शिवछत्रपतींच्या लाल महालाचे नेमके काय झाले असावे? | What must have happened to Lal Mahal? | Pune

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 62

  • @amitakorde1082
    @amitakorde1082 Рік тому +2

    खूप छान पद्धतीने समजावलं आहे

    • @KimantuLive
      @KimantuLive  Рік тому

      आपले मन:पूर्वक आभार मॅम!

  • @MilindKotwal22
    @MilindKotwal22 5 місяців тому

    उत्तम विवेचन …….

  • @Truth_is_powerful
    @Truth_is_powerful 3 роки тому +1

    Sir, tumche video khoop chan aani mahiti purn astat... Dhanyawad. Fakt maz etke मत aahe ki जिथे जिथे शिव छत्रपती ह्याच वास्तव होते ती गोष्ट किंवा Vaastu पुढच्या पिढीला बघायला मिळावी 🙏

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 роки тому +2

      खरं आहे. त्यासाठी आपण त्या वास्तूंचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पण या वास्तू म्हणजे शिवाजी महाराज नव्हेत. या वास्तू म्हणजे शिवाजी महाराजांसाठी साध्य कधीही नव्हत्या. शिवाजी महाराज जी एक नवीन उद्दात समाजव्यवस्था निर्माण करू पाहत होते त्यासाठी शिवाजी महाराजांसाठी पण या वास्तू फक्त साधन होत्या.
      शिवाजी महाराजांनी करोडो होन खर्च करून किल्ले बांधले, ते शत्रूला द्यावे लागले किंवा त्यांचे नुकसान झाले, तरी त्याचे शिवाजी महाराजांनी कधी काही फार मनाला लावून घेतले नाही. मग आज आपण या वास्तूंचा एक जरी दगड इकडचा तिकडे झाला तरी दंगली का घडवतो आहोत, याचा विचार केला पाहिजे.
      वास्तू राहिल्या पाहिजेत हे खरेच. पण काळाच्या पुढे कोणाचे काही चालत नाही. काळ सर्व काही गिळंकृत करून टाकतो हे वास्तव आपण स्विकारले पाहिजे. शिवछत्रपतींनी देखिल हे वास्तव स्विकारले होते म्हणून त्यांनी वास्तूंपेक्षा जास्त महत्व विचारांना दिले होते. आणि म्हणूनच शिवछत्रपती आज या वास्तूंमध्ये जिवंत आहेतच. पण त्यापेक्षा देखिल जास्त आपल्या सर्वांच्या ह्रदयात जिवंत आहेत. कारण दगडांवर कोरलेली नावे काळ पुसून टाकतो. पण हृदयावर कोरलेली नावे काळाला पुसता येत नाहीत. त्यामुळे वास्तू राहोत नाही तर जावोत. जोपर्यंत एक तरी माणूस या जगात जिवंत आहे तोपर्यंत शिवछत्रपती जिवंत आहेत.

  • @sushmachavan3090
    @sushmachavan3090 2 роки тому

    Kiti chan prakare sangitle tumhi
    khup thanks tumchya mule etihas kalala

  • @unpat
    @unpat 3 роки тому +5

    तुमच्या अभ्यासपूर्ण व्हिडिओची स्थिती जुन्या लाल महाल प्रमाणे झाली हे खेदाने म्हणावेसे वाटते. इतके कमी views इतक्या चांगल्या व्हिडीओ साठी?
    काहीतरी भडक बनवा. तुमच्या व्हिडिओची caption चटपटीत जातीयवादी द्या. मग बघा लाखा लाखाचे views मिळतील😉
    खूप छान माहिती. खूप चांगले कार्य करताय आपण. शुभेच्छा

  • @vikrampimprikar6842
    @vikrampimprikar6842 4 роки тому +2

    किमांतू ओंबळे सरकार तुम्ही लाल महालाच्या इतिहासाचे खूप अभ्यास पूर्वक वर्णन आणि विश्लेषण केले त्याबद्दल धन्यवाद... विक्रमराज पिंपरीकर

  • @pankajshinde529
    @pankajshinde529 4 роки тому

    अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण

  • @surekhapulicharla2236
    @surekhapulicharla2236 4 роки тому +1

    Useful information sir

  • @akashgawde4313
    @akashgawde4313 3 роки тому

    खूप छान विवेचन दिलात सर, यात एक खूप आवडलं शिवरायांचे विचार मनातून नष्ट होता कामा नये, सर मला सभासदाची बखर कुठे भेटेल

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 роки тому +1

      गुगलवर सर्च करा.भेटेल.

