अक्कलकोट : श्रीमंत मालोजीराजे भोसलेंचा शाही दसरा ! वक्तृत्व स्पर्धेबरोबर यंदा नारी शक्तीचाही सन्मान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • www.royalfamilyakkalkot.com
    अक्कलकोट संस्थानच्यावतीने दर वर्षी पारंपरिक पद्धतीने विजयादशमीचा नेत्रदीपक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या उत्सवाला अनेक वर्षांपासूनची पारंपरिक
    व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे.
    या विजयादशमी उत्सवाची सुरुवात
    श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी जुन्या राजवाड्यातील प्रथम देवदेवतांचे पुजन करून सुरू केले.नंतर मानकरी आणि सर्व उपस्थित मान्यवरांच्या समवेत सांगवी रोड वरील शरणमठातील शमीवृषाची पूजा करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक विधी झाल्या.या शमीपूजना नंतर पुन्हा राजवाड्यात येऊन सोने लुटण्याचा कार्यक्रम झाला. हा सुवर्ण सोहळा पाहण्यासाठी असंख्य मान्यवर उपस्थित होते.यंदा याच विजयादशमी सोहळ्या सोबत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यंदा तालुक्यातील नऊ नारी शक्तीचा सन्मान सोहळा आयोजित केला होता.यात नागम्मा बजे (खेळाडू), सीमाली कोळी( सहाय्यक पोलीस निरीक्षक), श्रीमती कुंदा नखाते (संगीत कलाकार),रूपाली शहा (शैक्षणिक), सुमती फडतरे ( इतिहास संशोधिका),डॉ. गिरीजा राजीमवाले (वैद्यकीय व सामाजिक), आरती काळे (लेखिका),सोनल जाजू ( सामाजिक ),वनिता तंबाके (उद्योजक) अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या स्त्री शक्तीचा अक्कलकोट राजघराण्यातर्फे सन्मान करण्यात आला.प्रारंभी निरव पोतदार या
    छोट्याशा मुलांनी शिवगर्जना दिली
    आणि ओंकार जाजू यांनी दांडपट्ट्याचा
    खेळ सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
    यानिमित्त वक्तृत्व स्पर्धा ही घेण्यात आली.
    यात प्रथम क्रमांक - प्रचिती पाटील ,
    द्वितीय क्रमांक- शिवानी भोसले,तृतीय
    क्रमांक - श्रेया माशाळ,उत्तेजनार्थ -
    मानसी खानुरे ,कन्याकुमारी पाकणीकर,
    पुष्पा खानापुरे आदींनी यश संपादन केले. विजेत्या विद्यार्थ्यांना मालोजीराजे भोसले यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी राजमाता जयप्रभादेवी राजेभोसले, मामा आशिष कदम यांच्यासह
    सर्व मानकरी उपस्थित होते. या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन शिवानी भोसले यांनी केले तर आभार आरती काळे यांनी मानले.
    www.instagram....

КОМЕНТАРІ • 7