Bavdhan Bagad 2023 | बावधन बगाडाची अतिशय अवघड पण डोळ्याचे पारणे फेडणारी प्राचीन परंपरा |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • Bavdhan Bagad 2023 | बावधन बगाडाची अतिशय अवघड पण डोळ्याचे पारणे फेडणारी प्राचीन परंपरा |
    #bavdhanbagad #bagad #bavdhan #bavdhanbagad2023 #bavdhanbagadyatra #bavdhanyatra #बगाड #बावधनबगाड #bavdanbagad #bavdhanbagadyatra2023#bagadbavdhan #bavdanbagad #bagadyatra #bagadbavdhan2023 #bagadyatra2023 #latestbagadvideo #latestbagad2023 #latestbagadvideo2023 #bagadnewvideo #famousbagad #famousbagadinmaharashtra
    about video-
    बावधनची बगाड यात्रा (bavdhan bagad yatra): बावधनची बगाड यात्रा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन येथे दरवर्षी बगाड यात्रा भरते. इंग्रज काळाच्या अगोदरपासून बावधनमध्ये बगाडाची परंपरा चालत आलेली आहे. गावातील भैरवनाथाच्या मंदिरामधील सभामंडपात असलेल्या लाकडी खांबावर ठोकलेल्या नालांवरून ते लक्षात येते. होळी पौर्णिमेपासून बावधनच्या यात्रेला सुरुवात होते तर रंगपंचमीदिवशी येथे बगाड भरतं. ही यात्रा अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक ही यात्रा पाहण्यासाठी येत असतात. बावधनच्या बगाड यात्रेसाठी फक्त खिल्लार बैलच वापरण्याची प्रथा आहे. कारण या खिल्लार बैलांशिवाय इतर कोणताही गोवंश इतक्या ताकतीचा नाही. म्हणूनच बावधनमधील प्रत्येक घरामध्ये एक तरी धिप्पाड खिल्लार बैल सांभाळलेला दिसतो.
    बगाड म्हणजे काय? बावधन येथील यात्रेत जे बगाड वापरले जाते त्याचं वजन तब्बल २ ते ३ टन इतके असते. बागडाला दगडाची चाके, दगडी चाकावर कणा, कण्यावरती बूट, बुट्यावरती साठी, साठी वरती वाघ, वाघावरती खांब, खांबावरती शीड अशी बगाडाची रचना असते. बगाडाच्या शिडाला टांगलेला नवसाचा बगाड्या असतो. होळी पौर्णिमेच्या दिवशी बावधनच्या बगाड यात्रेचा बगाड्या निवडला जातो. ज्या माणसाचा नवस पूर्ण झाला आहे अशाच व्यक्तीला बागड्या म्हणून निवडले जाते.बावधन गावातील सुतार समाज मिळून हे बगाड बनवत असतात. यात्रेपूर्वी सलग ८ ते १० दिवस 24 तास काम करून बगाडाचा गाडा पूर्ण केला जातो. बगाडाचा गाडा पूर्णपणे बाभळीच्या लाकडापासून तयार केला जातो. लोखंडाचा वापर केला जात नाही. आळदांडी चंदनाची असते. बागडाला वापरले जाणारे लाकूड हे ओले असल्या कारणाने ते जास्त वजनदार असते. बगाड झाल्यानंतर सर्व साहित्य हे गावातील विहिरीमध्ये ठेवले जाते. कि जेणेकरून ते पुढील २ वर्ष वापरले जाते.

КОМЕНТАРІ • 10