Shravanat Ghananila unplugged and unprocessed by Rahul Deshpande

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • Shravanat ghananila originally sung by Lata Mageshkar, composed by Shriniwas Khale and written by Mangesh Padgaokar

КОМЕНТАРІ • 771

  • @sangeetasawant
    @sangeetasawant 4 роки тому +95

    राहुल जी, या कठीण काळात तुमच्या या UA-cam आणि फेसबुक live sessions मुळे सगळा मानसिक शीण हलका होतो! ईश्वरी कृपा आहे की असे कलाकार आम्हाला बघायला आणि ऐकायला मिळत आहेत 😊 खुप खुप धन्यवाद 💕🙏

    • @udaymhatre2738
      @udaymhatre2738 2 роки тому

      अगदी खरं आहे..👌👌👌

  • @pareshraut3227
    @pareshraut3227 4 роки тому +131

    राहुल गुरुजी, माझे नाव डा‌‌ॅक्टर परेश राऊत आहे. मी दहिसर, मुंबई ला राहतो. मी तुमच्या आवाजाचा मोठा FAN आहे. मला लहानपणा पासुन शास्त्रीयसंगीत शीकायचे होते, पण आमची परिस्थिती नव्हती. मग जबाबदारी अंगावर पडली. वेळ कसा निघून गेला ते कळलेच नाही आणि मी आज चाळीशी च्या उंबरठ्यावर आहे. जबाबदाऱ्या कमी झाल्या आहेत. आत्ता ह्या COVID 19 lockdown मध्ये वेळ मीळाल्याने मी शास्त्रीय संगीत शीकायचे ठरवले आहे. ज्या प्रकारे एकलव्य प्रशिक्षण घेतांना गुरु द्रोणाचार्य ची प्रतिमा समोर ठेवित असे, त्या प्रमाणे मी तुमची प्रतिमा माझ्या मनात ठेवून मी शास्त्रीय संगीत शीकायला सुरूवात केली आहे. बस तुमचा आशीर्वाद असु द्या. 🙏🙏🙏🙏

    • @abhi2577
      @abhi2577 4 роки тому +2

      Keep it up Dr.

    • @abhi2577
      @abhi2577 4 роки тому +1

      Rahul.. Like Dad like Son... Nostalgic.. Salute

    • @sadhanagadge7811
      @sadhanagadge7811 3 роки тому

      आपले .स्वर सुंदर समजतात . लवकर अवगत होतात. . स्टार maker chya साहाय्याने आम्हाला गणे शिकण्यास. suppot hoto .pan tumche guidance matra inअमूल्य.

    • @anitawagle1785
      @anitawagle1785 3 роки тому

      👍🙏

    • @kokanatilbhaykatha_
      @kokanatilbhaykatha_ 2 роки тому +1

      wa doctor

  • @saurabhtare6176
    @saurabhtare6176 4 роки тому +84

    वाट बघतो आम्ही ही बंधने तुटण्याची
    घराबाहेर पाऊल ठेवून खुलेआम जगण्याची
    निराश होतो कधी, कधी संपेल ही साथ
    पण मग तुझ्या गाण्याचा दरवळतो सुवास
    डॉक्टरांना पाहिलं नाही, कधी प्रत्यक्षात
    त्यांचे दर्शन घडले, फक्त तुझ्या सुरात
    संगीताचा प्रवास, असाच सुरू राहू दे
    अशीच सदा असू दे, तुझ्या गाण्याची साथ

    • @neelatare9755
      @neelatare9755 4 роки тому +1

      खूपच छान लिहीली आहे तुम्ही कविता! माझे नांव पण तारे आहे. मी मुंबईची शिवाजी पार्कची पण आतां USA मध्ये असते. असेच छान लिहीत जा.

    • @saurabhtare6176
      @saurabhtare6176 4 роки тому

      @@neelatare9755 धन्यवाद fellow Tare :)

    • @gentlerowdy
      @gentlerowdy 4 роки тому +1

      nice one my friend

    • @saurabhtare6176
      @saurabhtare6176 4 роки тому

      @@gentlerowdy Thanks :)

    • @1976anilpatil
      @1976anilpatil 4 роки тому +1

      Saurabh Tare , अप्रतिम....कौतुक हो तुमचे ।

  • @alkaranade8779
    @alkaranade8779 4 роки тому +14

    मी ही gynaecologist. कामाचा ताण सध्या खुप. राहुल चे गाण ऐकूनच दिवसाची सुरुवात करते. किती सुंदर गानपुजा... फार म्हणजे फारच आवडतात सगळी गाणी.. Especially निर्गुणी भजन

  • @vaibhavithakur9183
    @vaibhavithakur9183 4 роки тому +36

    खरंच ह्या कठीण प्रसंगी, असाच एखादा घन निळा बरसू दे आणि सगळं वातावरण निर्मळ होऊ दे.
    जगदंब!

