अरे काय संसार आहे हा ! - सयाजी शिंदे || Sayaji Shinde.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025

КОМЕНТАРІ • 3 тис.

  • @rahulmusale1387
    @rahulmusale1387 3 місяці тому +2061

    २००८ या वर्षी सयाजी शिंदे सर जेव्हा नशिक ला आले तेंव्हा फक्त विनंती केली की सर मी नविन ऑफिस चालु केले त्या माध्यमातून गोरगरिबांना आम्ही आर्थिक मदत करतो.... तेंव्हा सर तत्काळ ऑफिसवर आले आणि पाहाणी केली असता त्यांनी ऑफिस चे नाव सिद्धी विनायक ग्रूप ठेवण्यास सांगितले, माझे मित्र परिवार यांना जेव्हा कळाले की सर येत आहेत, तर सयाजी सर पायात स्लीपर आणि साधं शर्ट आणि पँट घालून आले सर्वांना वाटले की येव्हाढा मोठा कलावंत आणि साधी राहणीमान.... तूम्ही समाजासाठी काही तरी देणं लागत असे काही सुन्दर कार्य करा, आज २२ अँब्युलन्स तेही विनामूल्य आणि रोज गोरगरिबांना दोन टाईम मोफत अन्नदान करण्यात येतं.. सर हे सर्व श्रेय फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादाने असेच चालु राहणार ❤❤

    • @Sayajishinde.
      @Sayajishinde.  3 місяці тому +230

      माझ्या सदिच्छा सदैव आपल्या पाठीशी आहेत...!!🙏✨

    • @Bhim-kq5uu
      @Bhim-kq5uu 3 місяці тому +15

      ❤​@@Sayajishinde.

    • @rahulmusale1387
      @rahulmusale1387 3 місяці тому +14

      @@Sayajishinde. 🙏💕 धन्यवाद सर 💕🙏

    • @kashyapr7947
      @kashyapr7947 3 місяці тому +9

      शुभेछा 🎉🎉❤

    • @dattatraygaikwad1956
      @dattatraygaikwad1956 3 місяці тому +49

      मेंढपाळ समाजचे फार खडतर जीवन आहे, अभिनेता सयाजी शिंदे यांचे माणूसकीचे दर्शन दिसले, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद देखील सर

  • @rajendragadekar8392
    @rajendragadekar8392 3 місяці тому +1126

    सयाजी शिंदे यांना महाराष्ट्र सरकार ने महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला पाहिजे. सहमत असेल तर लाईक/ कॉमेंट करा...

    • @kesharkamalagrojalna9549
      @kesharkamalagrojalna9549 3 місяці тому +23

      त्यांना महाराष्ट्र भूषण भेटणार नाही कारण ते ब्राह्मण नाही आत्तापर्यंतचे महाराष्ट्रभूषण चेक करा

    • @govindingale674
      @govindingale674 3 місяці тому

      ब्राह्मण पाहिजे

    • @subhashchavan6554
      @subhashchavan6554 3 місяці тому +3

      Barobar.aahe.Sayaji.Siranche.kam.changale.aahe.sirana.vinti.aaheki.maharastrat.paús.kamiaahe.karan.vadachi.zade.kami.zali.aahet.vadanchya.zadachi.lawan.karave.lagel.

    • @tusharjavir
      @tusharjavir 3 місяці тому +12

      कसा मिळेल भाऊ कारण इथ खरं बोलणाऱ्या आणि सामान्य माणसांना किंमत नाही...😢😢

    • @anukamble5525
      @anukamble5525 3 місяці тому +5

      आदरणीय,वंदनिय सयाजी शिंदेना महाराष्ट नाही पण सार्‍या जगातला सोनेरी पुरस्कार द्या हेच भारत सरकारलानिवेदन आहे.......

  • @ChandrakantPawar-s2e
    @ChandrakantPawar-s2e 3 місяці тому +531

    आजपर्यंत चा यू ट्यूबवर पाहिलेला सर्वोत्तम व्हिडिओ ❤मानाचा मुजरा🙏 शिंदे जी 💐

  • @Ingoledeepak
    @Ingoledeepak 2 місяці тому +49

    त्या ताईच बोलण खूप मोकळ आणि प्रेरणादायी आहे... ती किती शिकलेली आहे माहिती नाही, पण या जगात माणसाने कसं असायला पाहिजे तर नक्कीच या ताईसारख मन मोकळ...❤❤❤

  • @dhb702
    @dhb702 3 місяці тому +263

    डोळ्यात पाणी आलं भाऊ यांचे कष्ट, साधेपणा बघुन. या माऊली चा संसार सुखाचा होवून तीला लेकरं बाळ होऊ दे ही देवाला प्रार्थना !

  • @dilipsangar6217
    @dilipsangar6217 3 місяці тому +395

    माणुसकी जपणारा मोठा,दिलदार माणूस म्हणजे आदरणीय श्री.सयाजी शिंदे साहेब.प्रणाम.

  • @tukaramdube4286
    @tukaramdube4286 3 місяці тому +43

    सयाजी सर मी एक संगमनेर तालुक्यातील मेंढपाळ आहे तुमची मेंढपाळ समाजाबद्दल ची सहानुभूती बघुन मन अगदी भरून येते

  • @RajendraKedari-s9e
    @RajendraKedari-s9e 3 місяці тому +525

    सयाजीराव एवढे कष्ट करून देखील ताई किती समाधानी आहे खरच आलिशान बंगल्यात राहून देखील काही बायका समाधानी नसतात त्यांनी जरा यांचा पाशी येऊन पहावं म्हणजे आयुष्याचा खरा अर्थ समजेल त्यांना... खरच ग्रेट असतात अशी माणसं...👌👌👌💗💗💗💞💞💞💞

    • @LAXMAN_ILAG
      @LAXMAN_ILAG 3 місяці тому +10

      दादा, तुम्ही म्हणता तसे ते ग्रेट आहेत पण परिस्थिती त्यांना तसे ग्रेट बनवते🙏

    • @nagnathpawale2202
      @nagnathpawale2202 3 місяці тому +7

      अशी जर भटके लोक फिरतात व पोट भरतात, याना पण आरक्षण आहे पण फायदा होत नाही, खुप वाईट अवस्था आहे समाजात ,शिदें सर आपले खुप चागले आहे

    • @user-qy5yi8ql6y
      @user-qy5yi8ql6y 3 місяці тому +6

      @@RajendraKedari-s9e kharach saheb fakt sukh शोधता आल पाहिजे बस...

