|| MSRTC || लालपरी || एसटी ची विना अपघात 29 वर्ष यशस्वी सेवा करून सेवानिवृत्ती || 😭😭

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 5 місяців тому +821

    आपला जीव मुठीत घेऊन उन वारा थंडी पाऊस अंगाखांद्यावर झेलत प्रवाशांना विना अपघात इच्छीत स्थळी पोहचवणारे विना अपघात एस टी चालक आपणास छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा.. पांडुरंग आपणास उदंड निरामय आरोग्यदायी दिर्घायुष्य देवो हीच सदिच्छा ❤

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +20

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

    • @ShahajiHulge
      @ShahajiHulge 5 місяців тому +10

      नमस्कार चांगली सेवा पारपाडली

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +6

      @user-nl7cf6yt9k खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

    • @DattatrayPawar-kf2my
      @DattatrayPawar-kf2my 5 місяців тому +6

      ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 काका मना पासून चांगले काम केले तुम्ही खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मना पासून

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +3

      @DattatrayPawar-kf2my खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @the_archie
    @the_archie 5 місяців тому +402

    हा‌ खरा मराठी मुस्लीम❤ काका तुमच्या कार्याला‌ सलाम🙏🏻🙏🏻

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +12

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

    • @azizattar87
      @azizattar87 Місяць тому

      यात काय मराठी अणि अमराठी रे..... BC कुठे पण काय पण तुमचे....

    • @NetGuru88
      @NetGuru88 Місяць тому +3

      हा खरा, हा खोटा
      तू कोण हे डीसाईड करणारा?

    • @the_archie
      @the_archie Місяць тому

      @@NetGuru88 अरे तु कोण मला सांगणारा
      मी माझ मत मांडतोय‌‌..

    • @ChachaParathewale
      @ChachaParathewale Місяць тому +7

      सगळ्या साईड ला चांगले लोक असतात च

  • @allabakshamulla9282
    @allabakshamulla9282 5 місяців тому +424

    काकानी रडीविले .कौतुकास्पद गोष्ट आहे .सैलूट या काकाना आणि वीडियो बनवीणाऱ्या विडियोग्राफरला❤❤

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +7

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @ganeshawate4414
    @ganeshawate4414 5 місяців тому +359

    खरोखर रिटायरमेंट फार अवघड असते आमच्या पण डोळ्यतून पाणी आले

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +3

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @vinayakpatil993
    @vinayakpatil993 5 місяців тому +251

    खूप भावनिक क्षण असतो हा....एक प्रामाणिक माणसं साठी...

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +5

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

  • @RajendraJahagirdar
    @RajendraJahagirdar 5 місяців тому +256

    हल्लीच्या highway आणि शहरातल्या वाढलेल्या ट्रॅफिकतून इतकी वर्षे सुरक्षोत विना अपघात कुठलाही डाग सेवेला न लागता चांगली सेवा पार पाडणे फार मोठी गोस्ट आहे भाऊ।तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +2

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

    • @santoshgurav-oi1sg
      @santoshgurav-oi1sg 5 місяців тому +1

      🎉

    • @mahadeopawar6596
      @mahadeopawar6596 5 місяців тому +4

      प्रामाणिकपणे सेवा केली आहेस भावा
      तुमचे आयुष्य सुखसमृद्धीचे व समाधानाने जावे हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +1

      @mahadeopawar6596 खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @pavankumarpadwal8377
    @pavankumarpadwal8377 5 місяців тому +1179

    ज्यांचे ज्यांचे डोळे भरून आले त्यांनी ईथे लाईक करा..😢😢

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +18

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

    • @kiranahire7703
      @kiranahire7703 5 місяців тому +13

      डोळे तर भरून येणारच ना दादा

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +5

      @kiranahire7703 खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

    • @Agroclinic98
      @Agroclinic98 5 місяців тому +3

      Khup Sundar video dada 😢 mazya father pan st driver aahet 4varsh rahile service ❤❤

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +1

      @NightRiders123 खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 त्यांचा पण वीडियो करू आपन, त्या वेळी इंस्टाग्राम वर मेसेज करा मग, आणि हा वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @RDMMarathiVlog
    @RDMMarathiVlog 5 місяців тому +146

