कन्नड विधानसभेत कोण होणार आमदार? Sanjana Jadhav vs udaysing Rajput vs harshvardhan Jadhav fight होईल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • कन्नड विधानसभेत कोण होणार आमदार? Sanjana Jadhav vs udaysing Rajput vs harshvardhan Jadhav fight होईल
    कन्नड विधानसभा मतदारसंघात नेमके काय होईल याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
    एकेकाळी हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे नेहमी चर्चेत राहीलेला विधानसभेचा बहुचर्चित मतदारसंघ म्हणजे कन्नड-सोयगांव विधानसभा मतदारसंघ
    आपल्या बिंदास अन निर्भीड स्टाईलने कामगिरी करणारे मा आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या यावेळच्या विधानसभा विजयावर प्रश्नचिन्ह घोंगावतेय कारण मागील म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणूकीत जाधव यांना पराभूत करत ठाकरेंचा भगवा उदयसिंग राजपूत यांनी फडकविला आणि ते आमदार बनले.यावेळी केतन काजेंसारखे महत्वपुर्ण मानले जाणारे शिलेदारही रणांगनात शड्डू ठोकून होते.याचा फायदा राजपूत यांनाही झाला.
    कोरोना संपताच एक नविन लाट चर्चेत आली तीला कुणी गद्दारीची लाट म्हटल तर कुणी बंड केल्याचे म्हटले पण खरच ही लाट ठाकरेंना खुप महागात पडली.राज्याच्या राजकारणाचा समतोल बिघडला आणि खोक्यांची घोषणाबाजीपासून पक्षावरील हक्कापर्यंत पोहचली. यातच छ संभाजीनगर जिल्ह्यातील आमदारांनी शिंदेसोबत जाणे पसंत केले पण एक आमदार माञ ठाकरेंसोबत राहीले ते म्हणजे कन्नड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत..
    माञ राज्यात विधानसभेच्या बिगुलाची घोषणा कधीही होऊ शकते ,म्हणून प्रत्येकजण गुडघ्याला बाशिंग लावून मतदारसंघात फिरताना दिसत आहेत.
    माञ यावेळीच्या विधानसभा रणसंग्रामात सर्वात पुढिल लढतीत कोण कशी तयारी करून चर्चेत आहेत यावर नजर टाकूया थोडक्यात.
    नमस्कार मी प्रविण पाटील बिंदासच्या निर्भीड व्यासपीठावर ,बिंदास दर्षकांच मनपुर्वक स्वागत !
    तत्पुर्वी जर चैनलवर तुम्ही नविन असाल तर तुमच्या आवडत्या बिंदासला सबस्क्राइब करायला विसरू नका. कारण. तुमच्या मतदारसंघातील महत्वपुर्ण अपडेट येथेच पहायला मिळतील.
    सध्या बहूचर्चित असलेल्या तीन चेहऱ्यांबद्दल जाणून घेऊयात
    सर्वप्रथम टॉप च्या चर्चेत आहेत
    संजना जाधव
    राजकीय अनुभव याशिवाय सासर माहेर राजकारणाशीच निगडीत असल्याने संजना जाधव यांची मतदारसंघात चांगलीच चर्चा आहे. अगदिच लहानातील लहान आणि मोठ्यातील मोठ्या कार्यक्रमांना संजना जाधव हजेरी लावत असतात. याशिवाय मतदारसंघातील असंख्य मतदार असलेल्या असंख्य गावात त्यांचे कार्यकर्ते हे विवीध स्थानिक संस्था म्हणजेच सोसायटी ,ग्रामपंचायत काबीज करून आहेत.यांमुळे त्यांना विधानसभेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. परंतु सर्वात मोठी ताकद ही पक्ष आणि पदाधिकाऱ्यांची,कार्यकर्त्यांची ताकदही महत्वाची असते.
