दापोलीतील निसर्गसंपन्न 'केशवराज मंदिर' | Keshavraj mandir, Dapoli

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 гру 2022
  • Download KukuFM
    Download link:- kukufm.page.link/as4N1P1c9VJj...
    Coupon code:- MUKTA50
    (Coupon code valid for first 250 users)
    दापोलीतील एक नितांत सुंदर मंदिर. केशवराज मंदिर. आम्ही दापोलीत राहिलेलो लाडघर मधल्या skyi county resort मध्ये. त्याची लिंक, contact details खाली आहेतच. तिथून मंदिर आहे 13 किमी अंतरावर.
    पहिल्यांदा दापोली कॅम्प कडे जायचा रस्ता धरायचा. मग हर्णे बंदरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जायचं. एक वळण खाली जाते. ते वळण घेतलं की आपण आसूद बागेत पोहोचतो.खाली गाडी पार्क केली की पुढे चालत जायचं. पहिल्यांदा घरं लागतात.मग सुपारीची बाग लागते. पुढे थोडी चढाई आहे. 15 ते 20 मिनिटात मंदिराजवळ पोहोचतो. गोमुखाच्या खाली डोणी आहे. त्यातल्या पाण्याने हातपाय स्वच्छ धुवून मंदिरात प्रवेश करायचा. गाभाऱ्यातील विष्णूची मूर्ती पाहून अगदी प्रसन्न वाटतं. दापोलीत गेलात तर मंदिराला अवश्य भेट द्या.
    🌼Skyi county resort Details:
    www.theskyicounty.com
    Contact : 9834913028/9834288422
    / theskyicountydapoli
    Seute Verdiator Bag Link:
    Order Now
    Seute (Official Website) 👉 bit.ly/3gHzX1Y ( Use code MUKTA200 )
    Amazon Link 👉 amzn.to/3Xy8TTg
    The music in this video is from Epidemic Sound
    www.epidemicsound.com/referra...
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    MuktaNarveka...

КОМЕНТАРІ • 386

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekar  Рік тому +9

    Download KukuFM

  • @sulochanakale641
    @sulochanakale641 Рік тому +30

    हिंदु संस्कृती प्राचीन मंदिर आणि अलौकिक अशा संस्कृतीच दर्शन घडत आहे तुम्ही खूप दुर्मिळ अशी महिती त्याचे उत्तम असे सादरीकरण करतात त्याबद्दल आपले धन्यवाद

  • @ashwinivaidya8828
    @ashwinivaidya8828 Рік тому +6

    तू आमच्या दापोलीजवळच्या केशवराजला येऊन गेलीस मुक्ता.तू इतक्या संयतपणे मोजकं बोलून शो करतेस.स्वतः शो ऑफ करत नाहीसखूप खूप गोड.thanks Mukta

  • @vaibhavrewale5992

    अरे पण तू एकटीच कशी गेलीस ....

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 Рік тому

    साकव वणदे नदीवर आहे. नदी छोटी छोटी आहे. बारमाही नाही. आसूद बगेतील सर्व पोफळींचे शिंपण पाटातून वाहणाऱ्या प-ह्याच्या पाण्याने होते. गेली शेकडो वर्षे या पध्दतीने गावकरी पाळीपाळीने बागांचे शिंपण करतात. ही माहिती व्हिडिओत द्यायला हवी होती.

  • @AishwaryaSapkal-ll1ez
    @AishwaryaSapkal-ll1ez Рік тому +1

    Tai tuze videos share ka hot nhit privacy aahe ki kahi prblm aahe 🤔

  • @deepakjadhav756

    गाडी नाही जात तिथं पर्यंत आणि नारळी पोफळीच्या बागेतून फिरण्याची मजा मिस कराल.

  • @swaps1186
    @swaps1186 Рік тому

    तुझा आवाज कमालीचा छान आहे मुक्ता ताई..खर कोणतंही ठिकाण तुझ्या निखळ निवेदनाने जास्त मनाला भिडते.. गो नि दांचे तू मेंशन केलेलं पुस्तक कुठे मिळेल.. अधून मधून पुस्तकांवर सुद्धा बोलत जा

  • @pawardeepak2

    उन्हाळ्यात या अप्रतिम स्थळास भेट देण्याची वेळ सकाळचीच योग्य आहे तसेच इथे पार्किंगचा मोठा प्रॉब्लेम आहे

  • @arunasoman6385
    @arunasoman6385 Рік тому +4

    दरवेळे प्रमाणे हा ही एपीसोड एकदम् मस्त ..तुझ्या सोबत हिंडा फिरायला मजा येते

  • @pradeepmorajkar3947
    @pradeepmorajkar3947 Рік тому

    'बाळफणस' हे अावडलं,तळ कोकणात त्याला कुवरी म्हणतात. बर्‍याच दिवसानी तूझा व्हीडिओ बघीतला. छान वाटला.

