दुट्टप्पी उद्धवने धनुष्य बाण आणि शिवसेना गहाण ठेवली होती, ती मी सोडवली - एकनाथ शिंदे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • निवडणूक आयोगाने शिवसेना हे नव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचे संकेत दिले आहेत. तसेच शिंदे गटाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले असले तरी चोर हा चोरच असतो. आमच्याकडेच खरे धनुष्यबाण आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही त्यांनी साशंकता व्यक्त केली आहे. यावरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.
    उद्धव ठाकरेंकडून सहानुभूती मिळवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. आपल्या पक्षाकडे असलेले कार्यकर्ते दुसरीकडे जाऊ नयेत म्हणून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न आहे. निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था या स्वतंत्र यंत्रणा आहेत. या संस्थांवर अशा प्रकारचा आरोप केला जात नाही. यापुढेतरी तुमच्यात सुधारणा घडू द्या.
    “कोणीतरी आम्हाला चोर म्हणालं. म्हणजे आम्ही ५० आमदार आमदार चोर १३ खासदार चोर, शेकड-हजारो नगरसेवक चोर, लाखो कार्यकर्ते शिवसैनिक चोर. म्हणजे तुम्ही लाखो लोकांना चोर ठरवत आहात. कधीतरी आत्मपरीक्षण करणार की नाही?” असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसेच तुम्हाला सोडून गेलेले गुन्हेगार आणि तुम्ही बरोबर? हे कसे होऊ शकेल. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे,” असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
    ताज्या घडामोडी, बातम्या आणि नवीन अपडेट्स साठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या -
    ऍप डाउनलोड करा
    Download App : instoriesplus....
    Prime Marathi : primemarathi.in
    Facebook : / primenewsmarathi
    Twitter : / primenews_mh
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

КОМЕНТАРІ • 10

  • @ajaydurkar1354
    @ajaydurkar1354 Рік тому +7

    आस्या वेळी याला बाळासाहेब आठवतात. पण सभे मध्ये हा फक्त मोदी चे नाव घेत असतो
    आरे हा विकला गेला आहे आता बाळासाहेब असते तर याला फाडून काढला आसता . विकाऊ आहे हा

  • @ravibarge6074
    @ravibarge6074 Рік тому +6

    बेवडे सरकार.

  • @ashajadhav858
    @ashajadhav858 Рік тому +2

    Ani bjp kade lotangn ghatle tumhi.

  • @santoshsawant2060
    @santoshsawant2060 Рік тому +2

    गप बसा

  • @prashantsable2678
    @prashantsable2678 Рік тому +1

    Bjp kade gahan thevali

  • @bantai9463
    @bantai9463 3 місяці тому

    0:44

  • @maheshg-c4v
    @maheshg-c4v Рік тому +1

    महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब 🚩💐💪👍