Це відео не доступне.
Перепрошуємо.

Pataleshwar Caves| Pune : ऐतिहासिक पुणे | Part - 1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 вер 2021
  • पाताळेश्वर हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातल्या शिवाजीनगर भागात वसलेले एक शिवालय आहे. हे शिवालय राष्ट्रकूट राजवटीच्या काळात इ.स.च्या ८ व्या शतकाच्या सुमारास लेण्याच्या स्वरूपात खोदून घडवले आहे. राष्ट्रकूटांच्या काळात पुणे हे पुण्यविषय किंवा पूनकविषय (विषय म्हणजे जिल्हा) म्हणून प्रसिद्ध होते. राष्ट्रकूट राजा कृष्ण (पहिला) याच्या कारकीर्दीत दिलेल्या ताम्रपटात ही नावे आढळतात.
    पाताळेश्वर हे लेणे जमिनीव्या खाली जमीन खोदून बांधण्यात आले आहे. पाताळेश्वर आणि वेरूळमधील राष्ट्रकूट कालखंडातील लेणी यांत साम्य आढळते. त्या एकाच परंपरेतील ही लेणी असावीत. पाताळश्वर लेण्याला मोठे प रांगण आहे. प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदीमंडप आहे. या नंदीमंडपाचे छत प्रचंड मोठे, जाड व वर्तुळाकार कातळाचे आहे. हा कातळ स्तंभांनी पेलला आहे. त्याच्याआत आणखी एक वर्तुळ आहे, त्यावर नंतरच्या काळात ठेवण्यात आलेला एक नंदी आहे.
    लेण्यात प्रवेश केल्यावर चौकोनी स्तंभांच्या रांगा आहेत. समोर तीन गर्भगृहे आहेत. मधल्या गर्भगृहात शिवलिंग आहे. त्याच्या द्‌वारशाखांवर, म्हणजे गर्भगृहाच्या दरवाज्याजवळ नक्षी कोरली आहे. येथे प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहामागील भाग हा पुढील भागापेक्षा लहान आहे. मागच्या भिंतीला लागून काही भागांत कट्ट्याचे काम पूर्ण झालेले आढळते. एका भागातील काम अर्धवट आहे.तेव्हा लेणी खशी खोदत असतील, पुढे कसे जात असतील ते लक्षात येते.
    गर्भगृहाव्या डाव्या आणि उजव्या हाताच्या भिंतींवर जी शिल्पे दिसतात ती पूर्णपणे खराब झाली आहेत, किंवा त्यांचे काम अपुरे राहिले आहे. त्या शिल्पांतील एक लिंगोद्भव शिवाचे आणि एक त्रिपुरासुर वधाचे आहे. लेण्याच्या बाहेरील भिंतीवर एक झिजल्यामुळे न वाचता येणारा शिलालेख आहे.
    पेशवे काळात या मंदिराची नोंद आहे आणि मंदिराला दषिणा दिल्याचे उल्लेख आहेत.
    #Pune #HistoricalPune #Pataleshwar

КОМЕНТАРІ • 26

  • @mpan825
    @mpan825 2 роки тому

    Khup chhan.... Sundar mahiti dili... 🙏🙏👍👍

  • @gajananchopade2337
    @gajananchopade2337 2 роки тому

    खुप सुंदर वि शलेष न जय शि वराय

  • @DCKatreSonuKatreVlogs
    @DCKatreSonuKatreVlogs 2 роки тому

    Jabardast Bhau..... अप्रतिम

  • @ashwinhawal3399
    @ashwinhawal3399 2 роки тому

    Very nice information 👌💐👍

  • @samarthkatkar4087
    @samarthkatkar4087 2 роки тому

    Very Nice👌👌

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 2 роки тому

    खुप छान आणि ऐतिहासिक पुण्याची ओळख करून देणारा विडिओ. खुप खुप धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @user-gp7wm3rv2j
      @user-gp7wm3rv2j  2 роки тому

      धन्यवाद, अजून खूप काही आहे, आता येणाऱ्या व्हिडिओज मध्ये पाहायला मिळेल

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 2 роки тому

      @@user-gp7wm3rv2j ok

  • @milinddesai1851
    @milinddesai1851 2 роки тому

    Masta

  • @pratiktravelvlogs7282
    @pratiktravelvlogs7282 2 роки тому

    इतिहास सोपा करून सांगण तुमच्या कडून शिकावं 🙌.. अप्रतिम Video

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 2 роки тому

    किशोर दादा काय गंमत पहा माझे गाव असूनही मी अजून या लेणीला भेट देऊ शकलो नाही असे बरेच वाडे, मंदिर आहेत ज्यांना भेट द्याची मस्त विडिओ दादा

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 2 роки тому

    Sundar padhatine maahiti dili aahet. Dhanywaad.

  • @Hrishikeshjadhav1356
    @Hrishikeshjadhav1356 2 роки тому

    पाताळेश्वर लेणी,जंगली महाराज रोड छत्रपती शिवाजीनगर पुणे

  • @vinodsatpute2673
    @vinodsatpute2673 2 роки тому

    खुप सुंदर माहीती 👌👌👌
    धन्यवाद पुण्यामध्ये आल्या बद्दल

  • @vilassurve8481
    @vilassurve8481 2 роки тому

    अप्रतिम माहिती तुम्ही दिली त्याबद्दल खूप खुप आभारी आहे🙏🙏🙏

  • @mydriftwoodart
    @mydriftwoodart 2 роки тому

    Khupch sundar 👌👌👌👌👌👌

  • @S-----S
    @S-----S 2 роки тому

    🚩Jai Shivray🚩
    Khup sundar kam karta
    1st like 1st comment

  • @mvivek3930
    @mvivek3930 2 роки тому +2

    Parvati la pn ashi ek small cave ahe

  • @somnathahiwale9897
    @somnathahiwale9897 2 роки тому

    Khupach Channnnn

  • @ajitgaikwad7470
    @ajitgaikwad7470 2 роки тому

    अति सुंदर

  • @sunilkoshti28
    @sunilkoshti28 2 роки тому +1

    Jai shivray

  • @sumanmalusare5914
    @sumanmalusare5914 2 роки тому

    Very nice caves