    • @sumitgarad9177
      @sumitgarad9177 3 місяці тому

      Man liya to moj he Varna samsya roj he

    • @महाराजा3649
      @महाराजा3649 3 місяці тому +1

      हे मात्र एकदम बरोबर आहे कारण अलिशान बंगल्यात राहणाऱ्यांना समाधान कशात हेच समजत नाही. हे आहे त्यात समाधान मानतात.

  • @kirankalel1118
    @kirankalel1118 3 місяці тому +781

    उगाच कोणी गाडी थांबवून विचारपूस नाही करत करणं त्यानी हे दिवस अनुभवलेले आहेत शेवटी सातारकर आहे नाळ मातीशी आणि निष्ठा माणसांशी ❤❤❤

    • @rahuldevkate9684
      @rahuldevkate9684 3 місяці тому +4

      अगदी बरोबर 🔥👍

    • @santoshranawade5212
      @santoshranawade5212 3 місяці тому +4

      आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो

    • @sandipdombale4760
      @sandipdombale4760 3 місяці тому +1

      Help by economic

    • @user-dgp84
      @user-dgp84 3 місяці тому +2

      ​@Bharat_Ki_Sair_With_Youbhava sainikancha jilha ahe to satara

    • @shortswithvilas6153
      @shortswithvilas6153 3 місяці тому

      Bhau sayaji shinde he parbhanikar ahe

  • @manishagawli9331
    @manishagawli9331 Місяць тому +28

    दादा मी स्वतः शिक्षिका असून या लोकांचे आयुष्य जवळून पाहण्यात येते,आपण केलेले फार च कौतुकास्पद आहे .आनंद वाटतो जेव्हा आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून काम करत असता,लोकांच्या भावना समजून घेता.धन्यवाद दादा.😊

  • @sharadsutar9692
    @sharadsutar9692 3 місяці тому +107

    कमाल आहे सयाजीराव.... विश्वास बसत नाही. परमेश्वर आपल्याला ऊदंड आयूष्य देणार.

  • @balasahebganage720
    @balasahebganage720 3 місяці тому +181

    कोणताही मनुष्य पैशाने नव्हे तर विचारांनी मोठा असला पाहिजे सयाजी सर तुम्ही एका गरीबाची विचारपूस केली त्याबद्दल धन्यवाद

  • @Ronaldoghuge3341
    @Ronaldoghuge3341 3 місяці тому +56

    वंजारी धनगर समाजाचे लोक गरीब आहेत पण खूप नम्र आणि प्रामाणिक आहेत 😢❤

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 місяці тому +1

      Shrimant aahet

    • @laxmankakde1086
      @laxmankakde1086 Місяць тому +1

      💯💞

    • @KrishnaliGhuge
      @KrishnaliGhuge 25 днів тому +3

      वंजारी समाजातली कोणतीच स्त्री मांसाहार सेवन करीत नाहीत, धन्यवाद !!!

    • @KrishnaliGhuge
      @KrishnaliGhuge 20 днів тому +1

      @@Ronaldoghuge3341 वंजारी व धनगर व इतर आले एकत्र म्हणून आनंद झाला सर्वत्र !.....

    • @आत्मनिर्भर22
      @आत्मनिर्भर22 15 днів тому +1

      एकाद्या गरीब म्हणजे पूर्ण गरीब नसतो!

  • @user-qy5yi8ql6y
    @user-qy5yi8ql6y 3 місяці тому +226

    निशब्द...! तीन वर्ष गावापासून दूर राहून पोट भरणारी ताई आपल्या गरीब नवऱ्याबरोबर किती सुखात संसार करते आहे हे पाहून डोळ्यात पाणी आल. आज काल आजूबाजूच्या परिसरातील काही गोष्टी बघून वाटत फक्त आयुष्याची साथ देणारी लक्ष्मी चांगली मिळाली त्या घराला घरपण आणून देते नाहीतर आज सगळ्या गोष्टी मिळून पण काही लोक खुस राहू शकत नाहीत. सलाम साहेब तुम्हाला व्हिडिओ बनवील्याबद्दल ❤😊

    • @kailasdhondkar3869
      @kailasdhondkar3869 3 місяці тому +2

      Salute tai🎉

    • @sudhirwasnik.asst.lecturer163
      @sudhirwasnik.asst.lecturer163 3 місяці тому

      During watching this video eyes filled with tear.

    • @hemrajpatil2197
      @hemrajpatil2197 3 місяці тому +4

      ताईच, वाक्य ऐकलं का, नोकरी वाल्यापेक्षा भारी आहे पण हाल लई हेत.... समाधानी कुठं बी राहता येतं.... मानलं पाहिजे... 🙏👍

    • @kirankangane3745
      @kirankangane3745 3 місяці тому

      *नोकर वाल्यापेक्षा भारी हाल लई* हे वाक्य वंजारी समाजा बदल बरच काहि सांगुन जाते.

  • @shubhamsmagar
    @shubhamsmagar 3 місяці тому +230

    सयाजी सर…एक ही दिल हैं कितनी बार जीतोगे❤

  • @jotiramshedage1873
    @jotiramshedage1873 2 місяці тому +7

    आत्तापर्यंत यूट्यूब वर पाहिलेला सर्वात छान व्हिडिओ सयाजी सर तुम्ही तर फार ग्रेट आहात सातारकरांची शान आणि अभिमान सयाजी शिंदे

  • @suryakantpawar1758
    @suryakantpawar1758 3 місяці тому +112

    आवाज सुद्धा खलनायक सारखा परंतु प्रेम किती प्रेमळ गरीबा साठी गाडी थांबवून चौकशी त्यांची करतात धनगराचा वाड्यावर जातात जिथे धनगर लोक मेंढ्यांना वाघर लावून थांबतात सयाजीराव तिथे जाऊन प्रेमाने चौकशी करतात खरच सयाजी राव मनापासून सॅल्यूट आहे तुम्हाला असा कलांवत होणे नाही. यांना खरच पदमश्री असे पुरस्कार दिल पाहिजे .

