Kavitecha Gana Hotana | Ep 16 | Grace

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 45

  • @ashutoshjayawant2627
    @ashutoshjayawant2627 7 років тому +20

    ग्रेस वाचकाला सांगतात, तू ही कविता वाचणारा एकटा नाहीस. माझ्यातलं एकटेपण तुझ्यासोबत आहे. जसा घनदाट अरण्यात फिरताना काट्याकुट्यांनी जखमी होण्याचा आनंद आहे, तसा आनंद जीए, आरती प्रभु, ग्रेस यांच्या वाचनातुन आहे. पुन्हा नव्याने जखमी केल्याबद्दल डाँक्टर सलील तुम्हाला खुप धन्यवाद. ग्रेसच्या कवितेवरील आल्बमची आतुरतेने वाट पहात आहोत.

  • @abhishekmedhekar3594
    @abhishekmedhekar3594 7 років тому +16

    सकाळी जाग आल्या आल्या अंथरुणातून न उठता सगळ्यात आधी संपूर्ण Episode पाहीला......उरलेला दिवस मस्त गुंगीत जाईल आता...... धन्यवाद सलील दादा.... ग्रेस 🙏🙏🙏🙏 🙌🙌
    असे रंग आणि ढगांच्या किनारी
    निळे ऊन लागे मला साजणी
    असे घाटमाथे निळ्या राऊळांचे
    निळाईत माझी भिजे पापणी....... 😑
    -ग्रेस....

  • @uttkarshabaxi2201
    @uttkarshabaxi2201 7 років тому +6

    'A classic is a book that has never finished saying what it has to say'.
    Grace is classic.
    There is something about his words that take you prisoner. They pierce your skin and numb your thoughts. But, inside they do magic. 'Bhay ithale sampat nahi', 'ghar thaklele sanyasi', 'oon lagel tula tu savlit ye zara', all these creations are haunting.
    Rumi has quoted,
    ''Silence is the language of God,
    all else is poor translation''.
    But, grace has most certainly defied this with his words. Genuine poetry can communicate before it is understood and that explains his success.
    A big thanks to you, saleel sir for letting us savour these wonderful pieces of literature.
    P.S. desperately waiting for this album!

  • @pramodinipungaonkar6720
    @pramodinipungaonkar6720 9 місяців тому

    खुपच छान पद्धतीने तुम्ही कवी ग्रेस यांच्या कवितांना चाली लावल्या आणि त्या कविता अजरामर करायला तुम्ही हातभार लावला खुप धन्यवाद कवितांचे गीत झाल्या मुळे ते गुणगुणत म्हणत लक्षात ठेवण्यास सोपी होते सलील सर खूप धन्यवाद

  • @vishwaasmugalikar9580
    @vishwaasmugalikar9580 2 роки тому +2

    मला" तूला पाहीले मी नदीच्या किनारी..."ही ग्रेसांची कवीता मला फार आवडते.अजाणत्या वयात आई वारते त्यांना त्यात आई दिसत असावी असे मला वाटते🙏

  • @SanketRaipure
    @SanketRaipure 6 років тому +8

    या व्याकुळ संध्यासमयी
    शब्दांचा जीव वितळतो.
    डोळ्यांत कुणाच्या क्षितिजें...
    मी अपुले हात उजळतो.
    दोन वर्षांपासून या ओळींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतोय... पण एकदा लावलेला अर्थ परत काही दिवसांनी वेगळाच भासतो...
    ग्रेसांनी वेड लावून ठेवलंय...
    तेच म्हणतात ना...
    "शापच आहे मला संगमरवरांत स्वप्न लपवून ठेवण्याचा..!"

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 2 роки тому

    डॉ. सलील कुलकर्णी, हे माझ्या सर्वात प्रीय गायक, संगीतकारां पैकी एक, आणि अतीशय उत्कृष्ट संवेदनशील व्याक्तीमत्व.
    कवितचं गाणं होताना, ह्या मालिकेचा मी मनःपुर्वक चाहता झालो आहे.
    डॉ सलील कुलकर्णी यांची दर्जेदार, आनंददायक आणि आल्हाददायक संकल्पना.
    ही मालिका आम्हा सारख्या काव्य आणि संगीतप्रेमींसाठी सुवर्ण ‌पर्वणीच ठरली आहे.
    कवी ग्रेस, न भूतो न भविष्य ती, असे मराठीतील सर्वश्रेष्ठ कवी, यांच्या कवितेचं गाणं होताना ऐकन हा एक विलक्षण स्वर्गीय अनुभूति होती, त्यांच्या एका पेक्षा एक काव्याला, एका पेक्षा एक संगीतकारांनी संगीत दिले आहे.
    मला कवी ग्रेस यांच्या काव्याचं विलक्षण आकर्षण आहे.
    डॉ सलील कुलकर्णी यांचं विलक्षण विवरण. 'ती गेली तेव्हा रिमझिम' हे गाणं डॉ सलील कुलकर्णी यांच्या आवाजात ऐकुन पुन्हा भावल, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, भय इथले संपत नाही, हे माझे सर्वात प्रीय भावगीते आहेत.
    डॉ. सलील कुलकर्णी यांनी कवी ग्रेस यांच्या काव्याला संगीत देउन केलेल्या गाण्यांचा अल्बम मला ऐक्याला आवडेल.
    कवी ग्रेस यांच्या कवितेचं गाणं होताना ऐकन हा एक अविस्मरणीय अशीच विलक्षण स्वर्गीय अनुभूति होती.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Ajaypiya1331
    @Ajaypiya1331 5 років тому +2