  • @warriorbrat5620
    @warriorbrat5620 3 роки тому +3

    माझा अजून एक प्रश्न आहे तुम्हाला की
    कवी कलश याच्या भूमिकेबद्दल नेमका काय विचार आपण ठेवावा
    कारण कधी त्याला स्वराज्यहितदक्षक दाखवलं जात , तर कधी संपूर्ण मंत्रिमंडळाच्या कामकाजात ढवळा ढवळ करताना , किंवा कलश हा दुसऱ्या राज्यातून आलेला आहे ज्याला स्वराज्याबद्दल व त्या प्रदेशाबद्दल काही आदमास नाही त्यामुळे हा बाहेरून आलेला कोण कुठला कवी हा स्वराज्याच्या कारभारात एवढ्या लवकर कशी जागा मिळवतो
    कारण याच्या भूमिकेवर बऱ्याच अंशी संशय घेतला जातो काही पुस्तकांमधून
    माझ्याकडे उपलब्ध पुस्तके जस की ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा - डॉ सदाशिव शिवदे
    शिवपुत्र संभाजी - डॉ कमल गोखले
    नेमकं कवी कलश याच्या भूमिकेविषयी काय लक्षात घ्यावं

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 роки тому +3

      हा विषय थोडा गुंतागुंतीचा आहे. इथे कमेंटामध्ये मावणार नाही. लवकरच मी या विषयावर देखिल एक नवीन व्हिडिओ बनवेन.

    • @warriorbrat5620
      @warriorbrat5620 3 роки тому

      @@KimantuLive हो सर नक्कीच लवकरात लवकर तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहू

  • @prasadtkale
    @prasadtkale 2 місяці тому

    Sir june pune kase hote ya baddal video banva

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 місяці тому

      ठीक आहे साहेब. 🙏

  • @rajeevmantrimathsandscienc8104
    @rajeevmantrimathsandscienc8104 4 роки тому +1

    You are master of History

    • @KimantuLive
      @KimantuLive  4 роки тому +1

      Thanks Sir. But I am student of history.

  • @Shortfilm_makerr
    @Shortfilm_makerr 3 роки тому +1

    Nice❤️

  • @HOWILEARNRUSSIANLANGUAGE
    @HOWILEARNRUSSIANLANGUAGE 4 роки тому

    Very good historic information. जय शिवराय।

  • @ajaygawali9229
    @ajaygawali9229 4 роки тому

    Useful information... Now a days people use these topics for politics without knowing actual history

  • @vikas1121..
    @vikas1121.. 4 роки тому +1

    Nice video sir

  • @shekharbodake6986
    @shekharbodake6986 3 місяці тому

    सर मी जुन्नर ला राहतो. शिवनेरी किल्ल्याचा शिव काला आधी आणि नंतर चा इतिहास ऐकायला आवडेल. कृपया एक व्हिडिओ बनवा यावर.

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 місяці тому

      ठीक आहे साहेब. 🙏

  • @rubinashomefoodrecipes9078
    @rubinashomefoodrecipes9078 4 роки тому

    Useful information sir nice video

  • @ganeshambekar1076
    @ganeshambekar1076 2 роки тому +3

    छत्रपती आणि पेशवे यांचे सम्बद यावर एक व्हिडिओ बनवावा ही विनती ( छत्रपति शिवाजी महाराज पासून ते मराठा साम्राज्य अस्त होई पर्यन्त)

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 роки тому

      खरोखर चांगली सुचना आहे. यावर जरूर एक व्हिडिओ बनवता येण्याजोगा आहे. विषय लिहून ठेवला आहे साहेब.

    • @ganeshambekar1076
      @ganeshambekar1076 2 роки тому

      @@KimantuLive धन्यवाद सर जय शिवराय

    • @vishwamobimurud
      @vishwamobimurud 2 роки тому

      पेशवा हे मराठाशाहीतील एक पद ( चाकर ) होते .