    • @secane50
      @secane50 4 роки тому

      Vaibhavi Thakur तुमची इच्छा आज खरी झाली.⛈⛈👍

  • @adwait73
    @adwait73 4 роки тому +7

    I had met Mangesh Padgaonkarji and I was told that this poem was written in the month of May in a crowded harbour line local on a chit of paper and was handed over to Khale Kaka till was about to reach Masjid. Khale Kaka composed this song from CSMT (That time VT) to Akashvani radio.
    Rahulji, all of you are truely son's of Saraswati Mata. You people are out of the world....perhaps from the land of Gandharvas.

  • @viveksatdeve4417
    @viveksatdeve4417 4 роки тому +55

    क्या बात है.. खूपच छान..
    मी व्यवसायाने श्र्वसनरोग तज्ञ अाहे..
    आज जवळपास १२ तास चेहऱ्यावर मास्क होता.. दिवसभर रुग्ण सुश्रुषा केल्यावर..
    तुमचं गाणं ऐकून दिवसभराचा तान क्षणार्धात नाहीसा झाला..
    असेच गात रहा..
    जीते रहो... गाते रहो..

  • @radhuma1
    @radhuma1 4 роки тому +12

    Namaskaram Rahul. I studied Marathi in school in mumbai hence understand some of what you are singing....i m actually from south.... But a voice like yours needs no language... Thank u for sending across the stillness of your being to mine... Overwhelmed.... 🙏 both my 8year old son me listen to u before we go to bed 😀 each day

  • @swarnayuayurvedachikitsala9317
    @swarnayuayurvedachikitsala9317 4 роки тому +15

    श्रावणात घननिळा बरसला...
    ऐन ग्रीष्माची चाहूल लागली असताना, या गाण्याने मन मात्र पूर्ण चिंब भिजून गेलं...
    #RahulDeshpande

  • @KavyaParvani1176
    @KavyaParvani1176 3 роки тому +7

    "Jagun Jyachi Vaat Pahili Te Sukh Ale Daari", This line has very deep meaning this may differ from person to person..😊😊👍

    • @udaymhatre2738
      @udaymhatre2738 2 роки тому

      खरंय अप्रतिम अदाकारी आहे राहुल जी यांची..👌👌👌

  • @santoshthange8340
    @santoshthange8340 4 роки тому +4

    राहुलदा,
    तुमच्या सुरांचा हा बरसता मेघ आणि कविवर्य पाडगावकरांची नितांत सुंदर शब्दरचना ह्यांनी अगदी चिंब भिजवून टाकलं. कालातीत आणि निखळ दैवी आनंद ह्या गीतातून मिळाला. फक्त नितळ मनाने अनुभवावा असा हा सोहळा आहे. मनाच्या पवित्र गाभाऱ्याला स्पर्शून देहातीत आनंद देणारा तुमचा कंठ असाच अगणित काळ बहरत जावो. धन्यवाद

  • @sumeghaashutosh2790
    @sumeghaashutosh2790 4 роки тому +7

    या रणरणत्या ग्रीष्मात तुमचं हे गाणं एखाद्या थंडगार झुळुकी सारखं मनाला गारवा देतं.
    ऐकत रहावा हा मधुर , आश्वासक आवाज.👌👌

  • @abhijitdabholkar8291
    @abhijitdabholkar8291 4 роки тому +5

    तुमचेही बरसणे असेच सतत धार सुरू राहावे अशी त्या घननिळा कडे प्रार्थना

  • @funfeast6621
    @funfeast6621 4 роки тому +5

    श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा
    उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा,
    जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी
    जिथेतिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी
    माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा,
    रंगांच्या रानात हरवले हे स्वप्‍नांचे पक्षी
    निळ्या रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी
    गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा,
    पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदिचे आले
    माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले
    मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा,
    पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा
    अशा प्रीतिचा नाद अनाहत, शब्दावाचुन भाषा
    अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा...
    जितकी सुंदर शब्दरचना तितकाच सुंदर आवाज... अप्रतिम....