    सर,
    मनापासून आभार मानावेसे वाटत आहेत आपले. ग्रेस समजून घेताना हृदयनाथ सोबत घेतले कि तो अधिक सहज होत जातो. तुमच्या चालीतून आम्हाला तोच आस्वाद भेटला. ग्रेस यांच्या सोबत खास जवळीक असणारे विजय पोवार सर आज हयात नाहीत पण मी त्यांच्या कविता जेंव्हा पवार सरांसोबत बसून ऐकल्या समजून घेतल्या आणि मी ग्रेस भक्त झालो.
    तुम्ही ग्रेस खूप प्रेमाने अलगद समजून सागायचा प्रयत्न केलात. विजय सर नेहमी म्हणायचे कि ग्रेस फक्त वाचून समजत नाही तो का समजावा . एक एक कविता जर वर्ष दोन वर्ष कदाचित दहा वर्ष घेऊन जन्माला आली ती एका क्षणात का समजावी.
    ते गर्वाने हे सांगायचे कि "ती गेली तेंव्हा रिमझिम" या कवितेचे शेवटच कडवे सांगली येथे हृदयनाथांनी फक्त विजय पवार यांच्यासाठी गायले होते.
    मी त्यांच्या सावलीत ग्रेस अनुभवला ...आता ते हयात नाहीत आणि तुम्ही हा असा ग्रेस घेऊन आलात ..
    ग्रेस यांना वाचून त्यांचासाठी ...व तुमच्या या प्रामाणिक प्रयत्नासाठी माझ्या या ओळी
    दहा दिशा जगातला
    मी शोधून घेऊ कुठली
    मी जिथे धावतो तिकडे
    बघ तुझी सावली फुटली
    मी संध्याकाळी म्हणली
    ती गीते तुजला स्मरूनी
    अश्रूत काळ ओघळता
    दुखांची नाळ समजली
    मी पाणे वाचून पाहतो
    मी राने वाचून पाहतो
    ह्या छटा निळ्या गगनाच्या
    हातांनी स्पर्शून घेतो
    मग धमन्या मधुनी वाहते
    आयुष्य बोलके होते
    तेंव्हा मग हातून अलगद
    शब्दांची माळ सरकते
    - अजय निंबाळकर

  • @vivekkamtikar4268
    @vivekkamtikar4268 3 місяці тому

    Great expiation and analysis 🙏🙏

  • @poulram1977
    @poulram1977 7 років тому +1

    Dr.saab dil khush ho gaya....Thank you

  • @alone6162
    @alone6162 7 років тому

    Kya baat hai... mast episode hota... salute to Grace sir.... awesome

  • @sujanshirodkar1578
    @sujanshirodkar1578 2 роки тому

    ग्रेस
    नेहमी प्रमाणेच
    ते गुढ गढद शब्द
    छान विवेचन

  • @vaibhavisabnis1513
    @vaibhavisabnis1513 3 роки тому

    अतिशय सुंदर तुम्ही गाता आणि कवितेचे अर्थ पण छान सांगतात

  • @pratibhavishwasrao8986
    @pratibhavishwasrao8986 6 років тому

    उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे. पुढच्या पिढीसाठी मौल्यवान ऐवज आहे.

  • @anuradhakale1965
    @anuradhakale1965 7 років тому +2

    Dr. Saheb you are 'very good teacher ' too !

  • @ShortTemperedPoet
    @ShortTemperedPoet 7 років тому

    जियो ! सलिल मित्रा तूझे असे अनेक विडिअो असावे. उदंड जग !

  • @jyotijoshi9351
    @jyotijoshi9351 5 місяців тому

    ❤❤❤

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 7 років тому

    Khup chhan !

  • @aakashkarde6249
    @aakashkarde6249 4 роки тому

    Kamaaaaal❤️

  • @aniruddhachavan5058
    @aniruddhachavan5058 6 років тому +1

    निर्जीव झाले डोळे; अश्रु डोळ्यांपर्यंत येताच,
    स्थिर झाले ओठ; शब्द कंठापर्यंत येताच,
    दाटलेल्या कंठाला या साथ दोहा डोळ्यांची,
    जणू अबोलाला साथ मिळे ग्रेसच्या ओळ्यांची..

