Mangaon Talukyache Ladke Dada | Arundada Powar | Uday Chavan | Sunil Rajbhar | Mangaon

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • 🌺 गीतकार / संगीतकार :-
    उदय चव्हाण.
    🌺 व्हिडीओ एडीटर :--
    सुनील राजभर.
    🌺 गायक / रेकॉर्डीस्ट
    संदिप पालेकर.
    ( स्वराधीश रेकॉर्डींग स्टुडिओ, डोंबिवली )
    🌺🙏 अरुण तुकाराम पवार :-- 🙏
    म्हणजे माणगाव तालुक्याचे सर्वांचे लाडके अरुण दादा . एक दिलदार व्यक्तिमत्व. अजातशत्रू . खरोखर मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस. ...
    त्यांचा पूर्व इतिहास असा हा आहे...
    त्यांची विद्यार्थीदशा अत्यंत गरिबीतून गेली. पण मेहनत , जिद्द आणि उंच स्वप्न या बळावर त्यांनी 1981 साली दहावी आणि 1983 साली वाणिज्य शाखेतून बारावी केली.
    पुढे 1985 मध्ये पनवेल येथून I.T.I केले. नंतर एका टायपिंग शिक्षकाची नोकरी अवघ्या 300/- रूपये पगार पत्करून , तेथून पुढील टायपिंगच्या परिक्षाही त्यामाध्यमातून उत्तीर्ण केल्या.
    त्यानंतर मुरूड येथे 6 महिने खारबंदिस्त विभागात नोकरी केली.
    १६-०९-१९८७ . हो 16/ 9/ 1987 मध्ये माणगाव येथे इंग्लिश स्कूल आणि माणगाव ज्यूनिअर कॉलेज मध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून रुजू झाले. सकाळी आठ ते रात्री 8:00 वाजेपर्यंत म्हणजे बारा तास दादा काम करू लागले.
    यामध्ये , झाडू मारणे, बेल मारणे, नोटीस फिरवणे, ऑफ तासाला जाणे, विविध स्पर्धा, खोखो, कबड्डी स्पर्धा व प्रशिक्षण देणे, सर्व शाळा व कॉलेज प्रश्नपत्रिका टायपिंग व छपाई करणे, विज्ञान प्रयोग करून दाखविणे,इतकेच काय तर लातूर पॅटर्न राबविणे, विद्यार्थी व पालक यांच्या घरी जाऊन भेटी देणे , ईत्यादी....! शिवाय इतर कार्यालयीन कामेसुद्धा... यात कोणताही कमीपणा न जाणवता आवडीने आणि हिरिरीने दादाने आपले कार्य कोणाला न दुखावता आनंदाने पार पाडले.
    अकरावी विज्ञान आणि कला शाखा प्रस्ताव,
    १३ वी कला शाखा प्रस्ताव,
    कृषी विद्यापीठ प्रस्ताव,
    १२ वी परीक्षा केंद्र व सीईटी परीक्षा केंद्र यासाठी केलेल्या प्रस्तावांना आणि त्या प्रयत्नांना ते यश मिळाल्यानंतर ,दादांच्या चेहऱ्यावर त्यावेळेस एक विलक्षण समाधान आणि आनंद आम्ही पाहीला.
    संप काळात सुद्धा दादांनी ११ वी व १२ वी ची practical घेऊन विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान टाळण्यास मदत केली.
    संस्थेच्या विविध शाखांना दादांनी भरघोस आर्थिक मदत केली.
    लोकनेते अशोकदादा साबळे पतसंस्थेच्या वतीने स्वतः एक लाख रुपये देणगी दिली. शिवाय
    शिपुरकर आणि वाघरे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सुसज्ज प्रयोगशाळेसाठी दादांकडून आर्थिक मदत झाली
    अशोकदादा साबळे विद्यालय आणि माणगाव ज्यूनिअर कॉलेज प्रयोगशाळा ही दादांनी स्वतः ५० हजार रुपये खर्च करून अद्यावत केली.
    2015 साली ग्रामपंचायत सदस्य पाणिपुरवठा चेअरमन म्हणून दादांनी उत्तम कार्य केले.
    पत्रकारितेत त्यानी निःपक्ष पणे कार्य केले. जनतेच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी लेखणीचा खऱ्या अर्थाने हत्यार म्हणूनच उपयोग करून निर्ढावलेल्या लोकप्रतिनिधींना व सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांना दादांनी जागे करून कामाला लावले.
    2012 ला दादांना रायगड जिल्हा परिषदेचा मानाचा रायगड भूषण पुरस्कार प्राप्त झाला.
    अनेक राष्ट्रीय व राज्य असे सुमारे 50 पुरस्कार त्यांना प्राप्त झाले.
    दादांच्या या अजोड कार्याला आमचा मनाचा मुजरा !!
    सेवानिवृत्ती नंतर सुद्धा दादा या कार्यापासून दूर जाणार नाहीत ही आम्हा शुभचिंतकाना ज्ञात आहेच ! त्यांचे पुढील आयुष्य त्यांच्या परिवारासोबत , मित्रमंडळीत समवेत सुखाचे , आनंदाचे उत्तम आरोग्याचे व्यतीत व्हावे , ही ईश्वरचरणी प्रार्थना ! 🙏🙏
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~

КОМЕНТАРІ •