श्री.निळूभाऊ फुले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 тра 2020
  • अलौकिक अभिनय सामर्थ्य असलेल्या या प्रतिभावंत कलाकारावरील राष्ट्रसेवादलाचे संस्कार,सामाजिक बांधिलकीचे दर्शन डॉ. श्रीराम रानडे यांनी घेतलेल्या मुलाखतीतून घडते.
    कथा अकलेच्या कांद्याची ,सखाराम बाईंडर,बेबी,सूर्यास्त या नाटकात तसेच सामना ,पिंजरा,सिंहासन,शापित,चोरीचा मामला,एक होता विदूषक अशा असंख्य मराठी तसेच हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय आहेत.
    ४२ ची चळवळ,पंढरपूर मंदीर प्रवेश,गोवा मुक्ती संग्राम,संयुक्त महाराष्ट्र आंदोलन यात त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग होता.कृतज्ञता निधी सारख्या अनेक सामाजिक उपक्रमातून ते सक्रिय सहभागी होते.
  • Розваги

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 3 роки тому +1028

    सह्याद्रीकडे खूप मोठा खजिना आहे , आपल्याकडे असलेल्या जुन्या मुलाखती आपण टाकत जा. आपले मनापासून धन्यवाद .

  • @balkrishnajoshi1383
    @balkrishnajoshi1383 3 роки тому +388

    मी पाहिलेली निळू भाऊंची पहिलीच मुलाखत. खूप ऐकलं होतं, आज अनुभव आला. प्रचंड ताकदीचा, निर्मळ मनाचा एक खूप मोठा माणूस!
    सलाम निळूभाऊ!
    Edited: मुलाखतकार श्रीराम रानडे साहेबांचं कौतुक.

    • @maganpatil8128
      @maganpatil8128 2 роки тому +2

      सलाम निळु भाऊंना

    • @kautikbaste2551
      @kautikbaste2551 2 роки тому +5

      एक उत्तुंग व्यक्तीमत्व आज या जगात नाही पण
      त्याची प्रेरना मात्र कायम राहिल
      खंरच निळुभाऊ फुले साहेब तुम्हाला मानाचा मुजरा🌹🌹🙏🙏

    • @ramchandrawaghe9689
      @ramchandrawaghe9689 2 роки тому +4

      असा नट पुन्हा होणार नाही

  • @abhijeetjanjalkar6843
    @abhijeetjanjalkar6843 2 роки тому +188

    कुठलेच backgroud music नाही. दोघांचा आवाजातुन निर्माण होणारा अनुभवाचा ओघ, आदरपुर्वक संभाषण व गत काळातील आठवणी हे केवळ सह्यादि मराठीच देऊ शकेल अनेक अनेक धन्यवाद

    • @radheshyamkarpe
      @radheshyamkarpe Рік тому +3

      आजच्या खासगी टीव्ही चॅनेलवाल्यांनी ही मुलाखत एकदा आवर्जून बघावी...

    • @bansidharkulkarni3639
      @bansidharkulkarni3639 Рік тому +1

      @@radheshyamkarpe ⁰

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 Рік тому +1

      हाच फरक आहे शासकीय आणि खाजगी मधे.
      आणि सह्याद्री वाहिनी बद्दल बोलायचं तर पहिल्या पासुनच आपली वैशिष्ट्य जपली आहेत.
      सह्याद्री वरील बातमी पत्र ऐकताना तर एक वेगळाच अनुभव आणि समाधान मिळतं.

    • @dinkarpatil8898
      @dinkarpatil8898 Рік тому

      ​@@radheshyamkarpe ....................................................................................................................................

  • @adityadeshpande8823
    @adityadeshpande8823 2 роки тому +110

    निळू फुले यांनी चित्रपटात मुख्यतः खलनायकी भूमिका रंगवल्या. आयुष्यात मात्र हे खरोखरीच सरळमार्गी & उदात्त जगले. ते गेले तेव्हा पुणे सातारा महामार्गावर त्यांची एक हात जोडलेली हसतमुख प्रतिमा पाहिल्याचे आठवते. खाली केवळ दोनच शब्द 🙏🏼 मोठा माणूस!

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 3 роки тому +258

    इतिहासाचे महान साक्षीदार लुप्त होण्यापूर्वी त्यांच्या अशा मुलाखती घेतल्या पाहिजेत.

    • @sandeepmanjrekar1971
      @sandeepmanjrekar1971 2 роки тому +5

      Nilubhau ek Uttam kalalar tar hotech pan ek Uttam manusahi hote

    • @narayanpandhe2204
      @narayanpandhe2204 2 роки тому +4

      गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 🙏

    • @shtug
      @shtug Рік тому

      .
      0

    • @Atmakeeawaz
      @Atmakeeawaz Місяць тому

      या कमेंट्शी अतिशय मनापासून सहमत आहे .

