श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल, जळगाव (महा.)/एक दिवसीय शैक्षणिक सहल/दि.१३-०१-२०२४/भाग -२

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • आमच्या श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती विद्यालयाची एक दिवसीय शैक्षणिक सहल शनिवार दिनांक १३ जानेवारी २०२४ रोजी भद्रा मारूती, वेरूळ, घृष्णेश्वर, छ. संभाजीनगर येथील सिध्दार्थ गार्डन आणि बिबी का मकबरा ही पौराणिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक ठिकाणे पाहून यशस्वीपणे संपन्न झाली. सहल प्रमुख श्री. पी. एम. पवार यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे आणि श्री. डी. जी. पाटील, सौ. सुनीता महाजन, श्री. ए. एल. बोरोले, श्री. सी. जे. वाघ या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने अतिशय उत्साहात पार पडली. इ. ५ वी ते १० चे एकूण ४३ विद्यार्थ्यांनी सहलीचा आनंद घेतला. मुख्याध्यापक श्री. पी. आर. जाधव यांनी नारळ फोडून बसचे पूजन केले. सकाळी ६:३० वाजता विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळून पालक आणि मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत आमच्या बसने प्रस्थान केले. दिवसभरात भद्रा मारुती, वेरूळ येथील कैलास मंदिर, घृष्णेश्वर मंदिर, वाटेत जाताना देवगिरी किल्ला, छ. संभाजीनगर येथील सिध्दार्थ गार्डन, बिबी का मकबरा या ठिकाणांना भेटी दिल्या.
    सदर भाग - २ व्हिडिओ मध्ये सिध्दार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालय बघताना टिपलेल्याविद्यार्थ्यांच्या भावमुद्रा, मिनी ट्रेन मध्ये बसण्याचा आनंद आणि बिबी का मकबरा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी परदेशी पर्यटकांशी साधलेला संवाद ही छायाचित्रे समाविष्ट आहेत.
    दुपारी वेरूळ लेणी परिसरात स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंद दिवसभर टिकून होता. शेवटी भेटी दिलेल्या ठिकाणांच्या माहितीवर आधारीत प्रश्नमंजुषा घेण्यात आली. बरोबर उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना लगेच शिक्षकांच्या हस्ते बक्षीसही देण्यात आले. रात्री परत येताना फर्दापूर येथे सर्वांनी शेवभाजी आणि तंदुरी चा आस्वाद घेतला. रात्री ११:३० वाजता आमची सहल सुखरूप विद्यालयाजवळ परतली.
    आमच्या विद्यालयाचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- निवृत्त सुभेदार सन्मान व्हिडिओ
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- पंचप्रण शपथ व्हिडिओ
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- मोफत शालेय साहित्य वाटप कार्यक्रम
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- वृक्ष दिंडी व्हिडिओ
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२३ व्हिडिओ
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- मेरी मिट्टी मेरा देश/ वृक्षारोपण कार्यक्रम दि.२२ ऑगस्ट २०२३
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- बेलरोप वाटप कार्यक्रम व्हिडिओ दि. २८ ऑगस्ट २०२३
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- शिक्षक दिन कार्यक्रम व्हिडिओ दि. ५ सप्टेंबर २०२३
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- चांद्रयान -३ प्रतिकृती तयार करणे व्हिडिओ
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... पाऊस कविता व्हिडिओ
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... हिन्दी सप्ताह समापन समारोह व्हिडिओ
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- हिवाळी क्रीडा स्पर्धा भाग:- १
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- हिवाळी क्रीडा स्पर्धा :- भाग २
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- सावित्रीबाई फुले जयंती
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- १४ जानेवारी भूगोल दिन व्हिडिओ
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- एक दिवसीय शैक्षणिक सहल १३-०१-२०२४

КОМЕНТАРІ •