    २९ वर्ष नोकरी करताना कितीतरी संकटं या माणसांवर येत असतात .. एखादा दिवस वाटत असेल कंटाळा आलाय , आज नको जायला कामावर . पण ह्या शेवटच्या दिवशी काय वाटत असेल मनाला आयुष्यभर ज्या नोकरी ने आपल्याला ओळख दिली .. मोठं केल .. एक कुटुंबच आहे हे सर्व . काका तुम्हाला सेवानिवृत्ती नंतर आणखी चांगला आयुष्य लाभो आणि आनंदाने सर्व तुमच्या कुटुंबा सोबत वेळ खर्ची करा ... पुढच्या येणाऱ्या सुखी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्या ....

  • @marutipatil7942
    @marutipatil7942 5 місяців тому +115

    समाजाकडून आणि महामंडळाकडून अनेकदा दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या, लाल परीच्या ड्रायव्हर च्या जीवनातील एका भावनिक प्रसंगाचे खूप छान चित्रण,,,ड्रायव्हर दादांचे पुढील आयुष्य सुख समाधानाचे जाओ!!!!

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 5 місяців тому +143

    सिकंदर साहेब, तुमच्या सारखे प्रामाणिक "सारथी" ST महामंडळाला लाभले हे आमचे भाग्य. अर्जुनाच्या यशाचा मानकरी श्री कृष्ण तसेच तुम्ही लालपरीचे "सारथी " आहात. निवृत्तीनंतरचे आयुष्य तुम्हाला आरोग्यदायी आणि सुखाचे जावो. धन्यवाद 🙏 एक प्रवासी, रत्नागिरी जिल्हा.

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +5

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 5 місяців тому +124

    रिटायरमेंट चा शेवट दिवस खरोखरच खुपच भरून येतो. घरापेक्षा आपण कामावरच जास्त असतो. त्यामुळे साहजिकच खुप वाईट वाटते.

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +2

      आगदी बरोबर बोलत, कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

    • @KrishnnaDhavane
      @KrishnnaDhavane 5 місяців тому +3

      ​@@travel_with_yunus तेच 10वी झाली तेव्हा संडप होते तेव्हा खूप मुलं खुश होते पण मला खूप emotinal वाटत होतं 😢 ❤

  • @satish1608-l7l
    @satish1608-l7l 5 місяців тому +71

    मी कालच कोल्हापूरहुन रत्नागिरीला आलो, घाटातून ,आणि त्यात 1पदरी रस्ता त्यातून बस चालवणे अतिशय अवघड काम आहे, सोपं नाही हे काम , msrtc च्या driver व conductor लोकांना सलाम🙏🙏

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +2

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @oveeanuse6568
    @oveeanuse6568 5 місяців тому +75

    खुप च भावनिक क्षण असतो माझ्या वडिलांनी पण 29 वर्ष विना अपघात नोकरी केली .

    • @raisshaikh3733
      @raisshaikh3733 5 місяців тому +1

      @@oveeanuse6568 🙏🌹🌹🌹

  • @rajuhalbe3883
    @rajuhalbe3883 5 місяців тому +67

    प्रामाणिक काम केले म्हणून तुम्हाला एवढं वाईट वाटले असो हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात येतो पुढील आपलं आयुष्य निरोगी आणि आनंदी जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि शुभेच्छा

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 5 місяців тому +61

    प्रामाणिक चालकासाठी खुप भावनिक क्षण असतात असे खुप खुप शुभेच्छा काकांना 🙏

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +1

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @mehmoodmulani2133
    @mehmoodmulani2133 5 місяців тому +47

    मी ही नुकताच सेवानिवृत्त झालो आहे.हा क्षण खूप भावनिक असतो विशेषतः ज्यांनी इमाने इतबारे लोकांची आणि त्या विभागाची सेवा केलेली आहे. ज्यामुळे आपलं घर चालतंय मुलं शिक्षण घेतात आपल्याला मान सन्मान मिळत असतो असे समजणाऱ्या इमोशनल लोकांना अश्रू अनावर होतात.पुढील आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏🏼🙏🏼

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @dhanajimalode6144
    @dhanajimalode6144 5 місяців тому +31

    सिकंदर दादा आपण प्रवाशांना 29 वर्ष खूप चांगली सेवा दिली आहे आपले पुढील आयुष्य आरोग्यमय व आनंदी जावो हेच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @pravinsuryawanshi8038
    @pravinsuryawanshi8038 5 місяців тому +42

    पुढिल आयुष्य आनंदी जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना व शुभेच्छा ❤

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @shahanurshaikh2197
    @shahanurshaikh2197 5 місяців тому +109

    अश्या प्रामाणिक सेवा देणाऱ्या एस टी कर्मचारी मुळेच एस टी 75वर्षे जनतेची सेवा करू शकली.लालपरी आणि अश्या प्रामाणिक कर्मचारी यांना धन्यवाद.