  • @rhushimore3576
    @rhushimore3576 2 роки тому +16

    चित्रपट पाहताना लहानपणी खूप राग यायचा यांचा इतका खरा अभिनय होता भाऊंचा
    The Great Actor Nilu Bhau

    • @zunjarrao9491
      @zunjarrao9491 2 роки тому +1

      अगदी मनातल बोललात 🙏

  • @VINAYSHINDE9311
    @VINAYSHINDE9311 3 роки тому +42

    लहानपणी एकदा निळु फुलेंना भेटण्याचा योग आला, शाळेला जाताना स्कुल बस समोर ते रिक्षा मधुन जाताना दिसले (कोथरूड,पुणे)
    आम्ही सगळे त्यांना बघण्यासाठी रिक्षा च्या शेजारी गेलो. त्यांनी सर्वांना हस्तांदोलन केले आणि बोलले, मुलांनो शाळेला जा आणि खुप शिका मोठे व्हा!

  • @akshaydeshpande4571
    @akshaydeshpande4571 2 роки тому +9

    सावित्रीबाई फुले यांचे नातलग होते निळू फुले हे अतिशय अप्रतिम वाटलं.

  • @yogeshchaudhari8682
    @yogeshchaudhari8682 4 роки тому +247

    असे कलाकार काळात एकदाच घडतात.
    निळू भाऊंना मानाचा मुजरा...

  • @ArvindJ
    @ArvindJ 3 роки тому +291

    निळू भाऊ जेव्हा गेले त्या दिवशी मी रडलो होतो ... ग्रेट माणूस .... आणि त्याहीपेक्षा ग्रेट ऍक्टर ....

    • @shekharagnihotri7890
      @shekharagnihotri7890 2 роки тому

      निळुभाउंच निधन केव्हा झालं.?

    • @rahulpradhan7217
      @rahulpradhan7217 2 роки тому

      बलात्कारी होता म्हणे तो पूणे, सातारा, सांगली,‌🌀🌀🌀🌀

    • @siddharthpatil3028
      @siddharthpatil3028 2 роки тому +14

      @@rahulpradhan7217 Ho Kay ? Tuzya War Kela Mhane ?😂😂😂

    • @uvitawkar
      @uvitawkar 2 роки тому

      Great

    • @pravinmali2479
      @pravinmali2479 2 роки тому +1

      @@siddharthpatil3028 🙏🤣

  • @anitasubhedar4949
    @anitasubhedar4949 2 роки тому +21

    किती लाखमोलाचे समृद्ध आयुष्य जगले निळूभाऊ सलाम त्यांना 🙏🏻💐🙏🏻

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому +2

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @Royal-xw1hj
    @Royal-xw1hj Рік тому +6

    सगळे निळू भाऊंविष् यी बोलता आहात.पण जे मुलखात घेत आहेत.तो ही माणूस किती प्रसन्न आणि हुशार व्यक्तीमत्व 💯

  • @pavannagre784
    @pavannagre784 3 роки тому +109

    मी 25 वर्षेचा झालो पण अशी अप्रतिम मुलाखत कधीच बगतली नाही अश्या मुलाखतीला सलाम

  • @prakashgidde6539
    @prakashgidde6539 2 роки тому +11

    मी पाहीलेल्या कित्येक मराठी चित्रपटातील तिरस्कार वाटणारी हलकट भुमिका मिस्कीलतेने सहजपणे वटवणारा हा अवलीया वास्तविक जिवनात कीती सरळ साधा सज्जन आहे हे प्रत्येक मराठी रसिकांना नक्की कळले असेल... दुरदर्शन चे मनःपूर्वक धन्यवाद.

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 3 роки тому +30

    त्या साध्या सरळ मोठ्या मनाच्या निळू भाऊंचे दर्शन शिवाजी मंदिर दादर मध्ये झाले. खलनायक चरित्र अभिनेता वास्तविक जीवनात मात्र अतिशय साधा सरळ माणूस डोळ्यावर विस्वास बसतं नव्हता हेच का ते निळूभाऊ. साहेब तुम्हाला शतशः नमन निळू भाऊंना मानाचा मुजरा 🙏🙏🙏

  • @ravikanthajare2515
    @ravikanthajare2515 2 роки тому +10

    किती विनम्रपणे बोलतोय हा माणूस, किती साधेपणा, एवढं मोठं काम करुन आपल्यातून निघून गेले पण कायम आठवणीत राहणार

