श्री शारदा देवी मंदिर तुरंबव ll असंख्य भक्तांचे श्रध्दास्थान ll Terambav Temple ll

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • श्री शारदा देवी मंदिर तुरंबव ll असंख्य भक्तांचे श्रध्दास्थान ll
    Terambav Temple ll
    कोकणला निसर्गाने भरभरून दिले आहे . येथील मंदिरे विशेष ठरली आहेत. पुरातन वास्तु रचनेचा ठेवा हे येथील मंदिराचे वैशिष्ट्य आहे.
    श्री शारदा देवीचे मंदिर चिपळूण तालुक्यात तुरंबव येथे आहे . विशेष म्हणजे संपूर्ण कोकणपट्टीतील हे एकमेव शारदा देवीच मंदिर आहे .
    नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून ओळख असलेल्या श्री शारदा देवीच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे . सध्याच्या आधुनिकतेच्या युगात व तरुणाईचे आकर्षण असलेल्या डिस्को दांडियाच्या काळातही येथे नवरात्रोत्सव गेले काही शतकापासून आपले वेगळेपण टिकवून आहे .संतती प्राप्तीच्या नवसाला पावणारी देवी असा लौकिक असणाऱ्या शारदा देवीच्या उत्सवाला अवघ्या महाराष्ट्रातील भाविक आवर्जून उपस्थित लावतात.
    नवरात्रात येथे जोरदार उत्सव साजरा केला जातो. नऊ दिवस येथे यात्रा भरते. नवरात्रातील पहिले दोन दिवस देवीचा जागर म्हणून जाखडी नृत्य, भजन, दिंडी आदी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तिस-या दिवसापासून ‘गौराईचा नवस’ कार्यक्रमाला प्रारंभ होतो. सकाळी आठ वाजल्यापासून दर्शन व देवीची ओटी भरणे असे कार्यक्रम असतात. यानंतर दीपारत्यांचे नृत्य व जाखडी नृत्यास सुरूवात होते. या नृत्यासाठी विशिष्ट प्रकारचा पेहराव करणे ही येथील पारंपरिक पद्धत आहे. विशिष्ट प्रकारचे धोतर, कमरेला रंगीत शेला, डोक्यावर मराठेशाही पगडी, पायात चाळ असा गणवेश परिधान करून सर्व ग्रामस्थ मानकरी नृत्यात सहभागी होतात. या नृत्यानंतर रात्री नवसाचा कार्यक्रम सुरू होतो, तो पहाटेपर्यंत चालतो. प्रत्यक्ष अपत्य प्राप्तीनंतर नवस फेडताना विविध वयोगटातील बालकांना त्यांचे नातलग देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी या नवरात्रीत घेऊन येतात. हा कार्यक्रम सुरू असताना ढोल, वाजंत्री व घंटाच्या निनादात मंदिर परिसरातील वातावरण भक्तांना मंत्रमुग्ध करणारे असते.
    #चिपळूण
    #temple
    #kokan
    #kokani
    #kokan_status
    #share
    #youtubevideos
    #kokannewsupdate
    #kokankar
    #devi
    #नवरात्री
    #garba
    #sharadadevi
    #travel

КОМЕНТАРІ • 1