    • @sayalideshmukh7276
      @sayalideshmukh7276 4 роки тому

      Beautiful song👌👌 परमेश्वराचा वरदहस्त आहे तुमच्यावर! हे गाणं मी पहिल्यांदा 5 दिवसा आधी ऐकले तेव्हापासून रोज दिवसातून कितीतरी वेळा ऐकते, खूपच सुंदर गायलं आहे आणि अगदी मूळ गाण्याइतकच मनाला भावलंय👌 असेच नवनवीन प्रयोग करत राहा आणि आम्हाला आनंद देत राहा🙏

  • @sameerkulkarni8217
    @sameerkulkarni8217 4 роки тому +6

    लता दीदींचा अजरामर स्वर व खळे काकांचे अप्रतिम संगीत, या गाण्याचे unplugged & unprocessed संस्करण राहुलजी तुम्ही इतके सुंदर गायलात कि आता याला वेगळे processing करण्याची आवश्यकताच नाही. सुंदर सुंदर सुंदर.

  • @anilkakuste1470
    @anilkakuste1470 4 роки тому +2

    अप्रतिम सुंदर माझी सकाळ सुमधुर सुरू झाली

  • @shrutisawant6738
    @shrutisawant6738 4 роки тому +60

    You gave glimpse of rains in this scorching heat.thanks a million for singing this beautiful song...

  • @sandipdabhekar8202
    @sandipdabhekar8202 4 роки тому +2

    जेंव्हां जेंव्हां हे गाणे पुन्हा पुन्हा ऐकतोय..
    प्राणवायू मिळाल्यावर जसे तन मन प्रसन्न होते ..अगदी तसे जाणवत आहे..वेड लागले आहे अक्षरशः या गाण्याचे...आपल्या सुरांनी मन आणि आत्मा यावर विजय मिळवला आहे खरंच...या प्रतिकूल परिस्थितीत आपन आपल्या सुरांनी सर्वांना प्राणवायूच दिलाय जणू...

  • @supriyawadadekar41
    @supriyawadadekar41 4 роки тому +4

    आज बाहेर पाऊस सुरू असताना तुमचं हे गाणं किती आनंद देऊन जातंय हे शब्दांत सांगणे कठीण आहे.... अप्रतिम. जुग जुग जियो।

  • @umeshkuber1154
    @umeshkuber1154 4 роки тому +4

    अफलातून,काय सुरेख स्वररचना आहे आणि गायलीही किती मस्त

  • @aditid2858
    @aditid2858 4 роки тому +9

    I have heard this rendition of yours atleast a hundred times until now.
    Cant get enough of it!
    Such a rare talent, beautiful singing and piano!
    🙂

  • @ujjwalakulkarni2155
    @ujjwalakulkarni2155 4 роки тому +3

    राहुलदादा अप्रतिम गायलास, एक एक सुरावट हिरव्या पिसाऱ्यापरी उलगडली,काय जबरदस्त संगीत आणि लतादीदींचा आवाज कायमच स्वर्गीय आनंद,पण तू जसे उलगडून गायलास ते गाणं,त्याचे शब्द आणि खळे काकांचे सांगीत सारेच भारी वाटले पुन्हा,,😊👌

  • @Gaatha100
    @Gaatha100 4 роки тому +4

    I am so jealous of the neighbors as they can hear u live everyday, I wish I could have gotten the chance to hear u rehearse everyday.
    Thanks for making our day

  • @avinashachare1406
    @avinashachare1406 4 роки тому +2

    आपला आवाज ऐकला की देव साक्षात खाली उतरल्याचा अनुभव होतो.🙏

  • @diptikhiste2169
    @diptikhiste2169 4 роки тому +25

    Hi my 4 month old baby listens to your song daily, and sleeps calmly , Your voice is mind-blowing Thank you for keeping posting such nice songs :)

  • @nileshmalusare7006
    @nileshmalusare7006 2 місяці тому +1

    मनाच्या प्रत्येक आजारावर रामबाण औषध म्हणजे संगीत संगीत आणि संगीत.. राहुल सर अप्रतिम 👌👍❤️

  • @ashtelk
    @ashtelk 4 роки тому +2

    खूप सूंदर... Unplugged मधली सगळीच गाणी चांगली निवडली आहेत...
    ह्या गाण्याची सुरुवात तर खूपच छान झाली आहे...
    शब्दात सांगू शकत नाही पण काही वेगळेच फिल झाले...
    "रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात"
    हे गाणे आवडेल ऐकायला...
    "बरस असा की पिया ना जाईल..."
    ह्या वाक्यातला भाव खूप आवडतो...