  • @ashishpawar4093
    @ashishpawar4093 4 роки тому +637

    किती दुर्दैव आहे की हा माणूस जिवंत असताना मी ही मुलाखत पाहू शकलो नाही... Legend ...मराठी सिनेमातील तारा 🙌🙌

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 2 роки тому +20

    निळुभाऊंनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवल पण कुठेही
    ते त्यांच्या वागण्या बोलण्यात दिसल
    नाही.
    एक सच्चा महान कलाकार आणी विनम्र माणूस म्हणूनही छाप सोडुन गेले.
    हया मोठ्या माणसाला लाख लाख
    सलाम.
    मुलाखत खुप छान होती. सह्याद्री
    वाहीनीचेही खुप खुप....आभार.
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌺🌻🌺

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 3 роки тому +61

    अफ्लतून मुलाखत .महान कलाकार बेरकी खलनायक , समाजसेवक आणि बरच काही सांगणारा देवमाणुस. आणखी काय लिहावं .मोठा माणूस. धन्यवाद.

  • @user-ui9qo5tg8h
    @user-ui9qo5tg8h 2 роки тому +19

    सह्याद्री वाहीनीचे खुप खुप आभार, गजानन महाराजांच्या शेगावला भारीप बहुजन महासंघाचं अधीवेशन घेतलं होतं माझ्या वडीलांनी तेव्हा नीळु फुले राम नगरकर यांना सुध्दा कार्यक्रमाला बोलावलं होतं ( प्रमुख पाहुने ) तेव्हा प्रत्यक्ष बघन्याचा योग आला होता तेव्हा नाही वाटलं पन आता वाटते की खरच आपन भाग्यवान आहोत की एवढ्या मोठ्या हस्ती आपन जवळुन बघीतल्या

  • @subhashthorat1979
    @subhashthorat1979 4 роки тому +67

    मराठी चित्रपट सृष्टीत असा खलनायक होणे नाही

  • @EnfieldeR69
    @EnfieldeR69 3 роки тому +67

    अजरामर व्यक्तीमत्त्व ♥
    The Great NiluBhau..❤
    सह्याद्रीचा आपलेपणा.. गोडवा मनाला भावणारा..!

  • @rhkolhapur6164
    @rhkolhapur6164 2 роки тому +92

    आठवण आली खूप या मराठी चित्रपट सृष्टीतील कोहिनूर हिर्याची 😔😔

  • @sureshsalunke2362
    @sureshsalunke2362 2 роки тому +19

    आमाला निळू भाऊना दलितांचे बद्दल किती प्रेम होते हे आमाला कधी समजले नाहीच याचे वाईट वाटते

  • @shivajigulve2272
    @shivajigulve2272 2 роки тому +33

    सह्याद्री वाहिनीकडे असलेला हा अनमोल ठेवा आहे.
    खूप खूप आभार सह्याद्री वाहिनी.....

  • @VishalPawar.1
    @VishalPawar.1 2 роки тому +17

    या लोकांचा पोत किती सच्चा आहे आणि तो त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो आणि म्हणूनच ते मोठे होते..धन्यवाद सह्याद्री आपल्यामुळे खुप काही शिकलो या मुलाखतीद्वारे.आपण या मुलाखती पूनप्रक्षेपित कराव्यात...त्रिवार मुजरा आभाळाएवढ्या व्यक्तिमत्वास.

  • @madhurinaik4732
    @madhurinaik4732 2 роки тому +52

    कधीच कुठल्याच पिंजरात न अडकलेला कलाकार म्हणजे श्री निळू भाऊ फुले. खुपच सुंदर मुलाखत.

  • @sureshkhairnar9748
    @sureshkhairnar9748 2 роки тому +9

    बाई वाड्यावर या ! म्हटल्यावर निळू फुलेच समोर उभे राहतात..असा कलाकार होणे नाही. .मुलाखत बघून खूप बरे वाटले. ..

