वारकरी परंपरेचा 'एक्स रे', नव्हे 'एमआरआय' | Book | Warkari |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • देतो तीक्ष्ण उत्तरे...
    पंढरीच्या पांडुरंगाच्या प्रसादाच्या लाह्या भाजताना जशा फुलून तडातड उडतात, तसे घेरडीच्या माळावर त्यांचे शब्द तडतड करत फुटत होते.
    त्या शब्दांना अभ्यास, व्यासंग, मेहनत आणि भक्तीचा खरपूस गंध होता. 'देतों तीक्ष्ण उत्तरें, पुढें व्हावयासी बरें' अशा भूमिकेतून ते माझ्या प्रश्नांना उत्तरे देत होते.
    ह. भ. प. ज्ञानेश्वर बंडगर. अवघ्या पंचविशीतला माझा स्नेही. सांगोल्यातील घेरडी गावाजवळच्या माळरानावर त्यांचं घर आहे. तिथंच त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. 'होय होय वारकरी' असं पुस्तकाचं नाव.
    पुस्तकामधून या युवा कीर्तनकारानं वारकरी चळवळीचा 'एक्सरे'च नव्हे, तर 'एमआरआय 'काढलाय, असं मी म्हणालो. मी असं का म्हणतोय, ते ही व्हिडिओ मुलाखत ऐकल्यावर कळेल.
    कॉमेंटमध्ये संपूर्ण मुलाखतीची लिंक दिली आहे, ती जरूर ऐका. महत्त्वाचं म्हणजे पुस्तक मिळवून वाचा. वारकरी परंपरेविषयी ज्याला जाणून घ्यायचंय, त्यानं ते वाचलंच पाहिजे.
    फार महत्त्वाचा माणूस होऊन बसणार आहे हा तरुण पुढच्या काळात!
    व्हिडिओ : अजय रासकर
    #ज्ञानबातुकाराम #dnyanobamauli #marathi #vitthalmandir #sangola #pandharpur #saint #पंढरपूर #सांगोला

КОМЕНТАРІ • 5

  • @yogeshnampurkar3827
    @yogeshnampurkar3827 Місяць тому

    छान चर्चा सत्र झाले... तुमची खुर्ची जबरदस्त आहे.

  • @amishgawande8367
    @amishgawande8367 Місяць тому

    बंदघर महाराजांचे निमित्ता ने, खरच असा बंडखोर वक्ता, कीर्तनकार, आणि आता लेखक महाराष्ट्रा ला लाभलेला आहे,
    या पुस्तका तुन नक्कीच, क्रांती घडेल, खूप उत्सुकता लागली आहेपुस्तक वाचण्याची,

  • @amolshelke4683
    @amolshelke4683 Місяць тому

    चक्रधर शिव फुले शाहू आंबेडकर विचारमंच कडून आपणास मानाचा मुजारा

  • @rangraohirdekar7778
    @rangraohirdekar7778 Місяць тому +1

    सर मी हे गावं पाहिलं आहे मी भेटून येतो नंबर द्या