महाराष्ट्रात झिका व्हायरसचा हैदोस! झिका व्हायरसची लागण झाल्याची 9 लक्षणे Zika virus symptoms Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 чер 2024
  • महाराष्ट्रात झिका व्हायरसचा हैदोस! झिका व्हायरसची लागण झाल्याची 9 लक्षणे Zika virus symptoms Marathi
    #zikavirus #symptoms #marathi
    झिका व्हायरसचा धोका वाढला!
    महाराष्ट्रातील पुण्यात झिका व्हायरसचे तब्बल 5 रुग्ण आढळून आलेले आहेत. झिका व्हायरस हा जीवघेणा आजार डासांमार्फत मनुष्यापर्यंत पोहोचतो. झिका व्हायरसने ग्रस्त डास चावल्याने आपल्याला हा आजार होतो. या आजारावर सध्या तरी कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. झिका व्हायरसचे इन्फेक्शन जीवघेणे ठरू शकते.
    झिका व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे Guillain-Barré syndrome (GBS) हा अत्यंत दुर्मिळ आजार होऊ शकतो. या आजारात स्नायू कमकुवत होऊन लुळे पडतात आणि लकवा म्हणजेच पॅरालिसिस होऊ शकतो. काही प्रमाणात मृत्यू होण्याची देखील शक्यता असते. गर्भवती महिलांना झिका व्हायरसचा सर्वाधिक धोका आहे. गर्भावस्थेत झिका इन्फेक्शन झाल्यास जन्मणारे बाळ विकृत जन्मते. त्याला मायक्रोसेफाली हा आजार होतो. या आजारात बाळाच्या डोक्याची वाढ होत नाही. त्यामुळे ब्रेन डॅमेज होण्याचा धोका वाढतो. झिका इन्फेक्शन मुळे गर्भपात होऊ शकतो तसेच गर्भाशयातच अर्भकाचा मृत्यू देखील होऊ शकतो.
    झिका व्हायरसची लक्षणे जाणून घेऊ :
    1. सर्दीसोबत ताप येणे
    2. डोळे लाल होणे
    3. सांधेदुखी
    4. तीव्र डोकेदुखी
    5. अंगावर पुरळ उठणे
    6. स्नायूंमध्ये वेदना किंवा पेटके येणे
    7. खूप घाम येणे
    8. खूप थकवा जाणवणे
    9. भूक कमी होणे / काहीही खाण्याची इच्छा नसणे
    झिका व्हायरसची लागण होऊ नये यासाठी काय करावे ?
    1. झिका व्हायरसची लागण डासांमुळे होते. म्हणूनच आपल्या घरात, अंगणात व परिसरात डास होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
    2. छतावरील, अंगणातील रिकामी भांडी पालथी घालावी. त्यात पाणी साठू देऊ नये.
    3. बाल्कनी तसेच बागेतील कुंड्यांमध्ये पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
    4. डासांना पळवून लावणाऱ्या औषधांचा mosquito repellent चा वापर करावा.
    5. अंगभर कपडे घालावे म्हणजे डास चावणार नाहीत.
    6. खिडक्यांना जाळ्या बसवून घ्याव्या.

КОМЕНТАРІ •