Vasai Fort History : Maratha सैन्याने पोर्तुगीजांना नमवत जिंकलेल्या वसईच्या किल्ल्याची गोष्ट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2023
  • #BBCMarathi #History #maharashtra #shivajimaharaj #forts #vasaifort #किल्ल्यांचीगोष्ट
    सुमारे 450-500 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एक युरोपीय पद्धतीचं शहर होतं. तिथं अधिकारी-सैनिकांची घरं होती, चर्चेस होती, हॉस्पिटल, बाजारपेठ, न्यायालय, नगरपालिका, कॉलेजेस, विहीरी, बांधलेले रस्ते, हॉटेल्स, सांडपाण्याची व्यवस्था होती असं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला खरं वाटेल का?
    पण हे खरंच महाराष्ट्रात मुंबईच्या अगदी हाकेच्या अंतरावर एक शहर होतं. अनेक उंचच इमारती आणि वर्दळीनं भरलेलं हे शहर थेट वसईच्या किल्ल्यातच होतं.
    वसईचा किल्ला हा व्यापाराच्या नावाखाली पोर्तुगीजांनी भारतात किती बळकटपणे पाय रोवले होते आणि त्यांना तिथून उखडून टाकण्यासाठी मराठी सत्ता तितकीच कशी सामर्थ्यवान होती याचं उदाहरण म्हणावं लागेल. वसईचा किल्ला पोर्तुगीजांविरोधात चिमाजी अप्पांनी केलेल्या मोहिमेमुळे इतिहासात प्रसिद्ध झालाच त्याहून वसईची मोहीम, वसईची लढाई या नावाने त्याला विशेष स्थान मिळालं.
    पाहा बीबीसी मराठीची विशेष मालिका किल्ल्यांची गोष्ट
    रिपोर्ट - ओंकार करंबेळकर
    शूट-एडिट - शरद बढे
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 58

  • @p_presenting9285

    मी अनेकदा हा किल्ला पहिला आहे, इतका भव्यदिव्य किल्ला, आणि त्याचा पोर्तुगीज, मराठे, ब्रिटिश, कालखंडात झालेले बदल अभ्यासकांना इतिहास प्रेमींना, शिकण्यास एक पर्वणीच आहे,

  • @pradeeppatne362

    खुप छान माहिती आहे,मी इतिहासतज्ज्ञ श्रीदत्त राऊत यांच्या सोबत हा किल्ला फिरून खुपच छान माहिती मिळाली आहे.

  • @prassanapathak115

    सुरेख शब्दांकन आणि सखोल अभ्यास करून उत्तम मांडणी ओंकार करंबेळकर यांनी केली आहे,खूप खूप शुभेच्छा❤

  • @Gauravchavan57478

    खूप छान माहिती गड किल्ल्यांची माहिती अजून सांगत जा

  • @mahantsart

    Bahut mast❤

  • @latikamitesh

    Very well researched and brilliantly presented , detailed tour of Vasai Fort!

  • @kaptan_shahab

    जबरदस्त

  • @house-property-

    जय महाराष्ट्र.... जय चिमाजीअप्पा

  • @pascallopes822

    Nice information , good to see Vasai fort on BBC. Sree Datta has good information around it.

  • @santoshnaik7087

    छान विस्तृत माहिती दिली आहे, धन्यवाद श्रीदत्त राऊत

  • @siddharajravindrapatil8470

    Very nice information from BBC Marathi on forts , this series on Forts of Maharashtra Is very informative & worth watching

  • @sanaaarashaikh1986

    I m vasai kar. ...❤

  • @kshatriyasoul6866

    Vasai mh 48 🚩🙏🕉️ chimaji aapaa chi virangan sangnarya killyachi bhinti Aaj pn ubhya ahet...

  • @Aaa..ek1

    Chan upkram ahe ...

  • @pushkarstraveldiary

    350 kille ahet Maharashtra madhye. Tewdhe episode zale pahije

  • @aakashtandel9137

    अर्नाळा किल्ला या वर विडिओ बनवा

  • @harijayswal9720

    Puratatva vibhagatali mothh mothhe huddya var baslele pada-Adhikaryane vasai chya killyala bhett dewoon kamachi pahani karawi.. Aani durlaksha karnarya adhikarya var kaaryawahi karawi.. Hee vinanti

  • @Players2420

    सरकारला लाज वाटायला हवी महाराष्ट्रातील किल्ल्यांची अवस्था खुप बिकट झाली आहे रायगड, शिवनेरी, प्रतापगड, देवगिरी असो वा अन्य हे महत्त्वाचे किल्ल्याची खूप पडझड झाली आहे तिथे बाकीच्या किल्ल्याची काय कथा

  • @user-cd4xe7zv6z

    काही नाही आता तर कोणी केअर नाही केली आहे आपल्या किल्ल्याचे कालच जावून आलो आम्ही

  • @Players2420

    तुम्ही किल्ल्याच्या सध्यस्थिती बाबत माहिती देत चला. कुठून जायच मार्ग, पाहण्यासाठी काय आहे