फुलवरा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 жов 2024

КОМЕНТАРІ • 9

  • @ganeshkadam8774
    @ganeshkadam8774 Місяць тому

    खूप दिवसांनी पुन्हा एकदा कानी पडला फुलवरा गीत

  • @Gyanesh_Kinkar
    @Gyanesh_Kinkar 2 роки тому +5

    पिण्डांड ब्रह्मांड अंतरीं दैवत भिन्नाकृती वो । शोधोनी पहातां अवघें चराचर व्यापक घन संभुती वो । भेदभाव त्रिगुणाचा रज तम सत्त्वाची आरती वो । ऐसें जाणोनी केली उभवणी । द्वैत सारुनी । परी तो मनीं । एक हरि अंकिला । तुज म्यां फुलवरा बांधिला ॥ १ ॥
    जगदंबे । पूर्णकदंबे । जगउद्‌बोधें । देह तुज अर्पिला । तुज म्यां फुलवरा बांधिला ॥ध्रु०॥
    आई भवानी थोर जाणोनि तिज म्यां उपासिलें वो । हातीं देऊन परडी तिनें मज भिकेसी लाविलें वो । खुळा पांगुळा करुनी आपणा जवळी बैसविलें वो । उदो अस्तुचे भरे । गरगरा फिरे । भूत वावरे । तो मज व्यर्थ शीण वाटला ॥ २ ॥
    खंडोबासी नवस करुनी मुरळी होउनी बैसलें वो । आपुले जे कां सखे सज्जन ते विवंचुनी भरीं भरले वो । वारी मागतां पोट भरेना बहु श्रम पावलें वो। श्वानाचीये परी वृथा गुरगुरी । जाय चाचरी । परी तो हरि नाहीं देखिला ॥ ३ ॥
    माझे घरीं पाहुणा भैरव येऊन बैसला वो । त्रिगुणाचा त्रिशूळ घेउनी प्रपंच विस्तारिला वो । जोगी बोलाउनी परत भरुनी भराड म्यां घातिला वो । ऐशीं वरदळें । सोशिलीं बळें । जालीं निर्फळें । सुखाचा लेश नाहीं देखिला ॥ ४ ॥
    मुंजाबासी डांक घालुनी मेसाई आळविली वो । त्रिगुणाची तिवई करुनी त्यावरी बैसविली वो । धूप दीप नैवेद्य दाउनी पंचारती केली वो । तिनें मज नाडिलें । दुःख भोगिलें । सुख नासलें । मग म्यां ढकलून दिलें तिला ॥ ५ ॥
    ऐशीं दैवतें केलीं अनंतें नवस बहु फेडिले वो । परि ते फलकट जाले शेवटीं गळां येउनी पडिले वो । बहु जाचिलें दुःख भोगिलें चौदिशीं व्यापिलें वो । जालें मी उदास । धरली कास । सोडुनी आस । पंढरी पाहून जीव माझा हर्षला ॥ ६ ॥
    वैकुंठीचें निधान त्याचे असती जे प्रियकर वो । त्याची गांठ पडली तेणें दिधला अभयकर वो । त्याचे संगतीं गेलें भक्तीनें देखिलें भीमातीर वो । परात्पर सोयरा । पुंडलीक बरा । दिधला थारा । तेणें मज बुडतां हात दिधला ॥ ७ ॥
    डोळा घालुनी अंजन घेउनी गेले मज राउळीं वो । विटेवरी जगदंबा एकाएकीं नयनीं देखिली वो । मनोभावें वरदळ वृत्ती देहाची खुंटली वो । एका जनार्दनीं भलें । द्वैत हरपलें । ऐक्य संचलें । जन्ममरणाचा पट फाटला ॥ ८ ॥

  • @puneripranav1872
    @puneripranav1872 5 місяців тому

    Ravi dada is like my bigg brother ❤ we miss him

  • @prataplokhande3900
    @prataplokhande3900 11 місяців тому +1

    थोडक्यात काय भवानी सोडा,खंडोबा सोडा इतर देवता सोडा आणि भैरव सोडा आणि ह्या भामट्यांचा हरी खरा आणि शिवशक्ती खोटीच जाणावी..............आणि हे असले पद शिवशक्तीच्या लोकोपचारातील गोंधळात म्हणतात म्हणजे काय म्हणायचे....ज्याची उपासना करायची त्याचीच निंदा

    • @balrajkate9877
      @balrajkate9877 9 місяців тому +5

      हरी म्हणजे पांडुरंग हा विष्णूंचा अवतार...साक्षात पंढरपूरच्या विठुरायाने शिवाला आपल्या मस्तकी घेतलं आहे...शिव आणि शक्तीचा मांडीला गोंधळ...हा गोंधळ चंद्रभागेच्या वाळवंटातीरी जगद्गुरू तुकाराम महाराजांना घालावा लागला की जे सतत विठ्ठल नामात दंग होते म्हणजेच बापाचा धावा करत होते आईचा विसर पडलेल्या महाराजांच्या आयुष्यात एकाएकी गोंधळ माजला हे काही सांगायला नको म्हणून त्यांनी तु ग विटेवरी सखये बाई ग करी कृपा असं म्हणून आई जगदंबेचा धावा केला...वरिल फुलवरा म्हणजे संत एकनाथ महाराजांनी आपल्या देहाचा फुलवरा कसा आहे ह्याच वर्णन केले आहे...दोन धर्म एक शैव आणि दुसरे वैष्णव दोन्ही धर्माचा मार्ग वेगळा पण दैवत एकच हरी-हर...म्हणजे शिव-विष्णू...विठोबा आणि खंडोबा हे काही वेगळे नाहीत भु वैकुंठ पंढरी तशीच जेजुरी...भक्तीचे द्वैत आणि अद्वैत असे दोन प्रकार आहेत तुम्ही काहीही करा कुठेही जा पण आपला कुलधर्म आणि कुलाचार हा कोणालाही चुकलेला नाही...भराड-गोंधळ-जागरण घातले की अंतरातील शरीरातील षडविकार काम-क्रोध-मंद-मत्स-दंभ-अहंकाराचा फुलवरा कळसाला बांधल्या खेरीज तुमच्या मनातील अंतरातील - देवळातील देव तुम्हाला दिसू शकत नाही आणि भेटू शकत नाही...कुल स्वामी मल्हारी निज भक्ताचा कैवारी...हरी नामाचा सोहळा उभ्या दरबारी...दरबारी!

  • @nanijkitchan2667
    @nanijkitchan2667 Рік тому

    गादि मस्त भरली आहे खूप मस्त

  • @vishalyadav-ni4yu
    @vishalyadav-ni4yu 2 роки тому

    👍

  • @pratikgaykwad5558
    @pratikgaykwad5558 2 роки тому

    खुप छान

  • @ganeshkadam8774
    @ganeshkadam8774 Місяць тому

    खूप दिवसांनी पुन्हा एकदा कानी पडला फुलवरा गीत