Ajit Pawar Convoy Stopped : बारामतीतूनच लढावं, अर्धा तास ताफा अडवत कार्यकर्त्यांची दादांकडे मागणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024
  • #AjitPawar #Baramati #NCP #MaharashtraTimes #MarathiNews
    राजकारणातील दादा समजल्या जाणाऱ्या दादांचाच चक्क बारामतीतच तब्बल अर्धा तास ताफा अडवत त्यांना वेटीस धरण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीतून उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच लढवावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा अडवत ही मागणी त्यांच्यापर्यंत गेली. उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसांपासून बारामती दौऱ्यावर आहेत. काल बारामतीत विविध कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत पार पडले. आज बारामती तालुक्यातील माळेगाव येथील कार्यक्रम आटवून ते बारामतीच्या दिशेने निघाले होते. शहरातील कसबा येथे शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवत तब्बल अर्धा तास त्यांची गाडी अडवून धरत बारामतीच्या विधानसभेसाठी तुम्हीच उभे राहा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून यावेळी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली 'एकच वादा' 'अजित दादा' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सदर कार्यकर्ते अजित पवारांच्या जवळचे असल्याने पोलिसांनाही त्यावेळी हस्तक्षेप करता येत नव्हता..! यावेळी पोलिसांची ही तारांबळ उडत असल्याचे दिसून आले. बऱ्याच वेळानंतर अजित पवारांनी गाडीतून खाली उतरत कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते आपल्या मतावर ठाम होते. त्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार गाडीत बसून निघाले असता कार्यकर्त्यांनी चक्क त्यांच्या गाडीसमोरच झोपले व जोरदार घोषणाबाजी केली. नंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला करत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताब्याचा मार्ग मोकळा करून दिला. व पवार पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : maharashtratim...
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Spor

КОМЕНТАРІ • 58

  • @rahulsatpute4726
    @rahulsatpute4726 10 годин тому +18

    कामाच्या बाबतीत दादाचा नाद नाही करायचा🔥🔥

  • @kapiltekle8852
    @kapiltekle8852 11 годин тому +30

    आरे लोकसभेला दादाची आठवण आली नाही आपल भल करनारा मानुस दुर चालला आहे बारामती सोडुन 😢

  • @GuruprasadGore-i8l
    @GuruprasadGore-i8l 10 годин тому +11

    एकच वादा अजित दादा लव्ह you दादा from अहिल्यानगर ❤

  • @vishaltehere6045
    @vishaltehere6045 10 годин тому +11

    यातले अर्धे शरद पवारांचे लोक असतील मुद्दाम दादांना उभे रहा म्हणताय 😁

  • @namdevgunjal1411
    @namdevgunjal1411 10 годин тому +10

    बारामती साठी एकच हुकुमी एक्का only Ajit Dada ❤

  • @ramchandrapawar193
    @ramchandrapawar193 10 годин тому +10

    लोकसभेला पाडले काम करणारा व मेहनती नेता आहे अजित दादा व मनमोकळे आहे

  • @ganeshgunjal4672
    @ganeshgunjal4672 10 годин тому +8

    ही सगळी सेटिंग अजित दादांना आधीच लावून ठेवलेली होती😂😂😂😂😂😂

  • @swarajya7848
    @swarajya7848 11 годин тому +10

    Ajit dada is mass leader of Maharashtra ❤️❤️

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 10 годин тому +3

    दादांनी शिरूर व बारामती दोन्हीही ठिकाणी फॉर्म भरावा. असे वाटते. कारण बारामती करांसाठी दादा जीव की प्राण आहेत. दादांशीवाय बारामती सुनी सुनी आहे.

  • @sunandapondkule332
    @sunandapondkule332 9 годин тому +3

    दादा बारामती तालुक्यात आपला आहे सोडु नका अजित दादा ऐकच वादा

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 9 годин тому +3

    दादा बारामतीतून उभे राहिले नाही तर अनेकांना अश्रू अनावर होतील.

