श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती हायस्कूल, जळगाव./"शिक्षक दिन"/विशेष कार्यक्रम दि.५ सप्टेंबर २०२३

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • आमच्या श्रीमती जानकीबाई आनंदरामजी बाहेती विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिन 05 सप्टेंबर हा दिवस "शिक्षक दिन" म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी मुख्याध्यापिका इयत्ता 10वी तील विद्यार्थिनी रोशनी नन्नवरे हिच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तिने डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाविषयी आणि शिक्षक दिनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. तसेच यावेळी विद्यार्थी शिक्षक बनलेल्या इयत्ता 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंतच्या वर्गांच्या तासिका घेतल्या. विद्यार्थी शिक्षकांनी पूर्वतयारी करून उत्तम अध्यापन केले. सदर कार्यक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.आर.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यातआला. कार्यक्रमाचे नियोजन सौ.सरला चौधरी यांनी केले. तसेच श्री. टी. एस.माळी, श्री. के.एच.पाटील,श्री.पी.एम.पवार ,श्री.डी.जी.पाटील सौ. सुनीता महाजन आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी श्री. ए. एल. बोरोले ,श्री.चंद्रकांत वाघ व संगणक शिक्षिका सौ. लिना चौधरी यांचे सहकार्य लाभले. तसेच यावेळी विद्यार्थी शिक्षकांना अल्पोपहार देण्यात येऊन शिक्षक दिन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
    आमचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- निवृत्त सुभेदार सन्मान व्हिडिओ
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- पंचप्रण शपथ व्हिडिओ
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- मोफत शालेय साहित्य वाटप कार्यक्रम
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- वृक्ष दिंडी व्हिडिओ
    • श्रीमती जानकीबाई आनंदर... :- स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२३ व्हिडिओ

КОМЕНТАРІ • 2