बालेकिल्ला व उत्तर पठारावर नक्की काय बघायचं? | दुर्गश्री - किल्ले शिवनेरी | Shivneri Fort | Part 2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 чер 2024
  • शिवनेरी अर्थात शिव जन्म भूमी! तीन शब्द वेगळे करून यासाठी लिहिलेत कारण त्यातच अर्थ सामावलेला आहे. याच शिवनेरी किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणून या स्वराज्य भटकंतीची सुरुवात इथून होते आहे. मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत मात्र ही एक वेगळी सिरीज म्हणून पुढे घेऊन जाणार आहोत.
    आज आपण गडाच्या उत्तर पठारावर आणि बालेकिल्ल्यावर असलेल्या वास्तू बघण्यासाठी आलो आहोत. आपला मागील भाग हा साखळी मार्गाने शिवनेरी किल्ल्यावर कसे यावे याविषयी होता. दुसऱ्या भागाची शुरुवात शिवकुंज इमारती पासून करूयात. राजमाता जिजाऊ आणि बाल शिवराय यांचे दर्शन घेऊन मग आपण या सुंदर इमारती पासून शिवजन्म स्थळ इथे जाऊयात.
    वाटेत आपल्याला कमानी मशीद आणि टाक लागत. या ठिकाणी आपल्याला खांब टाके बघायला मिळतात. कमानी मशिदीवर आपल्याला 2 शिलालेख दिसतात मात्र दोन्ही शिलालेख वाचता येत नाहीत.
    शिवजन्म स्थळ म्हणून बांधलेली इमारत महाराजांची आठवण करून देते. इमारतीत खाली महाराजांचा अर्धाकृती पुतळा आणि पाळणा आहे. या इमारतीला दुसरा मजला देखील आहे.
    शिवजन्मस्थळ इमारतीच्या समोर वाड्यांचे अवशेष आहेत. यात एक इमारत स्नानगृह आहे. त्याला हमामखाना म्हणून ओळखलं जातं.
    उत्तर भागात बदामी तलाव आहे. या तलावात पाण्याची लेवल मोजण्यासाठी मध्यभागी एक खांब आहे. पुढे वाटेत एक दरवाजा आणि नंतर कडेलोट टोक आहे.
    बालेकिल्ल्यावर आपल्याला महादेव कोळी चौथरा आणि ईदगाह इमारत आहे. परतीच्या वाटेवर आपल्याला गंगा जमुना टाके आणि अंबरखाना लागतो.
    गडकिल्ल्यांवर फिरत असताना आपण फक्त भटकंतीचा आनंद न घेता ती अभ्यासपूर्ण असावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
    -----------------------------------------------------------------------------
    शिवनेरी किल्ला गुगल मॅप लिंक:
    maps.app.goo.gl/GyDebkTPJDzNm...
    शिवनेरी किल्ला साखळी मार्ग गुगल मॅप लिंक:
    maps.app.goo.gl/1XrRVFqVriS8r...
    (chain road नावाने तुम्हाला हा मार्ग गुगल मॅप वर दिसेल. महालक्ष्मी लॉन पासून तुम्हाला या मार्गाकडे जाता येते.)
    -----------------------------------------------------------------------------
    Instagram : / nikhilmhaskevlogs
    -----------------------------------------------------------------------------
    #शिवनेरी #दुर्गश्री #किल्ले_शिवनेरी #Shivneri #ShivneriFort #ShivneriTrekkingRoute #SakhaliMargShivneri #ShivneriBalekilla #Shivjanmasthal #ShivneriAmbarkhana #KamanimashidShivneri #NikhilMhaskeVlogs

КОМЕНТАРІ • 6