    • @NIKJOD18
      @NIKJOD18 9 днів тому

      वंजारी आहे हे... आमच्या जवळच्या गावाच्या आहेत

  • @Gautamputra_Sandip
    @Gautamputra_Sandip 3 місяці тому +205

    2:51 स्त्री ची सुंदरता तिच्या लाजनातून दिसते
    आणी नवऱ्याच नाव घेताच तिच्या चेहऱ्यावर लाज उमटली 😊👌🏻

  • @pikeltevikelagricalcharproduct
    @pikeltevikelagricalcharproduct Місяць тому +6

    ताई च्या चेहऱ्यावर समाधान आहे एवढं त्रासाच जीवन असून पण, धन्य झालो आज व्हिडीओ पाहून नवीन प्रेरणादायी

  • @ashokadhav5196
    @ashokadhav5196 3 місяці тому +95

    आज जगातील सर्वात श्रीमंत माणसांचे मनाने श्रीमंत असलेल्या माणसाने दर्शन घडविले धन्यवाद. 🙏

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 3 місяці тому +76

    फिल्म इंडस्ट्रीत मोठ्या उंचीवर असुन देखील मातीशी नाळ जुळवून ठेवलेले आणि गोर गरीबांची जान, आपुलकी आणि नितांत प्रेमभावना असलेले एकमेव अभिनेते यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.💐💐💐💐💐👍👍🙏 जयहिंद.🙏

  • @ravijagtap1980
    @ravijagtap1980 3 місяці тому +9

    जीवनाशी ना कसला राग ना कसला रोष किती समाधानी जीवन. खरंच ताई आणि दादा ग्रेट आहात तुम्ही..... 🙏🙏

  • @bappasahebkhandare01
    @bappasahebkhandare01 3 місяці тому +113

    मी पण वंजारी आहे आमच्यकडे पण अगोदर आजोबाच्या काळात मेंढ्या होत्या
    मेंढीपालन मध्ये पैसा आहे पण
    कष्ट खूप आहेत
    खूप हालकीचे जीवान् जगाव लागत
    आरोग्य नाही शिक्षण नाही
    जय भगवान
    बाळू मामाच्या नावान चांगभलं

    • @santoshshinde2841
      @santoshshinde2841 3 місяці тому +1

      माणूसीकीतला माणूस सयाजी

    • @DipakParkhe
      @DipakParkhe 3 місяці тому

      P po ky b

    • @jagnnathpatil5575
      @jagnnathpatil5575 3 місяці тому

      ताई आमच्याकड पण आहेत

  • @shriramsharanjimaharaj1506
    @shriramsharanjimaharaj1506 3 місяці тому +207

    ज्या लोकांनी कष्टाने मेहनत करून प्रपंच उभा केला त्यांनाच या व्हिडिओचे महत्व समजणार आहे. अतिशय भावनिक 😢😢😢😢

  • @HiteshGawle-bm4lj
    @HiteshGawle-bm4lj Місяць тому +5

    माननीय सयाजीराव शिंदे ( माझे आवडते अभिनेते ) यांना कोटि - कोटि वंदन ! साहेब , आपण खुप छान आहात ! भगवंत आपलं मंगल करो !

  • @Farmer-i9i
    @Farmer-i9i 3 місяці тому +103

    झगमागीत मराठी हिंदी साऊथ च्या चित्रपट सृष्टी पासुन आपल्या मातीशी ईमानी राखणारा,, मोठा दिलदार माणूस म्हणजे सयाजी दादा (सर ),,, जमिनी हकीकत जाणणारा, मातीशी नाळ जपणारा थोर माणूस,, सलाम दादा तुम्हाला 🙏🙏👍👍

  • @madhurideo8710
    @madhurideo8710 3 місяці тому +49

    कष्ट करण्याची तयारी असली की चेहेऱ्यावर किती आनंद दिसतो. धन्य आहेत. नोकरीवाल्या पेक्षा भरी.

  • @chandrashekharpawar8034
    @chandrashekharpawar8034 Місяць тому +1

    सयाजी शिंदे साहेबांनी मनिशवताईना आशीर्वाद दिला....तुझ्या विस्तवाचे आंगार होऊन फुल होऊदे.. आयुष्य चांगल होऊदे संसरांच फुलात रूपांतर होऊदे... आनंद आनंद मिलुदेत... संसार चांगला हाउदेत ....डोळे भरून आले...खूप छान

  • @nitindombale8678
    @nitindombale8678 3 місяці тому +506

    सयाजी शिंदे सर माणूस जीवाभावाचा... मनापासून अभिमान वाटतो तुमचा समाजातील सर्व जनमानसात तळागाळापर्यंत पोहोचणारा मातीशी नाळ आणि इमान राखून ठेवणारा अभिनेता..... 🙏❤

  • @DigamberNikhande
    @DigamberNikhande 3 місяці тому +74

    माऊलीच्या पोटी पुत्र नाही पण माऊली खूप आनंद दिसती एवढा किचकट संसाराचा गाडा ओढणे हीच खरी श्रीमंती

  • @all_in_one244
    @all_in_one244 3 місяці тому +67

    सयाजी शिंदे साहेब तुम्हाला सलाम,
    तुमच्या सारख्या अभिनेतानी धनगर, वंजारी समाज हा खऱ्याअर्थाने भटका समाज आहे त्यांना शासना मार्फत मेंढी व्यवसाय करण्यासाठी अनुदान दिले पाहिजे,सर तुम्हाला विनंती आहे की अशा गोरगरीब समाजाला मदत करा
    जय महाराष्ट्र...... धन्यवाद

