New Born Baby Welcome | 2021 | cute baby |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • प्रत्येक पित्याच एक #रत्न असते, ते म्हणजे #रत्नात रत्न #कन्यारत्न...परमेश्वरची एक अनमोल #देणगी.. जी मला मिळाली...#कन्यारत्न👸त्यातल्या त्यात मुलगी झाल्याचा आनंद जास्त #सुखावुन गेला . #कन्यारत्न ज्याच्याघरी,स्वर्गानंद नांदे दारी
    ममतेचे नवे रूप,मायबापाला उभारी
    घरपरी परधन,कन्यादान पुण्यकाम
    अशी मुलगी महान,तीच तीर्थ तीच धाम..
    ..देवाचे खूप खूप आभार की.!!!🙏लक्ष्मी आली घरा . #बाप झालो मी . 😊
    सर्व नातेवाईक व मित्रपरिवार यांना सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे . कि , १२ ऑक्टोबर २०२० रोजी माझं प्रमोशन झालं मला कन्यारत्नाचा लाभ झाला. आज बाळाला ४ महिने पुर्ण झाले त्यानिमित्ताने पुण्यात पहिल्यांदाच घरी आणले .आमच्या #नाळे परिवारासाठी आजचा दिवस खूप खुप आनंदाचा आहे त्याबद्दल देवाचे #गणपती बाप्पाचे लाख लाख आभार...🙏 माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. मला मुलगी झाली आणि #तिचं नाव #प्रियांशी उर्फ #देवयानी ठेवतोय ! 🥰 MY #Baby #Girl..! #Priyanshi #Yogesh #Nale #Lakshmi #Aali #Ghara.
    #पहिली_बेटी_धनाची_पेटी. “#कन्यारत्न”
    #घरी_आगमन👨‍👩‍👧
    #Welcome_priya 🥰
    #WellcomePrincess
    #welcomePINK
    #ItsBabyGirl
    Mh 14 #HK 0310
    #कन्यारत्न
    मुलगी हाच आमचा वारसा, अभिमान आणि स्वाभिमान..
    आईच्या पोटातले नऊ महिने आणि त्यांनतर 4 महिने बाळ गावाला होत . आता कोरोनामुळे देशात, राज्यात सुरू असलेलं खर खुर लॉकडाऊन देखील तिने अनुभवेल पण आज बाप म्हणून मला बढती सोबतच आजपासून आमच्या जबाबदारीत सुद्धा बढती झाली. आज खऱ्या अर्थाने संसाराचे एक वर्तुळ पूर्ण झालं.जितका आज खऱ्या खुऱ्या आयुष्यात एका लेकीचा बाप म्हणून वाटतोय. माझ्या डोळ्यांनी आजवर अनेक गोष्टी पाहिल्या आणि अनुभवल्या पण स्वतःच्या लेकराला पहिल्यांदा पहातानाचा सुख आणि तिला आपल्या हातात घेण्याचा अनुभव आयुष्यातील सर्वश्रेष्ठ आनंदा पैकी एक आहे. आपण बायकोला आयुष्यभर दिलेले गिफ्ट्स तिने आपल्याला दिलेल्या लेकरू नावाच्या गिफ्टपुढे फिक्केच आहेत. .आयुष्यात 'लेकीचा बाप' झाल्याच्या आनंदाने जे हृदय भरून येतं,ते जगाच्या कुठल्याही सुखाच्या तराजूत मोजता येणारे नाही. निसर्गाच्या अद्भुत कलाकृतीचा अनुभव आईबाप झाल्याशिवाय कळत नाही असे म्हणतात तेच खरं. डोळ्याला न दिसणाऱ्या एका शुक्राणूचे आणि बिजांडाचे रूपांतर डोळ्याला दिसणाऱ्या माणसाच्या पिल्लात करणाऱ्या निसर्गाच्या शक्तीपुढे मी सदैव नतमस्तक की या नशिबवान पंगतीचा मी भाग्यवान झालो.
    #कन्यारत्न 😘❤
    घरात एक नवं नातं प्रत्यक्षात आलं...भूक लागली की रडणारा, पोट भरलं की हात-पाय मारणारा लहानसा जीव...पण त्यानी आम्हाला सुखाची चाहुल लागली...ही चाहुल अद्वितीयच! आतून अगदी सगळ्या संवेदना जागृत झाल्या...हुरहुर आणि हळवेपना माझ्या मनाला वेगळाच आनंद देत आहे. प्रेम,विश्वास,काळजी,आनंद अशा नानाविध भावनांनी भरलेले बाप-लेकीचे नाते उदयास आले आहे...खरच आयुष्यात 'लेकीचा बाप' झाल्याचे सुख हे जगातील कुठल्याच सुखाच्या मापात मोजता येणारे नाही...
    तिच्यामुळे घरात परत "बालपण" अनुभवणार हे नक्की .

КОМЕНТАРІ •