  • @sanjaybarge6435
    @sanjaybarge6435 2 роки тому +3

    मराठी मातीतील खरा "कोहिनुर"
    निळू फुले,सावकार,सरपंच आणि सर्व काही.असा अभिनेता होणे नाही

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 Місяць тому +1

    मा आदरनिय सर निळू फुले यांची फार छान सुंदर मुलाखत घेतली जून्या आठवणी जाग्या झाल्या खुप छान वाटले त्यांचे सिनेमा फार गमतीशीर आहे धन्यवाद

  • @aniketwadwale6279
    @aniketwadwale6279 День тому

    आयुष्यभर सामाजिक बांधिलकी हे मूल्य ठामपणे अंगी बाळगून लोकरंजनातून लोकप्रबोधनात कार्यरत असणारा यांच्यासारखा कलावंत विरळच..शांतप्रिय दिलदार मनाचा माणूस.मराठी रंगभूमीला लाभलेला रत्न किती सुंदर आणि सरळ अतिशय मावळ मनाचा माणूस...खरा समाजवादी❤

  • @rahulshelar1306
    @rahulshelar1306 2 роки тому +62

    असा अभिनेता होणे नाही द ग्रेट निळु फुले🌸🌺🌻🌹🌷🌼💐🌸🌺🌻🌹🌷🌼💐🌸🌺🌻🌹🌷🌼💐

  • @dnyandevyadav
    @dnyandevyadav 2 роки тому +6

    एक समाजसेवक ते नाट्य व चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार हा सर्व प्रवास पाहताना मन हेलावून जाते कोणताही बडेजाव नाही की कसलाही अहंकार नाही एकदम साधे सरळ निर्मळ व्यक्तिमत्त्व.

  • @suhasakolkar
    @suhasakolkar 3 роки тому +122

    धन्यवाद सह्याद्री.... खुप मनमोकळ्या गप्पा होत्या. मी फार मोठा कलाकार आहे असा कुठेही अभिनिवेश नाही.

    • @vitthalmandhare4220
      @vitthalmandhare4220 2 роки тому

      Please. Uplod. Shivajirao. Bhosale. Srujanvedha

    • @swatibansude2142
      @swatibansude2142 2 роки тому +2

      Great actor & Great Social worker 🙏 निळूभाऊंच्या स्मृतींना अभिवादन 🙏🌹🙏पडद्यापेक्षा प्रत्यक्षात खूप वेगळं व्यक्तिमत्व होतं त्याचं.

  • @ramchandra9816
    @ramchandra9816 2 роки тому +6

    निळू भाऊ सारखा नट होणे नाही...त्यांचा प्रत्येक सिनेमा खरंच खूप सुंदर आहे...माझे आवडते नट निळू भाऊ 🥰😘❣❣

  • @pravinkini5909
    @pravinkini5909 3 роки тому +194

    अतीशय सुंदर मुलाखत. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. दूरदर्शनला धन्यवाद. 🌷🙏

  • @kriti8906
    @kriti8906 Рік тому +5

    किती सुंदर व्यक्तिमत्त्व होतं निळू फुले यांचं. खूप मोठा माणूस. आणि काय तो अनुभव असेल की शाळेमध्ये खुद्द शांताबाई शेळके मराठीच्या शिक्षिका आहेत.

  • @sids4079
    @sids4079 Місяць тому +1

    सह्याद्री चॅनेल कडे खूप मोठी आठवणींची शिदोरी आहे सह्याद्री पर्वत रांगा सारखीच एक विनंती आहे आपण ह्या सारख्या मुलाखती पब्लिक पुढे घेवुन याव्यात..... खूप लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची अनोखी ताकद अश्या लोकांमध्ये आहे... मनापासून धन्यवाद सह्याद्री वाहिनी चे....

  • @padmamanmode6394
    @padmamanmode6394 3 роки тому +8

    नीलू भाऊंच दूसर रूप बघायला मिलाली। मुलाखतमूले ।महान कलाकार चा जीवन दरशन झाल थनयवाद।

  • @prafulraut7196
    @prafulraut7196 2 роки тому +18

    साधे व्यक्तिमत्व उच्च विचारसरणी, सिनेश्रुष्टीतला इतका मोठा कलाकार इतका साधा राहतो.

  • @logical1325
    @logical1325 3 роки тому +38

    निळूभाऊ नि ग्रामीण पुढारी ची अप्रतिम भूमिका साकारली आहे

    • @amolsutar2115
      @amolsutar2115 2 роки тому

      खूप दिवसा पासून निळूभाऊ ची मुलाखत बघायची होती... उत्तम खलनायक...

  • @ashokvankar3233
    @ashokvankar3233 3 роки тому +18

    निळू भाऊ एक परीपुर्ण संस्था ! अभिनयाचं आभाळ !! शतकानुशकातून क्वचितच असे कलाकार जन्म घेतात.

  • @barinkulkarni3851
    @barinkulkarni3851 3 роки тому +24

    एक चांगली मुलाखत! मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील एक थोर कलाकार. आयुष्यात इतके मोठे यश, मानसन्मान मिळूनही किती विनम्रता आणि साधेपणा आहे.