  • @mohanghevade6794
    @mohanghevade6794 3 місяці тому +95

    मस्त वाटले त्यांच्याशी संवाद साधल्यामुळे डोळ्यात पाणी आले

  • @vikasdeokar6392
    @vikasdeokar6392 Місяць тому +7

    संसार.... हाच शब्द सर्व काहि सांगून जातो माणसाला..... सयाजी सर ग्रेट पर्सन...... काट्या कुट्या शब्द एकूण .... तवा मला दिसती जशी माझी माय.... हे गाणं मला आठवलं... बहिणाबाई यांची कविता अस्या लोंकावर आधारित असायच्या 👌🙏सयाजी शिंदे 🙏

  • @Kan29099
    @Kan29099 3 місяці тому +106

    सयाजी सर.... जर महाराष्ट्रात काही क्रांती घडवून आणायची असेल तर तुमच्या सारख्या... देव माणसाची खरोखर खूप खूप गरज आहे....

    • @siddhantkamble9041
      @siddhantkamble9041 3 місяці тому

      @@Kan29099 भाऊ कृपया सरांना देव म्हणवू नका.... त्यांना माणूसच म्हणून जगू द्या... कारण तसपण आपल्या इथं देव फार लवकर बनतात आणी लोक त्यांची एकदाची मंदिर बनवण्यात एकमेकांमध्ये कुरघोडी करून त्या व्यक्तीच माणुसपण हिरावून सरा दोष त्यांवरच टाकला जाता... कारण आपल्या देशात ज्यानीं ज्यानीं चांगली कामा केलीत लोकांनी त्यांना देव बनवलंय आणी त्याच्या फक्त चांगल्या कामांचा आणी नावाचा राजकारण माजवलंय त्यान्चे अनुकरण सुद्धा करायची लायकी नाही समाजात... साद्ध्यातर् सगळे फक्त ऱील् प्लेयर आहेत.... हे सयाजी सर ने सुद्धा बघितलं असेल १५ओगस्त् सारख्या ओकेजन्स ना......😅😅😅

  • @OwnParadise_
    @OwnParadise_ 3 місяці тому +52

    सयाजी अण्णा तुमच्यामुळे आम्हाला समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचून त्यांना जाणुन घेण्याची संधी मिळतेय. 👌🏻

  • @dilipkadu8572
    @dilipkadu8572 2 місяці тому +5

    जय मल्हार. खंडोबा प्रसन्न होणार. खरच खूप छान माहिती मिळाली. वाकडी खंडोबा . सर्व ईच्छा पुर्ण होणार. जय मल्हार.

  • @khadednyaneshwar2790
    @khadednyaneshwar2790 3 місяці тому +30

    आमच्या शेजारी धनगर व वंजारी समाजाचे लोक एकत्र राहतात
    धनगर व वंजारी समाज खुप कष्ट करतो - सलाम स्त्री शक्तीला - सलाम तुमच्या कष्टाला

  • @sunilkhavare4830
    @sunilkhavare4830 3 місяці тому +29

    गोर गरीब आणि कष्टकरी माणसांविषयी असलेली आपली आत्मीयता. अगदी सहज आणि निर्मळ मनानं त्यांच्याशी केलेला प्रेमळ संवाद आणि त्यांना आपण दिलेला शुभाशीर्वाद, इतका मोठा माणूस पण जराही दिखावा किंवा अहंभाव नाही....
    आपल्या बिझी शेड्युल मधून वेळात वेळ काढून आपण सर्व सामान्य लोकांच्या जगण्याला, त्यांच्या संघर्षाला आणि त्यांच्या जिवन प्रवासाला किती सहजतेने समजू शकता.
    ग्रेट सर.....
    मनापासून सलाम...!
    🙏🙏

  • @nivruttipatil2184
    @nivruttipatil2184 2 дні тому

    सर मन भरुन आले
    कोण थांबत कुणासाठी
    धन्यवाद सर परमेश्वर तुम्हाला 100 वर्षं आयुष्य देवो
    तुम्ही गोरगरिबांना राजे वाटतात

  • @Bhushanpatil491
    @Bhushanpatil491 3 місяці тому +31

    काही माणसे ही दैवी शक्ती प्राप्त झालेली असतात
    पण त्या दैवीशक्तीने काही लोकांना गर्व येतो पण हा माणूस कायम जमीनीवरच आहे
    मागे शेतात यांनी केलेला व्हिडीओ पाहून हा किती साधा माणूस असेल याची प्रचिती आली
    आणि आजचा व्हिडीओ पाहून मन अगदी मंत्रमुग्ध झाले कारण इतका साधा माणूस आपल्या महाराष्ट्र भूमीत जन्मला धन्य आहे
    अशीच प्रगती करा साहेब
    आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य आणि बलदंड हिम्मत देवो
    🎉🎉🎉🎉🎉

  • @uttamjondhale8386
    @uttamjondhale8386 3 місяці тому +42

    शिंदे सर तुमच्या या आपुलकीला, माणुसकीला मानाचा मुजरा आणि कोटी कोटी सलाम तुम्ही एवढे स्टार असतांना आमच्या गरीब माणसांची आस्थेने विचारपूस केली गाडी थांबवून खाली उतरून समस्या जाणून माणसांविषयी प्राण्यांविषयी जो जिव्हाळा दाखवला तो अगदी वाखाणण्याजोगा आहे सर, मातीतल्या माणसांसाठी किती प्रेम दाखवलं सर आपले कौतुकासाठी माझ्या कडे शब्द नाहीत त्याबद्दल मी माझं अज्ञान व्यक्त करतो सर या परिस्थितीत आमच्या कडे पहाण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो आम्ही मातीतले माणसं स्वभावाने गोड मायाळू असतो तुम्ही आमच्या आखरी आले असते तर चहापाणी घेतल्याशिवाय जावु दिलं नसतं,बरय सर भेटु पुन्हा. संगमनेर तालुका कौठेकमळेश्वर

  • @dhanajikamble-vj3we
    @dhanajikamble-vj3we 3 місяці тому +55

    गरिबाला मदत आणि त्याच कौतुक करायला सयाजी दादा तुमच्या धाडस लागत...दादा तुमच्या हातून असच खूप सुंदर कार्य घडो.मदत लागली तर आम्हीही सोबत येऊ....या जगात श्रीमंत माणसं खूप आहेत पण गरीब व्यक्तीची मदत करायला खूप लोकांना इच्छा नसते.आपणास विनंती आहे कि आपणा आपल्या माध्यमातून कष्टकरी, गरीब शेतकरी मुलांच्या शिकक्षनासाठी मदत करावी.मला सयाजी दादा तुमचा साधे पणा खूप आवडतो. सावळजकर. ..

