Chrysanthemum Farming | शेवंती शेतीचा यशस्वी प्रवास | Success Story | Dhondkar Wadi | Junnar | Pune

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • शेवंती शेती | Chrysanthemum Farming | Success Story |
    आजच्या काळामध्ये सर्वत्र फुलांचा वापर खूप वाढलेला दिसून येतो. त्यामुळे बाजारांमध्ये फुलांची मागणी सुद्धा वाढलेली आहे. अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये फुलांची शेती करताना दिसून येतात. व त्यातून नियमित उत्पन्नापेक्षा सुद्धा जास्त उत्पन्न मिळवित आहेत. फुलामध्ये सुद्धा कोणते फुलं जास्त महत्त्वाचे आहे कोणत्या फुलांची लागवड करावी याचा विचार करणे फायद्याचे ठरते.
    शेवंती साठी जमिनीची निवड
    लागवडीसाठी जमीन चांगल्या प्रकारची तयार करावी लागते. त्यासाठी जमीन नांगरणी वखरणी करून भुसभुशीत करावी . त्यासाठी जमीन उभी व आडवी नांगरट करावी. कोणत्याही पिकांसाठी शेणखत हे महत्त्वाचे असते त्यामुळे हेक्‍टरी 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. व जमिनीवरती आवश्यक तसे सऱ्या पाडून वाफे तयार करावेत.
    हवामान
    शेवंती हे कमी दिवसांचे पीक आहे शेवंतीला फुले येण्यासाठी लहान दिवस व कमी तापमानाची आवश्‍यकता असते. सुरुवातीला वाढीच्या काळात भरपूर सूर्यप्रकाश व मोठा दिवस असणे आवश्यक आहे शेवंतीच्या वाढीसाठी 20 ते 30 अंश तापमान तर फुलण्यासाठी 10 ते 17 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्‍यकता असते.
    लागवडीचा हंगाम
    शेवंतीच्या वाढीचा आणि फुलावर येण्याच्या काळ लक्षात घेऊन लागवडीची वेळ ठरवली जाते. उदाहरणार्थ ज्या वेळेस कमी तापमान कमी असेल अशी वेळ असावी पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेवंतीची लागवड लवकर /उशिरा केली जाते महाराष्ट्र लागवड एप्रिल मे महिन्यात केली जाते या काळात पाऊस सुद्धा कमी होतो.
    शेवंतीची रोपे कसे निर्माण करावेत
    शेवंतीची लागवड टर्मिनल कटिंग कलमे या प्रकारे होते सकरर्स ‘मुळे शेवंती लागवड चांगल्या प्रकारे होते मात्र मोठ्या प्रमाणावर लागवड करायची असल्यास सकरात अपुरे पडतात म्हणून जागतिक स्तरावर लागवडीसाठी कलमांचा वापर करतात परंपरागत पद्धतीने जर कटिंग लागवड केली तर जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात करावी मागील वर्षी लावलेल्या शेवटच्या झाडापासून आठ ते दहा सेंटीमीटर लांबी टर्मिनल कटिंग लावल्या जातात. मात्र मोठ्या प्रमाणावर शेवंती लागवड करायची असेल तर परंपरागत पद्धतीच्या एका महिन्या आधी म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी.
    कटिंग किंवा कलमे काढणे कशी करावी
    साधारणत मे महिन्यामध्ये काढण्यात येणाऱ्या कटिंग या मध्यम विकसीत व साधारण जाडीची असाव्यात. आणि यावर पानांची संख्या तीन ते चार इतकी कमी ठेवावी. याउपरही जून महिन्यामध्ये काढण्यात येणाऱ्या कटिंग या मध्यम विकसित स्वरूपाच्या असल्या तरी चालतात जून महिन्यामध्ये घेतलेल्या कटिंग वर पानांची संख्या थोडी जास्त ठेवावी.
    शेवंती च्या जाती
    जगात शेवंतीच्या 15 ते 20 हजार जाती असून भारतात सुमारे पाचशे जाती आढळतात.
    शेवंती करीता खत कसे द्यावे