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +2

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

  • @arunpawar464
    @arunpawar464 5 місяців тому +45

    अतिशय साधा व प्रामाणिक मनुष्य, ईश्वर त्यांचे पुढील आयुष्य निरोगी व सुखासमाधानात घालवो ही प्रार्थना.❤❤

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @tanmaychavan3525
    @tanmaychavan3525 5 місяців тому +76

    मी ह्या काकांनां भोसे रुट वर बस चालवतानां पाहिले आहे 95-96 च्या दरम्यान खूप सपाईदार पणे बस चालवायचे आणि त्यांची त्या काळी नविनच भरती असावी, वडाप आणि बस मध्ये त्या काळी स्परधा असायची म्हणून काही ड्रायव्हर लोकांनी आपल्या बस मध्ये टेप रेकाँर्ड बसविले होते , त्या काळी नदाप काकांच्या बस मधून टेप ची गाणी ऐकत प्रवास केला आहे, खूप खूप शुभेच्छा,❤❤❤❤

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +4

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

    • @sarjeraosanap1643
      @sarjeraosanap1643 5 місяців тому +6

      शेवटी एक दिवस प्रत्येकाला
      थांबावेच लागते, जग चालतच
      असते show must go on.
      Rohit आणि विराट इतके
      सुंदर खेळत असताना ही
      T 20 तुन रिटायर्ड झाले.
      Best of luck, ड्राइवर साहब

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +1

      @sarjeraosanap1643 खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @shaileshvallakathi3790
    @shaileshvallakathi3790 Місяць тому +6

    कामावर निष्ठा आणि प्रेम असणे खूप महत्वाचे असते हे काकांच्या अश्रुतून दिसून आले. खूप छान वाटले. ❤

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 5 місяців тому +44

    असे प्रामाणिक सेवक हीच देशाची खरी समृध्दी.

  • @Dr.vsgaigole.softEr
    @Dr.vsgaigole.softEr 5 місяців тому +9

    खरच याला म्हणतात नोकरी का असेना पण तिच्याशी असलेला प्रामाणिक पणा hatts of काका...❤❤❤

  • @pawanchavan7552
    @pawanchavan7552 5 місяців тому +5

    विना अपघात २९ वर्ष गाडी चालवणे Excellent work. ..👌👌🙏❤🙏❤🙂🙂

  • @prakashchoudhari3155
    @prakashchoudhari3155 5 місяців тому +73

    नेते खुर्ची सोडतात भरपूर पेंशन व कुटुंबातील सर्वांना मेडिकल सवलती असतात ते पाचवर्षं असले तरी पण महामंडळात सेवा केलीकी वाऱ्यावर सोडले जाते या प्रामाणिक चालकास खूप खूप हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +1

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

    • @anantnandagawali8008
      @anantnandagawali8008 5 місяців тому +6

      इतकी वर्षे सेवा करून सुद्धा उद्या पासून यांना तिकीट काढून प्रवास करावा लागणार आहे.. कमीत कमी याचा तरी विचार करायला हवा...

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +1

      @anantnandagawali8008 खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

    • @vasant1992
      @vasant1992 5 місяців тому +1

      मनापासून आपले आभार आपण एवढी वर्ष आम्हास सेवा दिली धन्यवाद 🙏🥰

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      @vasant1992 सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @Khumkar
    @Khumkar 5 місяців тому +19

    काही पण म्हणा आर्मी पेक्षा कांही कमी सेवा नाही ही पण ..कमी पगारात आणि रोज रोज हाल सहन करत... निःशब्द ❤❤❤❤

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +1

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 5 місяців тому +19

    सेवानिवृत्तीचे आयुष्य सुख समृध्दी चे जावो. ही शुभेच्छा.