  • @bhaskaryadav2980
    @bhaskaryadav2980 3 місяці тому +28

    धन्यवाद संसारला आणि समाधानला फक्त समाधान पाहीजेत संसार आपोआप चांगला होतो धन्यावाद सयाजी शिंदे साहेब इतके मोठे असुन सुध्दा गरीबाची काळजी घेतात

  • @anilshingate7969
    @anilshingate7969 Місяць тому +1

    सर तुम्ही मेंडपाळ बांधवाशी जे संवाद साधला ती त्याची साठी खूप मोठा आनंद आहे हा आनंद ते कधी विसरून शकत नाही आणि त्याची विचारपूस केली तआणि त्या बद्दल मी खूप आभारी आहे सर

  • @dattabagar8265
    @dattabagar8265 3 місяці тому +49

    उगच आपलं मन भरुन आलं😢 कुणीतरी विचारपुस करतय नाही तर कोन विचारतय कुणाला बर वाटलं भाऊ धन्यवाद,,🙏

  • @SubhedarSable
    @SubhedarSable 3 місяці тому +14

    मन हेलावून टाकणारा व्हिडिओ आहे.सयाजी शिंदे यांचे मनापासून आभार.. मनिषा व लाला यांचा संसार व एक मेकावरील विश्वास पाहून आनंद झाला.भाऊबीजेपोटी मनिषा हीस भेट दिली असती तर फार आवडले असते.दोघा उभयतांचे पुढील आयुष्य सुखा समाधानाचे व भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @VikasDudhal-r2h
    @VikasDudhal-r2h Місяць тому +1

    काट्या कुट्यात जगणे... काट्या कुट्यात मरण 😢😢.. सयाजी शिंदे सर यानी स्वताच्या आवाजात गाणे गायले.. मस्त सर 😢😢😢

  • @mangeshkapadi5057
    @mangeshkapadi5057 3 місяці тому +28

    खरेच मनाला आणि काळजाला लागला हा वीडियो.
    खरंच मायेचे/माऊलीचे शब्द काळजाला लागलेत.
    मनाच्या आतमध्ये खूप दुःख दडलेले असते, हाल असते परंतु मनावर एकदम हसू, सगळे दुःख विसरून माऊली एकदम मनभरून मोकळा संवाद करतांना, आणि मराठी कलेतील एक उत्कृष्ट अभिनेता एकदम सर्व साधारण व्यक्ती म्हणून अपरीचितांशी संवाद साधून आम्हा बघे करांचे मन जिंकले गेले

  • @manevitthaldadu4741
    @manevitthaldadu4741 3 місяці тому +23

    मोठ मोठ्या चि कोनिही विचार पुस करेल पण गोर गरीब आनि भटकि जमात ह्याची सर आपण अगदी मनापासून विचार पुस केली हे प्रेम आपुलकी जिव्हाळा देने सर्वांना जमत नाही त्यास पन वाघचे काळीज लागतं सर खुप खुप धन्यवाद

  • @sunilsawant5510
    @sunilsawant5510 3 місяці тому +29

    दादा तुम्ही फार सहिष्णू अहात. निसर्ग, प्राणी पक्षां बद्दल प्रेम आहे. त्तुम्हाला सर्व कार्या साठी हार्दिक शुभेच्छा!!😊

    • @SunilPadmukh
      @SunilPadmukh 3 місяці тому

      Great ॲक्टर सयाजी शिंदे सर 🙏

  • @JeevanParulekar1967
    @JeevanParulekar1967 3 місяці тому +52

    सुंदर सयाजी, कोणता बिषय किती खुबीनं हाताळशिल अन् मने जिंकशील ठाव नाय लागायचा तूझ्या चाहत्यांना🎉

  • @bhagwangavle7773
    @bhagwangavle7773 Місяць тому +1

    समाधान किती आहे भारी , कुणाच्या आध्यात नाही मध्यात नाही असे माणसं इमानदारीने जगतात.❤

  • @ucp8975
    @ucp8975 3 місяці тому +20

    खूपच ग्रेट सर, भावना शब्दात व्यक्त होऊ शकणार नाही. ईश्वर आपल्याला चांगले आरोग्यदायी आयुष देवो ही प्रार्थना!

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 3 місяці тому +22

    सयाजी सर धनगरी जीवन म्हणुन चॅनल आहे असच एक धनगर माणसाचं तुम्ही पाहा ते एकदम भारी जीवन जगतात सरळ साधं मानवी जीवन 🙏🙏

  • @brettlee437
    @brettlee437 17 годин тому

    फक्त आणि फक्त सलाम.....वेदना सहवास प्रयत्न सहनशिलता मेहनत प्रवास = जीवन एका मेंढपाळा चे

  • @pravinmane9678
    @pravinmane9678 3 місяці тому +19

    दिलदार मनाचा राजा माणूस धनगरी जीवन काय असत ते चित्रपटाच्या माध्यमांतून आणि स्वतःच्या स्वभावातून स्पष्ट पणे मांडणारा आवलिया खरच खुप अभिमान आहे सर तुमचा