  • @anikethrelekar
    @anikethrelekar 4 роки тому +2

    राहुल दादा तुझा आवाज खूप फ्रेश आहे. एक क्लासिकल सिंगर असुनही अतिशय सहजतेने तू हे गाण म्हटल आहेस. आज संध्याकाळी हे तुझ गाण ऐकताना छान मंत्रमुग्ध झालो. तुझे मनापासून आभार आणि अशीच आम्हाला तुझी सुंदर गाणी ऐकायला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @sunayanakb
    @sunayanakb 4 роки тому +1

    हम जिन गीतों की गोद में पलते हैं , बड़े होते हैं , वही गीत हमें तस्सली देते हैं , जब मन विचलित होता है. यह गीत भी कुछ ऐसा ही है.

  • @emes711
    @emes711 3 роки тому +1

    kiti sunder lihilay aani kiti sunder rendition. khoopach chhaaan.

  • @nitish915
    @nitish915 4 роки тому +1

    सुखद
    सकाळ सुरु ह्या गाण्या सोबत

  • @meera6702
    @meera6702 4 роки тому +2

    Khup sundar. Ya sur varshava baddal 🙏🙏🙏

  • @gamingvideos372
    @gamingvideos372 Рік тому

    खूप आवडतं गाणं तेही आपल्या मधुर आवाजात क्या बात है,किती आनंद झालाय म्हणून सांगू,कान आणि मन तृप्त झाले

  • @aratikakarmath4446
    @aratikakarmath4446 4 роки тому +2

    बाहेर टळटळीत कडक उन्हाळा आहे, पण मन अगद्दी चिंब चिंब धूंद गंधीत झाहले... हा स्वर्गीय स्वर ऐकून...😇💗💖💓💕❤️

  • @manishaatambat7622
    @manishaatambat7622 4 роки тому +1

    खूपच सुन्दर... या कठीण काळात ही सुरेल sobat जी तुम्ही देताय त्याला तोड नाही ♥️♥️♥️♥️♥️

  • @amoljoshi7242
    @amoljoshi7242 4 роки тому +8

    राहुल जी,.. निशब्द,... अप्रतिम !
    मी आत्ता, या क्षणी अक्षरशः रडतोय !!!
    मला च समजत नाही, हे अश्रू का येतायत......
    परमेश्वरा, लवकर सगळे पूर्वी इतके छान कर !!! आणि राहुल जीं सारख्या साधकांना दीर्घायुष्य दे !!!!! जेणेकरून आम्हाला जगणे सुकर होईल...

  • @sandipdabhekar8202
    @sandipdabhekar8202 4 роки тому +3

    "अप्रतिम" गायले आहे आपण...
    "आत्मिक सुख" मिळाले...
    ऐकताना ऐका वेगळ्याच विश्वात गेल्याची अनुभूती झाली..असेच आपण गात रहा..आणि आम्हांला या परमसुखाची अनुभूती होत राहो..खरंच खुपच निवांतपणा जाणवला
    🙏 🙏 🙏

  • @vedaparanjape5488
    @vedaparanjape5488 4 роки тому +5

    मधुर!! never thought I would appreciate this song in someone else's voice...thank you for this one.

  • @samruddhijewlikar2645
    @samruddhijewlikar2645 4 роки тому +8

    मनाला रिझवून टाकणारं आणि जखमेवर फुंकर घातल्यावर जसं शांत वाटावं तसं तुझं गाणं आहे राहुल दादा! किती सहजपणे तू आम्हाला तुझ्या गाण्याने आपलंसं करून टाकतोस! Loved this unplugged version of "श्रावणात घन निळा बरसला"! Can't wait for more such musical treats! 🙌

    • @shreyashanbhag8986
      @shreyashanbhag8986 4 роки тому

      Very beautiful song,amazing voice,feels extremely good.Great sir.

