Aga Khan Palace, Pune
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- सुलतान मोहम्मद शाह यांच्या पूर्वजांना पर्शियाच्या राजाने 'आगाखान हा किताब दिला होता. सुलतान मोहम्मद शाह (आगाखान तिसरे) यांनी १८९० च्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावर जागा खरेदी केली. त्यावेळी पुण्यात दुष्काळ पडलेला असताना लोकांना रोजगार मिळावा म्हणून या इमारतीचे बांधकाम त्यांनी सुरू केले. पूर्वी या इमारतीला 'येरवडा पॅलेस' म्हणूनसुद्धा ओळखले जात असे. या वास्तूच्या बांधकामात ब्रिटीश, इटालियन, फ्रेंच, मुस्लिम अशा विविध स्थापत्य शैलींचा प्रभाव दिसतो. या प्रासादात सुलतान मोहम्मद शाह आणि त्यांचे कुटुंबीय काही काळ राहत असत.
१९४२च्या 'चले जाव' चळवळीत, या वास्तूत महात्मा गांधी व त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांना ९ ऑगस्ट १९४२ मध्ये नजरकैदेत ठेवले गेले. ९ मे १९४४ रोजी गांधीजींची तेथून सुटका करण्यात आली. गांधीजींचे सहायक महादेवभाई देसाई यांचे १५ ऑगस्ट १९४२ रोजी निधन झाले व कस्तुरबा गांधी यांचे २२ फेब्रुवारी १९४४ रोजी येथेच बंदीवासात असताना निधन झाले. पॅलेसमध्ये कस्तुरबा गांधी व महात्मा गांधी यांच्या वस्तू आणि छायाचित्रे ठेवलेली आहेत. यामध्ये गांधीजींची भांडी, चपला, कपडे, माळ इ. गोष्टींचा समावेश आहे. गांधीजींच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या प्रसंगांची छायाचित्रे येथे प्रदर्शित करण्यात आलेली आहेत. गांधीजी या वास्तूत राहिले असल्यामुळे, या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. १९८० पासून गांधी स्मारक समिती आगा खान पॅलेसची व्यवस्था पाहते.
या महालाची रचना सुप्रसिद्ध वास्तुविशारद चार्ल्स कोरिया यांनी केली होती. या वास्तूच्या बांधकामात ब्रिटीश, इटालियन, फ्रेंच, मुस्लिम अशा विविध स्थापत्य शैलींचा प्रभाव दिसतो.
2003 मध्ये, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) ने ही जागा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केली.
पुण्यातून येरवडा भागात नगर रस्त्यावर गेल्यावर आगाखान पॅलेस आहे. तिथे PMPML Busने जाता येते. पुणे विमानतळापासून 3.7 km अंतरावर पॅलेस आहे.
वेळ - सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३०
प्रवेश शुल्क - २० Rs.