सोनं वाटून टाकणारे संत | Kanakdas | Karnataka |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • संत कनकदास चौक
    महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकालाही मोठी संत परंपरा आहे. विशेष म्हणजे या संत परंपरेचं मऱ्हाटी मुलुखाशी अतूट नातं आहे. कन्नड संत पुरंदरदास आणि संत कनकदास ही त्याची प्रमुख उदाहरणं.
    पंढरीचा श्री विठ्ठल या दोघाही संतांचं दैवत. महाराष्ट्रातील संतांनी दिलेला प्रेम, बंधुभाव, समता, एकोप्याचा संदेश त्यांनीही आपल्या रचनांमधून दिला.
    हंपीच्या अलिकडील होसपेट गावात संत कनकदासांच्या नावाचा प्रशस्त चौक लागला. चौकातील सुंदर मेघडंबरीत वीणा-चिपळ्या घेऊन भजन कनकदासांचा सुबक पुतळा उभा आहे.
    संत चोखमेळा यांच्याप्रमाणेच अत्यंत भावगर्भ रचना संत कनकदासांनी केल्या आहेत. त्यांच्याविषयी त्यांच्याच पुतळ्यासमोर सोबत असणाऱ्या ह. भ. प. पुंडलिक हलपनवार यांनी माहिती दिली.
    सोबत सविस्तर व्हिडिओची लिंक दिली आहेच.
    ||ज्ञानबातुकाराम|| वार्षिकाच्या वतीनं यंदा आम्ही संत एकनाथ महाराज विशेषांक प्रसिद्ध करत आहोत. त्या अनुषंगाने नाथमहाराजांच्या, भानुदास महाराजांच्या आणि वारकरी संप्रदायाच्या कर्नाटकातील पाऊलखुणा आम्ही शोधत आहोत. त्यातीलच हा चौथा व्हिडिओ.
    व्हिडिओ : नरेंद्र साठे
    #ज्ञानबातुकाराम #dnyanobamauli #कर्नाटका #vitthalmandir

КОМЕНТАРІ • 1

  • @laxmikakatikar6593
    @laxmikakatikar6593 Місяць тому

    छान श्री रंग दादा तुमचा उपक्रम🎉🎉