  • @RUPESHKUMAR.....
    @RUPESHKUMAR..... 4 роки тому +1

    खूपच छान या गीताला Sound quality एकदम जबरदस्त आहे

  • @nikhilpghag
    @nikhilpghag 4 роки тому +3

    Khup chan. Pratyek sur nital ani tejaswi.

  • @suresh-pt4cv
    @suresh-pt4cv 4 роки тому +3

    गाणे ऐकून खरंच आज श्रावणात घन निळा बरसला. शुभशकून

  • @rajeshargade500
    @rajeshargade500 4 роки тому +6

    कलासक्त ते कलाआसक्त हा प्रवास तुमच्या गाण्यानं शिवाय शक्य झlला नसता .. धन्यवाद !!

  • @user-zf6pe4ft1s
    @user-zf6pe4ft1s 4 роки тому +2

    मी फार लहान असल्या पासून हे गीत गुणगुणत होतो पण आज पर्यंत एका ओळीपेक्षा जास्त कधी गाण्याचं धाडस नाही झालं,पण आज किमान अंतरा तरी गाऊ लागलो ,ते तुम्हाला ऐकून,शतशः आभार.👍

  • @sandeepbagalkar3011
    @sandeepbagalkar3011 4 роки тому +4

    The minimal music allows one to enjoy the beauty of fantastic lyrics... Enchanting

  • @andy8081
    @andy8081 Рік тому +1

    कुणाला सांगून विश्वास बसणार नाही की हे अद्भुत निसर्गकाव्य पाडगावकरांना एप्रिल - मे च्या टळटळीत दुपारी हार्बर रेल्वेने प्रवास करताना चुनाभट्टी ते वडाळ्याच्या दरम्यान गलिच्छ झोपडपट्टी सोबतीला असताना स्फूरलं होतं.

  • @priyanirallgi528
    @priyanirallgi528 4 роки тому +3

    "गाणं पूर्वीही सुश्राव्य होतंच पण आपल्या आवाजाने ते वेड लावणारं झालं आहे."
    खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @veenapuranik7202
    @veenapuranik7202 4 роки тому +1

    Male awajaat hi sundar gan.u r great Rahul.shubhech anek.

  • @pradeephatti4625
    @pradeephatti4625 4 роки тому +2

    फारच सुंदर . अत्यंत हळुवारपणे व अत्यंत सुरेल आवाजात गायलेले हे गीत एक वेगळाच अनुभव देऊन गेले.

  • @sangeetagupte3487
    @sangeetagupte3487 4 роки тому +3

    सुंदर...अप्रतिम शब्द..खळे काकांचं सुंदर संगीत आणि साक्षात गानसरस्वती लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीत..इतकं सुंदर..राहुल देशपांडे यांच्या स्वरात ऐकतानाही तेव्हढीच सुंदर आणि खरंच सुंदर अनुभूती..धन्यवाद

  • @sangeetakanade2075
    @sangeetakanade2075 4 роки тому +4

    खुपच मस्त पियानोसह श्रावणात घननिळा एकदम मस्त 👌👌👌👌

  • @milindsathe4513
    @milindsathe4513 4 роки тому +3

    Hi rahul, मी इंदूर हुन मिलिंद साठे, मी pulmonologist आहे।
    तुझे गाणे खूप आवडले! सुमधुर,स्पष्ट उच्चारण, गाण्याचा गोड़वा द्विगुणित केला!फक्त पियानों चे rhythm पण छान होते।
    खळे काका च संगीत व पाड़ गावकरांचे गीत अजरामार आहे।
    अशीच नाविन्यपूर्ण कृति होऊ दे।

  • @anitasawantmoresawantmore8365
    @anitasawantmoresawantmore8365 4 роки тому +1

    अप्रतिम
    पुरुषी आवाजात ही हे गाणे इतक सूश्राव्य होईल अशी कल्पना नव्हती
    खुप सुंदर.... .रेषा ..वर खुप सुंदर स्वर लागला
    अशीच गाणी आणखीन गा.