  • @rajeprajyot1
    @rajeprajyot1 3 роки тому +39

    बाई. . . .😍😍 निळु भाऊ म्हणजे एक सच्चा कलाकार . . . . .त्यांच्या अभिनयाची छापच अशीच होती की वास्तव जिवनातही ग्रामिण भागातील आमच्या मायमाऊल्या त्याचा प्रचंड द्वेश करायच्या. . . यापेक्षा जिवंत अभिनयाची पावती कोणतीच नाही

  • @digutumwad1272
    @digutumwad1272 2 роки тому +13

    निळूभाऊ चा मला अर्धातास सहवास लाभला.हे माझं भाग्य.असा कलाकार होणे नाही.

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 2 роки тому +58

    खूपच चांगले कलाकार होते व एक व्यक्ती म्हणूनही खूप चांगले होते. Great Actor

    • @satishkhandve6439
      @satishkhandve6439 2 роки тому +3

      मला खुपअभिमान वाटतो की भाऊना मला दोन वेळा निवांत भेटता आले .त्याचा ऐक प्रंसग तर अंगावर शहारा आणारा आहे खरच नट तर खुप आहेत पण असा माणुस होणे नाही त्रीवार सलाम सह्याद्रीवर मी सतत ७ वर्ष सिरीयल केल्यात

  • @apurvmarathe7604
    @apurvmarathe7604 3 роки тому +27

    महाराष्ट्रातील जनामनाचे खरे सरपंच निळूभाऊ

  • @avinashnerurkar5784
    @avinashnerurkar5784 3 роки тому +42

    बाप कलाकार ....
    नीळकंठ कृष्णाजी फुले. (निळू फुले)

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 3 роки тому +34

    खुप गोड माणूस आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व 🙏🏻
    निळु भाऊ आपण सदैव आमच्या स्मरणार्थ रहाल🙏🏻
    जब्बार पटेलांनी सिंहासन चित्रपटांमध्ये आपल्याला जी "दिगु भाऊ" ची भुमिका दिली होती ती योग्यच होती कारण त्यांना हि माहित होते कि तुमच्या पेक्षा हि भुमिका कोणाला जमणार नाही.

    • @zunjarrao9491
      @zunjarrao9491 2 роки тому +1

      अतिशय perfect casting. 👍

    • @narayanpandhe2204
      @narayanpandhe2204 2 роки тому +1

      अगदी बरोबर आहे.🙏

  • @ShahidShaikh-tp9bc
    @ShahidShaikh-tp9bc 11 місяців тому +2

    निळू भाऊ, तुम्ही एकच होता ,
    नाही कोणी दुसरं.
    तो दरारा, ती भरदार मिशी आणि कणखर डोळे. पुन्हा होणे नाही...
    आज डोळे भरून आले. आज कळले की, आम्ही, राजा गोसावी, डॉक्टर लागू, यशवंत देव, दादा कोंडके, वी. शांताराम . नावे विरली काळात पण त्यांनी जो वारसा दिला त्याला शतशा... नमन....

  • @dhanasreetilekar3892
    @dhanasreetilekar3892 2 роки тому +35

    अफाट व्यासंगी पण कुठेही अभिमानाचा लवलेशही नाही अशी मानस परत होणे नाही किती साधेपणा निळुभाऊंनी त्यांचे आयुष्य पण खूप साधेपणाने जगले . निळूभाऊ तुम्हाला सलाम 🙏🙏🙏

    • @sachinpotdar391
      @sachinpotdar391 2 роки тому +1

      खरी गोष्ट आहे., मागे एकदा सचिन पिळगावकर यांची मुलाखत पाहिली होती त्यामध्ये सुरवातीपासून ते शेवटापर्यंत फक्त एकच वाक्य होते., मी असे केले मी तसे केले., मी असा आणी मी तसा निळू फुले यांच्या मुलाखती मध्ये फक्त वास्तव आहे आणी साधेपणा., कुठेही अहंकार दिसत नाही.

  • @vijaykudtarkar6310
    @vijaykudtarkar6310 3 роки тому +30

    खूप मोठा पण तेव्हढाच सरळमार्गी आणि पाय जमिनीवर असलेला माणूस, धन्य धन्य

  • @sunitajawale8369
    @sunitajawale8369 3 роки тому +9

    उत्तम कलाकार खूपच भयानक खलनायक पण सुंदर कलाकार असा कलाकार होणे नाही.मुलाकात एेकून. खूप आनंंद झाला. सह्याद्ीचे मनापासून आभारी.

    • @madhurinaik4732
      @madhurinaik4732 2 роки тому +1

      सुनीता किती सुंदर लिखाण आहे तुझे.

