शिवसेना नाव आणि धनुष्य बाण मिळाल्यावर, एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना काय म्हटले ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лют 2023
  • लोकशाहीचा आणि भारतीय घटनेचा हा विजय आहे. हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना निसटली आहे. आता शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आलं आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढची वाटचाल करू असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
    आणखी काय म्हणाले आहेत एकनाथ शिंदे?
    आमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता. तसंच त्यांनी योग्य निर्णय घेतला आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्ही बंड केलं होतं त्यानंतर कायदेशीर लढाईही लढली. आम्ही निवडणूक आयोगाकडे सगळी कागदपत्रं सादर केली होती. त्यानंतर हा निर्णय आला आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
    निवडणूक आयोगाचा निर्णय काय?
    निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव दिलं आहे. काही वेळापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. सत्तेतून बाहेर पडल्यानंतर आजच्या दिवसांपर्यंत शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट असा सामना बघण्यास मिळाला. त्यानंतर आता हा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे.
    शंभूराज देसाई यांनी काय म्हटलं आहे?
    आम्ही जी कागदपत्रं सादर केली होती त्यानंतर धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव आम्हाला मिळालं आहे. आम्ही नियमबाह्य काहीही केलेलं नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने आम्हाला न्याय्य निर्णय दिला आहे. आज सत्याचा विजय झाला आहे. या निकालाने आम्हाला न्याय मिळाला आहे असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.
    उदय सामंत यांनी काय म्हटलं आहे?
    वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची जी इच्छा होती ती आज पूर्ण झाली आहे. धनुष्यबाण आणि शिवसेना ही आमच्याकडे आली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा आज विजय झाला असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
    ताज्या घडामोडी, बातम्या आणि नवीन अपडेट्स साठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या -
    ऍप डाउनलोड करा
    Download App : instoriesplus.com/getapp?youtube
    Prime Marathi : primemarathi.in
    Facebook : / primenewsmarathi
    Twitter : / primenews_mh
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

КОМЕНТАРІ • 6

  • @sangitasalunkhe7114
    @sangitasalunkhe7114 Рік тому +1

    1नाथ शिंदे साहेब hands of you

  • @babaraogote7587
    @babaraogote7587 Рік тому

    Janata never accept this judgement is the reality

  • @yogeshshinde6666
    @yogeshshinde6666 Рік тому

    उद्धव जी ठाकरे साहेब
    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dupargudesuraj7355
    @dupargudesuraj7355 Рік тому

    लढाई " ला यश नाही..... तूम्ही निवडणूक आयोगाला पण खोके.... दिले आहे !

  • @kunalbalkrishnashelke3216
    @kunalbalkrishnashelke3216 Рік тому

    जोकर भाजपचा