  • @subhashgardi2045
    @subhashgardi2045 8 годин тому +1

    विधानसभेला दादाच पाहिजे . नाहीतर बारामती संपली असे समजा .कामाचा माणूस

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 7 годин тому +1

    दादांना परत एकदा कात्रज चा घाट दाखऊन पोपट करायला किती उत्सूक झालेत हे लोक!

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 8 годин тому +1

    बारामती चा हुकमी एक्का अजित पवार दादा तुम्हीच बारामती चि शान आहे बाकि लबाड लांडगे आहे

  • @Bhajap
    @Bhajap 10 годин тому +1

    स्क्रिप्ट बिग बॉस बारामती😂😂

  • @varunsaste6258
    @varunsaste6258 10 годин тому +3

    दादा plz अस करु नका.बारामती तुमचाशिवाय काहीच नाही.दादा फक्त आपल्यामुळे बारामतीला शान आहे.😢
    @ajitpawar

    • @ajinkyadeomare5788
      @ajinkyadeomare5788 6 годин тому

      शान राहू दे इथं निवडून यायचं वांद झालंय तुझ्या मूतऱ्या दादाच 😅😅😂

  • @sachinshikare3854
    @sachinshikare3854 11 годин тому +4

    मलीदा गेग

  • @GuruprasadGore-i8l
    @GuruprasadGore-i8l 10 годин тому +1

    महायुतीच जिंकणार जय श्रीराम 🚩❤

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 8 годин тому

    Ajit Dada ❤❤

  • @ajinkyadeomare5788
    @ajinkyadeomare5788 6 годин тому

    आर्रर्रर्रर्रर्र काय दिवस आलेत....
    तुम्ही उभारा आम्ही जाणकार जनता
    आहेच तुम्हाला पाडायला 😂😂😂

  • @MaheshNarayan9999
    @MaheshNarayan9999 9 годин тому +2

    येवडी कामे करून धोका दिला हिंदूंनी 😢😢😢😢 आणि बारामती करानी 😢😢😢😢

  • @genbaagawane3036
    @genbaagawane3036 11 годин тому +7

    सगळी मलिदा गॅंग जमा झाली आहे.
    दादा सावध. उभं करून पाडतील.

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 11 годин тому +7

    Only अजित दादा.

  • @narayankhorate6611
    @narayankhorate6611 7 годин тому

    आपल्या तालुक्याचा आमदार दमदार लागतो प्रशासनावर पकड पक्कड पाहिजे विकास कर्नाळा पाहिजे तो म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासून रात्री 10: वाजेपर्यंत बारकाईने कामात लक्ष घालून काम करणारा एकच वादा आणि अजित दादा

  • @DadaMore-su3qd
    @DadaMore-su3qd 10 годин тому +2

    Only dada

  • @VishalKhude-p2i
    @VishalKhude-p2i 8 годин тому

    कसला दादा मुतरा 😆
    चार पाच ताटली बाटलीवर जगणारे कार्यकर्ते पण बाकीच्या स्वाभिमानी जनतेच काय 😂

  • @MaheshNarayan9999
    @MaheshNarayan9999 9 годин тому +1

    लोकसभेला धोका दिला बारामतीकरानी 😢😢😢 दादा ला दादा चालले बारामती सोडुंन 😢😢😢😢😢🙏🙏🙏🙏

  • @priteshostwal5066
    @priteshostwal5066 10 годин тому +3

    सगळ्यांना रात्रीची सोय करून दिली आणि लावले नाटक करायला

    • @avdut394
      @avdut394 10 годин тому +1

      Ithe Kay to Sharuddin pawar ahe kay

    • @priteshostwal5066
      @priteshostwal5066 8 годин тому

      @@avdut394 नाही ना मुतारीवीर आहे तिथे ज्याने ७०,००० कोटीचा मलीदा खालला आता नाटकं करु लागला त्याला समजलं ना लोकसभेत बायको घरी बसली आता आपली वेळ आहे म्हणून आणि तुला तर फार झोंबल तुझी पन सोय करून दिली का त्याने रात्रीची

