Mahuli Fort | Mahuli Gad | | Mahuli Killa | Thane | माहुली गड | माहुली किल्ला | Bipin Mhatre

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • #mahuli
    #asangaon
    #Shahapur
    #bipinmhatre
    #bipin
    My Second Music Channel - / @bipinmhatrerocks
    Follow me on Instagram - / bipin_mhatre_vlogs
    Thumbnail Credit - Kalpesh Bhoir KB photography
    बालशिवबांवर गर्भसंस्कार करणारा, तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंचीवरील म्हणजे समुद्रसपाटीपासून २,८१५ फुटांवर असलेला शहापूर तालुक्यातील माहुली किल्ला विविध स्वरूपांच्या डागडुजीसह सोयीसुविधांपासून अद्यापही वंचितच आहे. राज्यभरातील गिरिप्रेमी व पर्यटकांना आकर्षित करणाऱ्यांना या गडावर विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
    सह्याद्री पर्वताच्या रांगांपैकी हा एक डोंगर अतिउंच सुळक्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. निसर्गसमृद्धी आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला हा माहुली गड अंगाला शहारे आणणाऱ्या स्थितीत इतिहासाच्या पाऊलखुणांचे जतन करीत आहे. शहापूर शहराच्या वायव्य दिशेला अवघ्या आठ किमी अंतरावर सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या दरीमधील उंच शिखरावर त्याचा सुळका आजच्या पिढीला विचार करण्यास भाग पाडत आहे. जवळ असलेली कल्याण व सोपारा (जि. पालघर) ही मालवाहतुकीची बंदरे, माहुलीवरून जव्हारमार्गे सुरत तसेच मुरबाड नाणेघाटमार्गे नगर, नाशिक अशा भौगोलिक रचनेमुळे इतिहासात या किल्ल्याला विशेष महत्त्व होते.
    ऐतिहासिक महत्त्व
    शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्यापूर्वी जिजामाता भोसले यांचे या माहुली किल्ल्यावर काही काळ वास्तव्य होते. त्यामुळे शिवबांची गर्भसंस्कारभूमी म्हणूनही हा किल्ला शिवप्रेमींचे श्रद्धास्थान आहे.
    निजामशाहीचे संचालक म्हणून १६३५-३६ मध्ये शहाजीराजे बाळ शिवाजी व जिजाबाईंसह निजामाच्या शेवटच्या वारसाला घेऊन या गडावर वास्तव्याला होते. या दरम्यान १६३६ मध्ये मोगल सेनापती खानजमान याने या गडास वेढा दिला होता.
    किल्ल्याच्या महादरवाजाची पूर्णपणे पडझड झाली असून खोदलेल्या पायऱ्यांवर ढासळलेल्या बुरुजांची दगडमाती पडलेले आहे. रस्त्यावर केवड्याची वने वाढल्याने हा रस्ता पूर्णपणे बंद आहे. कल्याण दरवाजा, घाण दरवाजा हे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. ३० फूट लांब व रुंद राजसदरेचे फक्त कातळ दगडाचे जोते शिल्लक आहे.
    My vloging setup -
    Action Camera www.amazon.in/...
    DJI Mini 2 Fly More Combo - www.amazon.in/...

КОМЕНТАРІ • 122