तुज मागतो मी आता,संगीत वसंत महोत्सव २०२४ कु.इशिता पत्की

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • किनवट येथे तेजोमय प्रतिष्ठाण प्रस्तुत संगीत वसंत महोत्सव २०२४ मोठ्या दिमाखात संपन्न
    तेजोमय प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने दिनांक ९/१२/२०२४ रोजी संत गजानन महाराज किनवट येथे बोधडी येथील रहिवासी गानतपस्वी , स्वर भाग्य गुरुवर्य पंडित वसंत शिरभाते सर यांच्या जयंतीचे औचित्य साधून संगीत वसंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवात भव्य राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा व संगीत मैफिल आदी भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन स्पर्धेचे परीक्षक स्वरानंद सूर्यवंशी गंगाखेड यांच्यासह तसेच मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. या महोत्सवात भव्य राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातील स्पर्धकांनी सादरीकरण करून स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला. या महोत्सवात श्याम कल्याण पांचाळ यांच्या तबलावादनाने व राजेश ठाकरे सर यांच्या गायनाने उपस्थित सर्व संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केले . मैफिली नंतर विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले . व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक वृषभ हटकर पुसद यांनी मिळवले तसेच द्वितीय पारितोषिक दिपाली चिरंगे यांनी पटकावले तृतीय पारितोषिक नावेद शेख (विभागून) , राजेश पंडागळे (विभागून), उत्तेजनार्थ पहिले पारितोषिक ऋषभ तोडसाम द्वितीय जीवन मोरे यांनी उत्तम सादरीकरण करत यश मिळवले. या स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक श्री .स्वरानंद बाळासाहेब सूर्यवंशी ,गंगाखेड यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. दिपाली रामजी मुंडे यांनी केले . प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री ज्ञानेश्वर सोनबा आहेरकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री सुरेश पाटील सर अध्यक्ष वामनदादा कर्डक संगीत अकॅडमी यांनी केले.यावेळी डी .एन .पांचाळ सर माजी विषय शिक्षक अंध विद्यालय बोधडी, श्री.रामराव पत्कि काका , श्री अखिल खान सर मन सब योग साधना, स्तंभलेखक उत्तम कानिंदे सर
    सौ रश्मी ताई कंचर्लावार माता कन्याका परमेश्वरी संचलिका तथा भरतनाट्यम कलावंत , श्री राजेश ठाकरे सर संगीत शिक्षक अंध विद्यालय बोधडी,सौ. मधुवंती ताई पांचाळ संगीत साधक, तेजोमय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री रामजी ज्ञानोबा मुंडे , शिरभाते सरांचे कुटुंबीय श्री संतोष दादा शिरभाते संगीत साधक, सौ मनीषाताई शिरभाते,सौ इंदुताई मुंडे, श्री दत्ता भिसे बोधडी इत्यादीं मान्यवरांची उपस्थिती या महोत्सवास लाभली. हा कार्यक्रम अधिक यशस्वी करण्याकरिता तेजोमय प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री रामजी मुंडे, उपाध्यक्ष अनिता म्हेत्रे,सचिव ज्ञानेश्वर आहेरकर, कोषाध्यक्ष किरण हुंडेकर, सहसचिव ललित इंगोले ,सदस्य लक्ष्मण हैबेते , काजल आहेरकर हितचिंतक दिपाली मुंडे, श्री.सुरेश पाटील सर, बालाजी गुट्टे, अर्जुन गुट्टे यांनी परिश्रम घेतले.

КОМЕНТАРІ •