    शेवंती च्या उत्तम वाढीसाठी आणि दर्जेदार उत्पन्न साठी लागवडीपूर्वी जमीन तयार करताना हेक्‍टरी 25 ते 30 टन शेणखत जमिनीत मिसळावे. लागवडीच्या वेळी हेक्‍टरी 150:200:200 किलो नत्र स्फुरद व पालाश लागवडीनंतर दीड महिन्याने दीडशे किलो नत्र हेक्‍टरी या प्रमाणात द्यावे.
    पाणी व्यवस्थापन
    लागवड उन्हाळी हंगामात करायची असल्याने पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. लागवडीपासून पाऊस सुरू होईपर्यंत पाच ते सात दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
    आंतर मशागत
    वेळोवेळी निंदणी करून पीक तणमुक्त ठेवावे, त्यामुळे जमीन भुसभुशीत राहून पिकाची जोमदार वाढ होते. झाडांची वाढ मर्यादित राहण्यासाठी आणि अधिक उत्पादनासाठी शेवंतीच्या झाडाचा शेंडा खुडण्याचा प्रघात आहे. शेंडा खुडणी याचे काम लागवडीनंतर साधारण तर चौथ्या आठवड्यानंतर करावे शेंडा खुडल्याने अधिक फुटवे फुटून फुलांच्या उत्पादनात वाढ होते.
    शेवंती वर येणारे रोग व कीड
    शेवंती वर पडणाऱ्या रोगांपैकी मुख्य रोग म्हणजे मर रोग. रोगांची लागण पुढे होते या रोगाची लक्षणे जास्त पाऊस होणाऱ्या परिसरात आढळतात रोगग्रस्त झाडे हळूहळू निश्चित होऊन झाड सुकून जाते. झाडाचा पुढचा भाग सुद्धा काळा पडतो यावर उपाय म्हणजे बुरशीचे बीजाणू जमिनीत असतात. त्यामुळे सुरुवातीची लक्षणे दिसतात ट्रायकोडर्मा चार किलोग्रॅम कंपोस्ट खत बरोबर मातीत मिसळून द्यावे. यासोबत भुरी रोग हा शुद्ध शेवंतीच्या पिकास घातक आहे. या रोगाचा प्रादुर्भाव पाने फांद्या कोरडे कोभ पकडल्यावर होत असतो त्यामुळे झाड अशक्त होऊन फुलाच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.
    फुलांची काढणी व उत्पादन
    शेवंती च्या पूर्ण उमललेल्या फुलांची काढणी योग्य प्रकारे करावे. हे करत असताना महत्त्वाची बाब म्हणजे फुले शक्यतो सूर्योदयापूर्वीच काढावीत. उमललेली फुले उशिरा काढल्यास रंग फिका पडतो. वजनही कमी भरते. जातीनुसार फुलांची काढणि लागवडीनंतर तीन ते पाच महिन्यांनी सुरू होते. लवकर उमललेल्या जातींची एकूण चार ते सहा हजार तर उशिरा उमललेल्या जातीचे आठ ते दहा तोडे होतात.
    Thank You For Watching ♥️🐾🕊️
    For Business Enquiry Mail Me At :
    Kavitadhoble6@gmail.com
    Follow Me On :
    Instagram :
    / kavya.dhoble
    Facebook :
    m.facebook.com...
    Gear We Use :
    GoPro Hero Black 8
    GoPro Batteries
    GoPro SD Card
    Tripod
    Thank You For Watching
    #flower #shewanti farming #chrysanthemum
    #junnar #travel #wanderingsoul #goprohero8black #mountain #savemountains #villagelife #savenature #travelvlogging #travelmate #travelvlogger #travelphotography #marathimulgi #marathivlogger #vloggerlife #unknownplaces #exploring #nature #agriculturallife #kavyadhoble #agricultural #newconcept #farmerslife #farmer #trendingconcept #kavitadhoble #sheti #shetkari #successstory
    शेवंती फुलाची शेती कशी करावी?
    लागवड पद्धती कशी असावी?
    जातींचे प्रकार कोणते?
    जमिनीची पूर्वतयारी?
    पूर्वखतव्यवस्थापना?
    रोपांची उपलब्धता?
    फवारणी?
    रोगांसाठी उपाययोजना?
    फुल तोडणी?
    बाजारपेठ?

