रानभाजी | देठ कसे करायचे ते पहा| देठ रेसिपी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • लाल माठाच्या (स्टिक) देठ असे म्हणतात. देठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य-
    एक चमचा आलं-लसूण पेस्ट
    फोडणीसाठी तेल
    हळद,चवीनुसार मीठ, लागेल तसं लाल तिखट,गरम मसाला
    भाजलेले खोबरे कोथिंबीर आणि एक चमचा धने घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. धन्या ऐवजी एक चमचा रेडीमेड धने पावडर ही वापरू शकता.
    सर्वप्रथम देठावरील पाने बाजूला काढून ठेवा. पानांची सुद्धा पालेभाजी करता येते. तुम्हाला माहितीच असेल बाजारात माठाची भाजी म्हणून विकत मिळते. या भाजीचे हे देठ आहेत.
    10 मिनिटे मिठाच्या पाण्यामध्ये हे देठ बुडवून ठेवावे
    लहान किंवा मिडीयम आकाराची देत असतील तर शेवग्याच्या शेंगा सारखे कट करून घ्यावे. मोठ्या आकाराचे असतील तर मध्य भागातून दोन भाग करून त्याचे तुकडे करून घ्या.
    कुकर मध्ये पाणी व चवीनुसार मीठ घालून हे देठाचे तुकडे दोन शिट्ट्या करून शिजवून घ्या.
    थंड झाल्यावर देठ बाहेर बाजूला काढून घ्या.
    कढईमध्ये किंवा पॅनमध्ये फोडणीसाठी तेल घालून त्यामध्ये थोडी मोहरी आलं लसूण ची पेस्ट घालून परतावे. हळद मीठ व लाल तिखट घालून बारीक केलेला खोबऱ्याचा कीस,गरम मसाला घालून व्यवस्थित परतून घ्या. व शीजवलेले देठ यामध्ये घालून मिक्स करून घ्यावे. पाणी न घालता बारीक केलेले खोबरं घातल्यामुळे कोरडेपणा येतो त्यामुळे थोडे पाणी घालून मिक्स करून पाच मिनिटे वाफवून घ्यावे. झाले आपले देठ फ्राय रेसिपी तयार . हे करत असताना गॅसची फ्लेम कमी असावी.
    ही देठ खाल्याने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

КОМЕНТАРІ • 2

  • @Savita-yo6ki
    @Savita-yo6ki 2 місяці тому

    खुप खुप छान ❤❤❤

  • @urmilaborkar2175
    @urmilaborkar2175 2 місяці тому

    खुप छान लागते ही भाजी