    • @sunitajawale8369
      @sunitajawale8369 2 роки тому +1

      @@madhurinaik4732 थँक्यू ताई.🙏😄❤

  • @ravimirekar8554
    @ravimirekar8554 3 роки тому +47

    खूप छान मुलाखत घेतली ग्रहस्तांनी निळू भाऊ यांचे. सह्याद्री वाहिनीचे आभार आणि मछींद्र कांबळी यांची मालीका १९९३ मधे संध्या. ७:३० ला प्रसारित होणारी *बाबल्या रे बाबल्या* UA-cam वर टाका.pls.

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 6 місяців тому +2

    निळूभाऊ फुले यांच्या बद्दल सुवर्ण मुलाखत ऐकून मन प्रसन्न झाले आहे.धन्यवाद.

  • @hunterhelsmsley7452
    @hunterhelsmsley7452 2 роки тому +6

    मराठीचा महान पुत्र आणि कलाकर .........
    निळू भाऊ सारखा कलाकार होणे नाही

  • @moviesmasti7
    @moviesmasti7 2 роки тому +9

    वाह मन तृप्त झाल किती मोठा कलाकार पण पाय जमिनीवर
    किती शांत किती साधा
    मनापासून नमन

  • @unknownguy279
    @unknownguy279 2 роки тому +8

    शांता शेळके ह्या शिक्षिका ....म्हणजे केवढी ती श्रीमंती राव !!! .जबरजस्त....!! ....शांताबाई महाराष्ट्र रत्नंच ....

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vistarakbjp0125
    @vistarakbjp0125 3 роки тому +3

    मला जेव्हा पासून नाटक पाहण्याचा छंद लागला तेव्हापासून मी निळूभाऊ च नाटक सोडलं नाही त्यातल सर्वात फेवरेट नाटक राजकारन गेलं चुलीत आजही पाहतो आमचा मराठी कलावत गमावला याची आज खंत आहे

  • @ArunGM
    @ArunGM 3 роки тому +54

    जबरदस्त व्यक्तिमत्व. अनेक गोष्टी नव्याने समजल्या . नीळूभाऊना शांता बाईंनी शिकवल आणि ईंग्र्जी सिनेमे बघीतले हे सगळ नवींन . सहयाद्रिचे मनापासून आभार

  • @rahulsawant5408
    @rahulsawant5408 3 роки тому +8

    सह्यादीचे मनापासून आभार
    आमच्या लहानपणी सहयाद्री वहिनी वरील कार्यक्रम पाहणे म्हणजे आमच्यासाठी स्वर्गसुखच होते आणि आता तेच कार्यक्रम पुन्हा पाहताना तोच आनंद मिळत आहे म्हणून सहयाद्री वाहिनेने अशा सर्व जुन्या कार्यक्रमाचे प्रसरण करावे हीच विनंती

  • @bluesky4unow
    @bluesky4unow Рік тому +7

    काय समृद्ध जीवन जगले हे आणि त्यात किती स्वभाव किती विनम्र .. सलाम !

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @65-shubhamvanjire76
    @65-shubhamvanjire76 Рік тому +2

    निळू भाऊच्या या कार्याला मानाचा सलाम तेव्हाच चित्रपट आनी अभिनय जमीन असमानचा फरक मानाचा सलाम याच्या अभिनयाला🙏🙏🙏😭😭😭

  • @sandythorat2005
    @sandythorat2005 2 роки тому +9

    निळूभाऊंना 2 वेळेस भेटलो आणि फोटो पण काढले , खूप शांत आणि सज्जन माणूस , मी लकी होतो.

  • @anilsapkal7418
    @anilsapkal7418 3 роки тому +15

    असा कलाकार होणे शक्य नाही. निळुभाऊंना माझा मानाचा मुजरा.

  • @Proud_Hindu_Sanatani
    @Proud_Hindu_Sanatani Рік тому +2

    महाराष्ट्राचे परमनंट सरपंच निलु फुले

  • @vishramacharya159
    @vishramacharya159 2 роки тому +3

    अतिशय उत्कृष्ट कलाकार, श्रीराम रानडे यांनी छान मुलाखत घेतली आहे. दोघेही जवळचे मित्र. निळु फुलेंचे अतिशय निरागस हास्य, तितकाच अतिशय प्रामाणिक पणा.