КОМЕНТАРІ • 114

  • @traveller_annu
    @traveller_annu 3 роки тому +7

    ताई संपूर्ण व्हिडिओ / Vlog अप्रतिम झालाय..!😍🌼✨👌🏻
    खुप छान अशी शेवंतीच्या शेतीची माहिती मिळाली…🌼
    त्याचबरोबर काकांकडून सुद्धा खूप व्यवस्थितपणे परिपूर्ण प्रश्नांची उत्तरे मिळाली…
    Proper & Perfect Tai..!😍📸🌍🕊️💯
    Keep it Up..!❤️✨

  • @ramabhang3550
    @ramabhang3550 3 роки тому +4

    ताई खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद. मी पण ठाण्याला राहतो व जुन्नर ला फुल शेती करत आहे व तीही शेवंती. धन्य वाद.🙏🌹

  • @prashantdhamale9955
    @prashantdhamale9955 3 роки тому +3

    खूपच छान आपण वेळात वेळ काढून सर्व शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून नवनवीन प्रयोग यशस्वी केलेले शेती विषयी माहिती देता त्या बद्दल धन्यवाद आपल्या पुढील कार्याला शुभेच्छा

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому

      धन्यवाद💚🤟🏻🕊️⛳

  • @vilasgosavi148
    @vilasgosavi148 3 роки тому +3

    सुंदर मार्गदर्शन व नवीन युवकासाठी प्रोत्साहनच....***

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому

      धन्यवाद♥️✌️😍

  • @mayurjundare9363
    @mayurjundare9363 3 роки тому +3

    उत्तम प्रकारच्या रोपांची निर्मिती व विक्री आपणाकडे ऊपलब्ध आहेच, त्याचबरोबर तुम्ही जे मार्गदर्शन करता ते खुप शेतकर्यांना फायदेशीर ठरते....
    खुप छान माहिती दिली धन्यवाद धोंडकरजी AVDHOOT NURSERY 💐... धन्यवाद KAVYAA'S VLOGS

  • @mangeshwable7764
    @mangeshwable7764 3 роки тому +3

    खूप छान वाटतं एखादी मुलगी शेती वर आधारितvlog बनवते 😍🤩❤️

  • @dokeakshay3188
    @dokeakshay3188 3 роки тому +3

    खुपच छान विश्वासकाका 👌👌👌

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому +1

      धन्यवाद💚🤟🏻🕊️⛳

  • @vinayaknaykodi6278
    @vinayaknaykodi6278 3 роки тому +3

    Mam video chhan ahe . Shetkaryanna bed kinva sari madhil antar tasech don zadanmadhil antar he pan vicharat ja.

  • @arjundoke571
    @arjundoke571 Рік тому

    Sundar margdarshan

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 3 роки тому +3

    Khub Chan Vlog Kavita Didi. Pretty Flower. Kalji Ghya

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому +1

      धन्यवाद💚🤟🏻🕊️⛳

  • @shankardhondkar3070
    @shankardhondkar3070 3 роки тому +3

    Khup chan vishwas nana
    👌👌👌👌

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому

      धन्यवाद💚🤟🏻🕊️⛳

  • @travelwithviraj7908
    @travelwithviraj7908 3 роки тому +3

    अप्रतिम सुंदर माहितीपूर्ण व्हीडीओ मी 7 year चा छोटा youtuber आहे.

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому

      खूप छान..!!😍😍😍😍

  • @santoshpatade.9859
    @santoshpatade.9859 3 роки тому +2

    खूप छान फुलशेती

  • @vinodbugade7777
    @vinodbugade7777 3 роки тому +3

    Khup chan

  • @sandeshkhandagle6987
    @sandeshkhandagle6987 2 роки тому +1

    खुप छान माहिती

  • @mrdhavale1719
    @mrdhavale1719 3 роки тому +3

    Tai tumcha background score and voice over sundar aahe. Handling triple responsibility (job, vlog, married life), hats off to you. Wishing you all the best. Happy rakshabandhan!

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому +1

      Thank you so much🌍🍃😇😍✌️

  • @ganeshgadage6314
    @ganeshgadage6314 3 роки тому +3

    Nice post

  • @mangeshdatkhile3007
    @mangeshdatkhile3007 3 роки тому +3

    Thanks for the information vahini 🙏🙏🙏

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому

      धन्यवाद💚🤟🏻🕊️⛳

  • @khanderaodhoble400
    @khanderaodhoble400 3 роки тому +3

    छान

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому

      धन्यवाद नाना🍃🌍✌️

  • @anilnaik3693
    @anilnaik3693 Місяць тому

    मस्त

  • @निवेदकशुभमखंडूदातखिळे

    एकदम मस्त

  • @NatureBeutySNGuru
    @NatureBeutySNGuru 2 роки тому +3

    मला पण फुल शेती करण्याची आवड आहे पण आमच्या बीड जिल्ह्यामध्ये फुलांचे मोठे मार्केट नाही तर मी मार्केट कसे आणि कोणते निर्माण करु किंवा गाठु?

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      किती क्षेत्रात सुरू करणार आहात

    • @Shevanti
      @Shevanti 2 роки тому

      ua-cam.com/video/gaKGG55JK4o/v-deo.html

  • @popatrao3883
    @popatrao3883 3 роки тому +2

    Nice Kavya 👍
    Very nice vlog good information

  • @avinashbadadhe485
    @avinashbadadhe485 2 роки тому +1

    Looking so beautiful

  • @naraharidukare2135
    @naraharidukare2135 4 місяці тому

    Super

  • @Shiv9903
    @Shiv9903 Рік тому

    Thank you mam 👍🏻

  • @vinayakdhamale187
    @vinayakdhamale187 3 роки тому +2

    Kupch chan

  • @dharnidharpolymersdeesa7298
    @dharnidharpolymersdeesa7298 3 роки тому +2

    Good sister

  • @rachitapatil3043
    @rachitapatil3043 Рік тому

    Roop kse tyar krtat plz sanga.