  • @vijaysalunkhe1511
    @vijaysalunkhe1511 4 роки тому

    Ati utam vdo. Aavadala.

  • @ChMuBaHiJaPa
    @ChMuBaHiJaPa 2 роки тому +1

    धन्यवाद साहेब! गो. स. सरदेसाई म्हणतात की छत्रपती शाहू त्यांच्या हयातीत (स्वराज्यात परत आल्यावर ) कधीच रायगडावर गेले नाहीत. रायगडकडे दुर्लक्ष केले. यावर आपले मत काय?

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 роки тому +4

      छत्रपती शाहू महाराजाचे बालपण मोगल छावणीत व्यतित झाल्यामुळे त्यांना गड किल्ल्यांचे तेवढे आकर्षण राहिले नव्हते. ते ज्या काळात राज्य करत होते, त्या काळात लढाया महाराष्ट्राच्या बाहेर होत होत्या त्यामुळे पण गडकिल्ल्यांचे महत्व संपुष्टात आले होते. रायगड तख्ताची जागा होती. पण शाहू महाराजांच्या काळात तख्त सातारा होते. त्यामुळे तख्ताचा किल्ला हे महत्व पण संपुष्टात आले होते. शिवाय महाराष्ट्रात आता शांतता नांदत होती. त्यामुळे साताऱ्यासारखे आल्हाददायक हवामानाचे ठिकाण सोडून रायगडसारखी वादळवाऱ्याची बिकट जागा राहण्यासाठी निवडण्याचे काही कारण नव्हते.
      सर्वात महत्वाची गोष्ट १७०७ साली शाहू महाराज महाराष्ट्रात आले. परंतु रायगड १७३३ पर्यंत सिद्दीच्याच ताब्यात होता. जेव्हा मराठ्यांच्या ताब्यात आला, तेव्हा ती फक्त एक प्रतिकात्मक घटना सोडून कोणासाठी त्याचे जास्त काही महत्व नव्हते. कारण मराठ्यांचे लक्ष रायगडच्या तख्तापेक्षा तेव्हा दिल्लीच्या तख्ताकडे जास्त लागून राहिले होते.
      शाहू महाराज रायगडावर गेले नाहीत त्याची वरील काही कारणे सांगता येतील. पण मुख्य कारण म्हणजे शाहू महाराज कधीच फारसे सातारा सोडून कधी बाहेर पडले नाहीत. अगदी शत्रू दाराशी हल्ला करायला आला, तरी कित्येकदा त्यांनी ते काम पेशव्यांवर व इतरांवर सोपवून दिले, पण स्वत: होऊन काही फार हालचाल केली नाही. किंवा स्वत: होऊन कधी कुठे गड किल्ल्यांच्या आश्रयाला गेले नाहीत. शाहू महाराज राजकिय कारणांसाठी गड-किल्ल्याचे महत्व जाणत नव्हते असे नाही. पण वैयक्तिक आयुष्यात त्यांना नंतर कदाचित गडकिल्ल्यांची तेवढी ओढ राहिली नसावी.
      रायगडच काय पण इतरही गडकिल्ल्यांना त्यांनी कधी आवर्जून भेटी दिल्याचे उल्लेख कमीच आढळतील. पण रायगडला तरी त्यांनी किमान एकदा तरी भेट द्यायला हवी होती हे खरेच आहे. शाहू महाराजांनी रायगडला भेट का दिली नाही हे आता ते त्यांचे त्यांनाच ठाऊक. आपण फक्त या बाबतीत वर सांगितले तसे काही अंदाज बांधू शकतो.

  • @prasad2463
    @prasad2463 2 роки тому

    नमस्कार
    २)तेथे २ वास्तू ,महाल किंवा घरं बांधण्यात आली होती.श्री.शिवछत्रपती चे थोरले बंधु संभाजी राजे यांच्या करतापण एक वाडा बांधल्याचे वाचनात आले आहे.
    २) १७४४ पर्यंत श्री.शिवछत्रपती महाराजांचे वंशज सातारचे श्री.शाहु छत्रपति हयात होते.तेंव्हा त्यांच्या हयातित कोणि लाल महालाची १०० वर्ष जुनी वास्तु कोणि बळकावली असेल अशी शक्यता वाटत नाहि
    .३)त्या जागेत चिमाजी अप्पांचे चिरंजीव सदाशिव भाऊंचि मुंज तेथे करण्यात आली होति.
    ४) लाल महालाच्या मोकळ्या जागेत , परिसरात पेशवाई कालखंडात महादजी शिंदे सरकारच्या फोजेच्या शिबिरा करता जागा देण्यात आली होति. असं वाचल्याच आठवतं.