    • @avdut394
      @avdut394 8 годин тому

      @@priteshostwal5066 त्या मलिद्यात सगळ्यात मोठा वाटा त्या शरुद्दिन चाच आहे .त्या मिनी औरांग्याच नाव घेतल्यावर तुला झोंबल काय.जो हिंदूंच्या विरोधात त्यांच्या आम्ही विरोधात मग पुढे कुठला पण दुर्रम खान असुदे की शेट वाकडी होत नाहीत

  • @shivajikhule8212
    @shivajikhule8212 8 годин тому

    दादा तुम्ही बारामती तू लढा परंतु 72 हजार शिक्षकांना न्याय देऊन पुढील टप्पा अनुदान द्या शाळांना

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 9 годин тому

    अरे हा कुठंही उभा राहिला तरी पडणारच.....😂😂😂😂😂

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 8 годин тому

    अरे आपल्या बारामती ला जर अजित पवार सोडून गेले ना लवकरच भिकारी होणार आपण हा युगेंद पवार ला कोन ओळखतो

  • @जयश्रीराम-ध9थ
    @जयश्रीराम-ध9थ 8 годин тому

    सगळे कंत्राटदार आहेत.चुली बंद पडतील म्हणून यांचा गोंधळ

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 9 годин тому

    अजितदादा बारामतीतून उभे राहिले नाही तर पंकजा ताई साठी जे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जे केलें ते बारामतीत होनेचा धोका आहे. अजित दादांनी निष्ठावंत कार्यकर्तेचे जीवाचे रक्षण करावे.

  • @pramodkadam9131
    @pramodkadam9131 9 годин тому

    Dada good planing 😂😂

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 9 годин тому

    फक्त स्वतःच्या बापाचा जयजयकार करा. यांना आता विश्रांती द्या.

  • @DineshDeore-yn3tt
    @DineshDeore-yn3tt 9 годин тому

    Only.dada

  • @sharadmane4529
    @sharadmane4529 8 годин тому

    Baramati only sharad pawar saheb

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 9 годин тому

    याला म्हणतात प्लॅनिंग...😂😂😂😂😂

  • @pruthvirajpatil3536
    @pruthvirajpatil3536 10 годин тому +5

    दादा बारामती त राहु नका महाराष्ट्र स्विकारणार नाही

  • @spsd5705
    @spsd5705 10 годин тому +1

    Ajit dada

  • @SunilPawar-ys5el
    @SunilPawar-ys5el 11 годин тому

    जय मल्हार जय ओबीसी जय ओबीसी 🔥💪

  • @santoshpawar3991
    @santoshpawar3991 9 годин тому

    पवार साहेबाची हीच खेळी असते $ उभा करून पाडायचा

  • @rajendrajadhav7014
    @rajendrajadhav7014 9 годин тому

    दोन ठिकाणी उभे राहावे

  • @amolzodge2177
    @amolzodge2177 11 годин тому +1

    Dada

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 7 годин тому

    😂😂😂

  • @laxmanjadhav1688
    @laxmanjadhav1688 9 годин тому +2

    कार्यकर्ते म्हणजे सामान्य मतदार नाही

  • @amoldeshmukh6046
    @amoldeshmukh6046 10 годин тому

    पवार घरातील नविन नाटक....

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 9 годин тому

    Tutari🎉🎉🎉🎉

  • @pandurangdeokate5469
    @pandurangdeokate5469 11 годин тому +2

    Fakt Ajith dada

  • @sudhirnavgire4823
    @sudhirnavgire4823 10 годин тому

    Ubharaha Ani pada

  • @shivp5630
    @shivp5630 8 годин тому

    😅😅😅बारामतीतून ऊभे रहा आणी पडा😂😂

  • @NimbbaPatil
    @NimbbaPatil 10 годин тому

    त्या ना बकरा पाहीजे