भोरचा राजवाडा, Vlog 05

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • भोर संस्थान महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक संस्थान होते. भोर संस्थान डेक्कन स्टेट्स एजन्सीच्या संस्थानांपैकी एक संस्थान होते. संस्थानच्या राजधानीचें भोर हे शहर पुण्याच्या दक्षिणेस सुमारें ३० मैलांवर नीरा नदीच्या तीरीं वसलेलें असून सभोंवार सह्याद्रीचे फांटे आहेत ह्या गांवावरून महाड-पंढरपूर रस्ता वरंच्या घाटानें गेलेला आहे.
    संस्थानचे मूळ संपादक शंकराजी नारायण गांडेकर हे देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण असून त्यांचें मूळचें गांव गांडापूर (निजाम इलाखा) हें होतें. शंकराजी याचा आजा मुकुंदपंत हा गांडापूर सोडून रोजगाराकरितां पुण्याच्या नैर्ॠत्येस आठ कोसांवर मांगदरी गांवीं येऊन राहिला. हें गांव हल्लीं राजगड तालुक्यांत आहे. त्याचा पुत्र नारोपंत. हा थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यांत कारकून होता. शंकराजी हा प्रथम पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्याजवळ नोकरीस राहिला. त्याचवर पेशव्यांची चांगलीं मर्जी बसली. छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळीं रामचंद्र निळकंठ अमात्य याच्या हाताखालीं शंकराजी हा कारकुनीचें काम करीत होता. त्यावेळीं शंकराजीची कामांतील हुषारी व शौर्य आत्याच्या दृष्टोत्पत्तीस आलें. डोंगरांतील चोरवाटा पाहून ठेवण्याचा, व मावळे लोकांत मिसळण्याचा शंकराजीस नाद असे. यामुळें अमात्यानें शंकराजीस (१६८६ त) फौजी कामांत घेतलें. छत्रपती राजाराम महाराज जिंजीस गेले, तेव्हां महाराष्ट्रांत एकटा रामचंद्रपंत अमात्य होता. स्वराज्यरक्षणची सर्व जबाबदारी रामचंद्रपंतावर हाती. अमात्याच्या जवळ शंकराजी व परशुराम त्र्यंबक हे दोन साहसी पुरूष होते. शंकराजीनें राजगड किल्ला मोंगलापासून सोडविला व अनेक विश्वासाचीं कामें उत्तम रीतीनें पार पाडलीं. त्यामुळें छत्रपती राजारामानें शंकराजीस मदारूनमहाम (विश्वासनिधि = कारभारी) हा किताब दिला. पुढें (१६९८) छत्रपती राजाराम परत आल्यावर शंकराजीनें स्वराज्यरक्षणार्थ बजाविलेली कामगिरी लक्षांत घेऊन राजाराम महाराजांनी त्याला रिकामें असलेलें सचीवपद दिलें. महाराणी ताराबाईच्या कारकीर्दींत मोंगली व मराठी फौज याचें महाराष्ट्रांत सारखें रण माजलें होतें. त्यावेळीं शंकराजीनें पुष्कळ शौर्याचीं कामें केलीं. त्यानें मावळांत कांहीं वतनें जोरावारीनें मिळविलीं व आपलें संस्थान वाढविलें. पुढें छत्रपती थोरले शाहु महाराज दक्षिणेंत येण्यास निघाले तेव्हां महाराणी ताराबाईनें सर्व प्रधानमंडळीस व सरदारास बोलावून कळविलें कीं, हा शाहु खरा नसून तोतया आहे, तरी सर्वांनीं त्यास न मिळण्याबद्दल शपथ घ्यावी. तेव्हां सर्वांबरोबर शंकराजीनें शपथ घेतली. पुढें ताराबाईचा पराभव करून शाहू साता-यास आले व त्यांनी सर्व सरदारांनां भेटीस बोलाविलें तेव्हां अडचण आली; तींतून निसटण्यास शंकराजीनें भोरानजीक अंबवडें येथें जाऊन चतुर्थाश्रम घेतला; थोड्याच दिवसांत विष खाऊन तो वारला (१७०७ नोव्हेंबर).

КОМЕНТАРІ • 37

  • @sameerkamble3628
    @sameerkamble3628 Рік тому +3

    आजच जाण्याचा योग आला या वास्तू मध्ये. .. मी कोणत्याहि ऐतिहासिक ठिकाणी गेलो ना कि इमॅजिन करतो त्या काळ चा टाइम ... त्या काळी कसे असेल. .. इतका भव्य वाडा आहे खरंच कसा बनवला असेल हाच विचार पडतो.