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 роки тому

      थोरले संभाजी महाराज यांचेसाठी वाडा बांधला होता, याबाबत थोडी शंका वाटते साहेब. बाकी मुद्दे बरोबर आहेत.

  • @warriorbrat5620
    @warriorbrat5620 3 роки тому

    माझा अजून एक प्रश्न आहे की महाराजांनी कधी गडावर सत्यनारायण घातला का
    महाराजांनी सती प्रथा कशी यशस्वी पणे बंद केली

    • @KimantuLive
      @KimantuLive  3 роки тому

      महाराजांनी कोणत्याही किल्लयावर सत्यनारायण घातल्याची नोंद मला तरी अजून कुठे सापडली नाही. पण माझे मत विचाराल तर, महाराज किल्ले स्वराज्यरक्षणासाठी बांधत होते. रयतेच्या करभक्षणासाठी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी किल्ल्यांचे महत्व रणनितीक होते. वैयक्तिक नाही. औरंगजेबासारखा प्रबळ शत्रू चाल करून आल्यावर, प्रत्येक किल्ला किमान एक वर्ष लढवता आला तरी, किल्ला बांधण्यासाठी लावलेला पैसा सार्थकी लागला अशी महाराजांची भुमिका होती. किल्ला आहे तो सदासर्वकाळ कोणा एका राजाच्या ताब्यात राहणार नाही. काल कोणा दुसऱ्याच्या ताब्यात होता, आज् आपल्या ताब्यात आहे, उद्या अजून कोणा तिसऱ्याच्या ताब्यात जाईल, याची महाराजांना जाणीव नव्हती असे कोण म्हणू शकेल? त्यामुळे किल्ला वेळेला रक्षणकर्ता झाला, एक वर्ष भांडवता झाला, मग शत्रूच्या ताब्यात गेला तरी हरकत नाही. ही महाराजांची भुमिका होती. याच महाराजांच्या विचाराने पुढे सत्तावीस वर्षे औरंगजेब महाराष्ट्रात एका एका किल्ल्याला वर्षभर वेढा घालून बसला, वर्षभर किल्ला लढवला, पावसाळा आला की मराठे औरंगजेबाकडून पैसे घेऊन त्याला किल्ला देत असत आणि पावसाळा संपला की किल्ला परत जिंकून घेत असत.
      त्यामुळे किल्ल्यावर सत्यनारायण घालण्याचा मुर्खपणा महाराज करतील असे वाटत नाही. आजकाल आपण सत्यनारायण वास्तुशांतीसाठी कमी आत्मशांती किंवा अहंकारपुर्तीसाठी जास्त घालत असतो. महाराजांना यातल्या कोणत्याही दुर्गुणाची बाधा झालेली इतिहासात दिसून येत नाही. महाराज गड-किल्ले, वाडे आणि गढ्या या संदर्भात धार्मिक असण्यापेक्षा जास्त व्यावहारिक होते, त्यामुळे जाणूनबुझून किंवा कोणा साधू वाण्याला भिऊन महाराज सत्यनारायण घालण्याच्या भानगडीत पडतील असे काही वाटत नाही. अर्थात याचा अर्थ महाराज हिंदू नव्हते असा होत नाही. महाराज एक राजा म्हणून निधर्मी राजा होते पण एक व्यक्ती म्हणून धार्मिक हिंदूच होते. फक्त धार्मिक होते. धर्मांध नव्हते. सश्रद्ध होते अंधश्रद्ध नव्हते. या अशा साधू वाण्याच्या बुडालेल्या जहाजांच्या कथा ऐकत बसले असते, तर मग त्यांचे आरमार कधी उभे राहिले असते का? ते पण युरोपियनांच्या तोडीस तोड? म्हणून महाराज जसे होते, जिथे होते, तसे ते तिथे ठीकच होते. आपणच आपल्या मेंदूवरची धूळ झटकण्याची गरज आहे.
      राहता राहिला सतीप्रथेचा प्रश्न. महाराजांचे धोरण कोणत्याही धर्माच्या धार्मिक स्वातंत्र्यात हस्तक्षेप करण्य्याचे नव्हते. प्रत्येक जण महाराजांच्या राज्यात स्वत:च्या धर्माचे पालन करण्यास मुक्त होता. आणि तसाही महाराजांनी धार्मिक स्वातंत्र्यात हस्तक्षेप करून सतीची प्रथा बंद पाडण्याचा आदेश काढल्याचा कुठे काही पुरावा मिळत नाही. याचा अर्थ महाराज सुधारणावादी नव्हते आणि त्यांनी तसे कधी केले नसते असे नाही. पण कोणत्याही शासन अथवा सरकाराला सामाजिक किंवा धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी राज्यात राजकिय स्थिरता असणे गरजेचे असते. इंग्रजांना राजाराम मोहन रॉय यांच्या मोहिमेनंतर सतीप्रथा विरोधाचा कायदा करता आला, कारण तोपर्यंत इंग्रजांचे राज्य भारतात चांगलेच स्थिरावले होते आणि जनतेचा या अशा गोष्टीत विरोध मोडून काढण्याइतके बळकट पण झाले होते. महाराजांचा काळ लढायांचा आणि धामधुमीचा होता. त्यांचे सर्व आयुष्य स्वराज्य वाचवण्यात आणि वाढवण्यातच खर्ची पडले. जर महाराजांना या सर्वातून उसंत मिळाली असती, तर महाराजांनी नक्कीच समाजातल्या कुप्रथांना वेसण घातली असती. पण तेवढे आयुष्य आणि वेळ देखिल त्यांना मिळाला नाही. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
      सारांश. महाराजांना सत्यनारायण घालण्याचे काही एक प्रयोजन नव्हते, कारण साधू वाण्याची जहाजे बुडवली तशी महाराजांची बुडवण्याची सत्यनारायणाची छाती झाली नाही. पोर्तुगीझ, इंग्रज, सिद्धी आणि वादळ-वाऱ्याची पण झाली नाही तर सत्यनारायाणाची कुठून व्हावी? दुसरी गोष्ट सतीची प्रथाच काय पण इतर कोणात्याही कुप्रथेला नष्ट करण्यासाठी महाराजांना आयुष्य आणि मिळालेल्या आयुष्यात स्थिरता मिळाली नाही. त्यामुळे ते काम त्यांच्या हातून होऊ शकले नाही. नाही तर राजाराम मोहन रॉय व इंग्रजांना करण्यासाठी महाराजांनी हे कार्य नक्कीच मागे शिल्लक ठेवले नसते.

