90 वर्षांचा झालो तरी मीच महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणणार- पवार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • mymarathi.netफलटण-वय झाल्यामुळे आणि नव्या पिढीला नेतृत्वाची संधी मिळावी म्हणून शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून बाजूला व्हावे आणि आपल्याला संधी द्यावी असा प्रयत्न अजित पवारांनी केला होता. त्याला आधी होकार देऊन नंतर शरद पवार मागे फिरले होते. त्यानंतर ते सुप्रिया सुळेंकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाची सूत्रे देतील, अशी चर्चा होती. मात्र, आपण निवृत्ती घेणार नाहीच. पक्षाची सूत्रे दुसऱ्या कुणाकडेही देणार नसल्याचे संकेत ८४ वर्षीय शरद पवारांनीच सोमवारी दिले.अजित पवार पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर यांचे बंधू सातारा जिल्हाध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, त्यांचा मुलगा अनिकेत तसेच फलटण-कोरेगावचे आमदार दीपक चव्हाण यांनी फलटण येथील सोहळ्यात शरद पवार गटात प्रवेश केला. त्या वेळी शरद पवारांनी स्वत:ची पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केली. ते म्हणाले की, काही तरुण मुले हातात बोर्ड घेऊन उभी होती. त्यात माझा फोटो होता. त्यात लिहिले होते की, ८४ वर्षांचा म्हातारा. तुम्ही काही काळजी करू नका. आपल्याला लांब जायचंय.८४ वर्षांचा होवो की ९० वर्षांचा. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मला साठ वर्षात एक दिवस पण तुम्ही सुट्टी दिली नाही. चार वेळा तुम्ही मुख्यमंत्री केलं. महाराष्ट्राचा चेहरा बदलायची माझी नैतिक जबाबदारी आहे. रामराजेंचे नाव न घेता पवार म्हणाले की, इथे एक जण दिसत नाहीये. परंतु त्यांची मानसिकता काय आहे हे धैर्यशील यांच्या निवडणुकीत मला कळलं.
    लोकसभेला ३१ जागा गमावल्यावर लाडकी बहीण आठवली
    शरद पवार असेही म्हणाले की, बारामतीत सुनेत्रा पवारांच्या पराभवाचा थेट उल्लेख टाळत पवार म्हणाले की, लोकसभेला ३१ जागा गमावल्यावर लाडकी बहीण आठवली. बारामतीकर लय हुशार आहेत. बारामतीकरांनी बहिणीला पाठिंबा दिला. संजीवराजे निंबाळकर म्हणाले की, साम, दाम, दंड भेद सगळे वापरा असे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले आहे. मात्र, सातारा स्वाभिमानी आहे आणि दिल्लीवर राज्य करणारा जिल्हा आहे. महाराष्ट्र आणि देशाला पवारांशिवाय पर्याय नाही.

КОМЕНТАРІ •