एस सी आर कळंत्री प्राथमिक विद्यालयात "राष्ट्रीय विज्ञान दिन" उत्साहात साजरा....
Вставка
- Опубліковано 13 січ 2025
- एस सी आर कळंत्री प्राथमिक विद्यालयात "राष्ट्रीय विज्ञान दिन" उत्साहात साजरा....
आज विद्यालयात दुपार सत्रात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रमोद दायमा सर व व्यासपीठावर उपस्थित चोरट मॅडम व मोराणकर मॅडम यांच्या हस्ते डॉ.सी.व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्री.चंद्रकांत आमले सरांनी विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाविषयी माहिती सांगितली.विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाची माहिती दिली,तसेच डॉ. सी.व्ही रामण यांच्या जीवनाबद्दल व्हिडिओद्वारे माहिती सांगितली व रमण इफेक्टचा आपल्या जीवनाशी संबंध याच्याबद्दल मार्गदर्शन केले.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद दायमा सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विज्ञान दिनानिमित्त विद्यालयात "SCIENCE QUIZ" या स्पर्धेचे आयोजन केले.स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चंद्रकांत आमले सर यांनी केले व गुणलेखनाचे काम श्री बाग सर यांनी केले, तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.