  • @sanketprabhu16
    @sanketprabhu16 Рік тому +4

    दापोलीतील केशवराज मंदिर म्हणजे जणू स्वर्गच.

  • @prakashthakur4839
    @prakashthakur4839 Рік тому +2

    मुक्ता दिदि सर्वच गोष्टी एक नंबर ☝️.मी तरी जसा वेळ मिळेल तसे तुझे वीडियोज़ पहातो. पण गंमत अशी आहे की माझ्या सोबत माझा मुलगा प्रज्वल त्याला ही तुझे वीडियोज़ फार आवडतात. तो जे काही मला सांगतो ते आज मी तुला सांगणार आहे. कधी कधी तो तुझे वीडियोज़ पहाण्याकरिता हट्ट करतो. मला म्हणतो की मुक्ता दिदिला निसर्गाचे किती वेड आहे ना पप्पा. ज्या ठिकाणी तुमचा हॉल्ट असतो त्या ठिकाणच्या तुमच्या जेवणाची चर्चा आमच्या दोघांत असते. माझा मुलगा मला म्हणतो की मुक्ता दिदि नेहमीच खात असते. माझ्या तोंडाला पाणी सुटते पप्पा. तो म्हणतो की आम्हाला घेऊन का जात नाही मुक्ता दिदि...प्रज्वलचे वय वर्ष 6 असून त्यालाही निसर्गात रमायला आवडते. तुझ्या भविष्याच्या वाटचालीकरिता खुप शुभेच्छा .....🙏

  • @swapnilvichare8886
    @swapnilvichare8886 Рік тому +9

    " लोभसवाणे बाळ फणस लगडलेले दिसले" ❤️

  • @vrushhule4128
    @vrushhule4128 Рік тому +2

    मुक्ता तुझ्या मुळे जास्त प्रचलित नसलेल्या पर्यटन स्थळांना भेट दिल्या चा अनुभव घेता येतो..तुला खूप धन्यवाद

  • @sanjaypatwardhan9291
    @sanjaypatwardhan9291 Рік тому +2

    खूप सुंदर व्हिडिओ. तुझं सादरीकरण नेहमीप्रमाणे छान आणि मोहक आहे. कशी काय तुम्ही एवढं अवघड ठिकाणी डोंगरातून, जंगलातून फिरता? हे पाहून कौतुक वाटतं, तुमची काळजी सुद्धा वाटते. तुम्‍ही सांभाळून रहा, योग्य गाईड वगैरे घेऊन फिरा.पण तुझ्या व्हिडिओ मुळे फिरण्याची जिज्ञासा निर्माण होते हे मात्र खरं आहे.तू खूप चांगलं काम करते आहेस, तुझं काम तुला खूप आवडतंय हे जाणवतं.तुझ्यासोबत फिरायला गेलो आहोत असं काहीतरी वाटतं. तू बोलताना रंगून जातेस आणि आम्हालाही रंगवून टाकतेस.काळजी घेऊन रहा.स्वस्थ रहा, सुरक्षित रहा. देवी अंबाबाई नेहमी तुझं,तुम्हा सगळ्यांच, रक्षण करो.

  • @vaibhavisupekar5260
    @vaibhavisupekar5260 Рік тому +8

    हे सगळ कसं स्वप्नातल चित्र रेखाटल्या सारखं वाटतयं गं ❤️❤️ म्हणून म्हणतात निसर्गाला पडलेलं स्वप्न म्हणजे कोकण😁

  • @user-ht4nw9gv8l
    @user-ht4nw9gv8l Рік тому +1

    मुक्ता तुझ्या बोलण्यात एक वेगळीच जादु आहे👌 सुंदर presentation😍🥰

  • @ddilip8321
    @ddilip8321 Рік тому +1

    अतिशय अभ्यासपूर्ण आणि नेमक्या शब्दांत वर्णन त्या सोबत समर्पक अशा पार्श्वसंगिताची जोड. नेहमीप्रमाणे व्हिडीयो आवडला. 😊

  • @deepakkamath7513
    @deepakkamath7513 Рік тому +4

    What a wonderful episode. The devotional feel of the temple and the green setting is surreal