कपारीत असलेले मुंजाबा मंदिर - ओतुर
Вставка
- Опубліковано 3 січ 2025
- कपारीत वसलेला ऐतिहासिक मुंजाबा देव - ओतुर
ओतुर शहराच्या पुर्वेस अगदी सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाकरवाडीच्या पुर्वेस असलेल्या दक्षिण डोंगर माथ्यावर असलेला हेच ते ऐतिहासिक मुंजाबा मंदिर. येथे अनेक कातळकोरीव पाय-या असुन मुंजाबा देवतेच्या कपारी समोरच एक ६× १२ फु लांबी रुंदी चे पाण्याचे टाक कोरलेल पहावयास मिळते. साधारण पाच फूट खोल असलेले हे टाके असुन बदगी बेलापूरचे ग्रामस्थ पुर्वी या वाटेने ओतुरच्या बाजारपेठेत येत असावेत व त्यांची तहान भागविण्याचे काम हे पाण्याचे टाके करत असावे. याच डोंगराच्या माथ्यावर एक शिवलिंग कोरले असुन जुन्नर तालुक्यातील अनेक ऐतिहासिक वास्तुंचे दर्शन येथुन घडत आहे. या ऐतिहासिक वास्तूंचा उल्लेख कुठेही वाचण्यास मिळत नाही त्यामुळे हा परीसर तज्ञ इतिहास अभ्यासकांच्या नजरेस आला तर नक्कीच जुन्नर तालुका व ओतुर गावच्या इतिहासात एक वेगळीच भर पडेल.
विशेष म्हणजे या डोंगर माथ्यावरून एक आगळीवेगळी ओळख निर्माण झालेला धुरनळीचा धबधबा पाहण्यासाठी वर्षा ऋतुत लाखो पर्यटक भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. डोंगर माथा चढुन गेल्यावर पुढे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बदगी गावची हद्द सुरू होते व समोरच एक विशाल पठार निदर्शनास पडते. दिवाळीच्या दरम्यान या पठारावर लाखो सोनकीची फुले पाहुन तर सोनेरी चादर येथे अंथरलीच आहे की काय असा भास होतो. एकदिवसीय हिवाळी व उन्हाळी ट्रेक साठी हे ठिकाण खुप सुंदर व विलोभनीय आहे.
लेख - रमेश खरमाळे माजी सैनिक
८३९०००८३७०
अति सुंदर रम्य तपो तीर्थ दर्शन,,, सप्रेम ओम शक्ति
Khup sunder
Otur good information 👍
खुप छान सर...आम्ही ओतुरकर
Nashik 🙏