    • @warriorbrat5620
      @warriorbrat5620 3 роки тому

      @@KimantuLiveदादा खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या समर्पक उत्तराबद्दल

  • @darshanchavan1854
    @darshanchavan1854 2 роки тому +1

    छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू विष प्रयोगाने झाला काय ?

    • @KimantuLive
      @KimantuLive  2 роки тому +2

      या विषयाचे म्हणजे विषप्रयोगाचे काही पुरावे भेटत नाहीत साहेब. पण शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर ज्या काही घडामोडी घडल्या त्यामुळे शिवछत्रपतींचा काही घातपात तर झाला नसावा याबद्दल आता कायमचे संशयाचे धुके निर्माण झाले आहे.

  • @gorakhnathshitole9597
    @gorakhnathshitole9597 Рік тому

    Shaniwarwada Build on Shitole Sarkars Land .

    • @KimantuLive
      @KimantuLive  Рік тому

      हे कोणत्या कागदपत्रात वाचले आपण साहेब?

  • @harshwardhanvinodjakate_of9775

    मंजे लाल महाल याला महत्त्व नाहीबरोबर का .मग लाल होता का नाही

    • @KimantuLive
      @KimantuLive  Рік тому

      म्हणजे एवढंच साहेब. लालमहाल शिवकाळात होता. आणि शायिस्तेखान वधापर्यंत त्याचे प्रतिकात्मक का होईना महत्व देखील होते. नंतर ते हळूहळू कमी होत गेले आणि कालांतराने पूर्ण नाहीसे झाले.