नायगाव जुने ता.श्रीरामपूर या शाळेत हळदी कुंकू कार्यक्रम व माता पालक मेळावा संपन्न झाला.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • जुने नायगाव प्राथमिक शाळेत हळदीकुंकू व माता पालक मेळावा कार्यक्रम उत्साहात संपन्न
    श्रीरामपूर
    तालुक्यातील जि.प.प्रा शाळा नायगाव जुने शाळेत नुकताच हळदीकुंकू व माता पालक मेळावा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीमाता,जिजामाता,अहिल्यादेवी होळकर,सावित्रीबाई फुले,झाशीची राणी लक्ष्मीबाई या थोर महिला शक्तींना विनम्र अभिवादन करून करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून सहशिक्षिका सुजाता सोळसे यांनी हळदी कुंकू कार्यक्रमाचे महत्व विशद केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राधाबाई श्रीकृष्ण लांडे होत्या.मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांनी मुलांचा सर्वागीण विकास होण्याच्या दृष्टीने मातांचा सहभाग खूप मोलाचा असल्याचे नमूद करून मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे काम शाळा सतत करत असल्याचे सांगितले.यावेळी मुलांचे आरोग्य,शिक्षण,चांगल्या सवयी,स्पर्धा परीक्षा,मातांचा मुलांचे विकासातील सहभाग आदी विषयावर सखोल चर्चा झाली.काही मातांनी अभंग व कविता यांचे सुंदर गायन करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी मातांनी आपल्या मनोगतातून शाळेची प्रगती,विद्यार्थ्यांची गुणवत्ता व दोन्ही शिक्षकांच्या कामाबद्दल गौरव उदगार काढले.तसेच शाळेतील शिक्षक दरवर्षी हा उपक्रम घेतात त्याबद्दल अभिनंदन केले हळदी कुंकू कार्यक्रमात महिला मातांनी एकमेकींना तिळगुळ व वाण दिले.महिलांच्या संगीत खुर्ची स्पर्धेने कार्यक्रमात रंगत आणली.संगीत खुर्ची स्पर्धेतील प्रथम क्रमांक शोभाताई जालिंदर राशिनकर,द्वितीय क्रमांक उषा संदीप राशिनकर,तृतीय क्रमांक राधाबाई श्रीकृष्ण लांडे यांनी पटकाविला.त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शिक्षणप्रेमी ग्रामस्थ रामप्रसाद दातीर यांनी शाळेस एक हजार रुपयांची देणगी दिली.कार्यक्रमास माजी उपसरपंच मिनाताई लांडे,इंदुबाई लांडे,नीता लहारे,वैशाली लहारे,अनिता दातीर,पुष्पा दातीर,ललिता लांडे,मंगल लांडे,सरिता राशिनकर,भाग्यश्री राशिनकर,पूजा लांडे, लताबाई भुसारी, लिना लांडे,उषा राशिनकर,धनश्री बोर्डे,शोभा राशिनकर,संगीता दातीर,सरला राशिनकर,रोहिणी राशिनकर,वर्षा लांडे,अनिता लांडे,प्रांजल लांडे,स्वाती धसाळ,कमल दातीर,निशा लांडे,मनिषा लांडे,किमया लांडे,रंजना जोरी,आशा लांडे,रिना लांडे आदी माता पालक बहुसंख्येने उपस्थित होत्या.तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश लांडे,माजी अध्यक्ष संतोष राशिनकर,पोलीस पाटील राजेंद्र राशिनकर,डॉ.संदीप लांडे,संदीप धसाळ,सागर लहारे,शुभम भोंडे आदी उपस्थित होते.

КОМЕНТАРІ • 1

  • @SharadNagargoje_np8
    @SharadNagargoje_np8 4 дні тому

    खुप खुप छान उपक्रम सर जी 💐