  • @pravinmalve1808
    @pravinmalve1808 5 місяців тому +27

    काकांचे व त्यांच्या कुटुंबियांचे उर्वरीत आयुष्य सुखाचे, समाधानाचे आणि आरोग्यपूर्ण जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🎉🎉🎉🙏🙏🙏
    खूप चांगला vdo केला आहे. असेच चांगले, vdo शूटिंग करीत जाणे. तुमच्या पुढील कार्यासाठी अनेक शुभेच्छा.💐💐💐

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @rasikapatekar7767
    @rasikapatekar7767 5 місяців тому +24

    खरच खूप छान. हे खरे हिरो असतात.मी खूप आदर करते driver लोकांचे..इथ चुकीला माफी नसते..आपले जीव जोखीममधे घालून लोकांना सुखरूप नेतात.

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +2

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @rameshmore8283
    @rameshmore8283 5 місяців тому +18

    सलाम आपल्या कामगिरीस.पुढील आयुष्य सुखासमाधानाचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @pravinkeshavraokodande5103
    @pravinkeshavraokodande5103 5 місяців тому +17

    खुप भावनिक प्रसंग, एसटी ची सेवा ही चालक व वाहक यांच्यावरच अधिक अवलंबून असते. रातराणीच्या प्रवासात सर्व प्रवासी रात्री झोपतात व एकटे चालक रात्रभर बस चालवतात व सकाळी सर्वांना सुखरुप ईच्छीत स्थळी पोचवतात. खुप अभिमान वाटतो मला एसटी चालकांचा.प्रवास झाल्यावर मी नेहमी मनातुन धन्यवाद देतो व अशिच सुरक्षीत सेवा करण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो.

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @anantchavhan121
    @anantchavhan121 Місяць тому +3

    पुढील आयुष्य सुखाचे व समृद्धीचे, आरोग्य दायी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @ramchandragodbole9257
    @ramchandragodbole9257 4 місяці тому +7

    कामावर प्रेम आणि निष्ठा!अशांमुळे हे जग राहण्याला या होतं.!!!नाहीतर.....काकांना मनापासून नमस्कार.

  • @sandytattooartsandeshrauta6709
    @sandytattooartsandeshrauta6709 Місяць тому +4

    खूप भारी काका.... आम्ही ३/४ तास तरी गाडी चालवली तरी कंटाळा येतो तुम्ही येवढं वर्ष विना अपगात आपल काम पारपडल......🙏🙏🙏 आमच्या पन धोळ्यातून पाणी आल ....कोणाचा डोळ्यातून पाणी आलं लाईक करा....

  • @sspinjari
    @sspinjari 5 місяців тому +4

    खूप भारी विडिओ, असे ST चि प्रामाणिक सेवा करणारे लोक रिटायर्ड होत आहेत. असो सिकंदर काका मन जिंकलास तुम्ही ❤❤

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711 5 місяців тому +4

    ST कर्मचाऱ्याच्या मेहनतीला सलाम, कमी पगारात जीवन जगतांना फार त्रास भोगतात . निवृत्ती नंतर ही फारच अल्प पेन्शन मिळत.

  • @amitconnect
    @amitconnect 5 місяців тому +9

    अशा लोकांच्या मेहनतीमुळेच महाराष्ट्रात एसटी बस टिकुन आहे....सणवार, लग्नकार्य, आजारपण सगळं मागं ठेवून सेवा देणार्य लोकांचा महामंडळाने आणि सरकारने यथोचित सन्मान करयला पाहिजे....चालक साहेबांचं आभार.

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @adinathmohite3440
    @adinathmohite3440 5 місяців тому +21

    मोहिते परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा आणि पुणे शहराकडून पण लाख लाख शुभेच्छा काका तुम्हांला तुमच्या कष्टाला लाख लाख सलाम

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +1

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @Mitazut-sachkadava
    @Mitazut-sachkadava 3 місяці тому +2

    काकांना आर्दिक सुबेंच्छा 🎉🎉 प्रतेक बस चालकांना असाच आयुष लाभों,,आई भिवानी चा आशीर्वाद सदैव तुमच्या साथ .🚩🚩🚩😊😊

  • @vinodkulkarni949
    @vinodkulkarni949 5 місяців тому +25

    मी देखील एक सेवानिवृत्त लेखनिक सेवक आहे. जेथे आयुष्याची ३५-३६ वर्षे गेली तेथून असे एकदम बाहेर पडणे भावनिक दृष्ट्या फारच कठीण असते.

