Thank you Spruha ma'am

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 4 місяці тому

    खूप छान कविता❤
    स्पृहा तुला खूप खूप शुभेच्छा.

  • @user-vf9kg2yd7w
    @user-vf9kg2yd7w 5 місяців тому

    खरच खूप छान आहे कविता .. आणि तुमच्या तोंडून ती कविता .. आणि कवितेचा भावार्थ .. खरच . खुप खुप मस्त 👌👌👌❤️

  • @Gajanan79
    @Gajanan79 5 місяців тому

    तेच हसणं.. तेच दिसणं.. अतिशय सुंदर सादरीकरण

  • @vijaysabnis7291
    @vijaysabnis7291 4 місяці тому

    फार छान सादरीकरण. “ हात हवे मज…,” ही विंदांची कविता आपल्याकडून ऐकायला आवडेल.

  • @samruddhikadam2038
    @samruddhikadam2038 5 місяців тому +1

    ❤🎉😊👏👌👌
    खूप खूप छान कविता आणि तू खूप छान सादर केली त्या मुळे ती आणखीन छान वाटली👌👌👌💐😊

  • @user-qz4sv8om6j
    @user-qz4sv8om6j 4 місяці тому

    अगदी खरंय कविनी मोजक्या शब्दात पण अप्रतिम मांडलय 👌🙏

  • @susheelvibhandik4190
    @susheelvibhandik4190 4 місяці тому

    खूप सुंदर कविता खरच तेच ते...तेच ते
    👌🙏

  • @SuyashW
    @SuyashW 5 місяців тому +1

    Waah... khup chhan. Good to have you back on youtube

  • @chhayachavan2212
    @chhayachavan2212 4 місяці тому

    खूपच छान, आपण किती आयुष्यात तेच ते करतो,हे खुप छान मांडले आहे

  • @komaljibhakate3126
    @komaljibhakate3126 5 місяців тому

    Tuzhya mule kavita awdayla laglyat thanku dear❤

  • @madhurimafadnis6428
    @madhurimafadnis6428 5 місяців тому

    खूप छान 👌🏻 तू स्वतः एक कविता प्रेमी आहेस आणि अप्रतिम सादरीकरण करतेस. ❤

  • @seemapatilseema6085
    @seemapatilseema6085 5 місяців тому

    खुप सुंदर वाचता तुम्ही मी नेहमी ऐकत असते तुम्हाला 😊 खुप सुंदर

  • @vijaypuranik4975
    @vijaypuranik4975 4 місяці тому

    खुप छान कविता सुरेख सादरीकरण,👌👌🙏

  • @AmolPawar-ut1yh
    @AmolPawar-ut1yh 5 місяців тому

    खूप सुंदर आणि मार्मिक भावनेने एकवली ma'am तुम्ही कविता ... अप्रतीम

  • @raviarote8563
    @raviarote8563 4 місяці тому

    Apratim Sadrikaran Spruha 👍👍👍

  • @nilimahargode6231
    @nilimahargode6231 4 місяці тому

    अप्रतिम कविता +अप्रतिम सादरीकरण =हृदयात घंटानाद ❤

  • @prasadk5608
    @prasadk5608 Місяць тому +1

    स्पृहा कृपया सोपानदेव चौधरी ह्यांची "ताक" ही कविता मिळते का बघावे.

  • @PKP963
    @PKP963 5 місяців тому +1

    Tai khup masta kavita aani sadarikaran !!
    Please also have - 'Aise Kahi Vhave, Man Shant Nijave..'
    - Pratik Patil

  • @prachikulkarni6792
    @prachikulkarni6792 5 місяців тому +4

    खूप छान! मुग्धा आणि तुझ्या गप्पा फारच छान.kuthehi खोटेपणा, दांभिकता चा लवलेश नव्हता.aashich खरी उत्साही आनंदी न फ्रेश रहा. तुमच्या गप्पा मधिल काही goshtivar bolnyacha adhikaar नाही पण एक अशीच स्पृहा पुढच्या पिढीलीही मिळावी!❤