  • @sandeshparvate5170
    @sandeshparvate5170 2 роки тому

    ❤️❤️❤️

  • @Kaustubh_Dixit
    @Kaustubh_Dixit 7 років тому

    किती सुंदर बोलता !!! ऐकत रहावंसं वाटतं 😇

  • @appasays
    @appasays 6 років тому +3

    उन लागले तुला, तू सावलीत ये जरा
    एक झाड राहिले अन एक राहिला झरा
    I think of these as "empty nesters" (parents whose children gone away) feelings about their children.

  • @nitinkulkarni3307
    @nitinkulkarni3307 3 роки тому

    Thanks Saleel....
    lets forget all...
    about the first one...
    what exactly is this....
    who he is writing about???
    if she is Mother...
    then why ...
    ghanvyakul mi hi radalo...
    why not mich...
    and ...
    why ..,
    anganat gamale majala.,,
    sampale balpan maze...
    pls explain....
    I get senty...
    whenever I listen to this...

  • @sohan45100
    @sohan45100 6 років тому

    Kavita kashi vachavi he parat parat shiktoy ya saglya episodes madhun. Dhanyavad

  • @aartimoharil8137
    @aartimoharil8137 3 роки тому

    Khoop sunder ak ak shabdanchi phod karun Sangta aikawese watate

  • @sanjayneve7953
    @sanjayneve7953 4 роки тому +1

    तुमच्या साठी लोकानी लिहिलेले कॉमेंट वाचले,मी काहीच लिहू शकत नाही. पण एक सांगतो मराठी जिवंत ठेवणारे अवलिया आहात तुम्ही.
    साष्टांग नमस्कार आपणास.

  • @kavynilmankar1818
    @kavynilmankar1818 6 років тому

    Ghakas kay bol ahe.
    Kavynil Niles mankar.

  • @varshamahendrakar9597
    @varshamahendrakar9597 4 роки тому

    “Je sosat naahi...” with all due respect and acceptance to Salil Sir’s interpretation...
    “Pradeshi aapulya gharache manus jase bhetave...” yacha garbhitarth Kadachit asa asu shakto, ki n Sosanaare dukh he aayushyacha ek bhaag vyapun aahe, jase aapalya gharachi Manase asatatch, pan Vishwa- ghar, mhanaje ghar sodun rest of the world, ase je kahi Asate, tyat kuthetari aapan gharachi Maanase expect Karit naahi, pan asa prasang aalach tar “ananad + aashcharya+ Gondhalalepan ” ashi sammishra pratikriya asu shakte... tasech ya dukhaache, te jithe pathlaag karnaar nahi, asha thikani jaave, aani, tithe nemke tyane samor ubhe thakave...asa kahisa yacha arth asu shakto ka?!?!!!!
    “Aaple manus aani dukh” ase samikaran arthatach mandayache nahi, pan dukh kurvalane, ha manvi sthayibhaav, aani barechda te aapalepanatunch yete, parakyasaathi vatato to Khed, kuna aapalyasaathi vatate te dukh, tyachyapasun sutka pardeshi palayan karun milnaar nahi.....

  • @nileshjoshi5963
    @nileshjoshi5963 7 років тому

    tya cha antrang veglach vato
    punha punha vachun sudha
    anolkhi vatet te
    grace sir...

  • @arunagupte5833
    @arunagupte5833 4 роки тому

    Mala sarv episodes aeikayache aahet. Pathavushakal?

    • @SaleelKulkarniofficial
      @SaleelKulkarniofficial  4 роки тому +1

      They are available on UA-cam . Just type kavitecha gana होताना.

  • @sonalitipnis6230
    @sonalitipnis6230 5 років тому

    स्त्रोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे यातून कवी ग्रेस यांना काय म्हणायचे आहे

  • @ajaykumarkhandekar4223
    @ajaykumarkhandekar4223 Рік тому

    सलीलदादा तू काहीतरी असंच करीत रहा छान अर्थ लावतोस.

  • @prabodhd
    @prabodhd 7 років тому +6

    पाऊस कधीचा पडतो
    झाडांची हलती पाने,
    हलकेच जाग मज आली
    दु:खाच्या मंद सुराने
    डोळ्यांत उतरते पाणी
    पाण्यावर डोळे फिरती,
    रक्ताचा उडला पारा
    या नितळ उतरणीवरती

    • @swatimarathe8271
      @swatimarathe8271 4 роки тому

      खूपच सुंदर ,सलिल दादा तुमच्या मुळे कवी ग्रेस यांची कविता कळली

  • @leenahiwarkhedkar2276
    @leenahiwarkhedkar2276 6 років тому +1

    Kadachit to jiwant nasel ala. Mhanun samor jau nakos asa mhatla asel. Mrutyula asa mhatla asel ki prawasat bhetale koni.