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +1

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

    • @laxmienterprises8811
      @laxmienterprises8811 5 місяців тому +4

      रिटायर्ड होतांना मुलंबाळं यांचं कल्याण झालं आणि शारिरीक व्याधी नसेल तरच उर्वरित आयुष्य सुखात जाईल.
      कारण बर्याच कर्मचाऱ्यांना मान पाठ कंबरेची दुखणी लागली आहेत.

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @Siddharth-i6o
    @Siddharth-i6o 5 місяців тому +14

    तुमच्या सारख्या चालकामुळे आम्ही बिनधास्त, आनंदात, सुखरुप, आणि सुरक्षित प्रवास करतो. सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा... तुम्हाला पुढील आयुष्यातील प्रवास सुखाचा समाधानचा आनंदचा भरभराटीचा आरोग्यमय जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @omkarmadane5107
    @omkarmadane5107 5 місяців тому +6

    किती तरी प्रवाशांना सुरक्षित त्यांच्या ठिकाणी पोहोचवणाऱ्या अशा सर्व ड्रायवर काकांना खरच सलाम.... 🙌
    या काकांच पण खूप आभार...🙏🏻

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @AnilPawar-wk7ok
    @AnilPawar-wk7ok 5 місяців тому +33

    नोकरी ही केवळ नोकरी नसून जनतेची सेवा करण्याचे एक माध्यम आहे अशी कामावर प्रेम करणारी माणसं दुनियेत फारच कमी आहेत हा व्हिडिओ पाहून खरंच हृदय भरून आलं आमच्या या बांधवास व जाने हा व्हिडिओ तयार केला त्या सर्वांना मनापासून धन्यवाद

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +1

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @Amarrajmane0069
    @Amarrajmane0069 5 місяців тому +6

    खरच हृदयस्पर्शी व्हिडिओ आहे हा....माणसाचं मन किती मोठं असावं हे ठळकपणे दिसून आलं

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +1

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 5 місяців тому +25

    कोणतेही काम असो करत असताना नकोसे वाटते पण कायमचे काम सहकारी सोडताना खुप खुप वेदना होतात तेच काकांच्या बाबतीत झाले आहे पुढील आयुष्य निरोगी व दीर्घकालीन आयुष्य लाभो एवढीच कुलस्वामि पशी अपेक्षा 🎉🎉🎉🎉

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 5 місяців тому +8

    खूप भावनिक विडिओ सिकंदर चाचा उरलेलं आयुष्य आनंदात जगा.. 🌹🌹🌹🌹

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 5 місяців тому +17

    खूपच चांगली सेवा दिली सरकारने. अशा कर्मचाऱ्यांचे विशेष मानधन देऊन गौरवले पाहिजे

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @gajananshinde2555
    @gajananshinde2555 5 місяців тому +4

    सिकंदर काका आपले सेवा बघून माझ्या पण डोळ्यात पाणी आला आहे

  • @rajendrawagh9611
    @rajendrawagh9611 5 місяців тому +2

    महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला म्हणजे पगार मिळत नाही.निवृत्तीचे लाभ विलंबाने मिळतात. तरीही असे कार्यक्रम होतात त्याचा अभिमान आहे. खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🎈🌹🌹

  • @maheshkhade8595
    @maheshkhade8595 5 місяців тому +7

    तुमच्या प्रामाणिक आणि निस्वार्थी कामासाठी सलाम दीर्घ आयुष्य लाभो 🙏🏻🙏🏻

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @ssd6836
    @ssd6836 5 місяців тому +17

    दादा आपण खूप प्रामाणिक पणे ST ची वा प्रवाशांची सेवा केली,,,, आपणास पुढील आयुष्य सुख समृद्धी,,, उत्तम आरोग्य,, व समाधाना च जाओ,,,, हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @nandkumarkanunje5616
    @nandkumarkanunje5616 5 місяців тому +22

    मनमिळावू वृती असणारे चालक आहेत.उदंड आयुष्य लाभो हीच हेच मागणे आहे.माझे.