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 3 місяці тому +10

    मेंढपाळ लोकांची एक खासियत आहे ,एवढं कष्ट , हाल आहे पण कधी तोंडावर दाखवत नाहीत .सदा हसतमुख,समाधानी असतात .धनगरी जीवन मधले सिधू आणि बानाई ताई पण असेच आहेत❤ hat's off to you Sayaji Sir❤

  • @raghunathawate97
    @raghunathawate97 Місяць тому +1

    स्वाभीमाणी ताई छान बोलली सहानुभूती मिळवण्याचा बोलताना कसलाही प्रयत्न केला नाही
    नशीबाचं जीनं निकराचे प्रयत्न,कष्ट करून मस्त जगतात तीन तीन वर्षं घराबाहेर उघड्यावर संसार पाठीवर घेऊन फिरनं निसर्गाचा सामना करत चेहरा हसतमुख ठेवने यालाच जीवन म्हणतात पण पैसा मीळत असला तरी
    मेंढपाळांचा जीवनप्रवास खडतर आहे...

  • @milindnikade4847
    @milindnikade4847 3 місяці тому +12

    चित्रपटातील हिरो,
    जमिनीवरील उघड्यावर संसार मांडणाऱ्यांच्या व्यथा जाणून घेतोय तेव्हा,गरीबी आणि श्रीमंती मधील अंतर कमी होत
    सर तुमच्या कार्य कर्तृत्त्वाला सलाम

  • @dattupiple6661
    @dattupiple6661 3 місяці тому +11

    आभाळा एवढी उंची गाठुन जमिनीवर पाय असणारा देव मानुस..ग्रेट सयाजी दादा...

  • @yogeshdange7375
    @yogeshdange7375 Місяць тому +1

    हे फक्त सयाजी शिंदे करू शकतात इतका मोठा कलाकाराने साध्या माणसांना इतका वेळ दिला तर खूप खूप धन्यवाद साहेब जय मल्हार

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx 3 місяці тому +68

    धनगर वंजारी यांचं भावा भावाचं नातं आहे हे हे कित्येकदा सिद्ध झाले जात वेगळी असूनही❤🎉

    • @vitthalraosanap6776
      @vitthalraosanap6776 3 місяці тому

      💯✔️✔️

    • @ravindrapawara5741
      @ravindrapawara5741 3 місяці тому +3

      माणुसकीला जात पण असते?

    • @digambardhaware9311
      @digambardhaware9311 3 місяці тому

      💯✔️✔️💐💐👌👌

    • @Vishmauli_wellness192
      @Vishmauli_wellness192 3 місяці тому

      100% अगदी बरोबर

    • @vasantashinde5723
      @vasantashinde5723 3 місяці тому +4

      जात माणसाने निर्माण केली, समाज व्यवस्था म्हणून. पण आज तो इगो झाला आहे. तो या जातीचा हा त्या जातीचा.
      जात पात मानू नये.

  • @ashdukare6008
    @ashdukare6008 3 місяці тому +24

    सर धनगरी जीवन चॅनल बघा तुम्ही किती छान आहे आणि त्यातली ती बानाई तर खूपच छान किती आनंदाने जगतात ते नक्की आवडेल तुम्हाला

    • @shailendraborate6954
      @shailendraborate6954 3 місяці тому +1

      अगदी बरोबर!

    • @shailendraborate6954
      @shailendraborate6954 3 місяці тому +1

      माझी मुलगी, सून सगळे IT मध्ये इंजिनिअर आहेत, त्यांना मी कायम बाणाई चे हसतमुख समाधानी काम कष्ट करीत असताना चे व्हिडिओ सेंड करतो व है डोळ्यासमोर कायम ठेवा आनंदी जगण्या साठी हे सांगतो!

  • @santoshchaudhari4658
    @santoshchaudhari4658 5 днів тому

    जगण्याचा आनंद आणि आयुष्य काय आहे याचा फरक तरी आज आपल्या सर्वांना शिंदे सर यांनी आपल्याला दाखवलेला आहे मानाचा मुजरा प्रेरणा दाई ताईच्या आयुष्याला सरांच्या साधेपण ला

  • @Kan29099
    @Kan29099 3 місяці тому +22

    सयाजी सर.....खूप खूप धन्यवाद तुम्ही इतके मोठे कलाकार आहात...पण तुम्ही हे सगळे जमिनीवर राहून.... इतकी आपुलकीने विचारपूस करत आहात... अहो इतकी विचापुस तर सगे सोयरे देखील करत नाही.... U r great sir... Keep it up.....

  • @sushantjagtap2238
    @sushantjagtap2238 3 місяці тому +18

    किती प्रेमळ हास्य आहे त्या ताईंचे. मनाची श्रीमंती सोबत घेऊन फिरणारे लोकं आहेत हे. मनाचा भिकरपणा असणारे लोकं फक्त पैशाने श्रीमंत असतात.

  • @mahadevs691
    @mahadevs691 Місяць тому +1

    फारच छान. अशा लोकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काही ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. माझी मदत करण्याची तयारी आहे.

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 3 місяці тому +97

    या म्हणतात कष्टाची भाकरी आर्मी वाले सारखी आहे शिंदे साहेब यांचे अभिनंदन गरीबीची विचार पूस केल्या बद्धल ❤❤❤🎉🎉🎉🎉

    • @kashk117
      @kashk117 3 місяці тому

      आर्मी चा काय संबंध 🤣

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i 3 місяці тому

      ​@@kashk117नसेल ही,, पण तुमच्या सारखे जळके खुप आहेत, पण सयाजी दादा ला तुमच्या सारख्यान मुळे कधीच काही फरक पडत नाही,, मला वाटत तू शहरवासी आहेस तुला काय कळणार मातीची किंमत!!तू जे खातो ना ते आम्हा शेतकऱ्यांन केलेल्या कष्टा मुळे भेटतं एवढं लक्षात ठेव मित्रा,, मी पण शेतकरी आहे आणि ग्रामीण भागातील आहे त्यामुळे कष्टाची किंमत मला कळते,, नावे ठेवण्या पेक्षा समाजाशी आपल काय तरी नाते आहे हे विसरू नको कधी,,,, त्यांनी संगोपन, संस्कृती, विचार, कर्तव्य सगळं जोपसलय बर का!!!!