  • @zunjarrao9491
    @zunjarrao9491 2 роки тому +4

    GREATEST OF ALL ACTORS. Coments वाचतांना हे लक्षात येते की, उभ्या महाराष्ट्राला अभिमान आहे, निळूभाऊ तुम्ही आमच्यात जन्मलात. 🙏🙏🙏

  • @suhasinitulaskar7063
    @suhasinitulaskar7063 2 роки тому +34

    एक सच्चा कलाकार प्रामाणिक व्यक्तिमत्व शतशः वंदन 🙏🙏🙏

  • @Aryaofficials121
    @Aryaofficials121 Рік тому +2

    लहानपणी आमचे बालपण आनंदात घालवणारीअन आत्ता अशा मुलाखती टाकून धावपळीच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या sahyadri वाहिनीचा मी खूप आभारी आहे

  • @PallaviBehere-yv2bh
    @PallaviBehere-yv2bh 7 місяців тому +1

    मोठा आणि अत्यंत हुशार कलाकार... एवढंच म्हणेन मी 🥹.... खरंच दुसरे शब्द नाहीत.... अशा कलावंताला कोटी कोटी नमन 🙏🏻🥹

  • @pravinkamble5865
    @pravinkamble5865 2 роки тому +12

    एक सच्चा समाजवादी भाऊंना शत् शत् नमन

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @mpscgurujiibyvirajsir1175
    @mpscgurujiibyvirajsir1175 2 роки тому +34

    किती शांत संयम्मी सज्जन माहितीच भांडार होते निळु भाऊ.... Legend ❤❤❤❤

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 3 роки тому +17

    श्रीराम रानडेंनी मुलाखत मस्त घेतलीय, आभार.

  • @manishabhogade2012
    @manishabhogade2012 3 роки тому +36

    मोठा माणूस , भला माणूस , सरळ माणूस 🙏🙏🙏🙏🙏

  • @prassanajagtap5526
    @prassanajagtap5526 2 роки тому +9

    मोठा माणूस, देव माणूस
    असा कलाकार होनेच नाही.. 🙏🙏🙏

  • @aniketlokhande3187
    @aniketlokhande3187 3 роки тому +91

    The only word I have for this man "legend" अशी माणसं कधीतरीच जन्माला येतात🙏🙏

  • @vinodarsud868
    @vinodarsud868 2 роки тому +1

    निळूभाऊ मराठी सिनेमा आणि चित्रपटातील महान कलाकार होतेच. पण माणूस म्हणुन सुद्धा खुप ग्रेट होते.त्यांना समाज सेवची आवड होती. ही माणसे म्हणजे महाराष्ट्राला मिळालेली खूप मोठी देवाची देणगी होती.

  • @pankajkursange8275
    @pankajkursange8275 7 місяців тому +1

    सह्यांद्री च नाव मनात आल की बालपण डोळ्यासमोर येत सह्यांद्रीच्या खूप आठवणी आहेत धन्यवाद सह्यांद्री

  • @anilkoditkar9344
    @anilkoditkar9344 3 роки тому +71

    या महान कलाकारास कोटी कोटी प्रणाम..🙏🙏

  • @sharadgavhane5230
    @sharadgavhane5230 3 роки тому +22

    साने गुरुजी आणि महर्षी कर्वे मजेदार किस्सा 👍👍👍

  • @rajendramane932
    @rajendramane932 2 роки тому +1

    माणूस म्हणून स्वतःची जडण-घडण करत असताना अनुभवांचा इतका अफाट आणि प्रचंड खजिना जमवलेल्या या विलक्षण कलावंताविषयी कोणत्या शब्दांमध्ये भावना व्यक्त कराव्यात असा संभ्रम मनामध्ये निर्माण झाला आहे.
    निळूभाऊ कलेविषयी आस्था आणि आवड असलेला प्रत्येक माणूस सदैव तुमचा ऋणी राहील.

  • @tukaramkamble3193
    @tukaramkamble3193 3 роки тому +36

    एका प्रगल्भ नटाची व माणसाची प्रेरणादायी मुलाखत....!

  • @sharadgavhane5230
    @sharadgavhane5230 3 роки тому +86

    साधा सरळ आणि निगर्वी समाजसेवक !!💐

  • @maheshkapse9443
    @maheshkapse9443 Рік тому +4

    अजरामर व्यक्ती एक साधा व सच्चा माणूसश्री निळूभाऊ फुले आपणास विनम्र अभिवादन 🙏❤️🙏

  • @RajendraTanwade1270
    @RajendraTanwade1270 Місяць тому

    मोठा माणूस....ग्रेट ॲक्टर...निळुभाउ फुले मी आजुनही त्यांचे चित्रपट नेहमी पहातो

  • @mayurbhoite9241
    @mayurbhoite9241 Рік тому +1

    निळू फुले बाबा.. तुमचा सारखा अभिनय कोणीही करू शकत नाहीं... थोर पुरुष
    बाबा

  • @ravikadam8784
    @ravikadam8784 2 роки тому +28

    मस्तच, शरद तळवलकर, राजा गोसावी, अरुण सरनाईक, यांच्या पण मुलाखती असतील तर upload करा pls.