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @nawazattar7919
    @nawazattar7919 Місяць тому +5

    His body language shows he was too much attached with his work ...and he may have done his work very honestly .
    Good luck Chacha ❤

  • @SweetiRajguru
    @SweetiRajguru 5 місяців тому +4

    मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना खुप छान भावनिक प्रसंग आहे नकळत डोळे पाणावले हृदयाला पाझर फुटला जय भारत

  • @miteshdhuri2807
    @miteshdhuri2807 5 місяців тому +8

    सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना 🙏👍😇🧡

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @nikhilsatamkar7532
    @nikhilsatamkar7532 5 місяців тому +7

    व्हिडिओच्या शेवटी डोळे भरून आले.. काकांना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा..💐

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @kirankumarrathod9184
    @kirankumarrathod9184 5 місяців тому +2

    आपला जीव मुठीत घेऊन उन वारा थंडी पाऊस अंगाखांद्यावर झेलत प्रवाशांना विना अपघात इच्छीत स्थळी पोहचवणारे विना अपघात एस टी चालक आपणास छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा.. पांडुरंग आपणास उदंड निरामय आरोग्यदायी दिर्घायुष्य देवो हीच सदिच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @amarburondkar1752
    @amarburondkar1752 5 місяців тому +10

    आपण सुंदर असं शुट केलेत आपले खुप धन्यवाद ! सहसा असं कोण करीत नाही , आपली ST लालपरी अविरीत सेवा 29 वर्षे ज्यांनी दिली श्री सिंकदर साहेब ,आपण दिलेल्या सेवेबद्दल मनापासुन मानाचा नमस्कार. शुभेच्छा

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @ArvindKulkarni-l3c
    @ArvindKulkarni-l3c 5 місяців тому +2

    "काका खरंच आपण धन्य आहात आपली सेवा आपण अतिशय प्रामाणिकपणे पुर्ण केली आहे.आपल्या भावी आयुष्यासाठी आपणास व आपल्या कुटुंबाला खुप खुप शुभेच्छा"!!!

  • @M.tShivalkar
    @M.tShivalkar 5 місяців тому +9

    सर्व धर्म सम भाव🎉हा माझ्या शिवरायांचा,बाबा साहेबांचा महाराष्ट्र आहे

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @TerminatedError
    @TerminatedError 5 місяців тому +6

    सर्वात इमानदार डिपार्टमेंट हे MSRTC हेच आहे, तुम्ही दिवसभर सारखे गर्दीतून धक्के खाता ,ऊन,पाऊस, थंडी सहन करता आणि लोकांना निस्वार्थ सेवा देता ,खरोखरचं तुमचं मनापासून आभार🙏🙏

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @vilasnaik9889
    @vilasnaik9889 5 місяців тому +5

    बस चालक सेवा ही तारेवरची कसरत खुप भावनिक क्षण सिकंदर साहेबांना सेवानिवृत्तीच्या खुप खूप शुभेच्छा

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @madhavswami9737
    @madhavswami9737 3 місяці тому +1

    खरचं अश्रूअनावर झाले ..❤ ..सारथी .. यांना. सलाम.

  • @VikiThube
    @VikiThube 5 місяців тому +9

    अतिशय सुंदर,पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा 🎉🎉

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @rameshvichare9109
    @rameshvichare9109 5 місяців тому +1

    दादा खूप भावुक झाले, आपण खूप चांगली सेवा दिली, लाल परीला ही सलाम,
    दादा तुम्ही व्हिडीओ बनवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @riyajmulla3032
    @riyajmulla3032 2 місяці тому +3

    Radvlas bhava❤❤❤... Kaka ak number seva.... Emotional kela rao❤

  • @kailassarode4660
    @kailassarode4660 3 місяці тому +2

    अत्यंत कमी वेतनावर बस चालक व कंडक्टर काम करतात.हे त्यांच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे.बस खात्यासाठी त्यांचे फार मोठे योगदान आहे.आज काका सेवानिवृत्त होत आहे, त्यांच्यासाठी शुभेच्छा आणि अभिनंदन!! अगदी भावनिक असा प्रसंग आहे.डोळे भरून आले!