  • @vinaybhatt5436
    @vinaybhatt5436 Рік тому

    जागुन ज्याची वाट पाहीली तो क्षण आला द्वारी ;
    जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी .......
    वा ग.दि.मा.
    आणी वा माझ्या देवा ......
    स्वर्गीय; स्वर्णिम अनुभव ।

  • @Dr.VijaySharma_author
    @Dr.VijaySharma_author 4 роки тому +2

    राहुल जी, यदि प्रकृति बरखा की बूँदों का स्पर्श महसूस करके गुनगुनाती तो उसका भी अंदाज यही होता. ईश्वर तुम्हें इसी तरह सदैव सत-चित-आनंद की अनुभूति प्रदान करता रहे. 🙏🙏🙏

  • @sharadraoparamanand4444
    @sharadraoparamanand4444 3 роки тому

    अप्रतीम गाण फार कठीण आहे प्रत्येक अन्तरा वेगळ्या स्वराने शुरू होतात अति सुन्दर ।

  • @prajaktarajopadhye1059
    @prajaktarajopadhye1059 4 роки тому +2

    कित्ती कित्ती अप्रतीम आहे तुमचे गायन... पाचूच्या हिरव्या माहेरी...... खुपच convincing होते.....

  • @sheilikas8910
    @sheilikas8910 4 роки тому +7

    There is something so soothing when the voice isn't disturbed by too many musical instruments...it's just lovely!! Khupach chaan

  • @pradnyasonandkar5162
    @pradnyasonandkar5162 4 роки тому +2

    अप्रतिम आवाज आणि गाणे. मस्तच.👌👌👌

  • @samros4u
    @samros4u 4 роки тому +6

    One and only Rahul Deshpande Respect and lots of love with Blessings.

    • @vijaymahajan3835
      @vijaymahajan3835 4 роки тому +1

      अप्रतिम!! शब्द , सुर आणि चाल याचा अजोड मिलाफ !! राहुलजी तुमच्या आवाजात विलक्षण गोडवा आहे.
      आणि हो.. वसंतराव डोकावतात मधूनच आणि hi करून जातात...😊
      अशीच अवित गोडीची गाणी अजून ऐकायला मिळावीत अशी अपेक्षा.
      ज्यांनी आपल्या गळ्यात सुर ठेवलाय तो आपणास उदंड आयुष्य देवो 🙏

  • @anandtorvi5596
    @anandtorvi5596 4 роки тому +2

    Bhar unhatpan स्वरांच्या श्रावण सरींचा अनुभवला. खूप सुंदर. अप्रतिम.

  • @manjushajadhav3080
    @manjushajadhav3080 4 роки тому +3

    अप्रतीम, श्रावण सुरू झाला असच वाटलं..🌳🌴🍃

  • @Mature852
    @Mature852 4 роки тому +2

    सुंदर. शेवट तर अगदीच भावला. आधीच पाडगावकरांची सुंदर शब्द भावांची कविता, तिला खळे साहेबांची अतिशय उत्तम ,उत्कट चाल, अविट गोडीचे संगीत आणि मूळचा लता ताईंचा आवाज /साज यां मुळे या गीताला आधीच मनात एक विशेष स्थान दिले आहे आम्ही.. तूझा हा आविष्कार म्हणजे त्या मूळ गीताला काढलेली सुंदर महिरप. गीत अजूनच खुलले. शाळेत वर्गात बसून आपण आवडत्या मराठी शिक्षकांकडून एक छान कविता/ गाण्याला परत एकदा नीट अर्थ दृष्य आणि फक्त गाण्यातून समजून श्रवणानंद सुख घेत आहोत अशी अनुभूती मिळाली. असा अनुभव पुन्हा पुन्हा मिळेल अशी अपेक्षा.

  • @manojlaxmi7185
    @manojlaxmi7185 4 роки тому +3

    अक्षरश: दहा वेळेस ऐकले हे गाणे दादा! केवळ अप्रतिमच!

  • @madhuragholap2629
    @madhuragholap2629 4 роки тому +6

    अंतर्यामी सूर गवसला,
    नाही आज किनारा...अहाहा! मंत्रमुग्ध!❤️❤️✨✨

  • @sunandapalande7776
    @sunandapalande7776 4 роки тому +1

    Rahulji khup sunder Gayle shravnat ghan nila barsala

  • @vinayakdamle8127
    @vinayakdamle8127 4 роки тому +5

    पं.राहुल प्रत्येक वेळेस स्व.वसंतरावाच्या स्वर्गीय गाण्याची आठवण करून दिल्याबद्दल आभार. शुभेच्छा.
    हरी: ओम् नम: शिवाय।।

  • @vasantikulkarni13
    @vasantikulkarni13 Рік тому

    फार फार मधूर गायन ! *शब्दातित अनुभव!* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @varshapatil1127
    @varshapatil1127 4 роки тому +3

    खुप छान खुप आवडले. तुम्ही माझ्या छोट्या मामाची आठवण आणली जो ह्या जगात आता नाही. हे त्याचे आवडते गाणे तो खुपदा गुणगुणत असे आम्ही त्याला लता मंगेशकर चिड़वत असू। खुप जुन्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद.