    अशा स्थितीत ही जागा शिंदे गटाला किंवा भाजपला सुटू शकते त्यामुळे वेळेवर या दोन्हिपैंकी कुठल्याही एका पक्षाचे तिकीट त्यांना दिले जाऊ शकते याची दाट शक्यता आहे. कारण त्यांचे वडील रावसाहेब दानवे हे तगडे राजकारणी असून गल्लि चे दिल्ली त्यांची भाजपमध्ये चांगली चलती आहे. यामुळे ते पक्षाकडे लेकीसाठी शिफारस करून तिकीट मागू शकतात .. एक शक्यता ,दुसरी शक्यता म्हणजे भाजपकडून जरीही ऊन्नीस बीस झालं तरी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून त्यांना तिकीट दिले जाऊ शकते यात शंकाच नाही.माञ हर्षवर्धन जाधव जर रिंगणात उतरले तर पुन्हा एकदा विजय त्यांच्या हातातून निसटू शकतो याची शक्यता नाकारता येत नाही.
    ऐन रणसंग्राम सुरू होण्याआधीच संजना जाधव ह्या कमळ हाती घेऊ शकतात किंवा धनुष्याला दोरी लावून प्रतिस्पर्ध्यांवर नेम धरू शकतात त्यांचा निशाणा नेमका कसा आणि कुणाला घायाळ करतो की नेम चुकतो हे पाहणे औत्युक्याच ठरेल.
    दोन नंबर चर्चेत आहेत
    ठाकरेसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत
    बाकीच्यांनी गद्दारी केली पण मी निष्ठावान म्हणूनच राहील अशी न्यायनिती राजपूत बाळगून आहेत.त्यामुळे राजपूत यांच्या बद्दल लोक सहानुभूती बाळगून आहेत खरे पण ही जागा लढविताना शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी, कॉंग्रेस त्यांना कशी साथ देते हे पाहणेही औत्सुक्याचे ठऱणार आहे.
    केवळ सहानुभूती वर निवडणूक जिंकली जाऊ शकत नाही यासाठी कार्यकर्त्यांचे प्रश्न सोबतच मतदारसंघात झालेली विकासकामे यांवर सुद्धा बरचं काही अवलंबून आहे.
    ठाकरे मुख्यमंञी असताना मिळाला तोच निधी राजपूत यांच्या पथ्यावर पडला माञ तदनंतर पुढे सत्ता शिंदे फडणविसांच्या हातात गेल्याने राजपूत यांना फारसे सहकार्य मिळाले नाही.
    त्यामुऴे मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मला आणखी एक संधी द्या असेही राजपूत म्हणू शकतात. सहानुभूतीची लाट ही ठाकरेंसोबत असल्याने येथील मतदार काय निर्णय घेतील हे काहीच दिवसांत स्पष्ट होईल .
    तिन नंबर चर्चेत आहेत.
    मा आमदार हर्षवर्धन जाधव
    एकेकाळी दबंग कामगिरी करून नावा रुपाला आलेल्या हर्षवर्धन जाधवांना मागील निवडणूकीत मोठा फटका बसला
    खैरेंचा गेम करण्याच्या नादात ,मतदारसंघावर दुर्लक्ष झाले आणि खैरे तर पराभूत झालेच पण सोबतच जाधवांना पराभवाचे तोंड पहावे लागले.
    खैरे -जाधव हा वाद नवा नाहीय पण पराभवाचा बदला पराभवच हे शिवसेनेने स्पष्ट केले. यानंतर 2024 मध्ये लोकसभेला अपक्ष उमेदवार म्हणून चर्चेत राहीलेले हर्षवर्धन जाधव यावेळी लोकसभेला फारस मतदान घेऊ शकले नाहीत त्यामुळे कामगिरीतून बाद होत चाललेल्या जाधवांना जाधव विरूद्ध जाधव आणि राजपूत असाही संघर्ष करावा लागणार आहे.सोबतच पक्ष आणि चिन्हाची आजपर्यंतची असप्षटता जाधवांच्या विजयावर प्रश्नचिन्ह निर्माण करते.येणाऱ्या काही दिवसांत जर एखाद्या पक्षाकडून जाधव यांनी निवडणूकीची दिशा ठरवलिच तर बदल होऊ शकतो पण नेमक कुठला पक्ष जाधव यांना सपोर्ट करेन की जाधव हे अपक्ष लढतील हा विषय गुलदस्त्यातच आहे.
    #कन्नडविधानसभा #sanjanajadhav #udaysingRajput #harshvardhanjadhav #kannadAsembly

