श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल, जळगाव/ "कॅरीबॅग निर्मूलन अभियान" भाग :- ३/दि. २६-०८-२०२४

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • आमच्या श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल, महाबळ कॉलनी, जळगाव येथील राष्ट्रीय हरित सेनेतर्फे श्रावण सोमवार निमित्त ओंकारेश्वर मंदिराजवळ येणाऱ्या भाविकांना इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी १५० बेल रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच "कॅरीबॅग निर्मुलन अभियानांतर्गत" २००० कागदी पाकीटे बेल-फुल विक्रेत्यांना वाटप करण्यात आले.
    दि. ७ ते ११ ऑगस्ट दरम्यान इ. ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्राच्या कागदापासून प्रत्येकी ४० याप्रमाणे एकूण ५००० पाकिटे तयार केली. त्यापैकी दि. १२ ऑगस्ट २०२४ सोमवार रोजी इको क्लबच्या विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक श्री. पी. आर. जाधव, श्री. पी. एम. पवार, इको क्लब शिक्षिका सौ. सुनीता महाजन, सौ. चारूशिला सोनार यांनी ओंकारेश्वर मंदिर परिसरात बेल-फुल विक्रेत्यांना कागदी पाकिटांचे वाटप केले. त्यावेळी प्लॅस्टिक कॅरीबॅग न देता कागदी पाकिटांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच येणाऱ्या भाविकांना बेल रोपांचे वाटप करून ते रोप योग्य जागी लावून त्याचे संगोपन करण्याबद्दल विद्यार्थी माहिती देत होते. या कार्यक्रमासाठी श्री. टी. एस. माळी, श्री . एन. एम. चौधरी, श्री. डी. जी. पाटील, श्री. के. एच. पाटील, श्री. ए. एल. बोरोले यांनी सहकार्य केले तर श्री. आनंद महांगडे, श्री. चंद्रकांत वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले. (व्हिडीओ भाग :- १ व २ जरूर बघा. लिंक खाली दिली आहे.)
    त्याचप्रमाणे दि. २६-०८-२०२४ रोजी म्हणजेच चौथ्या सोमवारीही आमच्या इको क्लब तर्फे कॅरी बॅग निर्मूलन अभियान राबविण्यात आले. महाबळ परिसरातील तसेच ओंकारेश्वर मंदिराजवळील बेल विक्रेत्यांना जवळपास २२०० कागदी पिशव्या वाटप करण्यात आल्या. तसेच मंदिरात येणाऱ्या आणि स्वेच्छेने घेणाऱ्या भाविकांना ७० पेक्षा जास्त बेल रोपांचे वाटप शिक्षक, विद्यार्थी आणि सहकाऱ्यांनी केले.
    यावेळी इको क्लब शिक्षिका सौ. सुनीता महाजन, सौ. मोहिनी भंगाळे, श्री. आनंद महांगडे, श्री. चंद्रकांत वाघ उपस्थित होते.
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- निवृत्त सुभेदार सन्मान व्हिडिओ
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- पंचप्रण शपथ व्हिडिओ
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- मोफत शालेय साहित्य वाटप कार्यक्रम
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- वृक्ष दिंडी व्हिडिओ
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२३ व्हिडिओ
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- मेरी मिट्टी मेरा देश/ वृक्षारोपण कार्यक्रम दि.२२ ऑगस्ट २०२३
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- बेलरोप वाटप कार्यक्रम व्हिडिओ दि. २८ ऑगस्ट २०२३
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- शिक्षक दिन कार्यक्रम व्हिडिओ दि. ५ सप्टेंबर २०२३
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- चांद्रयान -३ प्रतिकृती तयार करणे व्हिडिओ
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... पाऊस कविता व्हिडिओ
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... हिन्दी सप्ताह समापन समारोह व्हिडिओ
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- हिवाळी क्रीडा स्पर्धा भाग:- १
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- हिवाळी क्रीडा स्पर्धा :- भाग २
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- सावित्रीबाई फुले जयंती
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- १४ जानेवारी भूगोल दिन व्हिडिओ
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- एक दिवसीय शैक्षणिक सहल १३-०१-२०२४ (भाग -१)
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... एक दिवसीय शैक्षणिक सहल १३-०१-२०२४ (भाग -२)
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ २०२३-२४
    • श्रीमती जानकीबाई आनंदर...
    सेवानिवृत्ती निरोप समारंभ : - मे २०२४
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... आंतरराष्ट्रीय योग दिवस, भाग - १
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... आंतरराष्ट्रीय योग दिवस भाग : - २
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... गुरूपौर्णिमा दि. २० जुलै २०२४
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... शिक्षण सप्ताह (भाग - १)
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... शिक्षण सप्ताह (भाग - २)
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... शिक्षण सप्ताह ( भाग - ३ )
    • श्रीमती जानकीबाई आनंदर...
    गुरूपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम, छात्र अभिनंदन गुरू वंदन
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... वृक्ष दिंडी व्हिडिओ.
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... "कॅरीबॅग निर्मूलन अभियान" भाग - १

КОМЕНТАРІ •