  • @cvids455
    @cvids455 3 роки тому +2

    Great work..😍🌸

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому

      धन्यवाद🍃🌍✌️

  • @cvids455
    @cvids455 3 роки тому +3

    👌👌👌

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому

      धन्यवाद🍃🌍✌️

  • @sharadbibave7863
    @sharadbibave7863 3 роки тому +2

    नमस्कार धोंडकर साहेब

  • @निवेदकशुभमखंडूदातखिळे

    जुन्नरकर

  • @nishigandhasarvagod-hd5nz
    @nishigandhasarvagod-hd5nz 2 місяці тому

    अजून दुसरे रंगांची शेवंती दाखवा की

  • @rajeshdatkhile6264
    @rajeshdatkhile6264 3 роки тому +3

    ❤❤❤❤

  • @NavnatPavar
    @NavnatPavar 12 днів тому

    Rope pahije

  • @निवेदकशुभमखंडूदातखिळे

    वहीनी खुप छान 👌

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому

      धन्यवाद💚🤟🏻🕊️⛳

  • @bhaskardatkhile5470
    @bhaskardatkhile5470 3 роки тому +3

    😍😍😍😍😍

  • @निवेदकशुभमखंडूदातखिळे

    💕🚩

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому

      धन्यवाद💚🤟🏻🕊️⛳

  • @laxmiagawane4348
    @laxmiagawane4348 2 роки тому +1

    कमीत कमी किती रोपे घ्यावी लागतात?

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      Madam तुमचं क्षेत्रफळ जेवढं आहे त्यानुसार तुम्हांला रोपे मिळतील

    • @laxmiagawane4348
      @laxmiagawane4348 2 роки тому +3

      मला आवड म्हणून बागेत लावण्यासाठी हवी आहेत
      तर देणार का पाठवून?
      आपण खूप छान माहिती दिली.
      धन्यवाद.

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद

  • @cvids455
    @cvids455 3 роки тому +2

    Kothe aahe hee Dhondkarwadi??

  • @randipshinde6728
    @randipshinde6728 2 роки тому

    👌👌👍

  • @निवेदकशुभमखंडूदातखिळे

    आपल्या हक्काच चॅनल...

  • @nm6746
    @nm6746 2 роки тому

    त्यांनी variety च नाव शेवट पर्यंत सांगितलं नाही

  • @sadashivpatilkabnoorkar7072
    @sadashivpatilkabnoorkar7072 2 роки тому +2

    त्याचे ठीकान सागा

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      धोंडकरवाडी😇🙏

  • @laxmiagawane4348
    @laxmiagawane4348 2 роки тому +1

    रोपे मिळतील का

  • @laxmiagawane4348
    @laxmiagawane4348 2 роки тому +1

    रोपे कशी मिळतील? फोन नं सांगावा

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      होय..99707 45766 विश्वास धोंडकर

  • @ganeshdhaygude9384
    @ganeshdhaygude9384 2 роки тому +1

    Mala vishvas kakacha no milel ka

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      Description मध्ये दिलाय

  • @shubhamghadage8007
    @shubhamghadage8007 9 днів тому

    शेताकरायचा नंबर नाय दिला मला त्यांच्याकडे रोप गेयचंय

  • @sanjaynalawade7954
    @sanjaynalawade7954 3 роки тому +2

    Aamchi mati aamchi manse

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому

      धन्यवाद💚🤟🏻🕊️⛳

  • @ramkisanbirajdar3016
    @ramkisanbirajdar3016 Рік тому

    No. Patva

  • @amolshelke9765
    @amolshelke9765 2 роки тому +2

    रोपे मिळतील

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому +1

      हो मिळतील ना

  • @akshayraut9022
    @akshayraut9022 3 роки тому +3

    फोन नंबर आहे का

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому

      Description मध्ये आहे

  • @sadashivpatilkabnoorkar7072
    @sadashivpatilkabnoorkar7072 2 роки тому +2

    ताई काकाचा नंबर मीळेलका

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      दादा description मध्ये आहे काकांचा no

  • @navnathgaikwad9331
    @navnathgaikwad9331 3 роки тому +1

    फोन नंबर द्या मॉडम रोपे घायचे आहे शेतकराचा नंबर द्या

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому

      Description मध्ये आहे

  • @navnathgaikwad9331
    @navnathgaikwad9331 3 роки тому +2

    फोन नंबर

  • @deepakkokane1266
    @deepakkokane1266 3 роки тому +3

    Khup Chan

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому

      धन्यवाद🍃🌍✌️

  • @dharnidharpolymersdeesa7298
    @dharnidharpolymersdeesa7298 3 роки тому +2

    Good sister