КОМЕНТАРІ • 44

  • @Devpurna
    @Devpurna 22 години тому +7

    सर्व तालुक्यातील मतदारांनी विचार पूर्वक आपला निर्णय🎉 घ्यायचा आहे
    माझे मत आम आदमी पार्टीला म्हणजे सुभाष निकम ला 🎉

  • @chandramanikhandagale1550
    @chandramanikhandagale1550 11 годин тому +5

    सुभाष दादा निकम आम आदमी पार्टी यांना संधी मिळायला पाहिजे.

  • @karimshaha8726
    @karimshaha8726 3 дні тому +9

    उदय भाऊ पुनः आमदा र होनार

  • @Devpurna
    @Devpurna 12 годин тому +5

    आता पर्यंत आपण सर्वाना संधी दिली आहे आता संधी फक्त आम आदमी पार्टीला

  • @sandipchavan6685
    @sandipchavan6685 21 годину тому +6

    माझे मत आम आदमी पार्टीच्या सुभाष निकम यांना

  • @amitmankape1266
    @amitmankape1266 10 годин тому +5

    नवीन चेहरा आम आदमी पक्षाच्या सुभाष निकम यांना

  • @akashubale1564
    @akashubale1564 2 дні тому +4

    कोणी कितीही करा हल्ला लई मजबूत उदयभाऊ यांचा किल्ला

  • @ankurgavhane5667
    @ankurgavhane5667 10 годин тому +5

    Now its time for Subhash Nikam sir ...AAP🎉

  • @santoshawchar5544
    @santoshawchar5544 10 годин тому +3

    यावेळेस फक्त श्री सुभाष निकम सर ना दुसरा कोणता पक्ष ओन्ली आम आदमी पार्टीकडे लक्ष

  • @AvinashBongane
    @AvinashBongane 11 годин тому +5

    श्री. सुभाष निकम पाटील

  • @Rajeshnikampatil155
    @Rajeshnikampatil155 21 годину тому +5

    मा श्री सुभाष पाटील निकम

  • @Devpurna
    @Devpurna 12 годин тому +5

    कन्नड विधानसभा🎉 निवडणूक सुभाष निकम च जिकणार

  • @मराठीबाणाछत्रपतीसंभाजीनगर

    सुभाष निकम लावा ताकद

  • @virenthakur9378
    @virenthakur9378 11 годин тому +5

    Only Subhash Nikam Sir

  • @VijaySuryawanshi-b3p
    @VijaySuryawanshi-b3p 3 дні тому +7

    उदय सिंग राजपूत

  • @Banti_Ghuge
    @Banti_Ghuge 2 дні тому +3

    ना भावी ना माजी पुन्हा एकदा उदय भाऊच मारणार बाजी..

  • @parthmahadik8053
    @parthmahadik8053 10 годин тому +5

    Only subhash nikam sir

  • @shakurshaikh9714
    @shakurshaikh9714 8 годин тому +2

    आदरणीय शिक्षण महर्षी सुभाष निकम दादा आम आदमी पार्टी यांना विजयी करा

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 2 дні тому +3

    फक्त आणि फक्त उदय भाऊ राजपूतच.

  • @sandipvalunje8760
    @sandipvalunje8760 3 дні тому +5

    हर्षवर्धन जाधव

  • @prakashkachole6186
    @prakashkachole6186 2 дні тому +3

    Harshwardhan Dada❤❤

  • @khushalsing_rajput
    @khushalsing_rajput 2 дні тому +3

    भावी मंत्री उदयभाऊ राजपूत

  • @ऋषिकेशजाधव-ब1थ

    जाधव कुटुंब एकत्रितपणे काम करेल❤❤❤❤

  • @shridharughade8425
    @shridharughade8425 2 дні тому +3

    UdaySingh Rajput

  • @Bhagwankshirsagar-l6x
    @Bhagwankshirsagar-l6x 2 дні тому +4

    उदयसिग

  • @samarthmhaske-k5y
    @samarthmhaske-k5y 2 дні тому +3

    Harshu Dada Jadav 🎉

  • @vikasnawle9782
    @vikasnawle9782 День тому +2

    Udaysingh rajput 100/ yenar

  • @santoshawchar5544
    @santoshawchar5544 10 годин тому +3

    Only shri subhash nikam sr ......

  • @kalyankajale1376
    @kalyankajale1376 10 годин тому +2

    Fakt Subhash Nikam sir

  • @ravipatil9902
    @ravipatil9902 2 дні тому +1

    अरे ही जागा महायुती कडून राष्ट्रवादी ला सुटणार आहे आणि नितीन पाटील उमेदवार आहेत ✌️

  • @vaibhavborgade4711
    @vaibhavborgade4711 2 дні тому +1

    Udaya Singh rajput

  • @shankarbharati4517
    @shankarbharati4517 3 дні тому +4

    आता ऐक जाधव तर संपला आहे आनी राहीली दुसरी जाधव तिचा तर नवरा पन पटला आनी बाप पन पटला आनी मग काय संमजुन घ्या मग

  • @KaushalPatil-u1y
    @KaushalPatil-u1y 3 дні тому +2

    Fix MLA SANJANA TAI JADHAV

  • @ramkale157
    @ramkale157 2 дні тому

    फक्त आणि फक्त केतन भैया काजे

  • @sudhirwagh2811
    @sudhirwagh2811 2 дні тому

    युवा उद्योजक मनोज पवार

  • @dilippawar8805
    @dilippawar8805 2 дні тому

    संजना जाधव

  • @annasahebakolkar1859
    @annasahebakolkar1859 День тому

    दादा

  • @nitinjadhav7435
    @nitinjadhav7435 2 дні тому

    फक्त केतन भैया काजे लावा ताकत

  • @hrmnetrahul3757
    @hrmnetrahul3757 2 дні тому

    किती पैसे घेतले

  • @shekharsurase184
    @shekharsurase184 3 дні тому

    केतन भैय्या काजे

  • @SudhirGayke-y9r
    @SudhirGayke-y9r 2 дні тому

    हर्षवर्धन जाधव