  • @hrishikeshdere1679
    @hrishikeshdere1679 4 роки тому +2

    किती वाट पाहिली होती male version साठी... खुप खुप आभार सर ❣️❣️❣️

  • @arunsutar7810
    @arunsutar7810 4 роки тому +1

    अप्रतिम.... ह्या अंगाची लाही करणाऱ्या उन्हात देखील खरंच श्रावणच सुरु आहे असं वाटलं.. 😍😍😍

  • @anilkakuste1470
    @anilkakuste1470 4 роки тому +1

    पुन्हा पुन्हा एकावे या वेळेस श्रावण जास्तच कर्ण मधुर आहे

  • @varshabellary2577
    @varshabellary2577 4 роки тому +4

    Your voice is so soothing and healing. One gets transported to a different peaceful world after listening to your songs. Have been your fan since katyar kaljat ghusli days. Happy to listen to your live performances on UA-cam now. Keep up the good work Sir🙏

  • @dr.jayabhoite4275
    @dr.jayabhoite4275 4 роки тому +2

    खूप,खूप,खूप,खूपच सुंदर... क्या बात हैं। राहुल जी अप्रतिम👌👌👌👌👍👍👍👍

  • @alone6162
    @alone6162 4 роки тому +1

    राहुल सर... एक विनंती आहे तुम्हाला अशीच अजून खुप भावगीते सादर करा... तृप्त झालं मन... स्वर्गीय अनुभूती आहे अश्या अजरामर गीतांना नव्याने उजाळा देताय तुम्ही...😍😇... रसिकांसाठी पर्वणी आहे हि... लवकरच अजून नवीन काही तरी सादर कराल अशी अपेक्षा आहे...🤘🤗

  • @neelatare9755
    @neelatare9755 4 роки тому +5

    राहुल फारच छान! माझे अत्यंत आवडते गाणे. मी गेला महिनाभर तुझी व रेणुकाची गाणी ऐकते आहे. खूप enjoy करते आहे. मी USA मध्ये आहे. इथे पण भारतासारखीच परिस्थिती आहे.
    तूं, महेश काळे, आर्या आंबेकर यांची गाणी म्हणजे कानाला मेजवानी आहे. तुम्हां सर्वांना शुभेच्छा !

  • @pravinyande8271
    @pravinyande8271 4 роки тому +1

    स्वरांची बरसात अप्रतिम.... स्वरब्रम्हा मध्ये न्हाऊन निघालो.शब्दात धन्यवाद देणे शक्यच नाही🙏🏵️🌸☘️🌼🍁🌹😊

  • @aksarojini
    @aksarojini 4 роки тому +4

    The depth in your voice is beyond words.... Soulful, mesmerizing, transcends you to a different world...

  • @sangeetathakur4999
    @sangeetathakur4999 4 роки тому +3

    मनाला गुंगवून टाकणारा अनुभव... संगीता ठाकूर

  • @sonalkhedkar5445
    @sonalkhedkar5445 4 роки тому +2

    apratim gaylat tumhi...khup chan..shravan suru zalyache feeling ala..Thank you.

  • @adityachopdekar1333
    @adityachopdekar1333 4 роки тому +1

    Tumchi saagli gaani maan aagdi shant karun jatat ani sur tar vaaah vahh

  • @akshaydeshpande554
    @akshaydeshpande554 4 роки тому +2

    गाणं ऐकताना श्रावण आल्याचा भास झाला. अप्रतिम.

  • @sanjaydhamdhere3708
    @sanjaydhamdhere3708 3 роки тому +1

    आपले गाणे ऐकताना एखांदी फिल्म बघत आहे असे वाटते.सगळे डोळ्यासमोर उलगडत जाते.कवी मंगेश पाडगांवकर यांच्या शब्द आपल्या गायनाने जिवंत केले.धन्यवाद

  • @sunandapalande7776
    @sunandapalande7776 3 роки тому +1

    Rahulji kharach kiti sunder gatta tumhi mala far aawadtat tumchi gaani radio war aikto tyahipeksha bhaari wat te tumche gaane

  • @anandsholapurkar8695
    @anandsholapurkar8695 4 роки тому +1

    क्या बात है ! नेहमी प्रमाणे अप्रतिम !