  • @Y_Brooo
    @Y_Brooo 5 місяців тому +13

    हिंदू आणि मुस्लिम याच्यात किती आपुलकी दिसून आली त्या कांडेक्टर ताई ना मुली प्रमाण वागावला असं बोलल्या ताई हिच खरी कमाई मानवता हाच धर्म आहे.पुढील आयुष्य असच राहो हीच सदिच्छा 🎉🎉🎉

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +1

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @surajgambhir1426
    @surajgambhir1426 2 місяці тому +1

    अशी सोन्यासारखी माणसं फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्रातच जन्माला येऊ शकतात धन्य आहोत आपण आपला जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झालाय.

  • @shreyashbarge9343
    @shreyashbarge9343 5 місяців тому +5

    हे आनंदा चे अश्रू प्रामाणिक सेवेचे आहेत 👌👍🙏🙏

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +1

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @babajiloke5849
    @babajiloke5849 5 місяців тому +2

    खुप छान निस्वार्थी सेवा, काकांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐💐🙏🙏

  • @chandrakantsuryawanshi5995
    @chandrakantsuryawanshi5995 5 місяців тому +10

    29+11=40 years sikandar sahab aapane Bina accident driving. Kiya very very nice 👍👍👍 work done by you God always bless you and your all family members salute to you.

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +1

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @pratikchaudhary9944
    @pratikchaudhary9944 Місяць тому +1

    महाराष्ट्राच्या जीवनवाहिनीची 29 वर्ष सेवा केलीत .... धन्यवाद काकाजी ❤❤🙏🙏❤❤

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 5 місяців тому +7

    खरच खूप भावनिक केलं काकांनी हा क्षण पुन्हा येणार नाही

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @sahilkamble4796
    @sahilkamble4796 3 місяці тому +1

    खुप अवघड आहे 29 वर्ष कोणताही अपघात नहोता सेवानिवृत्त होने.आपल एक नातं तयार होतं त्यांपासून दुर जाने . मी सुद्धा एसटी महामंडळ मध्ये काम करत आहे.आणी बघत आहे ते नातं आणि बॉंडिंग खुप छान.... काका तुमच ईथुन पुढचं जीवन सुखी जावो ....❤❤❤❤

  • @ShivajiJagtap-md5qz
    @ShivajiJagtap-md5qz 5 місяців тому +3

    अजबच कामगिरी बजावली आहे धन्यवाद तूम्ही खूपच छान काम केले आहे साहेब तुम्हाला सलाम 6:51

  • @IamMe927
    @IamMe927 3 місяці тому +2

    खुपच ह्रदयस्पर्शी ! सलाम तुमच्या कार्याला !

  • @milindsonawane7436
    @milindsonawane7436 5 місяців тому +4

    लाखो लोकांचे stearing samhalnarya ya भावाला सलाम

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @theraj368
    @theraj368 3 місяці тому +1

    सिकंदर भाऊ, आपल्या कामावरील निष्ठेला आणि प्रेमाला सलाम.

  • @AnandJanjale-o5z
    @AnandJanjale-o5z 5 місяців тому +4

    एसटी बस चा सेवा निरुतीचा पहील्यांदा युट्युब वर बघत आहो अप्रतिम आहे

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @pramodnarve2871
    @pramodnarve2871 5 місяців тому +2

    आपल्या कर्तव्यावरती किती प्रामाणिक प्रेम आहे याचे मुर्तीमंत उदाहरण आहे 👌

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @haripalpatil5583
    @haripalpatil5583 5 місяців тому +14

    फार छान ड्रायवर साहेब. मी तर फक्त एसटी ने च प्रवास करतो

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @MukeshTambe-h7i
    @MukeshTambe-h7i 5 місяців тому +1

    डोळ्यात पाणी आलं ❤❤❤❤❤ सलाम तुमच्या आजपर्यंतच्या सेवेला

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @srikantpanchal4064
    @srikantpanchal4064 5 місяців тому +3

    हे दुख जे रिटायर्ड होत आहेत त्यांना च कळत कारण की ईतके दिवस ची डिवटिची आदत एकदम सुटत नाही मित्रांसोबत राहिले ल्या माणसाला आता एकट रहावे लागते पण आता त्यांचा परीवार त्यांचा सखा मित्र बनावा हिच शुभेच्छा🎉🎉

