Manoj Priti अँड Lunch @ Bamburi Beach | Pravin Mankar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 жов 2024
  • १०७।मनोज जोशी
    परवा
    परवा मनोज जोशी नवनाथ मंदिरात अचानक भेटला. मी अन तो २००३ मध्ये बरोबर काम करत होतो. प्रसाद घेतांना म्हणजे जेवतांना आम्हीं आठवणींना उजाळा दिला. घासून पुसून साफ केल्या. दीर्घ चाललेलं जेवण जास्त गोड लागत होतं. मजा आली. याची, त्याची चौकशी झाली. स्मरणातली गल्ली परत अनुभवली.
    टाटा बाय बाय करतांना तो भावना व्याकुळ झाला होता. प्रीती ही उल्काची चांगली मैत्रीण. तेंव्हा दोघीजणी मुंबासा भाजी मार्केट मध्ये जायच्या - स्वस्त भाजीच्या शोधात. दोघी काटकसरी - म्हणून मैत्र घट्ट. मनोज म्हणाला - मानकर साहेब मला उद्या सुट्टी आहे, घरी जेवायला या दुपारी. नंतर कुठे तरी फिरू. मी ' हो ' म्हणालो. कारण अजून ..... ( घरी येतांना मी विचारात होतो - एकाच ठिकाणी मनोज पंचवीस वर्षे - अर्थात तो खूप कमी शिकलेला आहे - क्लार्क होता, आहे आणि .)
    काल
    मनोजचा फोन आला. म्हणाला ' मानकर साहेब आज आपण बांबूरी बीच वर जाऊ. तेथेच जेऊ '. मी ' ओके ' म्हणालो कारण मला बीच वर जायचं होतंच. गेलो. फेरफटका मारला. जेवलो. खूप गप्पा मारल्या. गप्पांच्या अंती कळलं की - मनोज प्रीती ची मुलं - एक मुलगा अन एक मुलगी - लंडनला आहेत. मुलीचं लग्न झालंय - ती तेथे स्थिरावली आहे. मुलगा स्थिरावेल असा मनोजचा विश्वास आहे. माझ्या जुन्या मालकाकडे तो पंचवीस वर्षे काम करतोय. मुलांच्या शिक्षणाचा खर्च मालकाने केला. पूर्ण खर्च. आत्ता वर्षापूर्वी फ्लॅट पण घेतला.
    हा खर्च अपॉइंटमेंट लेटर मध्ये होता का ? नाही. मनोज काम करत गेला - मनोभावे. मालक खुश. पंधरा वर्षांनी मनोजला मदत - बक्षीस. मनोजला दरवर्षी मालक चांगली इन्क्रिमेंट देतो का ? तर उत्तर ' नाही '. पण अचानक गरज पडेल तेंव्हा मदत करतो. इथली पद्धत 'अशी' आहे. सगळे गुजराथी - कमी शिकलेले - इथे येतात अन सिरिअसली काम करतात अन त्यांचा फायदा होतो - लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट सारखा ( दहा टक्के ). काही शॉर्ट टर्म वाले - भारतात परत येतात - काहीही न कमावता ( चाळीस टक्के ). उरलेले पन्नास टक्के मालकाला फसवतात अन स्वतःच्या आयुष्यात जिंकतात. वाचकहो, प्लिज असं समजू नका की चोरीचा पैसे टिकत नाही. किंबहुना ' चोरीच्याच पैशावर ' लोकं प्रचंड श्रीमंत झालेली उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर आहे. आफ्रिकेत माणूस स्मार्ट हवा.
    बघा बांबूरी बीच. निळा समुद्र.

КОМЕНТАРІ •