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i 3 місяці тому

      ​​@@kashk117अरे आर्मी वाले जसे कष्ट करतात त्याच्याशी तुलना केली,, तुला कसं कळणार कारण समोरचा काय सांगतोय ते तुझ्या पबजी मेंदूला कसं कळणार बर 😂, मित्रा तुला भाकरी आणि कष्ट समजत नाही, कारण तू पिज्जा बर्गर वाला आहेस,, एक दिवस शेतात राबून कष्टा ची भाकरी खा मग आयुष्याची किंमत आणि स्वतःच्या अस्सल आयुष्याची जाणीव होईल हे मात्र सत्य आहे

  • @balasahebnagargoje
    @balasahebnagargoje 3 місяці тому +11

    खरा देवमाणूस जमिनीवर पाय असलेला सयाजी सर is always great सलाम तुमच्या कार्याला

  • @yogeshkadam6556
    @yogeshkadam6556 3 місяці тому +1

    वास्तविक जगणं आणि वास्तविक जीवन माननीय सयाजी शिंदे साहेब आपण हा वस्तू पाठ आज दाखवलात खूप खूप धन्यवाद आणि माझ्याही या दांपत्यांना मनःपूर्वक शुभेच्छा

  • @DNYANESHWARSATPUTE-rz9dc
    @DNYANESHWARSATPUTE-rz9dc 3 місяці тому +11

    परस्थितीची जाणीव असणारा माणूस, आपल्या मातीशी असणारी गठ्ठ नाळ, मनापासून सलाम श्री.सयाजी शिंदे साहेब❤

  • @sagarvidhate-b8i
    @sagarvidhate-b8i 3 місяці тому +22

    सयाजी शिंदे ग्रेट व्यक्ती. भटकंती करून, कष्ट करून उदरनिर्वाह करणारे समाजातील गरीब भगिनीचां सत्कार आणि आशीर्वाद दिला .. मन भरून आले.

  • @lokeshp5618
    @lokeshp5618 Місяць тому +1

    शिंदे साहेब आपण एवढे मोठे सेलिब्रिटी होउन सुद्धा मातीशी जुळलेली आहेत हीच मोठी गोष्ट आहे.❤

  • @santoshghag8115
    @santoshghag8115 3 місяці тому +28

    सयाजी सर तुम्ही माणसाने माणसासाठी कसे जगावे,ह्याची शिकवण देत आहात जगात देवपण आहे तो माणसात आणि मनुसकित लपला आहे आपल्या माणुसकी जपणाऱ्या कार्याला सलाम❤

  • @ajaykumbhar3427
    @ajaykumbhar3427 3 місяці тому +83

    काळजाला टिचकी देऊन गेला video हा 😢👌🏻

  • @vitthalpalve8768
    @vitthalpalve8768 Місяць тому +1

    स्व श्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी ""माधव"" पॅटर्न तयार केला होता तो याच भटक्या समाजातील लोकांसाठी!!!! मला अभिमान तर आहेच पण गर्व सुध्दा आहे """वंजारी""" असल्याचा!!! अभिमान वाटला सयाजी शिंदे साहेब यांचा त्यांनी आपला अमुल्य वेळ माझ्या बहिणीसाठी दिला!! जय भगवान जय मल्हार!!!

  • @amoltaware5104
    @amoltaware5104 4 дні тому

    सयाजी सर तुम्ही खूप चांगले काम करत आहात आणि गरीब लोकांना असाच मदतीचा हात देत राहा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सयाजी सर

  • @आबासाहेबबोराडे-ण2ण

    धन्यवाद शिंदे सर एकदम चांगला अनुभव आनंद घेता त्या मेंढपाळ व आपणास खूप खूप शुभेच्छा

  • @surekhanigade3653
    @surekhanigade3653 3 місяці тому +33

    सयाजी शिंदे सर तुम्ही एकदा धनगरीजीवन हे यु ट्यूब. चॅनल पाहून त्यांची मुलाखत घ्यायला पाहिजे चार लाखांवर त्यांचे सबसक्रायबर आहे भटकंतीवर छान माहिती देतात तो एक मेंढपाळ आहे

    • @annasonikam5143
      @annasonikam5143 3 місяці тому +1

      सिद्धू हाके तुमच्याच गावचा आहे काय कारण तुमचे आडनाव निगडे आहे राख तुमचं गाव आहेत काय धन्यवाद

    • @vandanakamble713
      @vandanakamble713 3 місяці тому +2

      हा बरोबर धनगरी जीवन

  • @prakashotawanekar618
    @prakashotawanekar618 4 дні тому

    सयाजी शिंदे यांच्या सारखें कलाकार फारच दुर्मिळ. जें गरीब माणसांची व्यथा, पर्यावरण याची पुरेपूर काळजी घेऊन सर्वांना प्रोस्याहीत करतात. सलाम आपल्या कार्याला.❤❤❤

  • @indugajbhiye8974
    @indugajbhiye8974 3 місяці тому +46

    मायाळू दयाळु प्रेमळ मानसा सयाजी शिंदे ह्या पृथ्वी वरती हे दुःख पाहून होत नाही रे दादा पण शेवटी सगळ देवाच्या हातात आहे देव त्यांना सुखी ठेवो हिच सदिच्छा सया तुला देवाचा आर्शीवाद❤❤❤

    • @pandharinathjadhav1480
      @pandharinathjadhav1480 3 місяці тому

      ताई तुम्ही खूप समाधानी आहात, आमच्या कडे सर्व असुन समाधान नाही त.