  • @purutoke
    @purutoke 4 роки тому +6

    Very soothing! One of my all time favourite by Lataji and Khale kaka combo !!!

  • @chandrashekharwani4947
    @chandrashekharwani4947 3 роки тому +1

    Khupch sundar kadhi kali mi lahan astana mazhi aji he gane mhnayche tichi athvan ali khupch chan gane mhntle

  • @shraddhaphatak8245
    @shraddhaphatak8245 4 роки тому +4

    वाह क्या बात हैं...एकदम अनोखी भेट आहे ही...राहूल..खुपच सुंदर सादरीकरण...!!Improvisations best..with Piona..Great....
    अनेक हार्दिक शुभेच्छा..

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 4 роки тому +3

    आवडले.. स्वतःला शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न.. दाद आहे प्रयत्नाना.. हार्दिक अभिनंदन..पियानो पहिल्याच प्रयत्नात अप्रतिम वाजवला.. असेच प्रयत्न करा आणी परमात्म्याच्या चरणी सेवा रुजू करा.. मनापासून अभिनंदन आणी धन्यवाद..

  • @sanikaraul4757
    @sanikaraul4757 4 роки тому +1

    हा स्वर्गीय आवाज आहे..शब्दांत स्तुती अशक्य.हे गाणं तुमच्या आवाजात येणाऱ्या प्रत्येक श्रावणात आठवणीत राहील आता..
    पाऊस असला नसला पण तरी हे गाणं मात्र सतत रेंगाळत राहील .. आयुष्यभर.. खूप धन्यवाद राहुल दादा🌸❤️

  • @sandeepawalgaonkar8524
    @sandeepawalgaonkar8524 4 роки тому +2

    अतिशय सुंदर...
    ऐकून मन खूप प्रसन्न झाले...
    धन्यवाद...
    अजून खूप ऐकण्याची इच्छा...

  • @kirtinaikmuley6254
    @kirtinaikmuley6254 3 роки тому

    सुंदर.... वारंवार ऐकावी अशी सुरेख चाल, अर्थपूर्ण रचना... 👌🏽

  • @Astro9291
    @Astro9291 4 роки тому +2

    अप्रतिम.. खूप छान दादा..

  • @sanjaypanpatil8894
    @sanjaypanpatil8894 2 місяці тому

    जेव्हा तू गातोस , तेव्व्हा असं वाटतं ( ???) की , आयला गाणं किती सोप्पं आहे.....
    आणि तुझ्या गळ्यातून लता आणि आशा अगदी सहज वाहतात.....

  • @aparnashinde3794
    @aparnashinde3794 4 роки тому +4

    खूप छान गाणं 👌👌 आणि तुझ्या आवाजात ऐकायला मिळणे म्हणजे एक सुखद पर्वणीच आहे.असेच नवीन नवीन ऐकायला खूप आवडेल.💐💐

  • @sameerapednekar3961
    @sameerapednekar3961 4 роки тому +3

    निळ्या रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी....अहाहा!!....ग्रीष्मात चक्क स्वरश्रावणसरी बरसल्या....राहुलजी ..धन्यवाद

  • @kamalunawane252
    @kamalunawane252 4 роки тому +3

    मरगळलेले मन प्रफुल्लित झाले राहुलजी आपल्या गाण्याने .जणु वर्षाराणीला आमंत्रणच दिलेय.
    रोज एकतरी गाणे फेसबुकवर ऐकायला मिळेल तर क्या बात खुपच सुस्राव्य गायलेत .thanks a lot.

  • @shekharjadhav9581
    @shekharjadhav9581 Рік тому

    काही गोष्टी जगण्याचे बळ देतात त्यातली एक म्हणजे तुमचा आवाज.

  • @rajendraganvir1655
    @rajendraganvir1655 3 роки тому

    राहुल जी सुप्रभात....तुमची गाणी अप्रतीम असतात.आणि हे गाणं माझं खुप आवडीचे आहे..मी नेहमीच ऐकत असतो...

  • @1976anilpatil
    @1976anilpatil 4 роки тому +2

    Rahul, You are a blessing to all music lovers. My days always starts with “Kanda .....of your Grandpa’s best.....n your voice..... I dont have words.....Thank you very much 🙏