राजमाची किल्ला : 2 बालेकिल्ला असलेला महाराष्ट्रातील एकमेव किल्ला || भटकंतीसाठी संपूर्ण माहिती
Вставка
- Опубліковано 16 січ 2025
- राजमाची किल्ला : 2 बालेकिल्ला असलेला महाराष्ट्रातील एकमेव किल्ला || भटकंतीसाठी संपूर्ण माहिती
.
.
.
.
#rajmachifort #trekking #vishaldurge
.
राजमाची किल्ल्याच्या पश्चिम उतारावर बौद्ध लेणं आहे. यालाच 'कोंढाणे लेणी' असे म्हणतात.ही लेणी कोंढाणे या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गावापासून आग्रेयेस २ कि.मी अंतरावर आहेत.ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात म्हणजे सातवाहनकालाच्या सुरुवातीला खोदलेली आहेत.अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ठ नमुना आहे.या लेणी समुहात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे. या लेण्यांची निर्मिती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेखाली झाली. यावरूनच असे अनुमान निघते की हा किल्ला साधारण २५०० वर्षापूर्वीचा असावा. राजमाची किल्ल्यास पूर्वी 'कोंकणचा दरवाजा'संबोधण्यात येत असे. कल्याणच्या १६५७ च्या स्वारी नंतर त्याचवर्षी शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची ,लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेशावर शिवशाहीचे वर्चस्व प्रस्थापित झाले. पुढे संभाजी महाराज जिवंत असे पर्यंत म्हणजेच सन १६८९ पर्यंत हे सर्व किल्ले मराठयांच्या ताब्यात होते. यानंतर १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी कान्होजी आंग्रे यांना हा किल्ला दिला . सन १७३० मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला.१७७६मध्ये सदाशिवराव भाऊचा तोतया संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटा पर्यंत पोहचला.त्याने राजमाची किल्ला घेतला.यानंतर या तोतयाचे वर्चस्व वाढले मात्र पेशव्यांनी त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला आणि आजुबाजुचा परिसर आपल्या ताब्यात घेतला.पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला.
राजमाचीवर मनरंजन व श्रीवर्धन हे दोन बालेकिल्ले आहेत. मनोरंजनच्या पायथ्यापाशी उढेवाडी ही २०, २२ घरांची पाणभरे कोळी लोकांची वाडी आहे. राजमाची किल्ला पहायला येणाऱ्या दुर्गप्रेमींच्या मुक्कामासाठी एक कॅंपिंग साइट सदर संस्थेने उढेवाडीजवळच तयार केली आहे.
Background Music From:
• Warriyo - Mortals (fea...
.
Video avdla tr nakki like kara..video kasa vatla comment kara... ani share karayla visaru naka...
.
धन्यवाद 🙏
Khup chan😊