  • @shekharmansukh661
    @shekharmansukh661 3 місяці тому +14

    खूप मोठ्या मनाचा आणि जिवाभावाचा व्यक्ती म्हणजे सयाजी शिंदे... अस्सल सोन 🌟✨❤

  • @pradiplahane4900
    @pradiplahane4900 4 дні тому

    खरंच जीवनाची खरी परिस्थिती युट्युब वर व्हिडिओ नेहमी पाहतो पण आजचा व्हिडिओ खूप साधं जीवन जगण्याची पद्धत शिकून गेला

  • @somnathtawale7437
    @somnathtawale7437 3 місяці тому +10

    सयाजी सर तुमचे कार्य खूपच महान आहे... माणसाने माणसाशी माणसा सम जगावे.... आपल्या कार्याला सलाम

  • @rajkumarmane2881
    @rajkumarmane2881 3 місяці тому +9

    सयाजी शिंदे सरांना मानाचा मुजरा
    गोर गरीबांची आपले पणान विचारपूस करुण
    माणसानं माणूस म्हणून जगण्याची ऊर्जा देणारा
    माझा विष्णू बाळा

  • @satishdhawle5785
    @satishdhawle5785 Місяць тому +2

    खरा अभिनेता मनापासून आभार सर खूप खूप छान

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 3 місяці тому +14

    मनाला स्पर्श करुन गेला हा व्हिडिओ. धन्यवाद सयाजी राव.
    एकच प्रार्थना माऊलीच्या झोळीत एक लेकरु टाकावं.
    🙏🙏🙏

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 3 місяці тому +23

    जमिनीवर पाय असणारा अभिनेता 🙏 सयाजी शिंदे दादा🙏

  • @vishalsarwade2797
    @vishalsarwade2797 3 місяці тому +1

    सर तुम्ही वेगळेच आहात
    काळजात लय माणुसकी आहे,
    अस्सल सोन आहे मन तर नेहमीच दिलदार असतं तुमच 👌

  • @BabasahebBangar-wh6uo
    @BabasahebBangar-wh6uo 3 місяці тому +2

    सयाजी शिंदे सर तुमच्या कार्याला सलाम ,खर सुख हे मेंढपाळ, ऊसतोडणी करणारे यांच्या कडे आहेच, नाहीतर कर्मचारी, साहेब एक तर आजार आणि आलेल्या पैसे चे काय करायचे यातच मेले❤❤❤

  • @panduranglavte4068
    @panduranglavte4068 3 місяці тому +30

    हा फक्त भटक्या आणि मेंढरे राखणारा बांधवच करू शकतो 8:14

  • @karangadade5743
    @karangadade5743 3 місяці тому +26

    सर तुम्ही जो पण व्हिडिओ बनवताना तो म्हणाला लागतो खरच अभिमान आहे तुमचा ❤❤❤❤😊

  • @VitthalraoSabale
    @VitthalraoSabale 28 днів тому

    अत्यंत कठीण खडकातच थंड व गोड पाणी असते हे सत्य आह तसेच शिंदे सर तुमचा दिसणा-या स्वभावात मनात लोण्यापेक्षाही मऊ स्वभाव पहायला मिळतो पाठीवरचा संसार आहे मानवाचा

  • @kallpanapraviinthube380
    @kallpanapraviinthube380 3 місяці тому +7

    सया दादा तुम्ही खूप ग्रेट आहात तुमच्या सारखा कलावंत आणि निसर्ग प्रेमी माणसाचा जन्म महाराष्ट्रात झाला याचा आम्हाला अभिमान आहे

  • @marathibhaktisangit
    @marathibhaktisangit 3 місяці тому +6

    आदरणीय सयाजी साहेब.... तुम्ही धनगर समाजाचे जीवन अगदी जवळून बघितले ते जीवन तुम्ही जगुनही बघितले.... काय त्रास असतो ते पण सांगितले तुम्ही... साहेब... फक्त धनगर समाजाला सर्वांनी सांभाळून घ्यावे हीच विनंती आहे. त्या दाम्पत्याच्या सत्कार केला हे पाहुण बरं वाटलं.... धन्यवाद.

  • @sandipdange1669
    @sandipdange1669 3 місяці тому

    माणुसकी जपणारा माणुस आदरणीय मनमोकळे पणाने बोलणारा अभिनेता,सयाजी शिंदे साहेब एवढा मोठा माणुस गरीब माणसाची व्यथा जाणुन घेतो. हा म्हणजे माणसतला माणुसपणा जिवंत आहे, असा गोड स्वभावाचा माणुस .
    परिस्थीतीची जाणीव आणि कदर आहे या माणसाला . पशुप्रेमी, निसर्गप्रेमी, शिंदे सर
    खर तर आम्हांला आपण मोठे हिरो आहे हे माहित होत परंतु तुम्ही tv तल्या हिरो पेक्षा ही समाजातील समस्या जाणुन घेतात. खरे हिरो आहे.

  • @rajendramane6227
    @rajendramane6227 3 місяці тому +13

    माणुसकी जपणारी माणसे आहेत अजून दादा खूप सुंदर असतात तुमचे व्हिडिओ डोळ्यात पाणी आणता तुम्ही .......🎉🎉🎉🎉

  • @rajendramane6227
    @rajendramane6227 3 місяці тому +32

    दादा १ हात जोडून विनंती तुम्ही मदत करता . अजून अश्या लोकांना मदत करत जावा कारण तुमच्या सारखी मानस कमी आहेत महाराष्ट्र त हार शाल देऊन तुम्ही सत्कार केला खूप आनंद झाला ❤❤❤❤❤

  • @sanjaymore9374
    @sanjaymore9374 3 місяці тому +1

    श्री सयाजी शिंदे साहेब आपण सातारचे असल्याचा आम्हाला अभिमान आहे आपली साधी राहणी उच्च विचार आम्हाला प्रेरणादायक आहे मला अभिमान आहे मी सातारकर असल्याचा असल्याचा

  • @baburaodadas
    @baburaodadas 3 місяці тому +12

    खुप छान सर सर्व सामान्य माणसाच्या काळजाला भिडणारा माणूस म्हणजे सय्याजी शिंदे सर🔥🔥🙏🙏 हाच आहे आमचा सातारा❤❤