    • @geetasamel8519
      @geetasamel8519 5 місяців тому

      स्पृहा, तुमचं सादरीकरण अप्रतिम. कविता तर उत्तमच 🌹🌹

    • @geetasamel8519
      @geetasamel8519 5 місяців тому

      भा रा तांबे ह्यांची एक कविता, मधु मागसी माझ्या सख्या परी, आणि इतर ऐकवाल का केव्हा तरी 🌹🌹🌹

  • @24-Rohandeshmukh
    @24-Rohandeshmukh 5 місяців тому

    खुप छान कविता आहे खूप आवडली ❤❤

  • @harsh_artandpoetry
    @harsh_artandpoetry 4 місяці тому

    खूप छान कविता आहे...आणि सादरीकरण पण खूप छान...👍

  • @vrindadesai4671
    @vrindadesai4671 5 місяців тому

    Navin upkramala shubhechya.tuze kavita vachan mala aawadte .asech chan upkram houdet

  • @navnathkumbhar4101
    @navnathkumbhar4101 5 місяців тому

    Mast ch.. punha ekda suru kelya baddal ... Thank u so much...

  • @sainathsontakke1150
    @sainathsontakke1150 4 місяці тому +1

    छान

  • @user-hi8qp1gi1j
    @user-hi8qp1gi1j 4 місяці тому +1

    Very nice 👍👍

  • @asmitabagal2893
    @asmitabagal2893 5 місяців тому +1

    Tujha sadarikaran itka sunder aasta ki kuthalihi kavita sunder watate

  • @user-en7qz1qb3h
    @user-en7qz1qb3h 5 місяців тому

    Khup sundar video ❤❤

  • @user-jw5ju7px4d
    @user-jw5ju7px4d 5 місяців тому

    Khup sunder...

  • @antarangakavita1428
    @antarangakavita1428 5 місяців тому

    खूप सुंदर सादरीकरण ताई 👌

  • @shaileshdande
    @shaileshdande 4 місяці тому

    खुप खुप छान 🙏🏽

  • @harishkalavar6065
    @harishkalavar6065 5 місяців тому

    KHUP Khup chan way you express
    ❤❤❤❤

  • @nikhilshedge3553
    @nikhilshedge3553 4 місяці тому

    मस्तच ताई❤❤❤

  • @saritakulkarni3503
    @saritakulkarni3503 4 місяці тому

    खूप सुंदर कविता सादरीकरण

  • @susmitaparanjape
    @susmitaparanjape 5 місяців тому

    विं. दा. करंदीकर यांची कविता तर उत्तमच आहे आणि स्पृहा ताई नेहमीप्रमाणेच सादरीकरणसुद्धा उत्तमच!!
    पुन्हा हा उपक्रम सुरू केल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच अनेक कविता ऐकण्यासाठी आम्ही वाट बघत आहोत.
    पुन्हा एकदा धन्यवाद!! ❤

  • @seemawarudkar4080
    @seemawarudkar4080 4 місяці тому

    अप्रतिम 👌

  • @ruchadeepakkarpe1491
    @ruchadeepakkarpe1491 5 місяців тому

    खूप छान सादरीकरण...
    मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन... मंगेश पाडगावकरांची ही कविता सादर कर‌ नं प्लीज

  • @shubhammankar5978
    @shubhammankar5978 5 місяців тому

    खूप छान❤

  • @nayanamandke7304
    @nayanamandke7304 4 місяці тому

    अशाच छान छान कविता ऐकवत जा

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 5 місяців тому

    वाह ..... स्पृहा , मस्त सादर केलीस तू ही कविता , खूप आवडली .... 👌👌👌👌

  • @udaykulkarni7479
    @udaykulkarni7479 5 місяців тому

    अप्रतिम सदरीकरण

  • @suvarnamore3266
    @suvarnamore3266 5 місяців тому

    खूप सुंदर कविता

  • @nalinigaznaregazbare4989
    @nalinigaznaregazbare4989 4 місяці тому

    Spruha khoop sundar sadikaran 👌👌

  • @shitalpevekar4231
    @shitalpevekar4231 5 місяців тому

    खूप छान..

  • @tanvijadhav8959
    @tanvijadhav8959 4 місяці тому

    मस्त....❤

  • @mukeshdesaiopju
    @mukeshdesaiopju 4 місяці тому +1

    Best wishes to you for your new journey 🎉