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @ManojKamble-n8j
    @ManojKamble-n8j 2 місяці тому +1

    सर आपण खुप प्रामाणिक पणे निस्वार्थ भावनेने एस टि महामंडळाला सेवा दिली, सेवानिवृत्ती नंतरचे आपले आयुष्य आरोग्यसंपन्न सुखसमृद्धीचे जावो आपल्या परिवारासहीत आपणास खुप खुप शुभेच्छा

  • @Merabharatmahan1986
    @Merabharatmahan1986 5 місяців тому +8

    अविस्मरणीय क्षण ... आणि छान चित्रीकरण👌

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @deepakd4148
    @deepakd4148 4 місяці тому +1

    Retirement चा क्षण फार भावूक असतो. मी अनुभवलेले आहे. काकांना मनाचा मुजरा व travel wirh युनूस तुमचे खूप खूप कौतुक.

  • @abhichopade6263
    @abhichopade6263 5 місяців тому +5

    खर प्रेम कामावर म्हणतात ते याला. अभिनंदन आणि सेवा निवृती शुभेच्छा

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @Milind1971
    @Milind1971 5 місяців тому +2

    Salute Driver sahebaana🎉🎉🎉Tears😢 in eyes... Thanks for this vdo 🎉

  • @cr.6860
    @cr.6860 5 місяців тому +11

    क्षण खूप भावूक होता 30 वर्ष सेवा बजावल्यानंतर हा क्षण प्रत्येक व्यक्ती साठी येत असतो

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @amolvatharevathare2188
    @amolvatharevathare2188 5 місяців тому +1

    🌹🌹🌹काका पुढील आयुष्य चांगलं जावो हीच शुभेच्छा 🌹🌹🌹

  • @madanjakhadi6224
    @madanjakhadi6224 5 місяців тому +6

    प्रत्येक स्टाफ चा विडिओ झाला तर एक स्मृती राहील, आनंद क्षण राहील. तस ही त्यांना कोणता ही ॠतु मधे जिवाची तमा न करता वेळी,अवेळी कधी जबरदस्तीन दबावामुळे राबाव लागतच. तेव्हडाच आनंद वाटेल.

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +2

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @laughheartily143
    @laughheartily143 День тому +1

    काका साहेबाचा जीवनातला सर्वात भावनिक क्षण ह्यापेक्षा भावनिक काहीच असु शकत नाही त्याच्याकरीता ❤😢

  • @nitinpagare4739
    @nitinpagare4739 5 місяців тому +12

    तुम्ही आम्हला सुरक्षित प्रवास दिल्या बद्दल तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहे

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому +1

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @ebrahimbeg484
    @ebrahimbeg484 5 місяців тому +2

    यूट्यूबरचे आभार कारण की तुम्ही अशीच सुंदर स्टोरी समाजासमोर आणली❤❤❤❤❤

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा

  • @vinugamer2780
    @vinugamer2780 5 місяців тому +4

    भाऊ आपण मनापासून प्रवासी आपले कुटुंब समजून सेवा केली म्हणून ईश्वराने अपघात नाही होऊ दिला
    खूप खूप अभिनंदन

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 2 місяці тому +2

    आरे बापरे लय कस तरी वाटलं 😢😢 विडीओ ग्राफरला शुट केल्या बद्दल शुभेच्छा ‌ 💐🙏

  • @vilaskurhade4729
    @vilaskurhade4729 5 місяців тому +3

    अतिशय सुंदर उर्वरित आयुष्य सुखाचे समृद्धीचा आणि भरभराटीचे जावो ही परमेश्वराकडे अपेक्षा

    • @travel_with_yunus
      @travel_with_yunus  5 місяців тому

      खुप सुंदर कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏 वीडियो आवडला असेल तर वीडियो ला like आणि share नक्की करा 😇

  • @dhananjaybokil9908
    @dhananjaybokil9908 2 місяці тому +1

    29 वर्षे विनाअभगत सर्विस केल्याबद्दल धन्यवाद या पुढील सेवानिवृत्तीचे आयुष्य आपणास आनंदाचे भरभराटीचे व आरोग्यदायी जावो हीच एका पुणेरी एसटी प्रवाशातर्फे अभिनंदन