  • @vishwanathiyer6654
    @vishwanathiyer6654 2 роки тому +1

    राजवाडा व्यवस्थित ठेवलेली आहे ।सुंदर ।

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 роки тому +2

    भोर संस्थान बद्दल चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद..

  • @niranjangaandekar7683
    @niranjangaandekar7683 8 днів тому

    Thanks

  • @dhananjoshi
    @dhananjoshi 2 роки тому +1

    छान आहे वाड्याची कंडिशन

  • @nandkumarture4890
    @nandkumarture4890 2 роки тому +1

    How a grear vdo.first time in my life u have seen bhor city and vada of sardar.please arrange trip fir this vada

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 роки тому +1

    Apratim. Khoop. Sundar.❤

  • @ushakher9241
    @ushakher9241 2 роки тому +3

    लई भारी.

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 2 роки тому +1

    फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
    भाऊ संगीतातच वेळ वाया गेला. वाडा पुर्ण
    दाखवायला पाहिजे होता.या पुढे तरी
    संगीतात वेळ वाया घालवण्यापेक्षा माहीती
    देत चला.

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 2 роки тому +1

    सुंदर माहिती आहे . Nice

  • @amrishgujarathi5421
    @amrishgujarathi5421 2 роки тому +1

    Khup chan

  • @sagarchavan905
    @sagarchavan905 Рік тому

    नीरा माता मंदिर आहे ते

  • @shivajishinde-y5f
    @shivajishinde-y5f 2 місяці тому +1

    अम्ही भोर च आमाला २

  • @SantoshKolhatkar-d2f
    @SantoshKolhatkar-d2f 4 місяці тому +1

    Ateishayachaglavid

  • @jaysingshikare2995
    @jaysingshikare2995 Рік тому

    गुलाम शाही तुमचा तुमरा लकलाभ😊

  • @laxmanwankhade77
    @laxmanwankhade77 2 роки тому +1

    1no.dada

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 2 роки тому +1

    माहिती व्यवस्थित दिलेली नाही. बराचसा वेळ संगीत वाढविण्यात गेला.

  • @chandrashekharbhilare9415
    @chandrashekharbhilare9415 2 роки тому +1

    Very nice .

  • @surajsingmarmat2932
    @surajsingmarmat2932 2 роки тому +1

    Farch chhan

  • @truptidhonde9590
    @truptidhonde9590 2 роки тому +1

    Khup sunder

  • @manojdalvi7417
    @manojdalvi7417 2 роки тому +1

    खूप छान 👌👌👌👍👍👍

  • @v.k.4119
    @v.k.4119 2 роки тому +1

    Aasha kale yanchya ardhangi ya chitrapatache shooting ithe zale hote.

    • @pravasvaibhav3551
      @pravasvaibhav3551  2 роки тому

      हो, बऱ्याच चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग इथे झाले आहे.

  • @prashantmule9952
    @prashantmule9952 2 роки тому +1

    Good job

  • @oldagecourage713
    @oldagecourage713 2 роки тому +1

    👌👍

  • @prasadjojo9985
    @prasadjojo9985 2 роки тому +1

    लाय भारी 👌👌

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 2 роки тому +1

    Thks

  • @meghabagade2540
    @meghabagade2540 2 роки тому +1

    Raja raghunathrao vidyalaya dakhavale nahi. Wada aatun chhan ahe yat kuthehi dakhavala nahi. Wadyachi magachi baju?

    • @pravasvaibhav3551
      @pravasvaibhav3551  2 роки тому +1

      मी गेलो तेव्हा वाडा बंद होता, पुढच्या वेळी परवानगी घेऊन संपूर्ण वाडा दाखवणार आहे

    • @amoldeshpande2865
      @amoldeshpande2865 Рік тому

      ​@@pravasvaibhav3551वाडा बघण्यासाठी परवानगी घ्यावी लागते का .. परवानगी घेण्याची प्रक्रिया काय आहे❓

  • @Trekabreak
    @Trekabreak 2 роки тому +1

    खूप छान सादरीकरण 💓

  • @kiranbharati7774
    @kiranbharati7774 2 роки тому +1

    Chalu ahe ka vada baghyla

  • @tarachandmohankar8646
    @tarachandmohankar8646 2 роки тому +1

    Good 👍.