  • @vishalrameshtaral214
    @vishalrameshtaral214 2 роки тому +7

    निळू भाऊंच्या नावाने दिला जाणारा " नाट्यचेतना " पुरस्कार मला २०१७ मध्ये आदरणीय रमेश थोरात, अकोला काकांनी दिला.
    मात्र आज कळतयं कि ही जबाबदारी खुप मोठी आहे.
    मनापासून निळू भाऊंना अभिवादन !!!
    सलाम !!! सलाम !!! सलाम !!!

  • @22duttkhand
    @22duttkhand 4 роки тому +48

    खुप छान वाटले निळूभाऊंची मुलाखत पाहून 😊👌

  • @hakanishaikh5307
    @hakanishaikh5307 3 роки тому +32

    खरच एक समाज सेवक एक कलाकार आणि विशेष इतिहासाचा जाणकार असा महान कलाकार पुन्हा होणे नाही. निळूभाऊ फुले यांच्या कर्तुत्वाला त्यांच्या सर्व चाहत्यांचा मानाचा मुजरा. ...

  • @anna-oy1rv
    @anna-oy1rv 2 роки тому +8

    सह्याद्री हाच फक्त ऐकमेव चेनल सगळ्या कुटुंबासोबत बघण्यासारखा

  • @universalboss9216
    @universalboss9216 3 роки тому +29

    सह्याद्री वाहिनीचे मनपूर्वक अभिनंदन 🎊

  • @sandeepkalantre8609
    @sandeepkalantre8609 3 роки тому +20

    मराठी मधला खलनायक अणि आता मुलाकात बगतन साधा मानुस
    ग्रेट एक्टर

  • @amy007us1
    @amy007us1 2 роки тому +5

    किती साधा आणि निर्मळ मोठा माणूस, निळू भाऊ.

  • @rakeshshirsat4016
    @rakeshshirsat4016 3 роки тому +32

    हा माणूस होता की जिवंत इतिहास.

  • @coomarz
    @coomarz 3 роки тому +9

    ह्या सदगृस्थाशी मला फार थोडा काळ संबंध आला. माझ्या काकांचे ते मित्र होते, त्या निमित्ताने माझी त्यांची ओळख झाली होती. वयाने वडिलांच्या वयाचे असून सुध्दा त्यांनी जी मित्रत्वाचे नाते जपले व खूप प्रेम दिले. त्यानां देशाच्या स्वातंत्र्य चळवळी विषयी बोलतांना, फार कमी लोकांनी ऐकलय. त्या विषयावर भयंकर पोटतिडकीने बोलायचे. त्या काळातील अनेक घटना त्यांना मुखोद्गत होत्या. स्वभावाने अतिषय शांत व भिडस्त माणूस कित्येक लोकांना मदत केलीय, खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, खूप किस्से आहेत...खरंच फार मोठा माणूस...🙏🏻

  • @abcstarvlog
    @abcstarvlog Рік тому

    निळू फुले हे परिवर्तवादी होते बाळासाहेब आंबेडकर यांना निळू भाऊंनी खूप मदत केली

  • @deepakdeepak9505
    @deepakdeepak9505 2 роки тому +5

    महान कलाकार तितकाच जमिनीशी घट्ट नात असणारा उत्तम नट आदर्श वत व्यक्तिमत्त्व निळू भाऊ

  • @universalboss9216
    @universalboss9216 3 роки тому +317

    मुलाखत कशी घ्यायची ती ABP माझाच्या खांडेकरांनी ह्या गृहस्थाकडून शिकून घ्यावं

    • @himanshukholay8093
      @himanshukholay8093 3 роки тому +31

      खांडेकर मूर्ख माणूस आहे

    • @umeshmaradwar1734
      @umeshmaradwar1734 3 роки тому +11

      Yanchi todis tod koni nahi sajan satvik manusn doghehi

    • @ruralmaharashtra8043
      @ruralmaharashtra8043 3 роки тому +17

      मी वाट बघतोय हे आक्रतेपणा करणारे चेनेल कधी बंद होतात
      मी आजच नाही तर नेहमी मोबाईलवर असतो अस शांत मुलाखती बघायला

    • @universalboss9216
      @universalboss9216 3 роки тому +2

      @@ruralmaharashtra8043 चांगली गोष्ट आहे

    • @madhurinaik4732
      @madhurinaik4732 2 роки тому +9

      @@himanshukholay8093 हो अतिशय मुर्ख खांडेकर आहेत.